एका डॉक्टरच्या कविता-6 :व्यथा

Submitted by डॉ अशोक on 15 October, 2010 - 10:44

एका डॉक्टरच्या कविता-6 : व्यथा

फिनेल स्पिरिटच्या वासांनी
नाकाला घेराव केले
वेदनेच्या आकान्तांनी
कान सुद्धा बधीर झाले

रो़ज रोज मरण बघून
डोळे सुद्धा कोरडे झाले
मित्रांचं तर जावूच द्या
अश्ररू सुद्धा गद्दार झाले!

- अशोक

गुलमोहर: 

रो़ज रोज मरण बघून
डोळे सुद्धा कोरडे झाले
मित्रांचं तर जावूच द्या
अश्रू सुद्धा गद्दार झाले!

हे खूप सत्त्य आहे

छान वाटली छोटीशी कविता .