|
'आत येउ सर!', दारात उभा तरुण विचारत होता. त्याच्याकडे न बघताच अमरने सवयीने 'हो' म्हणुन मान हलवली. 'सर आजच तुमच्याकडे join झालोय'.... 'आधी कुठे होतात?' नेहमीचा प्रश्न विचारत अमरने मान वरही केली नाही, आपल्या समोरच्या कागदांवरुन त्याची नजर जराही इकडे तिकडे गेली नाही. खुप सारे काम रोजचेच असले तरी नविन लोक पण तर येतच असतात.ती पण अशीच ’नविन’ आली होती. ’छ्या..! का आला हा विचार माझ्या मनात’, अमरने मान झटकली. 'नासिक!' त्या मुलाने उत्तर दिले. गावाचे नाव ऐकल्याबरोबर अमरच्या हातातला पेन तसाच थांबला... डोळ्यापुढे फ़ुललेला मोगरा तरळुन गेला, काही कळायच्या आत एक गोड शिरशिरी नखशिखांत धावली. वातावरणात अनामिक सुगंध पसरला... हळवं की काय म्हणतात तसं वाटु लागलं.. खिडकीबाहेरच्या आंब्याचा मोहर मनात फ़ुलुन लाजु लागला... आतल्या आत कोकिळाही गातांना ऐकु येउ लागली.... की मन गाउ लागले.. ? ती भेटेपर्य्न्त गिष्माचा दाह कळला होता ती भेटल्यावर वसंताचे फ़ुलणे काय असते ते कळले. नकळत त्याने त्या अनुभुतीला काळ वेळाचे भान विसरत स्वत:ला स्वाधिन केले..... हलकेच डोळे मिटले क्षणभर.... अस्तीत्व विसरुन...! 'सर'... अमर भानावर आला. कानशिले तापली होती. हृदयात खोल आत कुठेतरी त्याला अस्वस्थ वाटले 'अजुन मी तसाच आहे, इतका प्रयत्न केला पण नुसते तीच्या गावाचे नाव कानावर पडले तरी असं... भोवतालचे जग पुन्हा उमलुन आले...' 'सर, मी तसा अर्ज दिलाय आज join झालो म्हणुन. अमरने नुसतेच 'हो हो' केले. अस्वस्थ्पणे त्याने समोरचा PC सुरु करण्याचा प्रय्त्न केला.तो सुरु होत नाहिये पाहुन रागाने अन जोरात आवाज दिला 'कोण आहे रे तिकडे जरा पंखा लाव की..' 'साहेब, light नाहियेत' शिपायाने येउन सांगितले. अमर अजुन अस्वस्थ झाला.. "ह्म्म मघापासुन आपणच तर म्हणतोय आज दिवसभर light येणार नहियेत आणि पुन्हा विसरलो...आज आठवणिंचे मळभ असेच राहणर वाटत ..’ त्याने कुठलेही विचार अडवले नाही.प्रयत्न करुन उपयोग नव्हता . तीची आठवण अशीच होती तीच्यासारखीच.. जा सांगुनही ऐकल नसत तीने आज. "साल हे काय झाल, ही अस्वस्थता, अगदी तश्शीच.. 'ती' भेटल्यापासुन च सुरु झाली. नक्किच... तोवर अगदी चांगला होतो, अगदी normal .. आणि आता नुसत्या आठवणीनही.. सालं प्रेम बिम अस काही असत यावर विश्वास च नव्हता. विश्वास नव्हता म्हणण्यापेक्षा कधी आस पास पाहिलं देखिल नव्हते. कोलेजात सिनेमा बघायचो की खुप.. पण ते जग वेगळे आहे आणि आपले वेगळे अस वाटायचे,... वाटायचे कसले होतच तसं वेगवेगळ. साल कोलेजात कुठल्या पोरीवर लाईन माेरायची पण हिम्मत झाली नाही. आपल्याला कोलेज मध्ये शिकायला मिळाले हे च खुप झाले वाटायचे..... वाटायचे कसले होतेच तसं! शिकुन नोकरी करायची मग काकु लग्न कर असा लकडा लावेल तेव्हा लग्न करुन मोकळं व्ह्यायचे. एव्ह्ढ्याच चौकटीत आयुष्य असतं, हा समज पक्का होता. आणि तात्यांना तर माहितही नसायच मी कुठल्या इयत्तेत आहे म्हणुन. काकु बिचारी घरात सगळ्यात लहान, कामावरच असायची,... शेतात जायची, काकांची पोरं आईला काकु म्हणायचे, मी पण काकुच म्हणायला लागलो.. वडलांना सगळे तात्या म्हणाय्चे मी सुध्दा तेच म्हणायला लागलो..