|
Yog
| |
| Thursday, November 01, 2007 - 4:30 am: |
| 
|
दिनेशभाऊ, हे ललित म्हणून कदाचित योग्य वाटेल पण तरिही लिखाणात एक निश्चीत focus जाणवला नाही.. बाकी मुद्दामून चौकट वगैरे मोडण्याची गरज तुमच्या लिखाणाला भासू नये.. असो. waiting for next..
|
Ashwini_k
| |
| Thursday, November 01, 2007 - 5:13 am: |
| 
|
ए मुलींनो (फ़्रॉकवाल्या आणि दोन छोट्या शेन्ड्यावाल्या, including me ) आणि मुलांनो (चुरगळलेला शर्ट आणि हाफ़ पॅंट वाल्या) भांडू नकाSSSS. चिडका बिब्बा होऊ नकाSSSS. सगळ्यांची आई बोलावते बघा! संध्याकाळी भांडण विसरून पुन्हा खेळायला या बरं.
|
Dineshvs
| |
| Thursday, November 01, 2007 - 8:15 am: |
| 
|
चिन्या, मला वाटते तूमचा आणि अश्विनीचा मुद्दा एकच होता, त्याला मी उत्तर दिलेच आहे. नावाचा उल्लेख करायचा राहिला, त्याबद्दल दिलगीर आहे. नंदिनी माझ्या मनातला आशय समजुन घेतल्याबद्दल खुपच आनंद झाला. खरे तर सांगू नये असा संकेत आहे, पण जसा सर्वच कथाना वास्तवातील कुठलातरी संदर्भ असतोच तसा या कथेलाही आहे. माझ्या एका ज्येष्ठ मित्राच्या बाबतीत साधारण अशीच घटना घडली होती. त्यांच्याबरोबर मी अनेकवेळा त्या रस्त्याने जात असे. प्रत्येकवेळी ती पाटी दिसली, कि त्यांच्या त्या प्रसंगाच्या आठवणी जाग्या होत. ( म्हणुन ते शीर्षक ) बरं या आठवणी त्या स्पॉटवर जाग्या होत असल्या तरी जाताना नव्हे, फ़क्त येतानाच जाग्या होत असत. मग मला ते ऐकावे लागत असे. एकदोनदा मीही वहावत गेलो आणि हळहळ व्यक्त केली. तिसर्या वेळी त्यांच्याच बोलण्यात काही वेगळे घडले असल्याची शक्यता आली. मग मला राहवेना, मी तिथे उतरुन आजुबाजुला चौकशी करायची तयारी दाखवली, तर त्यालाही ते तयार होईनात. परत पोलिसानी केस ओपन केली तर ? माझ्यावरच शंका घेतली तर ? अश्या कुशंका. बरं त्याचवेळी, तेव्हा हि गाडी नव्हती, त्या वयात मी असा दिसत नसे हेही बचाव होतेच. ( घटना तब्बल बारातेरा वर्षांपुर्वीची !!!) मग पुढे बोलण्यातून असे जाणवले कि आणखी एका मृत्युला ते स्वतःला जबाबदार धरत असत. तो मृत्यु एका नातेवाईकाचा असला तरी, त्याबद्दल त्यानी स्वतःला जबाबदार धरण्यासारखी परिस्थिती मला वाटली नाही. आता त्यांच्या या कथेचा एकमेव अपेक्षित शेवट त्यानी स्वतःची अपराधीपणाची भावना सोडणे असाच असायला हवा होता, पण ते झाले नाही. ते अधिकाधिक व्यसनाच्या आहारी जाऊ लागले. कुठल्याही व्यसनाचा मला तिटकारा असल्याने, आमचे संबंध दुरावले. हा या कथेचा वास्तव शेवट. म्हणजे हवा असलेला शेवट झाला नाही आणि वास्तव शेवट, नकोसा होता तरी टाळता आला नाही. आजही मला मी त्याबाबतीत काही करु शकलो नाही, याची खंत आहे. मला वाटले होते कि, या