...तू (विड्म्बन)

Submitted by मी मुक्ता.. on 8 December, 2010 - 03:34

कौतुक शिरोडकर यांची क्षमा मागून...
मूळ गझल इथे वाचा...
http://www.maayboli.com/node/15178

बोलशी खोटे जरी तू
मागचीपेक्षा बरी तू...

तू न मुन्नी, तू न शीला..
साक्षात मल्लेश्वरी तू...

स्वप्न बघतो नित्य सुंदर..
ती खोटी, का खरी तू?

चिंतीशी वाईट माझे..
भार्या न, वैरी तू...

समजलो मी डाळखिचडी,
मिसळीवरची तर्री तू....

बघ नको, बागेत भेटू
सरळ ये ना घरी तू...

गुलमोहर: 

छान Happy

हा माझा झब्बु Happy

बोलशी मोठे जरी तू
नेहमीच बाता मारी तू...

तू न शहाना, तू न हुशार..
साक्षात वेड्याचा बाजार तू...

स्वप्नात दिसतो खुप सुंदर..
समोर येता, अगदी सुमार तू?

नेहमीच करतो पाठलाग माझे..
गार्ड न, गुप्तचर तू...

समजले जरी सिंह तुला,
निघाला भितरे मांजर तू....

बघ नको, बागेत थांबु
सरळ जा ना घरी तू...

सर्वांचे खूप आभार... Happy इथे आलेले प्रतिसाद बघता कालपासून प्रतिसादाच्या प्रतीक्षेत असलेला माझा romantic लेखाचा प्रयत्न फसल्यासारखा वाटतोय मला.. Lol
http://www.maayboli.com/node/21718

पण मायबोलीवरच्या पहिल्याच दिवसातील प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार..

@वर्षा..
मस्तच.. Happy

@अमित,
धन्यवाद.. Happy

@ह.बा.
महत्वाची ओळ आवडली म्हणायची... Lol

मस्त !!! अभिनंदन...! विडंबनाचा "विंबल्डन" कप जिंकलास तू ..! Lol