|
Ajai
| |
| Wednesday, November 28, 2007 - 5:57 am: |
| 
|
नीलु_एन्- मे एक ई-बूक रिफ्र करतोय. झकास्- बरोबर
|
Ajai
| |
| Friday, November 30, 2007 - 7:12 am: |
| 
|
pardon me for bad scanning

|
अजय खर सांगाय्चे तर दोन्हि चित्र नाही आवडली. शेडींग ok आहे पण नीलु म्हणते तसे anatomy पुर्ण चुकल्यासार्खी वाटते. (मी काही चित्र कार नाही नीलुसार्खी पण लगेच नजरेला जाणवते म्हणुन सांगितले.)
|
Ajai
| |
| Friday, November 30, 2007 - 9:54 am: |
| 
|
Lopamudra-मी वर एका पोस्ट मधे लिहल्याप्रमाणे मी पुस्तकातुन वाचुन anatomy शिकतोय. as far as face study goes I know the face is devided into 3 parts बाकी चेहरा गोलाकार कि चौकोनि कि ओवल ते बोन स्ट्रक्चर वर ठरते. खर म्हणजे दुसर चित्र टु द स्केल आहे त्यामुळे मला तुम तुम्ही झालेली चुक लक्षात आणुन दिलित तर आभारी राहीन. scanning च्या वेळेला डावा डोळा स्मज झाला होता तो करेक्ट केलाय मी नंतर. पेंसिल ड्रॉंईंग असल्याने तुम्ही जर point out केलत तर सहज बदल करता येतील
|
डोळ्यांना चांगले दिसत नाहिये हे मी सांगु शक्ते पण नक्की कसे दुरुस्त कराय्चे हे नाही सांगु शकत. ( मी अस करते i wiill try अभिजित ने काढलेला फोटो माझ्याजवळ आहे. कारण i know दुसर्याच्या चुका माणसाला लवकर दिसतात.)
|
Abhija
| |
| Friday, November 30, 2007 - 1:20 pm: |
| 
|
ajay, anatomy proportion ithe ajun changle aale aahe. hair texture pan chhan aahe. face rekheev aahe. pan chitra ajun 3d disayla have ani shading pan ajun changle hoU shakel. as i told you earlier, mala chitrakaleche anga naahee. je kahi sangitle aahe te samaanyadyaan aahe.:-) chitra awaDale.:-)
|
Divya
| |
| Friday, November 30, 2007 - 2:33 pm: |
| 
|
अजय, मी एक सांगु का. तुम्ही चित्र बरोबर येतय ना यासाठी दरवेळेस काढताना proportion check करत जा. म्हणजे दोन्ही डोळे एकाच वेळेस रेखाटायला घेताना( I asume तुम्हीपण असच करत असाल.) एक डोळा झाकुन दुसरा बघायचा मग तो झाकुन हा बघायचा. डोळ्यांची outline काढताना ती face frame च्या proportion मधे आहे ना ते ही बघायच. चेहर्याची face frame आणि केशरचना खुप छान आलीये. कपाळापासुन हात सरकवत फ़क्त डोळे आणि कपाळ एवढच दिसेल, बाकीचा चेहरा झाकलाना कि मला screen वर दिसणारा डावा डोळा थोडा चुकल्यासारखा वाटतो. डाव्या डोळ्याचा angle थोडा वरच्या बाजुला गेलाय, खुप lightly पण त्याने proportion बिघडतय. शिवाय face समोरुन जरी असला तरी किंचीत कलला आहे त्यानुसार डोळा नाकापासुन थोडा डाव्या बाजुला सरकवुन बघा. भुवई आणि डोळ्यांच्या मधली widht या टोकापासुन त्या टोकापर्यन्त सेम आहे का? कारण उजवा डोळा परफ़ेक्ट म्हणल तर डाव्या डोळ्याच proportion कुठे चुकतय कळु शकेल. तुम्हाला ही जाणवेल. चेहर्याचा