|
ट्रेनने सी एस टी स्टेशन अलगद सोड्लं. धावपळिच्या वेळेला बिगीबिगीन पळणारी ती ट्रेन आता मात्र अगदी सावकाश चालली होती. रत्रीचे साडेअकराअ वाजून गेले होते. लेडीज डब्यामधे तर मोजून तिघी चौघी जणी होत्या. आणि एकटा पोलीस. सर्वात भितीदायक तोच वाटत होता. सगळ्यात शेवटी पूजा चढली. ट्रेन जवळ जवळ चुकलीच असती. णेमकी खिडकीची जागा मोकळी होती. ढापकन ती तिथे येऊन बसली. आता पनवेलपर्यंत निवांत. तिच्या समोरच एक २५-२६ वर्षाची मुलगी बसली होती. जीन्स, कुर्ता आणि शाल घेऊन. नाकात नथनी. आणि कानात मोठ्या रिंगा. “गावाकडे आली तर लोक बंजारनच म्हणतील,” पूजा तोंडातल्या तोंडात पुटपुटली. त्या मुलीचं अर्थात लक्ष नव्हतं. ती कानात रेडिओ घालुन बसली होती. पूजाने बॅगमधून फ़ाईल काढली. ऊद्या बॉसला रीपोर्ट द्यायचा होता. आठवड्यामधे ही तिने मिळवलेली पाचवी पॉलीसी होती. अजून एक पॉलिसी आणि तिला कंपनीतर्फ़े मोबाईल मिळाला असता… शिवाय स्टार एंप्लोयी पण. या कंपनीमधे लागून तिला अवघ एक महिना लागला होता. बॅंकेची इन्शुरन्स पॉलीसी लोकाना घ्यायला लावायची हे प्रमुख काम. सुरुवातीचे पंधरा दिवस ट्रेनिंगमधे गेले आणि नंतर मात्र तिने धडाधड प्रगती दाखवली होती. शर्मासराच्या मते ती खूपच vulnerable होती, म्हणून कस्टमर तिचं पटकन ऐकायचे. म्हणजे नक्की काय ते तिच्या अजून लक्षात आलं नव्हतं. मोडकं तोडकं इंग्रजी आणि हिंदी फ़िल्म्सवर वाढ्लेलं हिंदी. मराठी मात्र तिचं चांगलं होतं. एवढ्याच बळावर तिला ही नोकरी मिळाली होती. फ़ाईलमधून तिने कागदपत्रे नीट लावायला सुरुवात केली. समोरची मुलगी तिच्याकडे बघत होती. पूजा तिच्याकडे बघून हसली. ती मुलगी पण हसली. Fआईल पिशवीत ठेवता ठेवता पूजा थबकली. इतके दिवस तिने डाटाबेसमधल्या लोकाना कॉंटॅक्ट केला होता. ज़्यानी या आधी एकतरी पॉलिसी घेतली आहे अशाना ती भेटली होती. पण पूर्णपणे अनोळखी व्यक्तीला तिने कधीच पॉलीसी विकली नव्हती. ंउलगी चांगल्या घरातली वाटत होती. नोकरी वगैरे करणारी असेल. काय हरकत आहे प्रयत्न करायला. तिच्याकडे टाईमपासला रेडिओ तरी आहे. आपल्याकडे तो पण नाही. ऍक तासभर टाईमपास करून घेऊ या, परत एकदा त्या मुलीकडे पाहून पूजा हसली.
