|
Pama
| |
| Friday, November 16, 2007 - 5:59 pm: |
|
|
घाबरू नका!! मी कही मंत्र तंत्र, जादू टोणा असल्या कुठल्याही विषयाबद्दल बोलणार नाही. या तांत्रिक शब्दाला फसू नका. ते काय आहे, ' तंत्रज्ञान ' असा साधा सरळ शब्द वापरला असता तर कोणी ढुमकूनही बघितल नस ना इथे! असा निरस विषय म्हणजे लिहून लिहून काय लिहिल असणार? आणि तेही अस जे अजून आपल्याला माहीत नाही? म्हणून ही जरा आपली आयडियाची कल्पना!!! मागे एकदा एका दुकानदाराने हा गुरूमंत्र दिला होता.. " ताईसाहेब, अव लेबल एकदम सॉलेट पायजेल, म्हणजे लोक बघत्यात तरी काय हाय. " तोच आजमावण्याचा प्रयत्न करतेय. खर म्हणजे अगदीच काही चुकीचा शब्द नाही हा. तांत्रिक बाबींची माहीती म्हणजे तांत्रिक विद्याच नाही का? मला नेहमी असच वाटत. जस एखादा मांत्रिक काही बाही अगम्या बडबडतो आणि 'ओम फट्S स्वाहा ' म्हटल की असलेली वस्तू गायब होते, कसले कसले आवाज एकू येतात, भविष्य कळत.. अगदी तस्सच तंत्रज्ञानाच्या बाबतीत पण आहे. मग जे लोक या करामाती कशा घडवून आणायच्या हे सांगतात त्यांना तांत्रिक का म्हणू नये?? आता बघा हं... तुम्हाला रस्त्यात अचानक कुणीतरी भेटत. मग त्यांचा नेहमीचा प्रश्न... "अरे आहात कुठे इतके दिवस? काय पत्ता नाही काही नाही. आता अस करा तुमचा mobile number च देऊन ठेवा म्हणजे मनात आल की तुम्हाला फोन करता येईल." मग नाईलाजानं नंबरांची अदला बदल होते. खर म्हणजे त्या गृहस्थांनी फोन बीन करावा आणि आपलं बील वाढवाव अशी आपली मुळीच इच्छा नसते. हे म्हणजे घरच झाल थोडं अन व्याह्यानी धाडलं घोडं अस आहे. आपण फोन केला तर ठीक आहे, पण दुसर्यानी केला तरी आपल्यालाच भुर्दंड.. भले शाबास!! दुसर्याला जातय का फोन फिरवायला? पुन्हा ' घरी नव्हतो ' असली सबब चालत नाही... हे प्रकरण सदोदित तुमच्या पाठीवर भुता सारख असतच. तरी बर त्यावर नंबरं कळतात. नेमका चार वेळा घेतला नाही कि समोरचा बेट्या हुशार असतो, भलत्याच फोनावरून बोलतो. काय जाणो कुणाचा महत्वाचा असेल म्हणून नंबर माहीत नसतानाही आपण उचलतो आणि मग ' हाय रे कर्मा' म्हणत पुढचा बराच वेळ अक्कल खाती जमा करतो. मी तर हे mobile प्रकरण बाळगण्याच्या अगदी विरोधात आहे. अहो, mobile वर बोलण्यानी करलासा cancer होतो असल काहीतरी शोधून काढलय म्हणे.. मग सांगा उगाच विषाची परिक्षा कशाला? आधीच लोकांनी फुंकलेल्या बिड्या सिगारेटी हुंगून माझ बरच आयुष्य कमी झालय. पण हे mobile प्रकरण कुत्र्याच्या छत्र्यांपेक्षा जास्त वाढलय. आमच्या झाडूवाल्या पासून गल्लीतल्या पानवाल्या पर्यंत सगळ्यांच्या गळ्यात, खिशात किंवा आणि कुठे कुठे मिरवत असत. 'जन गण मन' पासून ते 'बिडी जलायले' पर्यंत सगळी गाणी एकाच भावनेने म्हणण्याचा उदात्त भाव मी दुसरा कूठेही बघितला नाही. परवा 'यशटी' नी कुठेस जाताना का येताना माझ्या बाजूच्या शिटावर एक मळकट झब्बा पायजामा आणि गांधी टोपी बसली होती. दोनच मिनिटात, 'ये जवळये लाजू नको' एकू आल आणि मी तीन ताड उडाले. 