पुण्यातले पुणेकर

Submitted by admin on 1 April, 2008 - 18:43
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे व्हायचं ते होतच राहणार >>> हो यार! त्या हतबलतेचंच दु:ख आहे बहुधा.
तिथून जिथे आलो त्याची पण री development ची वेळ आली आता >>> खरंय.

यातला संदर्भ माहीत नाही >>> फा, वरची साजिराची घाशीराम वाली पोस्ट वाच. Happy

लंपन, छान पोस्ट.

हे असं वाड्यात राहणं वगैरे कधी झालंच नाही त्यामुळे मला रिलेट नाही करता येत आहे. पण गावचं घर पाडलं तेव्हा वाईट वाटलं होतं - मी कधी त्या घरात राहिले नसले तरीही.

यातला संदर्भ माहीत नाही तोपर्यंत नुसते पोकळ हसून घेतो. >> कशाला,हेच पान पुन्हा वाच Wink
आता किती लोकांना कळणार म्हणून तुझा उल्लेख "_डी" असा न करता "आशूडी" केला तेव्हाही मला इथला एक जुना वाडा पडल्यासारखे वाटले >> काय लिहिलंस! नको की मग, _डी च लिही. आवडते मला ते. ज्याच्या मागे कथा कहाण्या आहेत ते सगळंच सुरस वाटते अजूनही.

दुःख त्या वयापर्यंत दुसरे कुठले वाट्याला आलेच नव्हते कदाचित.> हो नक्कीच. वाडा पडायच्या आधी आणि घर सोडल्यावर एकदा जाणं झालं होत. पूर्ण घरात गवत उगवले होते. दिवाणखान्याची, स्वयंपाक घराची, ओसरीची अशी दयनीय अवस्था.. Sad

उतरायला आमचे घर वाड्यात नव्हते पण मी सपे मधे आत्याकडे इतका राहिलो आहे की सगळे तितकेच माहीत आहे.>> यावर लिहायचे होते पण पुढच्या तुझ्या वाक्याने नवाच नॉस्टलजिया जागा झाला आणि राहिले.
जजमेंटल नाही रे, पण काही फार बेसिक प्रश्न असतात त्या त्या ठिकाणचे आणि ते असे भरभर उघड नाही सांगता येत. नुसतेच वाडे चिरेबंदी असतात पण पुढच्या पिढ्या छंदी ऐतखाऊ निघाल्या असेही असते. कसब्यात तर प्रत्येक वाड्यात एक तरी वेडसर किंवा अपंग माणूस सापडायचाच. कसला तरी शाप लागून पडे पर्यंत उभे राहायची शिक्षा भोगत आहेत ते वाडे असे वाटायचे. जीव गुदमरून जायचा. अजूनही जे वाड्यात राहतात त्यातले नव्वद टक्के केवळ नाईलाज म्हणून, अशी मला खात्री आहे.

हेरिटेज हे भरल्यापोटंचे उद्योग आहेत हे अगदीच खरं. आणि ते बक्कळ पैसे असलेल्यांनीच (ते ही इच्छा असेल तर) + आणखी पैसे कमवायला किंवा सरकारने स्वखर्चानेच उत्पन्नाचे साधन म्हणून करावे. त्यातुन उत्पन्न (किमान खर्च) येणार नसेल तर जपणे शाश्वत कसं काय असेल? एखाद पिढी जपेल पुढे काय? आणि मनात नसेल तर का जपावं?
त्यापेक्षा नवं करावं काही. जुन्याचा सोस बास झाला. आपली परंपरा फक्त आत्ता उभ्या असलेल्या इमारती आणि जिवंत असलेल्या माणसांपुरतीच. एकदा माणूस गेला की किती का महान असेना! फार किम्मत नाही त्याला.

बाकी मला पण फुकटचे फोटो बिटो काढायला आवडतात. तिकिट लावून कोणी दाखवलं तर जाईन एखाददा किंवा नाही पण जाणार.

हॅलो. आमचा वाईचा २५० वर्ष जुना वाडा अजूनही रहाता आहे. जातो तिथे कधीतरी रहायला. तिथे छत्रसाल आले होते, अण्णासहेब कर्वे आले होते, भाउसाहेब पाटील आले होते :). आता तिथे कुणी कायम रहात नाही. नंतरचे रहाण्याची शक्यता दूरान्वये नाही. माझ्या वडिलांनी आणि नंतर चुलत भावाने संभाळलं. अजून २५-३० वर्षानी वाड्याशी आतून भावनीक नातं अस्णारं कोणीच नसणार. सगळेच बघे आणि प्रवासी. काय करणार. लिहिताना सुद्धा डोळ्यात पाणि येतय. असो.