|
हाय" पूजा म्हणाली. "थंडी आहे ना आता जरा.." वाक्य बोलल्यावर तिला चूक लक्षात आली. ट्रेनिंगचा पहिला रूल तिने मोडला होता. मुलगा मराठी होती का नाही हे तिला माहीत नव्हतं. त्या मुलीने कानातले हेड फोन काढले. "येस?" "आज ठंड बहोत है ना?" चूक झालीच नव्हती.. "हो.. थंडी आहे. अजून शिवडी गेलं की अजून जाणवेल." त्या मुलीने हसून उत्तर दिलं. "बाय द वे मी पूजा देशमुख." पूजाने तिला कार्ड काढुन दिलं. "शॅली.." तिने कार्ड घेता घेता सांगितलं.. "तुम्ही जॉब करता?" पूजने विचारलं. "नाही. मी पैसा कमावण्याचा धंदा करते," तिने कार्ड स्वत्:च्या पर्समधे ठेवलं. पूजा नुसतीच हसली. "शलाका मीडीयासाठी काम करतेस तू? पनवेलला ऑफ़िस मग इतक्या रात्री व्हीटीला काय करते?" तिने विचारलं. "मी इन्शुरन्स एजंट आहे. तुमची काही हरकत नसेल तर मी तुम्हाला आमच्या पॉलीसी विषयी सांगु का?" पूजाने विचारलं.. "हं.. पॉलीसीविषयी?? का बरं? तू मला का सांगणार?" शॅलीने पूजाकडे बघत विचारलं "तुम्हाला आमची पॉलिसी घ्यायला नक्की आवडेल. एक लाखाच्या पॉलीसीसाठी तुम्हाला फ़क्त.." "एक मिनिट थांब.. तुझी निरर्थक आकडे मोड माझ्या डोक्यावरून जाते. खूप एजंट येतात असे पॉलीसी विकायला. मी हाकलवून देते त्याना... आता तुला तर मी ट्रेनमधे हाकलवू शकत नाही.. पण प्लीज मला ती बड बड ऐकवू नकोस.." एखाद्याने थाडकन थोबाडीत मारावंसं पूजाला वाटलं. इतका तिचा अपमान आतापर्यंत कुणीच केला नव्हता. ट्रेनिंगमधे असे नमुने भेटतील हे सांगितलं होतं. शिकवलं होतं. पण असा सामना होईल हे मात्र वाटलं नव्हतं. तिचे डोळे भरून आले. ट्रेन झुक झुक चालली होती. तिने खिडकीमधून बाहेर पाहिलं.. "घरी कोण कोण आहे तुझ्या?" शॅलीने विचारलं. पूजाने काहीच उत्तर दिलं नाही. "ओह,, राग आला तुला.. पण सॉरी, ते इन्शुरन्स वगैरे सोडून बाकी काहीही बोल एवढंच म्हणायचं होतं." "बाकी काय बोलणार?" पूजाने फ़णकार्यात उत्तर दिलं. "का? जगामधे संवाद साधायला ही पॉलीसी सोडून कैक विषय आहेत... " शॅली हसून म्हणाली. पूजा काहीच बोलली नाही. "नवीन आहेस ना.. जुनी झालीस की समजेल तुला. आता तुझ्या लक्षातही येणार नाही. पण कधीतरी तूपण त्या लाखो अजंटसारखी यांत्रिक होशील. आधी कस्टमरला आपलंसं करयचं. त्याने वाटलं तर तो पॉलीसी घेईल नाही घेतली तरी वईट वाटून घ्यायचं नाही.. वगैरे वगैरे ट्रेनिंगम्धे शिकवतात ना सर्व.. इतक्यात विसरलीस?" "तुम्ही पण याच क्षेत्रात आहात का?" "नाही.. मी कुठल्याच क्षेत्रात नाही." शॅलीने पाठी सीटला टेकत उत्तर दिलं.. बहुतेक ती दारू प्यायलेली असावी... पूजाला वाटून गेलं.
|
Akhi
| |
| Tuesday, November 27, 2007 - 11:10 am: |
| 
|
सुरवात intersting आहे. खर तर हा हावरट पणा पण next post कधी?
|
नेहेमी सारखेच, नन्दिनी! सुरुवात जानदार आहे अन पुढचा भाग कधी येतोय ही उत्सुकता लावणारा आहे! लवकरच तुझे लिखाण वाचायला मिळेल ही अपेक्षा.
|
सही आहे..विषय एकदम वेगळा आहे....
|
चलो नंदु.. आगे बढो जल्दी जल्दी
|
Itgirl
| |
| Wednesday, November 28, 2007 - 5:26 am: |
| 
|
नंदू, मस्त सुरुवात, चल लवकर येऊदेत पुढचे पण
|
Abhijat
| |
| Wednesday, November 28, 2007 - 6:22 am: |
| 
|
आधी शब्द आणि नंतर संवाद! ज्ञानेश्वरांच्या "शब्देवीण संवादु दुजेवीण अनुवादु" ची आठवण आली. आता तिस-या कथेचं नाव अनुवाद ठेवा ;)
|
Anaghavn
| |
| Wednesday, November 28, 2007 - 9:02 am: |
| 
|
नन्दिनी, छान वाटलं. आणि ऊत्सुकता पण वाढली. वाट बघतेय. अनघा
|
Ramani
| |
| Thursday, November 29, 2007 - 5:13 am: |
| 
|
नन्दिनी, छान सुरुवात. तुम्ही नवीन कथा लिहायला घेतलीत, पण जुन्या रेहानचे काय? या महिन्यात दोन्ही कथा पुर्ण वाचायला मिळतील अशी अपेक्षा करायची का? तसे झाले तर मेजवानीच.
