Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 05, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » कार्तिक » कथा कादंबरी » चौकटीतील हुर हुर » Archive through December 05, 2007 « Previous Next »

Daad
Tuesday, December 04, 2007 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विसरायला लागण्यासाठी आपल्याच मनापाशी मुदत मागायची.... शर्टासारखी आठवण करून देणारी वस्तू मग आतल्या कुठल्यातरी कप्प्यात.... "नीट घडी करून" ठेवायची....
सुंदर! हा प्रसंग आणि असे अनेक ह्या इतक्या भागातच!

लोपा, खास शैली आहे! मस्त फ्लो आहे.
तब्येतीत लिही.


Shyamli
Wednesday, December 05, 2007 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसन्न" अजुन काय असते.... याच्या कडे पाहुनच हा शब्द तयार>>> वाह...खरय काही माणसांकडे बघून पट्कन असं वाट्त




Lopamudraa
Wednesday, December 05, 2007 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रात्री बराच उशिर झाला सगळी कामे आटोपुन घरी जायला. घरी पोहचतो तो दारात संभाची गाडी दिसली. तो असा अचानक आडवारी का आला असेल हे पाहुन त्याला अश्चर्य वाटले नाही अन कळायला वेळही लागला नाही. संभा सोफ़्यावर पाय पसरुन बसला होता. अमरच्या येण्याने त्याच्या T.V. बघण्यात थोडाही व्यत्यय आला नाही. शिपायाने येउन विचारले,"साहेब, जेवणार का ?"

अमरने संभाकडे प्रश्नारथक पाहिले. तो खांदे उडवत काही न बोलता जेवायला बसला. शांतपणे दोघांत एक शब्दाचेही बोलणे न होता जेवण संपले. घरातल्या नोकरांची पांगापांग झाली.

संभा अमरकडे एक टक बघत होता. अस्वस्थ होवुन अमर त्याच्यावर डाफ़रला "हे ,हे, अस काय लावलय? हे बघ, काय बोलायचे ते नीट बोल ना ..!" अमरच्या टिपेला पोहचलेल्या आवाजाचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. तो तितक्याच थंडपणे अमरसमोर येउन उभा राहिला हाताची घडी घातली.

"नाही , मघापास्न विचार करत होतो, तुझे पाय धरावे की हा पेपरवेट तुझ्या डोक्यात घालावा...,मी बोलण्यासाठीच इथे आलोय, बोलण्याने सगळे problem solve होतात या मताचा मी आहे हे तुला माहित नाही? एका शब्दाने काकुला बोलला असता तर बिघडले असते का तुझे? आई आहे तीने समजुन नसते का घेतले?...."

अमरने त्याला पुढे बोलु दिले नाही, त्याच्या कपाळावरची शिर तडतड उडु लागली.."कीती सहज पणे म्हणालास ना तीने समजुन घेतले असते,... घेतले असते ना तीने १०१% समजुन घेतले असते.. कीती गृहीत धरुन चालतो ना आपण आई आहे ’ती’ तीने समजुन घ्यावे..., तीने समजुन घ्यावे मुलाला त्याच्या सुखाला..
लग्नानतर ती श्रिमंत घरातली लेक या ’बडा घर पोकळ वास्यात’ रहायला आली तेव्हा ही .तीच्या सासरच्यांनी हेच गृहित धरले तीने समजुन घ्यावे या गरीबिला ,तीच्या नवर्याने गृहित धरले.. तीने समजुन घ्यावे त्याच्या विक्षिप्त स्वभावाला, आई वडिल गेल्यावर भावाने कधी सुखदुख:त विचारले नाही, तेव्हाही तीने दोघातली ’दरी’ समजुन घेतली... कीती जणांना तीने समजुन घ्याचे? आणि मी एखादी गोष्ट समजुन घेतली तर कुठे बिघडले?

अरे त्या दिवशी ती इतकी खुष होती सगळ्या नातेवाईकांना भेटण्यात.. कित्येक वर्षानंतर!.. तीला लक्षात ही आले नाही की भावाने दुस-या दिवशी भेटायला येतो सांगुन कार्यक्रमच ठरवला, कारण त्याला मुलीचे लग्न करायची घाई होती , बहिणिशी नाते जोडायची नाही. ..पण त्या भाबडीला हे सुध्दा कळले नाही."
त्यात "हे नाते" त्याच्या चेह-रावर बोलण्यात, वागण्यात मला तर कुठेच दिसत नव्हते.त्याच्यासाठी मी फ़क्त होणारा ’जावई’ होतो. एका सत्ताधा-याला हाताखाली एक हक्कचा माणुस हवाय त्यांना बाकि काही नाही."