त्या भल्या मोठ्या बारदानात कुणाला कुणाचा पायपोस नसायचा. १२ वीला ९२ टक्के पडले. काकुला त्यातले फ़क्त ’पास्” एव्हढेच कळले... . संभा आला म्हणला 'चल आपण दोघ agri ला जाउत, आपल्याला नक्कि admission मिळेल अस माझा भाउ म्हणालाय, मागची admission ८०% ला close झाली होती.'... 'फ़क्त थोडी जमिन नावावर लागते म्हणाला. काकां लोकांनी फ़ीला पैसे दिले/पुढे देत राहिले.. शिकायच शिक पण तुकडा बिकडा ना्वावर होणार नाही म्हणालेत. तेव्हा काकु सासरी आल्यापासुन पहिल्यांदा माहेरी गेली. भावाकडुन माझ्या नावावर काही एकर शेत करुन आली. माझी admission झाली. . मामाकडुन आल्यावर तीचा कसानुसा झालेला चेहरा अजुन आठवतो. गलबलुन आलं पोटात पण काय झाले विचारयची हिम्मत झाली नाही.. कोलेजला सगळेच आम्ही फ़किर...! agriculture होते ते!MBA नाही. सगळीच शेतक-याची मुलं. नोकरीशिवाय कसली स्वप्न सुध्दा कधी पडली नाहीत. सालं पुढची फ़ी कशी भरायची याचीच चिंता सगळ्यांना असाय्ची! पायात एक स्लिपरचा जोड नाहितर आपली कोल्हापुरी..!, ती तुटल्यावर दुसरा जोड! दोन शर्ट धुवुन धुवुन वापराय्चे...! मेस् वाल्याला लुटुन खाल्ले होते सगळ्या पोरांनी. सिनेमाला पुढे बसाय्चे,सगळ्यात कमी तिकिटात आणि मग मात्र हीsss मस्ती कराय्चो.. आणि आयुष्याच्या चौकटीत रंग भरायचा प्रयत्न करायचो..तारुण्याची मस्ती होती. सगळी जण रात्री रूमवर आलो की चिडेचुप शांतता व्हायची, अभ्यासाला लागायचो.. मग रात्रभर अभ्यास.. टपरीवाला जागा असतो हे माहित असायचे. कधीतरी मध्यरात्री मधुनच चहा प्यायला जायचे. रमत गमत.... दोन चार विषयावर तीथेच चर्चा करत बसाय्चो..! आकाशातल्या चांदण्या फ़िक्क्ट व्हायच्या अन तांबडं फ़ुटता फ़ुटता आमचे वाद रंगात यायचेत. पीरेडला जाणारे scooter वरचे सर दिसले की तसच धावत classroom गाठायचे... अग्रि ग्रजुएट्ला कसली आलिये नोकरी? मग परिक्षा दिल्यात. एक दिवस संभा धावत आला. ’ही यादी बघ !’ दोन नावं ठळक पणे वाचाली.. १. संभाजी...दुसरे अमर... नोकरी लागली. अजुन काही रंग आलेत आयुश्याच्या चौकटीत.. जे कपडयांचे रंग दुकानाच्या काचेच्या चौकटीत दिसायचेत, ते रंग माझ्या घरातल्या कपाटात दिसु लागले.कधी त्याचा पुर्वी हेवा वाटला नव्हता. तेव्हढा वेळही नसायचा विचार करायला पण ग्रिष्म सोसत असलेल्या उभ्या भेगा पहिल्या पावसाच्या सरीने थोड्याफ़र का होइना बुजल्या जातात तसे झाले होते. आणि जगाने सलाम केला की कसे बरे वाटते. दुख-या जखमा भरुन निघाल्याचे भाव काकुच्या डोळ्यात दिसले.तिच्या भिजलेल्या पदराची कडा दोन चिमटीत धरुन तसाच हात तीने माझ्या गालाला टेकवला.