|
Akhi
| |
| Thursday, November 29, 2007 - 7:00 am: |
| 
|
fully agreed Ramani next post???
|
शिवडी स्टेशन आलं होतं.. कुणीच चढलं नाही. कुणी उतरलं नाही. "टेल मी वन थिंग. तू हे काम का करतेस?" शॅलीने तिला पुढे येत विचारलं. "कारण मला पैसे मिळतात. नोकरी आहे माझी.." शॅली एकटीच जोरात हसली. "हसायला काय झालं??" खरंतर आता पूजाला तिचा राग आला होता. समजते काय स्वत्:ला ही मुलगी? "नोकरी... पैसा.. खूप महत्वाच्या असतात ना या गोष्टी," "हो," पूजाने तुटकपणे उत्तर दिलं. "ह्म्म.. काश.. काश मी पण नोकरी केली असती.. छोटीशी असलीच. इन्शुरन्स विकायचा. नाहीतर भाजी विकायची.. ओह नो.. भाजी विकायची म्हणजे परत धंदा केल्यासारखं..." पूजा काहीच बोलली नाही. तितक्यात व्हायोईनची एक मस्त धुन वाजली..."अगर तुम न होते.." शॅलीने पर्समधून मोबाईल काढला. आणि नंबर पाहिला. कितीतरी वेळ्मोबाईल वाजत राहिला.. पूजा खिडकीतून बाहेर बघत होती. शॅली तिच्याकडे बघत होती. पण नजर मात्र शून्यात असल्यासारखी. मोबाईल वाजायचा थांबला. "मी वाजवलय.." "काय?" पूजाने विचारलं. "हे जेगाणं ऐकलस ना ते मी वाजवलय. व्हायोलीनवर." "तुला वाजवता येतं?" "लहान्पणापासोनच. आधी खूप आवडायचं. आता जमतच नाही." काहीतरी बोलावंसं पूजाला वाटलं.. पण उगाच ती परत तिरसटासारखं काईतरी बोलेल असं तिला वाटून गेलं. "किती पॉलीसी विकल्या आतापर्यंत?" "या आठवड्यामधे पाच." "गूड. व्हेरी गूड." "तुमचा इन्शुरन्स आहे," पूजाने विचारलं. "नाही. कधी करावासा वाटलाच नाही." "का?" "कुणासाठी करू? मी मेल्यावर कुणलाही कसलाही फ़यदा होआर नाही. आहेच कोण इथे फ़ायदा करायला?" "आई बाबा?" "आई मी चार वर्षाची असताना गेली. बाबा नुकतेच.. मागच्या वर्षी गेले." "ओह आय ऍम सॉरी.." "आह.. मझे आई वडील नाहीत त्यात तुला वाईट वाटायचं काहीच कारण नाही. इट हॅपन्स" "लग्न वगैरे.." शॅली परत एकदा हसली. पलीकडच्या पोलीसाने उठून पाहिलं/ "इथे मरायला वेळ नाही तर लग्नाला कुठून असणार?" पूजा काहीच बोलली नाही. "आय ऍम नॉट जोकिंग. गेल्या दोन तासापासून वाशीच्या खाडीत उडी मारेन म्हणतय. पण हे काम.." परत व्हायोलिन सुरू झालं. "पाहिलंस?" पूजा मनोमन हसली. शॅली सारखे लोक रोज तिला भेटत होते. नव्हे, यानंअतर अजून भेटले असते. स्वत्:च्या दु:खाची दर्दभरी कहाणी सांगणारे. स्वत्:च स्वत्:ला खूप महत्वाचं भासवणारे.. आणि प्रत्यक्षात कुणाच्याच खिजगणतीत नसणारे. शॅलीसारखे.