संभा गाडीच्या चाव्या हातात फ़िरवत उठुन उभा राहिला.. "तुझ्या कडे मला solution सापडेल याची खात्री होती, तु बोलतो राव चांगलं.. काये तु कधी कधी असा गाढव बनतो ना..!"
"म्हणजे??"
"निघालो मी?"
"तु कुठे जाणारेस आता?"
"साहेब ," नाटकीपणाने संभाने हात जोडले.. "येतो आता , मी काय नोकरी सोडली की सरकारने मला नोकरीवरुन काढुन टाकलय? तुला उद्या office आहे आणि मला नाही काय?तिकडं पोहचत उद्याची संध्याकाळ उजाडायची.. तुझा गुंता तु सोडव .. राम राम..येतो मी!

बाहेर येउन त्याने ड्रायव्हरला आवाज दिला आणि गाडीत जाउन बसला.

गोंधळलेल्या अमरला तसेच ठेउन वळुनही न बघता त्याची गाडी वळणावरुन दिसेनासी झाली.
रात्रीच्या अंधारात अमरला त्याचे एकाकीपण जास्तच जाणवु लागले.दोन एक दिवसात काकुला बोलवुनच घ्यायचे म्हणुन
दुस-या दिवशी रात्री काम संपुन निवांत झाल्यावर त्याने घरी फोन लावला.
पलिकडुन गड्याने फोन उचलला.
" सगळे आत बोलत बसलेत व्हय , तो संभादादा आलाय ना मघापास्न..!!"
"हळु बोल, मी बहिरा नाहिय..!" अमर इकडुन ओरडला.आणि ऐकुन त्याची फोनवरची पकड घट्ट्ट झाली तो उठुन उभा राहिला.
" कधी आला तो तीकडे"
" हे काय ,सांज होता होताच पोचले की.."
" जोरात बोल की जरा घशात अडकल्यासारख काय बोलतोय.. काहिच ऐकु येत नाहिये, बोलव की आता त्याला फो्नवर , नुसता गप्प काय बसलास...!"
"होय, जी..!"
"संभा हे काये?.. काये हे? तु म्हणला होतास..."
"मी खोटे बोललो.." जितका अमर चिडुन बोलत होता तितक्याच थंडपणे त्याने उत्तर दिले.
"म्हणजे तु..."
त्याच शांत आवजात त्याने परत सुरु केले.."आपली शंका रास्त आहे आणि आपला संशयही खरा आहे मी काकुशी खुप काही बोललो आहे आणि ती पण माझ्याशी बोलली आहे. साहेब, बोलल्याने जगातले सगळे problem solve होतात असे माझे अजुनही मत आहे... आता तुझी माझ्याशी बोलायची इच्छा नसेल हे माझ्या लक्षात आले असल्याने मी फोन आपल्या मातोश्रीं कडे देतो.."
अलिकडुन फोनवर शांतता पसरली..

"बेटा, आईला जोखायला फ़ार छोटी फ़ुट्पट्टी आणलीस तु?.. काकुचा कापरा आवाज फोन्भर घुमला... "जे मी तुला देतेय,देत आलीये ते माझे नाहिये पोरा.. ते माझ्या आईबापांनी तुला द्यायला दिलेला ’वसा’आहे. माझ्या जन्माची ही तिन्ही सांज, केव्हा अंधार पसरेल सांगता नाही यायचे. तुला अजुन इथे रुजायचय,दिवस जायचाय तुझा, सुर्य माथ्यावर आहे तोवर घामाच मोती पेराय्च या मातीत आणि ..मग त्या आभाळाला जाउन भिडायचे ...

दुख:च्या दिवसातलं आसवांच पाणी,सुखाच्या दिवसांतलं त्या सुखाकडं बघत घालवलेले दोन क्षणाचं हासु हे सारं देणं नाही बेटा , ही देणगी आहे देवाची जी आई बाप मुलांकडं सोपवतात त्यांची ती देणगी "वसा" म्हणुन तुझ्या मुलांकड तु नेउन पोहचवायची,... तु अशी उलटी गंगा का आणतुया? वसा पिढ्या दर पीढ्या चालवायचा असतो.

आपल्या प्रतीष्ठेचं आणि धनाचं ओझं वाहुन येडावलेल्या माणसासाठी तुझ्या आयु्ष्याचा दावा लावेल होय रे मी?, झाल गेलं गंगेला मिळाले ,’तो’देवाचा आदेश ही नाही समजला बेटा त्याला .. तर मी तरी कुठवर माझ्या सोन्यासाठी चिंधी सांभाळाची? आता माझ सोनं तुचं"

अमरने डोळे घट्ट मिटले.. .. तो मनाशी म्हणाला.माझ्या मोठ्या मनाच्या आईला मी छोटे करुन टाकले होते.
खांद्यावरचे मणामणाचं ओझ भुरकन खिडकितल्या चिमणी सारख उडुन गेले.
घामाने भिजल्या मानेवर झुळुकेचा स्पर्ष झाला.. अमरच्या अंगावर शहारा आला..तो भानावर आला.. कुठल्या तरी काळोख्या जागेतुन बाहेर आल्यावर डोळ्याला प्रकाश सहन होत नाही तस त्याला तो आनंद सहन होइना. मन दुखवणारा आनंद..!!!
relax होवुन त्याने खुर्चीवर पाठ टेकली... पुन्हा तीच अनुभुती.... तेच आकाश, तीच जागा, तेच घर.. तोच खिडकीसमोरचा उदास तलाव झिळमिळ झिळमिळ करुन फ़ेर धरु लागले . पुन्हा मोहर लाजु लागला.. कोकिळा गाउ लागली.. गोड शिरशिरी अंगभर नाचली.