पण वाईचे १०० जुने वाडे हे गेल्या १० वर्षात पडलेत. माझ्या लहानपणीची वाई आता दिसत नाही जेंव्हा रस्ता फक्त चालणा-यांसाठी होता. आता ट्राफिक जाम असतो. जावसच वाटत नाही.

आशुडी फा ला पुपु वाडा पण पडायला आलाय अस म्हणायचं होत बहुतेक. Happy
म्हंणतात ना, हवेलीकी उम्र सौ साल.

सिओईपी ची मेन बिल्डिंग सुद्धा १८६५ सालची ब्रिटीश शैलीतील वरील फोटोंवरून आठवणारी आहे. पण मऊ वगैरे काही वाटायची नाही.

'लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते' Happy
आपल्याला आपल्या लहानपणचं, जुनं गाव/शहर हवं असतं. पण ते तसं राहणं प्रॅक्टिकल नसेल तर ते बदलणार. माझं खेडेगाव माझ्या लहानपणी माणसांनी भरलेलं होतं, आता रिकामं आहे. सणासुदीला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत काही दिवस लोक मुंबईहून गावाला येतात तेवढंच. जुनी घरं, शेणाने सारवलेली अंगणं गेली. शेतं ओसाड झाली. नवीन घरं चांगली चकाचक आहेत, अंगणात फरशी आहे. कुठेतरी जुनं गेल्याची खंत वाटते.पण आपण स्वतः तिथे कायमस्वरूपी रहायला तयार आहोत का, म्हणजे तसं राहणं प्रॅक्टिकल आहे का, असा विचार केला की खंत वगैरे वाटत नाही. त्यापेक्षा जे आहे, जसं आहे त्यात आनंद घ्यावा.
सीओईपीच्या इमारती मलाही मऊ वगैरे वाटायच्या नाहीत. Happy उलट परक्या वाटायच्या. बंद पडलेली घड्याळं वाटायची ती.

विषयांची सरमिसळ झाली. मी, चिन्मय, फारेंड इ. म्हणतोय ते वेगळं आहे.

मलाही सोयी संपलेल्या जुन्या वाड्यांत पाणी उपसावं लागलं, सेंट्रल बिल्डिंग्स मध्ये रोज कारकुनी करावी लागली, जीपीओ मध्ये पार्सलांवर शिक्के मारावे लागले किंवा COEP मध्ये रोज रुक्ष विषय शिकावे लागले तर अजिबातच मऊ उबदार वाटणार नाही., आणि त्या दगडी इमारतींत गंधांचे आणि उजेडा-अंधाराचे खेळ आकर्षक वाटणार नाहीत.

गप्पांच्या ओघात विषय निघत जातात, मुद्दे येत जातात- ते ठीकच आहे.

कसब्यात तर प्रत्येक वाड्यात एक तरी वेडसर किंवा अपंग माणूस सापडायचाच.>>> हे त्रब्यकेश्वर बाबत पण सान्गतात की घरटी एक वेडा,अपन्ग किवा मोठ्ठा आजार असलेली व्यक्ती आहे..तिथेच कालसर्प्,नारायण नाग बळी वैगरे विधी होतात..त्यामुळे आहे अस म्हणतात...खर खोट महादेव जाणे.
माझी मावशी शनिवारात राहायची तेव्हा वाड्याचा एन्ट्र्सच तसाच ठेवुन आत बिल्डिन्ग बान्धलेली , वर्तक तपकिरी कारखाना जवळ..त्याआधीही मावशी वाड्यातच राहायची.
नाशिकमधेही खुप जुने वाडे आहेत...जुन्या नाशिक मधे अजुनही काही चान्गल्या अवस्थेत असलेले आहेत.
बाकी जुन्या जिर्ण वास्तु साभाळण भयकर जिकिरिच होत पुढच्या पिढिला याबाबत अगदी सहमत..आमच गावच मन्दिर आणी घर आता खुप जिर्ण झालय..मधे दोनदा दुरुस्ति केली..नवरा आणी दिर ही आठवी पिढी बाकी कुणीही अ‍ॅक्टिव्हली बघत नाही.

