|
Ajai
| |
| Tuesday, November 20, 2007 - 9:42 am: |
|
|
हल्ली बर्याच चनेल्सवर standup comedy- mimicry अशा प्रकारचे कार्यक्रम असतात. झी मराठीवर ही असाच हास्यसम्राट नावाचा कार्यक्रम चालु आहे. इथे विनोदवीर बहुतेक इकडुन तिकडुन गोळा केलेले विनोद एका धाग्यात गुंफुन हसवण्याचा प्रयास करतात. तसेच हे येक काहिच्या काही गद्य. इथे नमुद केलेल्या व्यक्तिंच्या लकबा बोलण्याची पद्धत imagine करुन वाचावे. तसेच गाणी typical mimicry प्रमाणे visualize करावीत __________________________ situation मराठी सारेगमपाची एक खास फेरी. final round मधले ५ स्पर्धक एक एक गाणे गाणार. यातल्या विजेत्याला हिंदी सारेगमा मधे थेट entry मिळणार म्हणुन ही खास हिंदी गाण्यांची फेरी. आणि खास परिक्षक म्हणुन डॉक्टर श्रीराम लागु व डॉक्टर गिरिश ओक यांची उपस्थीती. तर पहिला स्पर्धक येतो. त्याचे गाणे. गाणे अभीजीतचे पण थोडे शहारुख खान अंदाजात. सर्दि खासि ना मलरिआ हुआ ये गया यारो इस्को लव लव लव लवेरिआ हुआ लवेरिआ हुआ लवेरिआ हुआ गाणे संपल्यावर परिक्षकांच्या प्रतिक्रिया.. डॉक्टर लागु: मी साऊथ आफ्रिकेत काही वर्ष प्रॅक्टीस केली पण या.SSS रोगाSSSSSSSSSSचे नाSSSव मी पहिल्यांदाच ऐकतोय. तु एक anacin ची गोळी घे. कदाचीत बर वाटेल. डॉक्टर ओक्- तुमच्या alopathy मधे नसला तरी आमच्या आयुर्वेदात या रोगावर बरेच लिहलेय डॉक्टर लागु. हा रोग बराच चिवित्र असतो, या स्पर्धकाने मला कार्यक्रमानंतर भेटावे, मी लागु पडेल असे औषध देईन. त्यानंतर दुसरा स्पर्धक त्याचे गाणे. सुर रेल्वे डब्यातला. सिने मे जलन आखोन्मे तुफ़ान सा क्यो है इस शहर मे हर शक्स परेशान सा क्यो है डॉक्टर लागु: हा acidity चा प्रकार वाटतो दोन जेलुसिल चघळा बरे वाटेल. डॉक्टर ओक्- लागुंचे निदान बरोबर आहे पण मात्रा लागु नाही पडणार. त्यापेक्षा आम्लपित्तनाशक पाटणकर काढा घ्या. अशोक मामा discount देतील. स्पर्धक क्रमांक ३ गाणे, आणी धुडगुस ओ हसीना, ओ नीलमपरि, कर गयि कैसे जादुगरि नीन्द इन आन्खो से छीन लि है, दिल मे मेरे है दर्द ए डिस्को दर्द ए डिस्को, ... अब फिरता हू मै लन्डन, परिस, न्यु यॉर्क, येल्ये सन फ़्रान्सिस्को दिल मे मेरे है दर्द ए डिस्को दर्द ए डिस्को, ... डॉक्टर लागु: आधिच उशिर झालाय तुम्हाला लगेच Angiography करुन घेऊ आपण डॉक्टर ओक्- आणि हो ते लन्डन, परिस, न्यु यॉर्क, येल्ये सन फ़्रान्सिस्को फिरणे बंद करा. तुम्हाल प्रवास झेपायचा नाही चौथि स्पर्धक गातो- १८मैनु ईश्क़ दा लगिया रोग मेरे बचने कि नैय्यो उम्मीद १९ गाण्याची पद्धत बोबडी अनुराधा. डॉक्टर लागु: तुम्ही एलिसा टेस्ट केलेय का कि स्वताःचा अंदाज? डॉक्टर ओक अशा बाबतीत संयम बाळ्गायला हवा, आता उम्मेद्द खरच नाहिये शेवटचा स्पर्धक्: गाण्याची पद्धत सर्दी झालेला कुणिही प्रतीमुकेश बस येहि अपराध मै हर बार करता हून आदमि हून आदमि से प्यार करता हू दोन्ही डॉक्टर काही बोलायच्या आत प्रेक्षकातुन धावत येक जण येतो, स्पर्धकाला कडाडुन मिठि मारतो, आणि म्हणतो "मित्रा तोडलस" तो असतो करण जोहर. दोघेमिळुन आदमि हून आदमि से प्यार करता हू परत परत गातात.