'ख्याख्याख्या...' करत गांधी टोपी हसली आणि खिशातून हा गडी ओरडला अस मला दाखवून गूळापासून तिळा पर्यंत बाजार भावांची चर्चा चालू झाली. माझ तस यान्च्याशी काही वाकड नाही. अडी अडचणीला कामीच येतात पण खर सांगा, यांचा साधा भोळा फोन करा आणि फोन घ्या असा हेतू असतो का? पक्क्या आतल्या गाठीच आहे हे प्रकरण. एकदा का तुम्ही याच्या मोहात सापडलात की मग बसा त्यावर तासन तास खेळ खोळत, गाणे एकत आणी निरोपा निरोपी करत. म्हणजे आधी आपण प्रत्यक्षात लोकांना भेटतोच, शिवाय जरा दूर गेलो की याच्याशी कानगोष्टी असतातच, तेवढ्यानी पोट भरल नाही की ओळी ओळीचे का होईन निरोप सुरू. थोडक्यात तुम्ही कुठेही कोणालाही सापडावेत हा हेतू. पण त्यामुळे पंचाईत अशी की घरी नसल्यामुळे निरोप मिळाला नाही ही थाप आजकाल पचत नाही. तुम्ही नसलात तर तुमचा निरोप घेण्यास सदैव तत्पर असलेले तुमचे फोन तुमची नाती जुळवून ठेवतात. इतका परोपकारी भाव आज कालच्या जमान्यात बघायला तरी मिळतो का? तरी मोठ्या जड मनाने, त्याच्या भावनेला दुखावत, मी त्याला आजपर्यंत त्याला दूर ठेवलय. त्याचा चुलत भाऊ माझ्या घरी आहेच. तो बिचारा इतकी सेवा करतो माझी कि मला जागच उठाव ही लागत नाही. कुणी माझी आठवण काढली की हा लगेच त्याच नाव मोठ्याने सांगतो. माझी मर्जी असली तर मी उचलणार, नसली तर तो ४ वेळा नाव घेतो आणि मग गप बसतो. त्यानी किती तरी बरे वाईट निरोप माझ्या पर्यंत पोहचवलेत, माझी आदळ आपट सहन केलीय तरी मुकाट एका बाजूल पडून राहतो. आता तांत्रिक विद्येचा हा एक असर मी मोडून काढलाय. दुसर्याला दुर ठेवण मलाही जमलेल नाही. अहो हाच तो आपला..१४ विद्या ६४ कलांमधे पारंगत असलेला... संगणक हो!! बेट्याला काहीही विचारा.. चटाचटा उत्तर देतो. माझे पत्रव्यवहार अगदी इमाने इतबारे संभाळतो. पण पुन्हा पंचाईत अशी कि इतक्या तत्पर सेवेची आम्हा भारतीयांना सवय नाही ना! पोष्टातून वेळेवर पोहचलच नाही, किंवा 'अरे मिळाल नाही का.. कधीच टाकल होत" असल्या सबबी त्याच्यापाशी चालत नाहीत. इथे टाकल पत्र कि तिकडे मिळाल. आपल्य पोटात इतक साठवून कस काय ठेवतो कुणास ठाऊक? या प्राण्याची मात्र मला भितीच वाटते. एक तर याला सुरू केल कि अनंत प्रश्न विचारून बेजार करतो. परत, एकदा सांगून हा गप बसतो का? नाही. मग ' खरच करू का?' , ' नक्की नं?' अस सारख विचारत राहणार. मधेच आपल कसली कसली आठवण करतो, जरा वेळानी विचार म्हटल कि दोन मिनिटात परत हजर.... ' आता करणार का?' वैतागून काही तरी सांगितल कि ह्याच पुन्हा बिनसणार आणि याच बिनसल तर याची समजूत काढायला मला काही जमत नाही. कधी याच्या अंगात कुणी घुसल कि तांत्रिकच बोलवावा लागतो. तो आपल्या अगम्य भाषेतील तंत्रांचा वापर करतो तेव्हा कुठे याच डोक ताळ्यावर येत. अस काही आपल्या माया जालात सगळ्यांना अडकवून ठेवलय.. कि सगळे चांगले गळ्यापर्यंत त्यात रुतून बसलेत. घरी तर घरी, याला आता car मधेही घेऊन फिराव लागत. गंमत अशी कि हे सगळे तांत्रिक लोकही एक मेकांना मिळालेले असतात. अपूर्ण