खालचा भाग ओठ, दात हनुवटी, overall smile मस्त आलय. पण तेवढच open ठेवुन बाकीचा चेहरा झाकला कि screen वरती उजव्या बाजुला गाल खालच्या बाजुला थोडा फ़ुगीर झाला आहे, किती खुप lightly असला तरी overall picture च्या proportion मधे खुप फ़रक पडतो. smile खुप छान आलय. नाकाचा शेप उजवी नाकपुडी आनि डावी खुपच वेगळी आली आहे. डाव्याबाजुच्या नाकपुडीचा curve छान आलाय पण center curve त्यामानाने थोडा खाली सरकलाय त्याला वर करता येइल. मग डाव्या साइडच्या नाकपुडीप्रमाणे उजवी पण सेम काढायचा प्रयत्न करुन बघा. smile मुळे येणार्या रेषा डाव्यागालावरची खुप young lady च्या वाटतात तर उजव्या गालावर खालची बाजु किंचीत फ़ुगीर आणि रेष खाली सरकल्याने वयस्कर बाईच्या वाटतायेत. अर्ध्या चेहर्यावर हात ठेवुन हा diffrence कळु शकेल. फ़ार अवघड नाहि नीट करण. anotomy च्या पुस्तकातुन आभ्यास करुन शिकताय हे खुपच कौतुकास्पद आहे. मी तर फ़ार आळशी आहे, येत असुन काही करत नाही. आणखी एक suggestion म्हणजे चेहेर्याच्या उजव्या बाजुला जशा केसांच्या बटा slightly चेह्र्याcया portion वर येतात तशा डाव्या बाजुला कानाच्यावर आणि डोळ्याच्या कडेला किंचीत दाखवा, अगदी outline केल्यासारखे चेहरा आणि केस वेगळे नाही दिसले पाहीजेत. हुश्श... I hope माझ्या सल्ल्यांचा तुम्हाला राग येणार नाही. कोणाला आवडेल नाही अंदाज येत नाही म्हणुन लिहीत नाही कधी. पण अस लिहीलेल आवडल नसल्यास सांगा, मी post उडवुन टाकेन माझे. चित्र काढताना जाणवत किंचीत proportion चुकल की चेहरा बिघडतो. आपल्याला बनवणार्याची कमाल आहे ना. (हे मी वरचा चेहरा बघुन लिहीलय.)
|
Ajai
| |
| Friday, November 30, 2007 - 2:56 pm: |
| 
|
abhjit- thanks. divya -detailed info aaNi comment baddal manapaasun aabhaar. suchanaa laxaat thevun improve karaayachaa prayatna nakki karen
|
Ajai
| |
| Saturday, December 01, 2007 - 6:19 am: |
| 
|
Divya /nilu_n- this is how I go about face study and human figure. would like to get basics correct first.

|
Neelu_n
| |
| Saturday, December 01, 2007 - 6:23 pm: |
| 
|
अरे वा दिव्या काय व्यवस्थित माहिती दिलीस तु फाईन आर्ट वगैरे केलयस का? तु 'येत असुन' लिहलय म्हणुन विचारले... तुझी चित्रे पहायला आवडतील. अजय दिव्याने तर आधीच व्यवस्थित माहिती दिलीय. मागच्या चित्रापेक्षा हे नक्कीच खुप चांगले आलय. फक्त डावा डोळा आणि नाक यात सुधारणा व्ह्यायला पाहिजे. डावा डोळा स्मज झालाय तो नीट correct नाही झालाय. डोळ्यातला highlight स्मज झालाय. तो दिसला पाहिजे. तिचे हास्य छान जमलय आणि केसही. तुमचे प्रयत्न कौतुकास्पद आहे. मी तुम्हाला सांगतेय खरं पण कित्येक दिवसात मीच पेन्सिल हातात नाही धरलीय. खालील बेसिक विषयी.. आता तुम्ही anatomy गंभीरपणे शिकत आहात म्हणुन सांगते.. स्केचिंग