|
Akhi
| |
| Friday, November 30, 2007 - 4:22 am: |
| 
|
छान पण जरा लवकर मिळाल तर अजुन मजा येइल
|
Arc
| |
| Friday, November 30, 2007 - 6:27 am: |
| 
|
one guess, she is prostitute,pahilya post pasunach watat aahe
|
Arc
| |
| Friday, November 30, 2007 - 6:28 am: |
| 
|
sorry call girl.there is bit difference
|
"तुला खोटं वाटतय का?" शॅलीने विचारलं.. "नाही. पण वाशी यायला अजून वेळ आहे. वाटल्यास एक झोप काढ. मी उठवते तुला. मग मार खाडीत उडी." पूजा रागावून म्हणाली. "मी उडी मारल्यावर तुझं काय होईल हे माहितीये?" "जास्त काही नाही... अधे मधे केव्हातरी आठवेल. पण प्लीज. मरायचं असेल ना तर निमूटपणे जाऊन मर. मला त्रास देऊ नको," "काय समजतेस काय मला? तो पोलिस बसलाय तिथे. तो बरा उडी मरू देईल? आणि गर्दीच्या वेळी लोक मारू देत नाहीत. साला.. जगायचा पण प्रॉब्लेम आणि मरायचा पण.." "खाडीत उडी मारण्याव्यतिरिक्त दुसर्या पद्धतीनेही मरता येईल." पूजाचा संताप अनावर होत होता. शॅलीने खांद्यावरची शाल बाजूला काढली. डाव्या मन्गटाला बॅंडेज होतं. पूजा डोळे विस्फ़ारून बघत होती. फ़ार तर तीन किंवा चार दिवसापूर्वीचं... "झोपेच्या गोळ्या पण घेतल्या होत्या. माझी मामी नेमकी मला भेटायला आली होती... श्या..." पूजा काहीच बोलली नाही. तितक्यात धुन परत वाजली. "फोन घे" "अ,न?" "शॅली फोन घे..." पूजा म्हणाली. खरंतर तिला इतक्या कठोरपणे बोलायचं नव्हतं. पण शॅलीला खरंच आधाराची गरज होती. "हेलो.. ट्रेनमे हू,,, वाशी.. हा... इट वॉज गूड.. नो आयडीया.... ह्म्म.. वील कॉल यु" तिने फोन ठेवला. पण काहीच्बोलली नाही. पूजा पण काहीच बोलली नाही. कुर्ला स्टेशन मागे पडले. "सॉरी.." शॅली म्हणाली. "का?" "असंच... म्हणावंसं वाटलं.." पूजा हसली. "मरायचा विचार करणं खूप सोपं असतं. जगण्याचा विचार करणं थोडं कठीण असतं.. पण सोप्या गोष्टी कुणीही करेल. नाही का?" "पूजा, बरोअर आहे. पण कळतं पण वळत नाही." "हे बघ, मला तुझा प्रॉब्लेम माहीत नाही. ऐक.. माहीत करून घ्यायचा पण नाही. कारण तुझा प्रॉब्लेम तुलाच सोडवावा लागेल." "पूजा, मला कुठलाही प्रॉब्लेम नाहिये, पर्सनल तर बिल्कुल नाही. पण मी माझ्या डॅडना दिलेल्या वचनाला जागत नाही आहे. मी आयुष्यात नापास होयेत, आणि... जाऊ दे.." "अरे, यश आणि अपयश हे चालू राहणारच. मी मुंबईत नोकरीसाठी तीन महिने फ़िरले. तेव्हा कुठे मला ही नोकरी मिळाली. एम कॉमपर्यंत शिकलेय मी. तरी मला हवं तसं काम किळालं नाही. म्हणून मी ट्रेनम्धून उडी मारली नाही." शॅलीने हलकेच डोळ्यात आलेलं पाणी पुसलं.. " }
|
Anaghavn
| |
| Saturday, December 01, 2007 - 8:44 am: |
| 
|
वाचतेय. वाट पहातेय. अनघा
|
interesting... aata pudhe kay.... he lavakar kalale tar khup bar hoil. mi vat baghate aahe.