|
Pama
| |
| Friday, November 16, 2007 - 7:53 pm: |
|
|
म्हणजे जसा एक doctor दुसर्या कडे पाठवतो ना.. तस. काय तर म्हणे.. फोन ला संगणक जोडा, संगणकाला सिनेमा जोडा, सिनेमाला गाणी जोडा, गाण्याला चित्र जोडा, म्हणजे एकंदरीत जोड्या लावा!! आजकाल गाडीत तर म्हणे काहीही करता येत. गाडीला बोट लावलत कि ती लगेच तुम्हाला ओळखते आणी तुमच्या प्रमाणे सगळ adjust करून ठेवते. सीटची उंची- रूंदी, मागचे पुढेचे आरसे इतकच काय गाडीतील हवामान पण! आता बोला! अहो बोला म्हणजे, मी नाही, अस गाडीतील बाई किंवा बुवा विचारतो.. कुठे जायचय आज? पत्ता सांगितला की अगदी दाराशी नेऊन पोहचवतो. आमच्या घरी या GPS system ला "चिऊताई" म्हणतो आम्ही. सारखी काहीतरी चिऊ चिऊ करत असते म्हणून. '४०० फुटांवर डावीकडे वळण आहे', ' आता १०० फुटांवर वलण आलय', 'आता वळायचय हं', 'आता वळ'... अस अनेक वेळा सांगूनही जेव्हा आम्ही तसेच पुढे गेलो, तेव्हा अतिशय नम्र पणे तिने पुन्हा एकदा रस्ता सांगायला सुरवात केली. दोन वेळा तिच एकल नाही तेव्हा शेवटी.. आता जागा मिळेल तिथून पर फीर.. असा तिचा सल्ला आला. हे सगळच दृश्य आमच्या गाडीला नवीन होत. कदाचित म्हणूनच अगदी भांबावून गेली असेल ती. एरव्ही... "अरे डावीकडे वळायचय पुढे.." "हो माहीत आहे मला." अस दमदर उत्तर. " अरे वळ वळ.." "ओरडू नको.. कळतय मला.." "गेल ना वलण.. आता कस जायच" "पुढून परत उजवी कडे वळता येत." "उजवी कडे कस.. डावीकडून जायचय आपल्याला" " माझा रोजचा रस्ता आहे.. तू सांगू नको. मला महीती आहे." " अरे हा तर one way आहे. आता पुन्हा फिरावा लागणार." "तुला नीट directions घेता येत नाहीत." गाडी रुळावरून घसरली... " मग तू घ्यायचेस ना.. आता विचार कुणालातरी." "इथे कुठे विचारणार. मी शोधतो रस्ता." "अरे पण आपण उलट्या दिशेला चललोय." "तुला direction sense च नाही."........................................................................................... असा सुख संवाद बराच वेळ झाल कि, रस्ता चुकलो ही माझी चूक नसून तूझच चूक आहे अस आम्ही दोघे एकमेकांना पटवून देण्यत नेहमीप्रमाणे असफल.. अचानक मग इअतक विनम्रपणे आपल्याला कुणीतरी परत परत directions सांगतय हे चित्र पचायला जरा जड गेल. चिऊताई बरोबा एक कावळेदादाही असतो. पण एकंदरीत काही झाल तरी बायका आपलच खर करतात तेव्हा त्या system मधेही कावळेदादा पेक्षा चिऊताईला जास्त कळत असा निष्कर्ष काढून चिऊताईंची वर्णी लागली आणि अम्ही तिच्या सांगण्यानुसार पत्ते शोधून काढायाला सुरुवत केली. बर हिची गंमत अशी होते, कि उंच buildings आजूबाजूला आल्या कि ती भ्रमिष्ट होते.. काहीच्या काही सांगते. एकदा वळायला सांगते, एकदा सरळ जायला सांगते, मधेच कुठे जायचय ते विसरून घरचा पत्ता सांगायला लागते. तिला अस बुचकळ्यात टाकून तिची मजा बघण्याचा असुरी आनंद आम्ही अधून मधून घेत असतो. तशी ती काही कच्च्या गुरूची चेली नाही, तिला कुठलाही आणी कसलाही पत्ता विचारा.. बरोब्बर नेते. परवा एका ठिकाणी जायचे होते. जाण जरूरी होत आणि कर्यक्रम फारसा आवडणारा नव्हता, तेव्हा अगदी कार्यक्रम संपायच्या वेळेस जाऊ म्हणजे फार बसाव लागणार नाही आणि पटकन निघता येईल, असा एक plan आखून, उशीर का झाला? या प्रश्नाला.. 'हरवलो होतो, फिरत बसलो बराच वेळ' अशी सोईस्कर थाप मारावी असा एकमतानी प्रस्ताव pass केला. तिथे पोहचल्यावर पाठ करून ठेवलेली थाप मारूनही झाली. तशीच एक थाप दुसर्याही एकाने मारली. निघताना तो मोठ्या हौसेने नवीन गाडी दाखवायला सगळ्यांना घेऊन खाली आला. त्याच्या गाडीत समोरच भलीमोठी चिऊताई दिसली आणी मग त्याला अचानक आपल्या थापेची आठवण झाली. चिऊताई असताना रस्ता चुकून फिरत बसला, ह्या थापेची सावरासावर करताना त्याची त्रेधातिरपिट उडालेली बघून आम्ही वर येताना चिऊताईला पर्स मधी ठेऊन आणल्या बद्दल मनातल्या मनात सुटकेचा निश्वास सोडला. गाडी park करायला लागत नाही, तुम्ही नुसत पर्क सांगितल कि ती आपोआप दोन गड्यांच्या मधे जाऊन बसते हे बघून मल हर्षवायू झाला. दोन गाड्यांच्या मधे गाडी लावणे ते तंत्र मला अजूनही अवगत झालेल नाही. त्यामुळे मी टुनकन उडी मारून हे आपल्या गाडीत हव अशी फरमाईश सोडली. असले चोचले आपल्याला परवडण्या सारखे नाहीत, आणि तशी गाडी घ्यायला vitamin M बरच लागत हे समजल्यावर मी जरा नाराज झाले. अजून एक बातमी हाती लगली ती म्हणजे, गाडी Park करताना मागच दिसाव अशी सोय असलेली पण गाडी असते. दुधाची तहान ताकावर भागवावी असाविचार करून पुढे मागे अपल्याला अशी तरी गाडी घेता यावी अशी स्वप्न सध्या मी बघते आहे. एका parking lot मधून आपल्याच तंद्रीत, मागच्या पुढच्यांची गप्पा मारत जाताना एका गाडीला धडकली तशी ती जोरात आवाज करायला लागली. तिच टॉय टॉय... एकून आता आपल काही खर नाही अस वाटल. पण झाल काहीच नाही.. बरोबरच्या सगळ्यांनी पोटभर हसून घेतल. अशा प्रकारच्या तांत्रिक विद्या ज्यांना अवगत असतात ते काय काय नवीन तयार करतील ते सांगता येत नाही. म्हणून सांगते.. तांत्रिक लोकांबद्दल माझ्या मनात फार आदरयुक्त भिती आहे. एखाद्या मांत्रिक जसा चिडला तर , 'तुझा नाश होईल', 'तुझे सर्वस्व भस्म होईल' असल काही बोलतो. तसा जर एखादा तांत्रिक माझ्यावर चिडला तर तो त्याच्या तंत्र विद्येच्या सहय्याने माझ सगळ नाश करू शकतो अशी माझी खात्री होत चालली आहे. समाप्त.