|
Zakasrao
| |
| Tuesday, November 20, 2007 - 12:01 pm: |
|
|
दोघेमिळुन आदमि हून आदमि से प्यार करता हू परत परत गातात>>>>>>>>>>.
|
Psg
| |
| Wednesday, November 21, 2007 - 5:12 am: |
|
|
चांगलं लिहिलं आहे अजय
|
Akhi
| |
| Wednesday, November 21, 2007 - 5:45 am: |
|
|
ही ही ही!!!! मस्तच!!!! जबरी!!! लगे रहो.......
|
Ajai
| |
| Wednesday, November 21, 2007 - 9:35 am: |
|
|
खर म्हणजे कुणि प्रतिक्रिया (चांगली, वाईट) तरी देईल का या बद्दल साशंक होतो म्हणुन या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
|
Sush
| |
| Thursday, November 22, 2007 - 3:51 am: |
|
|
मी साऊथ आफ्रिकेत काही वर्ष प्रॅक्टीस केली पण या.SSS रोगाSSSSSSSSSSचे नाSSSव मी पहिल्यांदाच ऐकतोय. सहिच, श्रीराम लागुंची बोलण्याचि स्टाइल सहि उतरवलिये
|
आणि हो ते लन्डन, परिस, न्यु यॉर्क, येल्ये सन फ़्रान्सिस्को फिरणे बंद करा. तुम्हाल प्रवास झेपायचा नाही >.आम्लपित्तनाशक पाटणकर काढा घ्या. अशोक मामा discount देतील.>>>.
|
Antara
| |
| Friday, November 23, 2007 - 12:50 pm: |
|
|
अजय, छान लिहिलय. अन दिवाळी अंकात हास्य बोध कथा पण आवडल्या!
|
Ajai
| |
| Friday, November 23, 2007 - 4:22 pm: |
|
|
Sush /Lopamudra /Antara- pratikriyandbaddal aabhaar
|
Gobu
| |
| Friday, November 23, 2007 - 4:30 pm: |
|
|
अजय, सही लिहीलेस रे!
|
Meenu
| |
| Wednesday, December 05, 2007 - 5:08 pm: |
|
|
मित्रा तोडलस .. ..
|
Dakshina
| |
| Thursday, December 06, 2007 - 10:17 am: |
|
|
अजय, जबरदस्त लिहीलयंस रे... खूप आवडलं...
|
Dineshvs
| |
| Thursday, December 06, 2007 - 5:06 pm: |
|
|
अजय हा शो आवाजी सादर करायची क्षमता नक्कीच असणार. तो कधी ऐकायला मिळेल ? मानिनी च्या दिवाळी अंकात, एका आज्जीबाईनी, ( नातीच्या मदतीचा उल्लेख आहे म्हणुन आज्जी म्हणतोय ) नैरोबी वर एक लेख लिहिला आहे. त्यात तोडलेले तारे. तिथे ना एड्स खुप आहे. सरकार काळजी घेते. हॉटेलमधले ग्लासेस वैगरे कागदात गुंडाळुन देतात. अस्साच हसलो, ते वाचुन.
|
Ajai
| |
| Friday, December 07, 2007 - 5:02 am: |
|
|
AIDS बद्दल बरेच गैरसमज आहेत दिनेश. मिमिक्रि फार पुर्वी करायचो (दोन तीन आवाज्- मिथुनदा,निळु फुले,शत्रुघ्न सिन्हा इत्यादी. ) त्यात फार प्रगती नाही झाली त्यामुळे नाद सोडला तो
|
अजय, मजा आ गया दोस्त.. .. शेवटचा सीन तर जबरीच
|
|
|