|
"अजून एक सांगू?" पूजाने विचारलं. "काय?" शॅलीने पर्समधून पाण्याची बाटली काढत विचारलं. "माझी नवीन नोकरी आहे म्हणून मी जितकी खुश आहे तितक्यात मला समजलय की ही एजन्सी बंद होणार आहे. एक दोन महिन्यामधे. म्हणजे परत मी बेकार.." "एजन्सी बंद होणार आहे? तुला कसं माहीत? मालकाने नोटीस वगैरे दिली आहे?" "नाही. मी तर अजून त्या मालकाला पाहिलं पण नाही. कधी भेटला ना तर नक्की त्याची गचांडी धरून विचारणार आहे.. माझी नोकरी काढून घेऊन त्याला काय मिळणार आहे ते.." "नक्की विचार.. पण तो काय खुशीनेच थोडी बंद करत असेल? त्याला कुठेतरी नुकसान होत असेल .." "किंवा एजन्सी कशी चालवायची त्याची अक्कल नसेल.. बेस्ट टीम आहे त्याच्याकडे. मार्केटमधे नाव आहे. शलाकामधून आले म्हटले तर लोक हाकलत नाहीत. वीस वर्षाची जुनी एजन्सी आहे. कितीतरी बॅंकाची कॉंट्रॅक्ट्स आहेत.. पण नाही... त्याला बंद करून बीपीओ चालू करायचय.." "ह्म्म पैसा जास्त आहे तिथे." "पण माझी नोकरी जाईल ना.." "का म्हणून? तू ऑलरेडी इतकं चांगलं काम करतेयस.. मग नवीन जॉब पटकन मिळेल.." "खेळ आहे का? हातात असलेलं सर्व सोडायचं आणि नवीन डाव मांडायचा.. किती त्रास होतो माहीत आहे का?" "माहीत आहे.. भोगतेय सध्या. हा डाव विस्कटायचं धाडस होत नाही. आणि नवीन डावाची हौस स्वस्थ बसू देत नाही.." गोवंडी स्टेशन गेलं. गार वारा अंगाला चांगलाच झोंबत होता. शॅलीने शाल अंगाला घट्ट गुंडाळून घेतली.पूजाने खिडकी बंद केली. "तू कुठे उतरणार?" शॅलीने विचारलं. "पनवेल. तू?" "वाशी.." "तिथे राहतेस?" "नाही. पण एक काम होतं म्हणून आले होते." "इतक्या रत्री?" "अंहं.. काम उद्या सकाळी आहे पण मी आजच आले. थोडे जुने हिशोब बघायचे आहेत. थोडे आठवणीचे आल्बम वाचायचे आहेत. थोडंसं जगायचं आहे. आजची रात्र.. आणि उद्या.." "उद्या?" "उद्या नवीन दिवस.. नवीन डाव. नेवीन भिडु... काही जुने पण.. तरीही सर्व नवीन." "तू काय बोलते मला समजत नाही.." "आणि जर तुला समजलं तर मला खाडीत उडी मारायची गरजच नाही. तूच फ़ेकून देशील माझी गचांडी धरून."
|
"काय?" "काही नाही." मानखूर्द स्टेशन गेलं, आणि ट्रेन खाडीच्या पूलवरून जायला लागली. शॅलीने पूजाकडे बघून हसली आणि हलकेच डोळा मारला. पूजा पण हसली. "परत भेटशील मला?" पूजा म्हणाली. "का?" "पॉलीसीसाठी. फ़क्त एक पॉलीसी आणि मला स्टार एंप्लॉयीचं लेटर मिळेल. नवीन जॉब मिळायला सोपं जाईल. तुला नसेल काढायची तर कुणीतरी ओळखीचे असेल त्याला सांग." "माझ्या बॉयफ़्रेंडला सांगते.." तितक्या मोहब्बतेची धुन वाजली. व्हायोलिनवर. शॅलीने फोन पाहिला आणि म्हणाली. "शैतान का नाम लिया और..." ती बराच वेळ फोनवर बोलत होती. अगदी हळू आवाजात. खाडी संपत आली तशी ती उठली आणि दरवाज्याजवळ गेली. "शॅली.. तुझा नंबर दे," पूजा म्हणाली. "परत भेटायला?" "हो.." "परत केव्हा भेटणार?" "माहीत नाही.." "कदाचित चोवीस वर्षानी किंवा चोवीस तासानी,,, पूजा.. तुझं कार्ड आहे माझ्याकडे. मी बोलवेन तुला." "ओके." "आणि एक सांगू... तुझ्याशी बोलल्यावर फ़ार हलकं वाटतय.. चल बाय." स्टेशनमधे गाडी जाताच शॅली उतरली. आता परत केव्ह भेटणार हा प्रश्न पूजाच्या म्नात येऊन गेला. "चोवीस वर्षानी किंवा चोवीस तासानी" ती स्वत्:शीच म्हणाई आणि तिचं तिला हसू आलं.
|
|
|