ओल्या पदराचा गार स्पर्श माझ्या ह्रुदयलाही गारवा देउन गेला. नोकरी सुरु झाली. जगाच्या पलिकडच्या बाजुला होतो आजपर्यंत, सत्ता ,पैसा समोर आणि त्या विरुध्द मी. आता या जगाच्या दुस-या बाजुकडे मी आलो होतो. ही बाजु पण मजेशिर होती जीवनाची!!! पलिकडे होतो तेव्हा हेवा कधी वाटला नव्हता. आणि अलिकडे येउनही त्याची रग चढली नाही. जसा होतो तसाच राहिलो. थोडा फ़ार बद्ल तर होणारच होता. रोज उठुन अन्याय ,संताप,लबाडी,फ़सवणुक, आप्तांवरचे दावे.. सगळं सगळं बघुन सरावाने मी ही ते शब्द भावना सोडुन वाचायला शिकलो. आणि वापरायलाही लागलो. त्या दिवशी असाच धो धो पाउस पडुन गेल्या्वर ओलाव्यावर पहुडलेल ओलं कोवळ उन माझ्या केबिनच्या काचेवर टीचक्या मारत होतं. त्या बिचा-याला buildings च्या पसा-यात मोकळेपणे हात पाय ही हलवता येत नव्हते. वस्तीवर कस घासाच्या जांभळ्या फ़ुलांवर उन बिनदिक्कत खेळत असायचे.... न लाजता.. अंग न चोरता.., वा-याच्या संगतीने, कोकिळेच्या कंठाने... कैरीच्या गंधाने!!" विचार करता करता अमर थबकला. समोर आजच्या सारखे त्या दिवशी सुध्दा कुणीतरी उभे होते. त्याने पुन्हा तो प्रसंग आठवायला सुरवात केली. ’ सर मी आज पासुन join होतेय तुमच्या department ला’ समोरच्या निरागस नितळ चे्ह-रावर अवघडल्याचे भाव होते. अमर ने वर बघितले, आणि बघतच राहिला. ’दाखल तारिख देताय ना सर’... अवघडलेला चेहरा आता अजुनच गोंधळला होता. ’ह’ म्हणत त्याने पटकन short sign मारली. आता तो चेहरा दारातल्या बहरलेल्या मोग-यासारखा रोजच दिसु लागला. सोबतीने मीटींगला बसु लागला. व्हिजीट्ला सोबत करु लागला. कुठेही निघतांना अमर आधी गाडीच्या मागल्या बजुला बघायचा,ती गडबडीने येउन बसतांना दिसली की मग हलकेच गालात लपलेल हसु ओठात येउन सांडु नये याची त्याला काळजी घ्यावी लागायची..! तीच्या काही प्रश्नानी खुप हसायला यायचे त्याला, तेव्हा ती गडबडुन जायची मग बराच वेळ गप्प आपले काम करत बसुन असायची मग अमरच काहि तरी विषय काढुन तीला बोलते करायचा, कधी तीच्या बावळट भोळेपणात त्याला वाटायचे, कसं होणार हीचे इथे... या असल्या जगात! ब-याचदा ती धिट्पणे अमर बोलत असतांना त्याच्याकडे बघत असायची पण अशा वेळी अमरला नजरेला नजर देण होत नसे, गडबडुन तो दुसरीकडे बघु लागे. नंतर आठवुन त्याला स्वताचे अश्चर्य वाटे. स्वताला आरश्यात न्याहळत तो म्हणायचा "मी बदललोय! एक वेगळी चमक त्याच्या डोळ्यात ठाण मांडून बसलेली आहे असे त्याला वाटे. तो चेहरा समोर दिसला ना्ही की त्या गंधाच्या आठवणी न अमर बेजार होवु लागायचा..डोळे मिटले की फ़ुल उमलावे तसा तो चेहरा नजरे समोर येवु लागला त्याचा. हा नव्याने जाणवलेला रंग होता, आवडुन गेला अमरला. तो खुष राहु लागला.या रंगाने स्वताचे नवे विश्व रंगवु लागला. रोजच्या त्या धबाडग्यात त्याला आता गाडीच्या ’खडबड.. खडबड ’ मध्ये, केसच्या फ़ाइल मध्ये, मोर्चाच्या निषेधाच्या घोषणातही मधुर सुर जाणवु लागले. काल मीटींगमध्ये S.P.म्हणालेसुध्दा ’काय रे फ़ार खुष असतोस हल्ली. anything special !’ त्याने हसुन नुसतीच मान हलवत'Nothing' म्हटलं.पण सगळ्यांना कळल होते तो हल्लि खुष असतो म्हणुन. संभानेही विचारले होते की ’काय रे कुठल्या विश्वात वावरतोय सध्या!’ (क्रमश
|
Bgovekar
| |
| Monday, December 03, 2007 - 12:10 pm: |
| 
|
ओहो! लोपा काय आल्हाददायक वातावरण निर्मिती करीत लिहिल आहेस.. मोगर्याचा सुवास दरवळला हं.. छान सुरवात..