.... तीला पुन्हा बहरुन आलेल पहायला अमर आतुर झाला.. " तीला नक्किच राग आला नसेल माझा जसा मला तीचा कधीच राग येत नाही...!!!"
(समाप्त):-)


Vrushs
Wednesday, December 05, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त....... छान.

एक गोड, हळ्वी कथा मुख्य म्हणजे गोड शेवट केला ते खूप आवडले. अभिनंदन.


Mrdmahesh
Wednesday, December 05, 2007 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेष्ट.. too good .. "रोज भारद्वाज दिसतो.." :-).. मस्त..

Tiu
Wednesday, December 05, 2007 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

too good! :-)

सकाळी सकाळी इतकी छान कथा वाचायला मिळाली! आजचा दिवस चांगला जाणार नक्की...


Itgirl
Wednesday, December 05, 2007 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिलेस लोपा!! आवडली कथा :-)

Chinya1985
Wednesday, December 05, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपमुद्रा अतिशय सुंदर कथा लिहिलिय. मी आत्ताआत्ताच मायबोलीवर कथा वाचायला लागलोय. ही त्यातील सर्वात चांगल्या कथांपैकी एक आहे. फ़ारच छान!!!!!

राधाने 'देव काय आहे' BB वर दाखवलेला उतावळेपणा इथेही दाखवला आहे. पुर्ण कथा न वाचताच लगेच घाईघाईत लिहिलय. कथा पुर्ण वाचुन मग चर्चा,भांडण करा ना!!!!


Kedarjoshi
Wednesday, December 05, 2007 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा सही. मस्त आहे कथा. आवडली. आईचा ग्रामीन भाषेचा बाज ही मस्त सांभाळला आहेस.

Asami
Wednesday, December 05, 2007 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

class flow लोपा. मस्त वटली वचताना. फक्त शेवटचे post title ला न्याय देत नाहि असे वाटले

Ashwini
Wednesday, December 05, 2007 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, मस्त जमली आहे कथा. शब्दरचना सुरेख, भावना प्रामाणिक, आणि शैली ओघवती!

मन दुखवणारा आनंद... hmm!

आता तेव्हढी ती विषामृत... :-) BTW, robinhood खरच दिसत नाहीत आजकाल.


Arch
Wednesday, December 05, 2007 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, मस्तच. आईच मन काय सुंदर रेखाटल आहेस. शाब्बास.

केदार, तुझ्या posts मध्ये जाणवल म्हणून लिहिते. ण लिहितान n न लिहिता N लिहित जा.


Manuswini
Wednesday, December 05, 2007 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, सुंदर!

आईचे मन हे असेच असते............ निर्व्याज प्रेम!


Daad
Wednesday, December 05, 2007 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, अगदी आवडली कथा.
**बेटा, आईला जोखायला फ़ार छोटी फ़ुट्पट्टी आणलीस तु?.. काकुचा कापरा आवाज फोन्भर घुमला....**

ही आणि अशासारखी अनेक वाक्यं....
जियो!


Divya
Wednesday, December 05, 2007 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! किती गोड लिहीलीयेस ग कथा. शेवटच वाक्य तर कडीच आहे. flow पण मस्त आहे वाचणार्याला अगदी डोळ्यासमोर उभे करतेस सगळ.

Mankya
Thursday, December 06, 2007 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा .. क्या बात है यार ! मस्त कथा. फ्लो एकदम जबरदस्त, वाक्यरचनाही सहि आहेत एकदम. एकंदरीत कथा खूपच आवडली !

माणिक !


Maitreyee
Thursday, December 06, 2007 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, मस्त आहे कथा. फ़्लो छानच, शेवट पण योग्य जागी केलायस.

Meggi
Thursday, December 06, 2007 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेटा, आईला जोखायला फ़ार छोटी फ़ुट्पट्टी आणलीस तु?..
ही देणगी आहे देवाची जी आई बाप मुलांकडं सोपवतात ...
सुंदर...

कथा बीज उत्तम.. मांडणी पण छान.. खूप भावून गेली मनाला..



Anaghavn
Thursday, December 06, 2007 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मनात आलेली प्रत्येक उपमा,प्रतिक्रिया इथे आधीच उमटली आहे. अजुन काय लिहु?
सकाळी सकाळी सुंदर विचारांचा एक खजिनाच दिलास.
अनघा


Sanghamitra
Thursday, December 06, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा सुरेख उतरलीय गोष्ट.
तुझी लेखनशैली, दोस्तांमधली आणि आईची भाषा यामुळं कॅरॅक्टर्स अगदी स्पष्ट होत जातात. आणि शेवट तर आवडलाच.
लिहीत रहा.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators