|
Athak
| |
| Saturday, November 24, 2007 - 1:45 pm: |
| 
|
प्रिन्सेस , छानच . कथेचा काळ बराच जुना वाटतो , मुंबई पार बदलुन गेलीय आता येवुन द्या पुढचे , घेतली का ऍडमिशन ?
|
Princess
| |
| Saturday, November 24, 2007 - 5:09 pm: |
| 
|
पुढचे काही आठवडे तुकारामाने सगळीकडुन नर्सिंग आणि मेडिकल कॉलेजेसची माहिती जमा केली. रसिकाचे नर्स बनण्याचे स्वप्न तुकारामाने बदलुन डॉक्टरचे स्वप्न दाखवायला सुरुवात केली होती. पैशांचा प्रश्न होताच कारण मेडिकलचे शिक्षण घ्यायचे म्हणजे केवळ श्रीमंताच काम. रसिकाला स्वप्नाच ओझे तर झालं होतच पण तुकाराम पैसे कुठुन जमा करु शकेल याचीही चिंता होतीच. तुकाराम ऑफिसमधुन अजुन आला नव्हता. रसिका कितीदा तरी बाहेर जाऊन रस्त्याकडे नजर टाकत होती. आणि काय आश्चर्य, माई आणि आप्पा तिच्या घराकडे येताना तिला दिसले. "रसिका, नवऱ्याच्या घरात गेलीस आणि विसरलीस का ग बाळ?" माईंनी मोठ्या प्रेमाने लेकीला जवळ घेतले. रसिका काही उत्तर देणार तोच आप्पा करवादले "तिचे थेर बंद असतील तर वेळ मिळेल ना... काय, मी ऐकलय ते खरय का? तू म्हणे डॉक्टरीण होणारेस." आप्पांना हे सगळं कस कळल हेच रसिकाला कळेना. "आप्पा... मी... मला... मला तर नर्सचे... पण ह्यांनी.. हे मला म्हणाले की डॉक्टर..." "एक शब्द बोलु नकोस. नवऱ्याच्या घरी आलीस म्हण्जे बापाचा धाक नाही, असे नाही, समजले?" "तुमचा धाक कसा नसणार आप्पा?" रसिकाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दारातुन तुकारामाने दिले. त्याच्या स्मितहास्याने वातावरण थोडे निवळले. "आप्पा, तुमच्या लेकीला डॉक्टर बनवणार आहे मी. खरंतर ते माझे अधुरे स्वप्न आहे आणि मी ते तिच्या रुपाने पूर्ण करणार आहे. नाही म्हणु नका... फक्त माझ्यासाठी." जावयाला नाही म्हणणे त्या जुन्या खोडाला पटले नसावे. रसिकावरची त्यांची नाराजी कमी झाली नाही पण जावयाला विरोध नको म्हणुन ते गप्प बसले. रसिकाने बनवलेला पाहुणचार घेऊन माई आणि आप्पा घरी जायला निघालेत. माई रसिकाला स्वयंपाकखोलीत जवळ घेऊन बोलल्या "पोरी जे करशील त्यात नांव मोठे कर. आप्पांना राग येईल असे काही करु नकोस ग पोरी. आता सहन नाही होणार त्यांना आणि मला सुद्धा." माई, आप्पा गेलेत त्या दिशेला कितीतरी वेळ रसिका अनिमिष नेत्राने बघत होती. तुकाराम तिच्या जवळ येऊन उभा राहिला तेव्हा त्याच्या हातावर तिच्या डोळ्यातले दोन टपोरे मोती पडलेत. क्रमश:
|
Daad
| |
| Monday, November 26, 2007 - 5:19 am: |
| 
|
प्रिन्सेस मस्त चाललीये कथा. पात्र, फ्लो आवडलं सगळं. तब्येतीत रंगूदे मैफिल!