|
ती समोर कागद धरुन बसली होती मघापासुन. जवळ अनु येउन उभी राहिली तरी तीचे लक्ष गेले नाही. "काय बाई, फ़ार्रर्च sincerely काम करतेस? मी पण आहे ह तुझ्याच जवळच्या department ला.! एव्हढे या आकड्यातत बघण्यासारखे काये?"अनु टोमणे मारीत होती! अनुने खसक्न कागद ओढला तीच्या हातातुन ! ह्म्म वसुलीची महिती करुन घेतेय वाटत्ये! ’ह्...’ तीने नुसताच हुंकार भरला. " का ग बये , बोल की काहीतरी!तु ना हल्लि वेगळीच झलियेस बघ.. " अनुचा mobile वाजला . म्हणून बर झालं. ती फोनवर गप्पा मारु लागली. अनुला काय माहित ती काय बघत होती त्या कागदावर. तीथे होती त्याची सही.. "अमर....." कीती साधी सरळ सही त्याच्यासारखीच! म्हणनात ना ज्याची सही साधी ,सरळ वाचता येण्यासारखी असते त्याचा स्वभावही सह्ज वाचता येतो . म्हणुनच तर तीला त्याचा चेह-र्यावरचे सगळे काही वाचता यायचे..! ती सारखी बघतेय लक्षात येउन तो इकडेतिकडे नजर भिरभिरवायचा. तीला हसु यायचे! काय हे? याने का लाजावे ? अरेच्च्या, सहज नजर भिडली तरी याने लगेच दुसरी कडे बघावे . कठिणच आहे. आणि मी पण का सतत त्याच्याकडे बघुन त्याची अशी फ़िरकी घेते? ती पण एखाद्या लाजलेल्या कळीसारखी स्वत:शीच हसा्यची. तीला लक्षाता आले होते,एक अनावर असुसलेपण जाणवतय तो भेटल्यापासुन, फ़क्त त्याला बघत राहण्याची आस..! जग संपलं तरी चालेल आता.... असा विचार करायची. संध्या्काळ झाली तर तीच्या काळ्याभो्र डोळ्यात चंद्रच खुलायचा. मधुनच पुढे काय होइल हे कातर कोवळे पण तीला अस्वस्थ करायचे. एव्ह्धी ओढ...का?! दिस्ला नाही तर इतके अस्वस्थ व्हावे? परवा तो त्याच्या केबिन मध्ये नव्हता. बाहेर कसली तरी गर्दी होती. नक्किच तो तीथे लो्कांना समजावत उभा असणार. ती ही जाउन उभी राहिली.... त्याला शोधत.. गर्दीत त्याचा चेहरा शोधतांना त्याच्या त्या हस-या निरागस नजरेने लगेच पकडले तीला, बघत राहिला तीच्याकडे, !! त्याची ती थेट आत उतरत जाणारी नजर..नखशिखांत रोमांच उभे राहिले तीच्या अंगावर, त्याला शोधणारी तीची नजर त्याने अलगद झेलली आणि ती तशीच्या तशी स्वता:च्या त्या निरागस हास्यात लपेटुन परत केली.. तेव्हा थिजल्यासारखी ती तीथेच उभी राहिली .. त्या गर्दीत office च्या आवारात. शेजारी अनु येउन उभी राहिली होती.. तेव्हा तीने डोळे मिचकवल्याचा भास तीला झाला. अजुन दोन तीन जण तीच्या कडे बघताहेत असा भास झाला. ती मनात म्हणाली "जाउदे , मला काही ही फ़रक पडत नाहिये" . त्याच्या प्रत्येक हलाचालितुन, त्याच्या दिसण्यातुन , त्याच्या हसण्यातुन तीला तीच जाणवत होती. त्याचा चेहरा काही ही लपवुच शकत नव्हता ,तीची नजर त्याच्या चेह-यावरचे एक एक बदल झटकन टिपत होती .. तो एक छंदच लागला होता तीला. तो इतरांशी बोलतांना त्याला पाहणे.. हे तर थरथरत्या लाटेने तळ्यात पडलेले आकाशाचे प्रतीबिंब निरखावे तसे वाटायचे आणि एक अवखळ हसु कायम असायचे त्याच्या चेह-यावार, कधी उदास दिसला नाही. नेहमी त्या वा-याच्या झुळकीसारखा मंद सुगंधावर विहरत असायचा.. घरी दारी तीला त्याची ती अवखळ मुद्रा आठ्वत रहाय्ची. आता तीला हाताखालच्या माणसांनी चुका केल्या तरी राग यायचा नाही. रिख्शावाल्याने जास्त पैसे मागितले तरी ती अजिबात डोकं लावत नसे. आईने जेवुन जा ग म्हटल्यावर ती चिडायची नाही. अनुच्या बडबडीला कंटाळायची नाही. कुठल्याच कामाने वैतागायची नाही. एके दिवशी अचानक सकाळी त्याच निराग्स mood मध्ये बसलेली असतांना वर्तमान पत्राच्या आतल्या बतमीवर नजर जाताच , ती चपापली," मला कसे कळले नाही?" ती धावत office मध्ये आली. तीने P.A ला विचारले."