|
Daad
| |
| Saturday, November 17, 2007 - 6:05 am: |
|
|
पमा, खासच अगदी. सुरूवातीपासून शेवटपर्यंत्- मस्तच. मोबाईल, चिऊताई... जबरदस्त. 'सॉलेट' लिहिलय!
|
Rajya
| |
| Wednesday, November 21, 2007 - 9:44 am: |
|
|
खासच लिहीलंय पमा मला ते मोबाईल प्रकरण फार आवडले
|
Princess
| |
| Wednesday, November 21, 2007 - 10:04 am: |
|
|
पमा, मी वीकेंडलाच वाचले आणि त्यानंतर दोन तीनदा तरी वाचले असेल. खुप मस्त लिहिलय. खुसखुशीत चिऊताई पर्समध्ये लपवुन नेलीस... very smart
|
Divya
| |
| Wednesday, November 21, 2007 - 2:25 pm: |
|
|
पमा, शैली छान आहे तुझ्या लिखाणाची.
|
Tiu
| |
| Wednesday, November 21, 2007 - 5:53 pm: |
|
|
काय मस्त लिहिलंय! एकदम सहज सुंदर लिखाण...
|
खासच. सॉल्लेट मज्जा आली वाचून.
|
Pama
| |
| Monday, November 26, 2007 - 4:41 pm: |
|
|
सगळ्यांना धन्यवाद.. तुम्हाला सगळ्यांना सर्व तांत्रिक विद्यांत यश मिळो!!! :-)
|
मस्त, गाडीतला संवाद अगदी 'आमच्या' गाडीतल्या संवादासारखा वाटला.. शेवटी गाडी तुला direction sence नाही वर येउन पोहचते.
|
मस्त लिहीलय. एकदम लेक्सस ऐल ऐस ४५० ल घेनार की काय? सही है बाप.
|
Amruta
| |
| Tuesday, November 27, 2007 - 2:54 pm: |
|
|
आमच्याकडेहि हाच संवाद असतो. मला वाट्ट सगळ्या नवरा बायकोमधे हाच प्रेमळ संवाद चालत असेल. बाकी लिहिलय एकदम मस्त
|
Satyajit_m
| |
| Thursday, November 29, 2007 - 11:36 am: |
|
|
पमा झक्कास, पन ते तु येश्टीतुन गेली होती अन गान लागल, लय फेका माराया लागली ग तू. येश्टीतुन येकदम मोटारीत confuse झालो ना म्या. पन लय मज्जा आली. पहीला परिच्छेद एकदम चपखल. मी पन काय तरी भुताखेताच वाचाव म्हनुन आलो व्हतो, पन तु चोरी पकडली मग बळेच वाचाया लावलस ना सम्द. लिउन ते लिउन लय चांगल लिवलस अन जबरदस्ती प्रतिक्रिया द्याया लवलीस. चांगल हाय. उगा लिवतात ह्या पोरी चांगल चांगल, आमच्या डोस्क्याला ताप वाचायचा अनि ते भी हापिसात बसुन.
|
Akhi
| |
| Thursday, November 29, 2007 - 11:50 am: |
|
|
झकास मस्त........ आवडल........ सुंदर ४ शब्द झाले
|
|
|