|
Radha_t
| |
| Monday, November 26, 2007 - 6:40 am: |
| 
|
उत्सुकता वाढत आहे, लवकर येऊ द्या पुढच
|
Princess
| |
| Monday, November 26, 2007 - 8:09 am: |
| 
|
तुकारामचे वडिल दादासाहेब मुंबई स्टेशनवर उतरले तेव्हा त्यांना त्यांची वाट पाहत असलेला तुकाराम समोरच उभा दिसला. त्यांच्याकडे धावतच येऊन तुकारामाने वाकुन नमस्कार केला. " पोस्टात कोल्हापुरहुन फोन आला होता, तुम्ही काल निघाल्याचा. कसा झाला तुमचा प्रवास, दादा?" "बरा झाला. तू कसा आहेस?" "मी पण बरा आहे. आईची तब्ब्येत बरी आहे ना?" गप्पा करत बापलेक घरी येऊन पोहचले. डोक्यावरचा पदर सारखा करत रसिकाने पटकन दादासाहेबांना वाकुन नमस्कार केला. "सौभाग्यवती भव" दादांनी तोंड भरुन तिला आशिर्वाद दिला. चहापाणी झाल्यावर तुकाराम आणि दादा साहेब व्हरांड्यात येऊन उभे राहिलेत. "तुका, तुझी तार मिळाली आणि त्याच पावली रक्कम घेऊन निघालो बघ. पैशांची अचानक कशी गरज पडली? काही अडचण आहे का?" "नाही दादा. "हिच्या" कॉलेजात फी भरायची. तुमच्या सुनेला डॉक्टर बनवायचे आहे मला." "तू काय बोलतो आहे, कळतय का तुला? लग्न झालेल्या स्त्रीला कॉलेजात पाठवुन संसाराची धुळवड करणार का? हे मला मंजुर नाही " बराच वेळ दादासाहेबांचा आणि तुकारामाचा आवाज रसिकाला स्वयंपाक खोलीत येत होता. मग अचानक शांतता पसरली. तुकारामाने पुन्हा त्याच्या मधाळ वाणीने दादासाहेबांवर विजय मिळवला होता. दादासाहेब स्वयंपाकखोलीच्या दाराजवळ येउन उभे राहिलेत आणि घसा खाकरत म्हणाले "तुम्ही कॉलेजात जाणार म्हणे?" रसिकाने त्यांच्या पायाकडे बघत फक्त मान डोलावली. "बघा, हे पाऊल उचलणे आमच्यासाठी खुप मोठे आहे. गावांत लोक आम्हाला नाना प्रश्न विचारतील. तुम्ही पहिल्या वर्षात कॉलेजात पहिल्या आलात तरच पुढे मी आर्थिक मदत देऊ शकेल अन्यथा नाही." रसिका किंचित बावरली. पण दादासाहेबांच्या मागे उभ्या असलेल्या तुकारामच्या इशाऱ्याने तिने पुन्हा होकारार्थी मान डोलावली. रसिकाची किंग जॉर्ज कॉलेजात ऍडमिशन करुन दादासाहेब कोल्हापुरला परतले. रसिकाने काळाचे बंधन झुगारुन दादांचा हात हातात घेउन त्यांना वचन दिले "दादासाहेब, मला तुमची सुन नाही, लेक समजा. लोकांच्या प्रश्नांवर तुम्हाला मान खाली घालावी लागणार, असे माझ्या हातुन काहीच घडणार नाही." तिच्या हातातुन हात सोडवुन दादासाहेबांनी तोच हात तिच्या माथ्यावर ठेउन तिला आशिर्वाद दिला. आगगाडीत बसतांना दादासाहेबांचे आनंदाश्रु फक्त रसिकानेच पाहिले होते. क्रमश:
|
Princess
| |
| Monday, November 26, 2007 - 10:33 am: |
| 
|
कोल्हापुरातल्या चौकश्याना "आमच्या सुनबाई डाक्तरीण झाल्यावर सगळ्याना फुकट सुई टोचणार आहेत." हे एकच उत्तर देउन दादासाहेबानी गप्प केले होते. तसे घरात कधीकधी बायको डोकं खात असे पण रसिकाचे वचन आठवुन दादासाहेब खिंड लढवत होते. रसिका कॉलेजात जायला लागली तसे गिरगावात आप्पाना पण लोकांनी चोच मारणे सुरु केले. आप्पा स्वत:च पुराणमतवादी लोकांच्या चौकश्याना काय उत्तर देणार... कावुन जायचे. घरी येउन माईना अद्वातद्वा बोलायचे. "आईने लेकीला