करताना पेन्सिल्स strokes तुटक काढु नका. म्हणजे प्रथम pencil strokes सलग काढण्याची थोडी प्रॅक्टीस करा. वरिल स्केच मध्ये पहा हे डोळे आणि नाक.. तिथे रेषा अश्या तुटक तुटक काढल्याने विस्कळितपणा जाणवतो. माझ्याकडे सध्या स्कॅनर नाहिय. म्हणुन तुम्हाला स्केच काढुन दाखऊ शकत नाहिय. पण मी हे basic anatomy sketches दोन चार दिवसात टाकण्याचा प्रयत्न करते... तुमच्या निमित्ताने माझी पण ऊजळ्णी होईल
|
Divya
| |
| Sunday, December 02, 2007 - 9:29 pm: |
| 
|
नीलु, fine art मधे diploma केलाय पण basically drawing लहानपणापासुनच चांगल होत. माझ्याकडे इथे माझे काही paintings नाहीयेत सगळे भारतात आहेत. मागे कधीतरी एक टाकल होत मायबोलीवर, परत काही टाकायची इच्छा झाली नाही. तुझे paintings छान असतात. मी ceramic work पण खुप केल होत india त असताना. इकडे आल्यावर काहीच नाही जमल. पण थोडफ़ार चालु असत mood असला कि. अजय तुम्हाला internet वर पण बर्याच मार्गदर्शन करणार्या साइट मिळु शकतील. मला स्वताला human figures sketch करायला फ़ार आवडत नाही. एकतर ते proportion च जाम tension असत पुर्ण होइ पर्यन्त आणि जर मनासारख येत नसेल तर जाम चिडचिड होते अगदी घरच्यांनापण tension . त्यापेक्षा निसर्गचित्र, पान, फ़ळ, फ़ुल... बरय. जास्त tension नको. म्हणुन तुमचे प्रयत्न नक्किच कौतुकास्पद वाटतात. practice makes perfect so karata rahaa.
|
मागे कधीतरी एक टाकल होत मायबोलीवर, परत काही टाकायची इच्छा झाली नाही.>>.. का ग दिव्या अस, टाकत जा की आम्हालाही guidence मिळतो, ही नीलु आता ऐकायला लागली.. आणि तीची चित्रे दाखवते सध्या.
|
Divya
| |
| Monday, December 03, 2007 - 2:32 pm: |
| 
|
लोपा इथे सध्या माझ्याजळ काढलेले आहेत काही, वेळ झाला कि scan करुन मेल करेन किंवा टाकेन इथे, बघुयात कधी जमतय.
|
Dineshvs
| |
| Monday, December 03, 2007 - 4:51 pm: |
| 
|
दिव्या, आग्रहच हवा असेल तर माझ्याकडुनही थोडासा. इतके छान लिहिले आहे कि चित्र कधी बघायला मिळेल असे वाटतेय. लोपाने पण बर्याच वर्षानी परत चित्रकला सुरु केली. हि कला अशी सोडुन जात नाही कधी, नुसता हातात माऊस, ब्रश वा पेन्सिल धरायची खोटी, काहितरी छानच आकाराला येते.
|
Neelu_n
| |
| Monday, December 03, 2007 - 6:05 pm: |
| 
|
लोपा तु पण हल्ली टाकत नाहीस चित्रं...कथालेखनाला पुन्हा सुरुवात तशी हे पण सुरु करा पुन्हा मी पण आग्रह करणार्यांच्या रांगेत आहे बरं दिव्या जमवच गं लवकर
|
Ajai
| |
| Monday, December 03, 2007 - 6:09 pm: |
| 
|
Tapovan-vajreshvari-vasai
|
Divya
| |
| Tuesday, December 04, 2007 - 12:34 am: |
| 
|
दिनेशदा तुम्ही आग्रह केला म्हणजे टाकायला पाहीजे इथे picture ,पण कुठल्याही कलेला रियाज महत्वाचा. रियाज नसेल तर कलेतील सफ़ाइ जाते. so फ़ार अपेक्षा नकोच माझ्याकडुन.
|
|
|