साहेबांच्या बदलीची बतमी वाचली खरय का?" तो "हो" म्हणाला.. पुढे बोलत राहिला "असच असते इथे अचानक बदल्या होतात. साहेबांना पण माहित नव्हते. वैगैरे ...." पण तीने... बोलायचा प्रयेत्न केला नाही. सरळ "त्याचा” mobile number फ़िरवला. दुसर काहीही तीला सुचल नाही. त्याच्याभोवती लोकाचा गराडा असावा , खुप कल कल ऐकु येत होती.. त्याने फ़ार काही न बोलता " हो बदली झाली . भंडा-याला चाललोय डोंगर तळी फ़िरायला.. म्हणुन सांगितले". आवाजात तेच ते त्याचे हसु. काही फ़रक पडला नाहिये त्याला. त्याच्या हसण्यातुन जाणवतेय ना.. ती मनाशीच म्हनाली. त्याच्या मनात नक्कि काय असेल? तीची चल बिचल तीला स्वस्थ बसु देत नव्हती. पाकळी पाकळीत नजाकतीने जसा मोगरा भर उन्हात फ़ुलत जातो तसे तीचे भाव विश्व फ़ुलत होते रोज!!आणि अजुन तर संकोचाचे धुके दुर व्हायचे होते. आणि लगेच अंधारुन आले !! तीचे डोळे डबडबले.......... पावसाची छोटीशीच सर आली तरी एव्हढे का भिजुन गेलो आपण ?एकमेकांना काही सांगाय्च्या आत.. असा कसा ऋतु बदलला ? दारातल्या ज्या कोवळ्या पाना फ़ुलांशी तीची मैत्री झाली होती . त्यांचा रस्त्यात डोकावण्याचा आता तीला राग येउ लागला होता .गेट पाशी आलेली बोगन वेलीची फ़ांदी तीने रागाने बाजुला केली. घरात गेल्यावर आईने प्रेमाने विचारले "जेवतेस ना.. वाढु?" तीने संतापाने म्हटले "जेवणशिवाय तुला सुचते की नाही दुसरे?" ती खोलीत जाउन पडली, रोज या वेळी रोजच्या नजरेच्या गुणाकार भागाकाराची पुन्हा उजळणी व्हायची. आज त्यातले काहीच झाले नाही . (क्रमश
|
Vrushs
| |
| Monday, December 03, 2007 - 3:11 pm: |
| 
|
पुढचा भाग लवकर टाक please.......
|
Neelu_n
| |
| Monday, December 03, 2007 - 5:57 pm: |
| 
|
लोपा बर्याच दिवसाने तुला ईथे पाहुन बरं वाटले!!! छान सुरुवात.. आता पुढचे भाग पटापट टाक
|
Shyamli
| |
| Monday, December 03, 2007 - 6:57 pm: |
| 
|
वा शुरु हो गये क्या गुरु, पटापट टाका पुढले भाग आता,
|
आज संभाला रात्री जेवतांना सांगुनच टाकले शेवटी अमरने.... तो हसत सुटला! "गपरे"..बाकी अमरला त्याची ही प्रतीक्रिया अपेक्षीत होती !!! म्हणाला " माझ्या आले होते लक्षात , तु सांगाय्ची वाट पहात होतो..!" "मस्त गड्या , बाकी काहीही असो, तुझ्या्त झालेला बद्ल आपल्याला आवडला, तीला मानावे लागेल." दुस-या दिवशी खरेद्दीला बाहेर पडल्यावर शर्ट घेतांना संभाने दोन उचलले."हा घे peach नाहीतर हा ओफ़ व्हाईट." अमर ने एक लेमन यलो आणि एक ब्लु तो ही इन्क ब्लु उचलला. तीचे याच तर रंगाचे ड्रेस असतात. संभा काय समजायचे ते समजला .गालात हसत दोघे बाहेर पडले.