वळण लावायला हवे. हा सगळा तुमचा दोष." असे माईंवर डाफरुन कितीदा तरी ताटावरुन उठुन जात. बिचाऱ्या माई... त्यांच्यासाठी काही हे नविन नव्हते. आप्पांचा स्वभाव असा बघता त्यांना मुलगा झाला नाही हे बरेच, असे माईंना वाटायचे. रसिका मुलीची जात म्हणुन ह्यांचे एवढे तरी ऐकले. मुलगा असता तर घर दार सोडुन परांगदा झाला असता... डॉ. स्मिथ... फर्स्ट यीअर मेडिकलला अनॉटॉमी शिकवत. स्मिथ सर म्हणजे स्वतंत्र भारतात केवळ भारताच्या भल्यासाठी राहिलेल्या ब्रिटीश लोकांपैकी एक होते. त्यांचे विषयावर तर प्रभुत्व होतेच पण ते एक चांगले डॉक्टर म्हणुनही लोकप्रिय होते. त्यांचा हात लागला म्हणजे जीव वाचणारच असा पेशंट्सचा विश्वास होता. सोनेरी केस, सोनेरी भुवया, पिवळ्या रंगाकडे झुकणारे डोळे आणि त्यावर सोनेरी चष्मा... या सगळ्यामुळे डॉ. स्मिथना हॉस्पिटलचा स्टाफ आणि स्टुडंट्स "गोल्डन मॅन" म्हणत. एका लग्न झालेल्या भारतीय स्त्रीने मेडिकल कॉलेजात प्रवेश घेणे म्हणजे काय... हे त्यांना त्यांच्या भारतातल्या तीस वर्षांच्या वास्तव्यात कळले होते. त्यामुळे रसिकाला स्वत:हुन ते प्रश्न विचारत. हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या तपासणीसाठी तिला बोलवुन आजार समजावुन सांगत. गरिब पेशंट्सला बघताना त्यांच्या डोळ्यात एक करुण छटा असायची. त्याबद्दल त्यांना कुणीतरी विचारलं असतांना त्यांनी छातीवर हात ठेउन सांगितल होतं "दॅटस द ओन्ली रिजन फॉर स्मिथ टू स्टे इन इंडिया." बरीच वर्षे मुंबईत राहिल्यामुळे डॉ. स्मिथ तोडकी मोडकी मराठी बोलत पण असत. काळ पंख लावुन धावु लागला. रसिकाने अभ्यासात स्वत:ला झोकुन दिले होते. दादासाहेबांच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी तिला कॉलेजात पहिले येउन दाखवायचे होते. तुकारामाने पण यात तिची साथ सोडली नव्हती. जणु त्याचीच परिक्षा असावी असा ताण त्याच्या चेहऱ्यावर होता. रात्रभर रसिकासोबत जागणे, तिला चहा करुन देणे, स्वयंपाकात मदत करणे हे सगळे काही तो करत होता. अगदी परिक्षेच्या काळात तर त्याने ऑफिसमधुन सुट्टी घेतली होती. आप्पांना हे सगळे पसंत पडणार नाही हे त्या दोघांनाही माहिती होते. आप्पा बऱ्याचदा त्यांचा वाढलेला ताण घेउन रसिकाच्या घरी येत. रसिकाला ओरडत. तुकारामाला सांगत, " जावईबापु, तुम्हाला रसिकाला शिकवण्याचा नक्की पश्चाताप होणार बघा. नवऱ्याने बायकोला मुठीत ठेवले तरच संसार सुखाचा होतो." तुकाराम फक्त हसुन त्यांना शांत करत असे. एकदाचा निकाल लागला. रसिका कॉलेजमधुन पहिली आली. डॉ. स्मिथ स्वत: तिच्याजवळ येउन तिचे अभिनंदन करुन गेलेत. कॉलेजने रसिकाला दुसऱ्या वर्षाची फी माफ केली होती. तुकारामला तर स्वर्ग दोन बोटे उरला होता. त्याने दादासाहेबांना तार करुन रसिकाचा निकाल कळवला. आता पैशाची चिंता पण दुर झाली होती. क्रमश:
|
Rajankul
| |
| Monday, November 26, 2007 - 10:47 am: |
| 
|
ही सिनेमाची कथा कुणी सांगितली हितगुजवर? च्यायला त्याचं डोस्कच धरतो. लिहिता येत नाही तर गुमान घरात बसाव. च्यामायला काहीबी घेउन येतात आणि लिहित बसतात.
