|
Supermom
| |
| Friday, December 07, 2007 - 2:44 am: |
| 
|
पूनम, एकदम मस्त. नेहमीच्या पाहण्यातली गोष्ट, पण किती सुरेख रीतीनं फ़ुलवत नेलीस. "आमच्या लग्नाला इतकी वर्षं झाली, तरी अजूनही सगळं स्पष्टपणेच बोलायला लागतं, त्यामुळे असं ’ मनं समजून घेणार्या’ लोकांचा मला जाम हेवा वाटतो बुवा" अगदी अचूक. (मला तर आमचे आधीचेच डायलॉग्स आठवले. 'अग, तू सांगितलं का नाहीस पण?' 'सांगायचं काय... तुम्ही समजून घ्यायला नको?') आता लग्नाला इतकी वर्षं झाल्याने आम्हीपण सारं 'सपष्ट' बोलतो तो भाग वेगळा.
|
Psg
| |
| Friday, December 07, 2007 - 7:35 am: |
| 
|
धन्स लोक्स 'मनं समजून घेणं' खरंच फार अवघड झालंय नाही मुली स्कार्फ गुंडाळतात हे खरं आहे, पण ते एका ठिकाणहून दुसरीकडे जातानाच. आणि पुण्याच्या मुलींकडून ही स्कार्फ गुंडाळण्याची 'कला' बाकी मुली मुद्दाम शिकूनही घेतात! अर्थात तोंड लपवून 'प्रेम' करणारे बरेच प्रेमवीरही आहेत, पण ते सगळीकडेच.. एकट्या पुण्यात नाही हे सगळं खूपच अतिशयोक्त लेखन आहे. विनोदनिर्मितीसाठी त्या स्कार्फचा उपयोग केलाय, इतकंच तुम्हाला आवडलं, तसं कळवलंत याबद्दल मनापासून धन्स!
|
Zakasrao
| |
| Friday, December 07, 2007 - 12:38 pm: |
| 
|
अग, तू सांगितलं का नाहीस पण?' 'सांगायचं काय... तुम्ही समजून घ्यायला नको?'>...... अरेच्च्या, हे युनिवर्सल आहे तर. मी उगीचच मला स्वतालाच कमी समजत होतो
|
पूनम, .. .. ..
|
Gsumit
| |
| Saturday, December 08, 2007 - 4:19 am: |
| 
|
पूनम, एकदम सही, फक्त त्या "मन समजण्यावर" एक किस्सा टाकावासा वाटतो... आम्ही कॉलेजला असतानी, एक देशपांडे मास्तर अन मास्तरीण असं जोडपं होतं... दोघही दिसायला एकदम क्युट, ते कमल हसन तर ही पद्मिनी कोल्हापुरे... आम्ही जर्नल चेक करायला घेउन जायचो तेव्हा दोघपण एकमेकासमोर बसुन गप्पा मारत असायचे... पण आम्हाला त्यातलं काही कळलं तर शप्पथ, इतके हळु बोलायचे ते, नुसते ओठ हलतानी दिसायचे... आमच्यात पैंजा पण लागायच्या त्यांचे बोलणे ओळखुन दाखवायच्या... हे वाचतानी त्यांचिच आठवण येत होती...
|
पुण्यात हेल्मेट घालणारे खुप कमी. त्यात ह्याने हेल्मेट घातले होते हे वाचुन आनंद वाटला. दुसरे काय करतात, काय खातात,ई.ई. कडे फारसे लक्ष देवु नये हे उत्तम.त्यांच्या पैशाने ते खातात, त्यांच्या पैशाने ते स्कार्फ की काय तो गुंडाळतात. आपल्याला याचा त्रास होण्याचे काही कारण आम्हाला दीसत नाही. वरील विनोदी कथेचा आम्ही निषेध करतो आणी हेल्मेट बनविणार्या कारखान्यांना उत्तेजन देतो. पुनम.. राग नसावा बर का आमचा. आम्ही या कथेला १००% गुण देत आहोत.
|
झकास! आवडलं. जमून गेलंय.
|
|
|