त्या रात्री अमरने ठरवले. लवकर तीला आपल्या छोट्याशा आयुश्यात आणायचे. जगण्यासारखे खुप काही आहे असे त्याला वाटु लागले. अचानक बदलीचा fax आला. "जावे लागले तरी काय हरकत आहे. कायमचे थोडेच सोडुन जातोय. हे अस तर नेहमी चालु राहणारे." अमर मनाशी म्हणाला " आणि तुझी नजर तर माझ्यासोबतच आहे.. माझ्या पापण्यात बंद" त्याने ओफ़्फ़िसला फोन केला. तीच्याशी बोलणे झाले just formal.त्यालाही एकदम फोनवर काय बोलावे सुचले नाही. पुन्हा फोन झाले नुसतेच. काहीतरी कारणे काढलेली...... बोलण नव्हतच ते पुन्हा पुन्हा ती भेटण्याचे उर्मी ,आस होती. नुसतेच श्वास आणि एकमेकांना भेटल्याचे भास..! रात्री अभाळात बघत तो विचार करी .. बस एक तुकडाच तर हवाय , जो माझा असेल फ़क्त माझा..माझं आकाश असेल ते , त्याबरो्बर पानांची सळसळ होई.. मन आभाळा होवुन तीला भेटुन येई.! "या आठवड्यात घरी जावे..... काकुला सगळ काही सांगुन टाकावे ... अन तीला जावुन भॆटुन विचारावे, रागवली असेल बहुतेक पण अह.. तीला माझा कधी राग येतच नव्हता जसा मला तीचा राग कधीच येत नाही. !" त्याने ठरवुन टाकले. तो घरी पोहचत नाही तोवर भेटणा-यांची रिघच लागली. काकुने येतोय म्हणुन गावभर सांगुन ठेवले ना.. काकुंना बघताच क्षणी अमरला त्यांचा चेहरा उजळलेला वाटला , मायेनेही आणि सुखाच्या सावलीनेही... . त्याने जातांना स्पष्ट बजावले होते माझ्यसोबत बदलिच्या गावी चल नाहितर इथे आता काम वैगैरे करायचे नाही. लहाणपणी काकु त्याला सारखी "माझ्यवर पडला की गोरा गोमटा लेक माझा " अस म्हणायची ! अमरला आता त्याला अर्थ कळला होता. काकु खरच गोरी होती पन आयुष्यात आलेल्या टळटळीत दुपारीने तीचा रंग रापला होता. रात्री काकु आणि अमर बाजेवर अंगणात बसले. आकाशात चांन्दण नव्हते. नुसतेच निरभ्र आभाळ.. स्वच्छ..! काकुने गप्पा गप्पात सांगितले "उद्या तुझा मामा येणारे ! त्याला वाटते सोयरिक व्हावी तुझी आणि त्याच्या लेकीची!, माहेर परत जोडले जातेय माझं...!! गरिबाघरी आली तशी माहेर सुटले होते. आज भाग्य दिले तु मला ते पुन्हा जोडायचे...!! चुकला तो! काय करतो भाउ आहे शेवटी, आता देवाने त्याला सद् बुध्दी दिली म्हणुन आपल्या दाराशी नातं जोडाया आलाय! मोठ्या बहिणिच्या मनान माफ़ करती त्याला... " अमरने पाहिले काकुंच्या डोळ्यात चांदणं चमचमत होते. त्या डोळ्यात इतके समाधान कधीही नव्हते दिसले.नेहमी चे ते कोरडे ठक डोळे आज चांदणं घेउन नाचत होते. त्यात थोडीसुध्दा जागा नव्हती कशालाच..!आणि त्या चांदण फ़ुलांकडे बघुन त्याला दुस-या कुठल्याही नजरेची त्यावेळी आठवण झाली नाही. त्याने लग्नाला होकार दिला. (क्रमश:
|
R_joshi
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:16 am: |
| 
|
लोपा आतामध्येच लोप न पावता कथा लवकर पुर्ण कर. वाट बघतेय पुढच्या भागाची
|
Anaghavn
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:18 am: |
| 
|
"त्या नेहमीच्य कोरड्या डोळ्यात चांदणे दिसत होते". आवडलं. वाट पहातेय पुढच्या कथेची. अनघा
|
