|
Ajai
| |
| Monday, November 05, 2007 - 10:38 am: |
| 
|
मुंबई म्हणजे भारताचे व्यापार केंद्र आणि इथे कसले कसले बाजार आहेत.त्यातल्या काही बाजारांचा हा आढावा चोरबाजार्- JJ हॉस्पीटल च्या समोरचा मटन स्ट्रीट भाग ओळखला जातो चोरबाजार म्हणुन. इथे अगदी सुई पासुन हत्ती पर्यंत सबकुछ मिळते म्हणुन ख्याती. तुम्ही तुमची गाडी उभी करुन इथे खरेदिला आलात तर तुमच्याच गाडीचे सुटे भाग तुम्हालाच विकतील अशी दंतकथा. खर म्हणजे हे secondhand market पण नावामुळे बदनाम. इथे मुख्यतः जुने फर्नीचर आणि जुन्या वस्तु मिळतील. अगदी कलेक्टर्स आयटम सुध्हा. अर्थात नवी वस्तु रंग रंगोटी करुन antique म्हणुन गळ्यात मारली जाण्याची शक्यता जास्त. फर्निचर घ्याल तर तुमच्या समोर pack करुन delivery करुन घ्या कारण तुम्हाला दाखवलेले antique फर्निचर ऐवजी त्याच सारखे दिसणारे फर्निचर घरी पोचेल. तुम्हाला इथे जुनी पेंटींग्स, फोटोग्राफ्स, जुन्या रेकॉर्ड्स आणि जुने इलेक्ट्रॉनीक्स मिळेल तसेच जुने पितळी दिवे, भांडीही मिळतील. इथे घासाघिस तर करावीच लागते पण अकारण आपल्याला खुप कळ्ते असा आव आणु नका. इथले व्यापारी ते बरोबर ओळखतील. बाजुच्या गल्लित लोखंडी सामान मिळते किलोच्या भावाने. जर डंबेल्स, बारबेल्स घ्यायचे अस्तील तर योग्य ठिकाण देढ गल्ली- कामाठिपुरा १ नंबर आणि २ नंबर गल्ली च्या मधली गल्ली म्हणुन बहुतेक नाव. कदाचीत देढ हा जातीवाचक शब्दही असेल. कधी देवळातुन तुमचे बुट, चप्पल चोरीला गेलेत? त्यांच काय होत माहितीय? ते बुट येतात या गल्लीत विकायला. शुक्रवारी पहाटे ३ वाजता हा बाजार भरतो. ईथे तुम्हाला हवा तो brand तुम्हाला हव्या असलेल्या किमतीत मिळतो. अर्थात सगळाच माल काहि चोरिचा नसतो. काहि duplicate तर काही दुरुस्त केलेले शुज सुद्धा असतात. सकाळी ८ पर्यंत हा बाजार संपतो. कॉलेजला जाणार्या पोरांचा हा आवडता बाजार. याच भागात जवळपास चिंधी बाजार आहे जिथे कपड्याच्या चिंध्या विकल्या जातात. १२ व्या गल्लीत शुक्रवारि पहाटे "सबकुछ" मार्केट भरत अस ऐकुन आहे पण कधी गेलो नाहिय तिकडे. मुसाफीर खाना- मनिष मार्केट च्या मागच्या गल्लीचा भाग. चिंचोळ्या गल्लीतुन आत शिरताना आत काय खजीना असेल त्याचा अंदाज येणार नाही. आतल्या दुकानात आणि रस्त्यावर ड्रेस मटेरिअल, chinese electronics कॉस्मेटिक्स, perfumes जे हवे ते मिळेल इथे कॉलेज कन्यांची झुंबड ना उडेल तर नवल. तुम्हाला हव्या त्या brand चे कॉस्मेटिक्स, मेक.आप किट तुम्हाला मिळतील, hugo boss ची बॉटल इथे १०० रुपयात मिळेल. अर्थात सगळे फेक. बाकिच्या दुकानात तरी काय खात्रि कि तुम्हाला original माल मिळतो? इथल्या दुकानदारांवर विश्वास ठेवायचा तर मुंबईत ८०% ठिकाणी हाच माल मिळतो. secondhand फर्निचर मार्केट ओशिवरा- SV Road - कूठेतरी वाचलेलं आठवतं कि आर्थीक अडचणीच्या काळात जेनिफर शशी कपुरने त्यांच घर ईथल्या फर्निचरने सजवले होते. इथे जवळजव्ळ ६०-७० दुकानं आहेत. जुने फर्नीचर विकत घेवुन त्याला दुरुस्त करुन, पॉलिश करुन विकल जातं. आरसे, खुर्च्या, टेबल, पलंग जे हवे ते फर्नीचर मोगल कार्विंग केलेले फर्नीचर सगळं मिळत. (नविन कर्वि.ग करुन हवे असेल तर माहिम बस देपोजवळ जा) हवेच असेल तर made to order फर्निचर ही मिळेल पण त्यासाठी गल्लोगल्ली दुकानं आहेतच की. धारावी लेदर मार्केट, कुंभारवाडा, लोहार चाळ हे भाग तर सगळ्यांच्या परिचयाचे म्हणुन त्याबद्दल लिहायचे टाळतो. अजुन यात कुणि भर टाका
|
Maanus
| |
| Tuesday, November 06, 2007 - 3:03 am: |
| 
|
ही जागा जास्त प्रभावी वाटतेय. /hitguj/messages/644/105545.html
|
|
|