|
Bsk
| |
| Monday, November 26, 2007 - 11:35 am: |
| 
|
प्रिंसेस, छान लिहीतेस.. काळ खूप जुना आहे, त्यामुळे वेगळी वाटतीय कथा!
|
प्रिन्सेस. तीट लावायला राजनकुल आलेत बरं का? पटपट लिही गं बाई. छोटे छोटे भाग टाकू नकोस.
|
Rajankul
| |
| Monday, November 26, 2007 - 12:07 pm: |
| 
|
बोलता बोलता रात्र चढत गेली. मन सोपवुन झाले होतच... रसिकाने शरीरही तुकारामला अर्पण केलं.>> मला ह्या वाक्याने हसु आवरल गेल नाही. काय म्हणालय वय रसिकाचे १५ आणि तुकारामाचे किती आहे? ? नंदिनी भांडनं अस काढतात.
|
Itgirl
| |
| Monday, November 26, 2007 - 12:35 pm: |
| 
|
प्रिंसेस लिही पुढे लवकर. मी वाचतेय
|
Anaghavn
| |
| Monday, November 26, 2007 - 1:07 pm: |
| 
|
राजकन्ये,, मी पण आहेच गं. अनघा
|
Panna
| |
| Monday, November 26, 2007 - 1:49 pm: |
| 
|
पूनम, मस्त चाललीये कथा!! पुढच्या भागाची वाट बघतेय.. लवकर टाक!
|
Princess
| |
| Monday, November 26, 2007 - 1:57 pm: |
| 
|
सगळ्यांना धन्यवाद. माझ्या कथेला पण तीट.... चला म्हणजे मी पण दाद, नंदिनी, यांच्या इतकी मोठी झाली तर. राजनकुल, तुम्ही म्हणताय ते खरय. फिल्मीच कथा आहे.
|
माझ्या कथेला पण तीट.... ये तीट क्या होता है????च्यायला ताट ऐकल होत, तट पण ऐकल होत पण तीट काय असत??
|
Aashu29
| |
| Monday, November 26, 2007 - 6:51 pm: |
| 
|
पूनम छान सुरु आहे ग!! राजनकुल, ती मन, शरीर अर्पण वालि भाषा लेखिकेची आहे, १५ वर्षिय रसिकाची नव्हे! चिन्या, तुझ्या मातोश्रिंना विचार तीट म्हणजे काय ते, तुला लहानपणी लावला असेल त्यांनी!:-)
|
Aashu29
| |
| Monday, November 26, 2007 - 8:53 pm: |
| 
|
पंधराव्या वर्षी इंटर,मेडिकल म्हणजे कमाल.>>>> ह्म्म्म, इथे मात्र गडबड आहे हं पूनम!
|
Manjud
| |
| Tuesday, November 27, 2007 - 5:54 am: |
| 
|
प्रिन्सेस, good one..... go ahead.
|
Arc
| |
| Tuesday, November 27, 2007 - 6:06 am: |
| 
|
पहिली येन्याइतकि ति खरेच हुशार होति का?कि उगिचच heroin म्हनुन दोक्यावर घ्यायचे? ह पण melodrama म्हनुन चान आहे. actualy माज़्या ओलखिच्या एक मोथ्या बाइ आहेत त्यान्चे पन १५ व्या वर्शि लग्न ज़ाले होते त्या कहि फ़ार हुशार नाहि आहेत पन त्याना उगिचच वातते कि आपन Doctor होउ शकलो असतो. आपले आपल्या वदलानि नुकसान केले. तसे बघायला गेले तर खुप मोथा असल तरि फ़ार चानगला नवरा मिलाला आहे त्याना
|
arc , ती हीरॉईन आहे.. नायिका आहे. आणि लेखिका ठरवेल तर ती पहिली येईल नाहीतर पुढच्या वर्षी स्मिथबरोबर लफ़डं करेल.. आणि १५ व्या वर्षी लग्न झालं.. त्याच वर्षी मेडिकलला गेली असं कुठे लिहिलय..?? प्रिन्सेस, तपशील नीट लिहत जा जरा.. उगाच गोंधळ नको.. आई गं.... ही पोरगी बीअरच्या ग्लास पर्यंत केव्हा पोचणार?
|
|
|