आज office ला जायला निघाल्यावर ती स्वताहुन आरशात डोकावली.कदाचित ड्रेस्च्या रंगामुळे असेल... एव्हढे मात्र खरे की तीला आरशात बघावेसे वाटले खुप दिवसांनी. कानत छोटेसे हि-याचे टॉप्स.अंगावर या व्यतीरिक्त दुसरा दागिना नव्ह्ता पण तीच्या चेह-र्याला सुंदर दिसायला अजुन कुठल्या दागिन्याची गरजही नव्हती. गरज होती ती फ़क्त एका सुंदरशा खळाळत्या हास्याची. ड्रेसच्या लेमन येलो कलर कडे पाहुन ती हसली. अनु नी आणि तीनी पैज लावली होती ’ रोज एकाच रंगाचा ड्रेस घालुन दाखवायचा.दोघी मस्ती करत अशा काहीही वाटेल त्या पैजा तर रोजच लावायच्या.. "तो पण ना वेडाच होता..त्याला वाटले मला हा रंग आवडतो मग तो ही... आणि मलाही नंतर हा रंग आवडायला लागला होता... जाउदे वेळ होतोय.." ती आरशापासुन बाजुला झाली.कामाची फ़ाईल उचलली , आईला बाय केला अन निघाली. डोहातली खळ्बळ आता शांत झाली होती. आठवणींच्या झुळकीने कधी कधी तरंग उठायचे एव्हढेच. मागच्या काही दिवसात तीने ऐकले होते त्याचे एका आमदाराच्या मुलीशी लग्न ठरले. .अनु म्हणत होती त्याच्याच नात्यातली मुलगी आहे. म्हणजे तर आधीपासुनच ओळख असणार? का विचार करतोय आपण ..विचारातच ती तीच्या साहेबांच्या केबिन पाशी आली. दार लोटले आणि आत .."तो" बसला होता.. तसाच जसा पुर्वी बसायचा ’थोडेसे विसकटलेले केस,रुंद कपाळ,धारदार नाक,प्रचंड सुंदर हसु !"प्रसन्न" अजुन काय असते.... याच्या कडे पाहुनच हा शब्द तयार झाला असावा.. असे तीला नेहमी वाटाय्चे इतके कसे "प्रसन्न" राहु शकते कुणी? पण ते gracefull smile आज ऒठाच्या कोप-यातुन हरवल होतं. काही न सुचुन नुसती नजर भेट होवुन ती बाहेर निघुन आली. हाता पा्यात त्राण नाही राहिले आणि घशाला कोरड पडली आहे असे तीला वाटले.. P.A. म्हणाला "मॅम, जुने साहेब आलेत, आज त्यांची कोर्टाची तारीख होती इथे. भॆटला की नाही तुम्ही?." " हो भेटलेकी ", ब-याच वेळानी तीच्या तोंडुन आवाज फ़ुटला...! तीला वाटले अजुनही त्याचा मला राग येत नाहिये. आज पुन्हा तेव्हढ्या काही सेकंदात त्याचा चेहरा तीने पुन्हा वाचला... तीला वाटले " पहिल्या प्रेमाचा अंकुर करपला होता तरी आशेचे बीज डोळ्यात तसच होते...!!! (क्रमशा:
|
भावना, व्रुश, प्रिति, नीलु, श्यमली आणि अनघा.. thanks! its exciting. धन्यवाद.
|
Radha_t
| |
| Tuesday, December 04, 2007 - 9:31 am: |
| 
|
सगळे पुरुष मेले एकसारखेच, शेवटी आई जन्मदाती, प्रेयसी / बायको कुठली कोण.. पायची वहाण, पायाला आराम देण एवढच तिच काम अस समजणारे.. मातृभत्क्त असाव की पण त्या अमरने एकदा आईसमोर तिच नाव काढल असत तर काय बिघडल असत. कदाचीत मुलाच्या आनंदात तिही सहभागी झाली नसती? लोप, सही चाललय, येउ द्या पुढच..
|
Jaijuee
| |
| Tuesday, December 04, 2007 - 9:57 am: |
| 
|
अगं राधा, किती टोकाचा अभिप्राय? त्याच्या आईचं कायम पिचलेलं असणं जाणवतयं की कथेत! त्याच्या शिक्षणासाठी आईचं माहेरी हात पसरणं पण आलयं. हे सगळं त्याला जाणवतयं हेच फार झालं. सगळे पुरुष तसलेच असं कसं म्हणता येईल? त्याच्या आईने मुलाच्या सुखासाठी पुन्हा मन मारणं नकोही असेल त्याला! कथा छान आहे फक्त शेवट झाला असेल तर पटकन संपवल्यासारखा वाटतो आहे, नसेल तर मी वाटच पहातेय.
|
Jaijuee
| |
| Tuesday, December 04, 2007 - 10:00 am: |
| 
|
ए, मी क्रमश: लिहिलेलं वाचलच नाही त्यामुळे शेवटच्या वाक्याचा पहिला भाग प्रतिक्रियेतून कृपया गाळून वाचावा.
|
राधाला अनुमोदन!!!! नुसता विषय काढायला काय जात होतं? आणि एक मूढ प्रश्न: heroineला वाईट का वाटत नाहिय???? चू. भू. द्या. घ्या.