कोतवालाचा वाडा बघायचाच असा चंग बांधून गेलो.> मी पण अशीच शोधत गेले होते. भलतिकडुन आहे त्याची एंट्री. नेते तुला हवतर Happy

हेल्लो ऑल!

अमाच्या निमित्ताने मायबोलीवर आले. पुपु पार तिसऱ्या पानावर सापडला. कसे आहात सगळे?

अमितव, यंदा भारतवारी झाली की नाही? तेरा कुच सामान हमारे पास (दो सालों से) पडा है!

09516D98-8531-478E-91A2-2CB8D7606149.jpeg

ते बाकी सगळं ठीक आहे पण "पुणे म्हणजे प्रेम"? काहीही सांगत होते रागाला. पुण्याची ही बदनामी थांबवा!

पुपुकर निद्रिस्त झाल्याने असे होत आहे.

Lol हो पुण्यात जेन झी चा अर्थ वेगळाच होईल Happy

श्र - हो आजकाल मेट्रोमुळे झेड ब्रिजचे एकदम पॅनोरामिक व्ह्यू मिळत असतील.

झेड ब्रिज आणि जेन झी हे कनेक्शन भारी आहे. झेड ब्रिज अजूनही लोकप्रिय आहे का?
(पुलंनी कुठेतरी लिहिलंय की नेमकी गंजलेली टाचणी टोचावी तशी एखादी आठवण नेमकी येऊन टोचते. तसं मला वरचं वाक्य लिहिताना राजवाडे अँड सन्समधला 'पर्वती आहे का रे अजून?' हा अचाट प्रश्न आठवला)

राजवाडे अँड सन्समधला 'पर्वती आहे का रे अजून?' हा अचाट प्रश्न आठवला >>> Lol हो तो जेन Zzzzz असावा. त्याला "पर्वती कुठे जात नाही आणि आजकाल लोक सोशल नेटवर्क्स वर भारतातील माहिती अधूनमधून काढत असतात परदेशात असताना सुद्धा" असे सांगायला हवे होते कोणीतरी.

पण लोकप्रिय आहे का प्रश्न व्हॅलिड आहे. अंकल लोक मेट्रोमधून फिरू लागल्यावर वरून सगळे दिसत असताना मुले तेथे बसायला अजून उत्सुक आहेत का बघायला पाहिजे Happy

अंकल लोक मेट्रोमधून फिरू लागल्यावर वरून सगळे दिसत असताना
<<<<<< अंकल लोक अगदी शेजारून दुचाकीवरून जात असताना जे लोक नाही डिस्टर्ब झाले ते विहंगमावलोकन करणाऱ्या मेट्रोच्या बंद डब्यातल्या अंकलना काय धूप घालतील?

हो तो जेन Zzzzz असावा
<<<<<<< Lol

हो जनरल अंकल लोकांची फिकीर करणार नाहीत पण मेट्रो मधून त्यांचेच आईवडील, or worse, भोचक नातेवाईक असतील तर? Happy

त्यांचेच आईवडील, or worse, भोचक नातेवाईक असतील तर?
<<<< Lol काहीही प्रॉब्लेम नाही. मेट्रोमधल्या भोचक कुसुकूंनी 'बापटांची विजू काय रे ती?....' म्हणेपर्यंत मेट्रो बालगंधर्व पूल ओलांडून जाईल.
शिवाय अजून पुण्यातल्या मुली तो विशिष्ट पद्धतीने स्कार्फ बांधायला विसरलेल्या नाहीत.

मेट्रोमधल्या भोचक कुसुकूंनी 'बापटांची विजू काय रे ती?....' म्हणेपर्यंत मेट्रो बालगंधर्व पूल ओलांडून जाईल. >>>> Lol मला जुन्या गोलमाल मधला उत्पल दत्त आठवला. पाहिल्यासारखे तर वाटत आहे पण नक्की नाही. या सगळ्यांना त्यातल्या लक्ष्मणप्रसाद "लकी" सारखे अवतार बदलून वावरता येईल. मुलींना चालबाज मधला डबल रोल असल्याचे भासवता येईल.

हो पुणेरी स्कार्फियार्की स्मॅश करायला रागाला वेगळी सभा घ्यावी लागेल.