गूढ कथा : कालग्रहांचे भविष्यआरसे (भाग-६)- शेवट

Submitted by निमिष_सोनार on 19 September, 2010 - 21:52

२०१२ साली सगळे जग नष्ट होणार असे माया सभ्यतेच्या लोकांनी सांगून ठेवल्यामुळे आणि प्रसार माध्यमांनी त्याला अवाजवी प्रसिद्धी दिल्याने सगळ्या जगावर भीती चे सावट पसरले होते. भूकंपांचे, ज्वालामुखींचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे ते सर्वांना खरे होईल असे वाटत होते. २०१२ च्या त्या तारखेला मात्र प्रत्यक्षात काहीही झाले नाही. मात्र राहुलला भारतात उत्खननात सापडलेल्या त्या कालग्रहांच्या भविष्य आरश्यांवर दाट विश्वास होता. त्याचा वैज्ञानिक मित्र डॅन याने त्याला अमेरिकेत बोलावले. अनेक ज्योतिषी लोकांनाही पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यांना गुप्ततेचे आव्हान केले गेले होते.

अमेरिकेत एका गुप्त ठीकाणी उभारलेल्या वैज्ञानिक संशोधन केंद्रात सर्व २०१३ साली वैज्ञानिकांनी एक अभूतपूर्व शोध लावला होता. जग नष्ट झाले तरीही त्या शोधाचा उपयोग होणार होता- प्रलयापासून वाचण्यासाठी. एक असा शोध जो २०१० सालात सगळ्यांना स्वप्नवत वाटला असता. वस्तुमानाचे रेडीओ लहरीत रुपांतर. एखाद्या जीवंत माणसाला रेडीओ लहरींमध्ये रुपांतरीत करुन रेडीओ लहरी अवकाशातल्या गुप्त स्पेस स्टेशन मध्ये पाठवून पुन्हा त्याला मुळ रुपात आणायचे. मग त्याला ग्लोबल व्हेरीएबल म्हणायचे. पण एका खास मशीनद्वारेच ते शक्य होते. सामान्य माणसांपासून आणि इतर सरकारी वैज्ञानिक संशोधन केंद्रांपासून अतिशय गुप्तपणे हे केंद्र उभारण्यात आले.

मग कालग्रहांच्या भविष्य आरश्यांबद्दल संशोधन सुरु झाले, कालग्रहांच्या पुढच्या काळातल्या पृथ्वीवर जाणेही शक्य झाले. राहुल त्यातला पहिला प्रयोग. डॅनने राहुलला २०२२ सालच्या कालग्रहावर (पृथ्वीवर) पाठवले आणि २०१३ चा डॅन २०२२ च्या राहुलशी सम्पर्क साधू शकला. राहुल जवळ असलेल्या अतिवेगात्मक रेडिओ लहरी पाठवण्याच्या तंत्रामुळे तो त्याद्वारे २०२२ सालाची दृश्ये २०१३ साली बघू शकला.

अति सामर्थ्यवान अशा त्या अनेक मंगळ प्रभावीत बालकांनी राहुलची गाडी उचलून हवेत भिरकावून दिली. शक्य तितके २०२२ सालाच्या पृथ्वीचे रस्त्यावरचे व्ही.डी. ओ राहुलेने तोपर्यंत २०१३ मध्ये ट्रान्स्मीट केले होतेच. आता वेळ होती बटण दाबण्याची. गाडी हवेत गटांगळ्या खात होती. पण राहुलने ते बटण दाबले. कारण २०२२ साली आता जास्त मुक्काम करण्यात अर्थ नव्हता. मात्र कालग्रहांचे भविष्य आरसे खरे आहेत हे मात्र सिद्ध झाले होते. तेवढे तात्पुरते पुरेसे होते. राहुल रेडीओ लहरींत रुपांतरीत झाला.

गादी रस्त्यावर आदळून दूरवर फरफटत गेली. आणि गाडीने पेट घेतला.

२०१३ सालच्या कालग्रहावर राहुल परतला.

राहुलचे स्वागत झाले. राहुअलने आपले अनुभव सगळ्यांशी शेअर केले.

काही दिवसानंतर..

राहु: "मला एका गोष्टीचे वाईट वाटते. कुणाच्याही डोळ्यात काही वेळाकरता इमेज टाकण्याचे ते यंत्र मात्र गाडीसोबत नष्ट झाले..."

डॅन म्हणाला : "ते पुन्हा बनवता येईल. पण राहु, एक सांगू? एक मस्त कल्पना आहे. कालग्रहावरच्या आणखी का ठीकाणी जातोस का? "

राहु: "कुठे?"

डॅनः "साधूने पाहिलेल्या अनेक जगांपैकी हे एक जग. तेथे फक्त आणि फक्त शुक्र ग्रहाचे राज्य आहे. नऊ शुक्र ग्रह. आणि एक चंद्र. बस्स! ?"

राहु :"कसे असेल ते जग? सौंदर्याने ओतप्रोत भरलेले, सगळीकडे शांतता असलेले? की आणखी वेगळे? "

डॅन : "ते तेथे गेल्यावरच कळेल. "

राहु: "तेथे आपण दोघे जावूया... पण मी एक सांगू का? हे सध्याचे जगच चांगले आहे. जगात सगळे काही आवश्यक आहे. सगळ्या ग्रहांचे सगळ्या प्रकारचे गुणधर्म आवश्यक असलेले लोक असावेत. नाहीतर..."

( समाप्त )
- निमिष सोनार, पुणे

गुलमोहर: 

संपली???????????????????????????????
हा तुमचा पहीलाच प्रयत्न होता का?
मला तर कळालीच नाही कथा....
का मी २०२२ सालात आहे???

२०१२ ला जग नष्ट न झाल्याने २०१३ सालच्या त्या वैज्ञानिक गुप्त शोधाचा उपयोग २०२२ सालच्या कालग्रहावर राहुलला पाठवण्यासाठी झाला. तेथील व्ही.डी.ओ. २०१३ साली डॅन ला पाठवून तो २०१३ साली परतला.

छान लिहिली होती. थोSSSSडी अजून रंजक बनवता आली असती असे वाटते. लवकरच संपली असेही वाटले. पुलेशु.

आनंदा,
या कथेतल्या २०२२ सालानंतर नक्कीच माणसे एकमेकांत लढून नष्ट झाली असतील. काही उरलीही असतील... वैराग्य आलेली सन्यासी...
ते कल्पनारंजन वाचकांवर मी सोपवतो आहे.
तसेच सगळीकडे शुक्राचे राज्य असलेले जग कसे असेल याची कल्पना करून पाहा...

आपल्या सगळ्यांच्या सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद.
यामुळे लिहिण्यास प्रेरणा मिळते.
लेखनात आणखी सुधारणा होते.
पुन्हा एकदा धन्यवाद.

,