|
रोज सकाळी धुक्यात धुरसट झालेले छोटे तळे खिडकीतुन दिसायचे, आता हिवाळा सुरु होत होता. पानगळीने सारे रान निष्प्रान काष्ट बनत होते. बदलत्या ऋतु पुढे प्रत्येकालाच मान तुकवावी लगते ना? अमर नुसताच मघा पासुन खिडकीत उभा होता. घरासमोरच्या बागेत सकाळी सकाळी मानेवर तपकिरी सोनेरी पिसे असलेली भारद्वाजाची स्वारी चक्कर मारायला यायची.., पक्ष्यांची किलबिल गाणी ऐकु यायची.. मन "प्रसन्न" ्व्हाय्चे .पण एक आठवणीची सर येउनच जायची. काकु ला जर भारद्वाज दिसला तर काकु म्हणायची "आजचा दिवस भाग्याचा आहे." office ला निघतांना त्याने काकुला फोन केला. "इकडे येउन रहा म्हणुन गळ घातली.. इथे रोज भारद्वाज दिसतो म्हणु्नही सांगितले.!" त्याला वाटत होते काकु इथे येउन राहिल तर ही अस्वस्थता कमी होईल. मन लागेल. एकदा तीला भेटावे असे अमरला फ़ार वाटले, आता केसला गेलो तेव्हा दिसली होती तेव्हा तो म्लान चेहरा पाहुन त्याला कससच झाले. वाटले कित्येक दिवसात हसली सुध्दा नसेल.पण तो निग्रहाने बोलला नाही. आपण तीचे आयुष्य का थांबवुन घ्यावे? आणि आपले ही? कधी कामा व्यतीरिक्त एकमेकांशी बोललो नाही की भेटलो नाही. तो तयार होण्यासाठी bedroom मध्ये गेला. त्याच्या हातात सगळे तेच रंग येत होते... त्याने कपाटातुन "त्या खास" रंगांचे सगळे शर्ट काढले.आणि डस्ट बीन मध्ये टाकुन दिले. एकदा विसरायचे ठरवले ना ...!! त्याने पाढरा शर्ट घातला आणि घराबाहेर पडला.त्याच्या नेहमीच्या वेळी ड्रायव्हर ने गाडी दारात आणुन उभी केली होती. तो गाडी पर्यन्त जाई तोवर त्याचा "विसरण्याचा निश्चय टिकला" गाडीत बसल्यावर तो ड्रायव्हर ला थांब म्हणाला. तो परत आलेला पाहुन ओर्डरलीने घाईने दार उघडले. तो bedroom मध्ये गेला "ते" सगळे रंग डस्ट्बीन मध्ये तसेच पडुन होते. त्याने सगळे शर्ट परत उचलता उचलता आपल्या "मनाला" म्हटले. " थोडी अजुन मुदत दे मला विसरायला..!" त्याने ते सगळे रंग पुन्हा नीट घडी करुन कपाटातल्या आतल्या कप्प्यात ठेवुन दिले. शरीर मनात त्राण येउ लागले नी लगेच वसंत संपला असे त्याला वाटत होते. त्या वसंत ऋतुशी "संवाद" नाही साधला तेच बरे झाले. नाहीतर त्याला भेटण्यासाठी सर्वस्व पणाला लागले असते. त्या पेक्षा त्याकडे पाठ फ़िरवण्याची किंम्मत नक्किच कमी असेल. स्वता:चे अत्यंत प्रिय असे काही जीवनात सोडुन देण्याची वेळ प्रत्येकावरच येते का? माहित नाही. पण काकुवर आली होती. तीला माहेर सोडावे लागले होते. आज तीच्या नशिबाने ते मिळते आहे तर का मी मध्ये यावे? (क्रमशा:
|
जाई जुई आणि राधा thanks.. heroineला वाईट का वाटत नाहिय????>> धुमशान वाटत्य की निट वाचा मग लक्षात येइल तीचे डोळे भरुन येतात पण फ़क्त ती धाय मोकलुन रडत नाहीये. आणि ती ते कधी करणार पण नाही.
|
yape, you are right!
|
yape, right Lopa ur absolutely right........
|
Vrushs
| |
| Tuesday, December 04, 2007 - 4:11 pm: |
| 
|
त्या वसंत ऋतुशी "संवाद" नाही साधला तेच बरे झाले. नाहीतर त्याला भेटण्यासाठी सर्वस्व पणाला लागले असते. त्या पेक्षा त्याकडे पाठ फ़िरवण्याची किंम्मत नक्किच कमी असेल. खूप छान..........
|
|
|