कथेच्या प्रतिक्रियेतुन मला तिसरा शेवट मिळेल. पण ते झाले नाही. नकारात्मक विचार करणारी माणसे आपल्या वागण्यातुन, बोलण्यातुन, समोरच्या व्यक्तिला पण कसे आपल्या विचारांच्या विळख्यात ओढतात, तेच इथे दिसले. सकारात्मक विचार हे प्रयत्नपुर्वक अंगात बाणवावे लागतात बहुदा. परत तुलनेचा इरादा नाही, पण मला दोन जुन्या कलाकृति आठवताहेत. एक आहे जया भादुरीचा हिंदी सिनेमा, मिली, आणि दुसरे आहे मराठी नाटक, अखेरचा सवाल. या दोन्हीमधे एका तरुण, हसर्या, खेळकर मुलीला कॅन्सरची बाधा होते. हळुहळु वाढत जाणारा त्यांचा आजार, नातेवाईकांची निराशा असे दोन्हीकडे आहे, पण दोन्ही ठिकाणी नायिकेचा मृत्यु दाखवलेला नाही. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत, इथेच शेवट होतो. हे मी ज्यावेळी बघितले, त्यावेळी खुप लहान होतो. जया भादुरी आणि भक्ती बर्वे यांचा अभिनय उत्तम होताच. पण बघुन झाल्यावर इतर सर्वांसारखे मला डोळे पुसावेसे वाटले नाहीत. ( त्यावेळी कॅन्सर असाध्य रोग मानला जात असे. ) बाकि सगळ्यांप्रमाणे मला त्यांचा मृत्युच होत असेल हे पटले नाही. सिनेमात वडिल अशोक कुमार आणि नाटकात आई, विजया मेहता, निराश झालेले दाखवले आहेत तरीही मला तसे वाटले नाही, त्यावेळी ते कळले नव्हते पण आता वाटतेय कि त्या दोन मुलींचा अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन मला जास्त भिडला होता. आणि जर माझा कयास बरोबर असेल तर लेखकाला पण तेच अपेक्षित होते. नाहितर या दोन्ही कलाकृतिंचा हमखास रडवणारा मेलोड्रामा करणे अशक्य नव्हते. सव्यासाची, टिका कुणी केली याला महत्व नाहीच, पण जे विधान केलय त्यात टिकेपेक्षा माझ्या मित्रमंडळींचा अपमानच जास्त होता. माझ्या लेखनावर पसंतीची मोहर उमटवणे, हा माझ्या मैत्रीचा निकष कधीच नव्हता. अज्जुकाला कथा आवडली नाही म्हणुन मी तिच्यावर डुख धरायचा, आणि नंदिनीला आवडली म्हणुन मी तिच्या लेखनावर स्तुतिसुमने उधळायची, याची अपेक्षा त्या दोघीदेखील करणार नाहीत. तसे ज्याना हि कथा आवडली नाही ते माझे दुष्मन आहेत, असे मी कदापि मानणार नाहीत. बाकि सगळ्यांच्या मुद्द्याना मी उत्तरे देतोच आहे कि. ज्याना हे लेखन ललित म्हणुन आवडले, कथा म्हणुन नाही, त्यांचा मुद्दा मला नीटसा कळला नाही. कथा म्हणजे निश्चित शेवटच हवा होता का ? मला नाही तसे वाटत. मी वर लिहिल्याप्रमाणे, घडवुन आणलेला शेवट मला नकोच होता. केवळ या कारणासाठी ती कथा, म्हणुन पटत नाही का ? कधीकधी मुद्दाम घडवुन आणलेला सुखांत बेगडी वाटतो. मला वाटतं मराठी दोघी, सिनेमावर आधारित असुनही, केवळ प्रेक्षकांची गरज म्हणुन, लागा चुनरी मे दाग चा सुखांत केलाय, पण तो तरी लोकाना कुठे पटलाय ? प्रितम, डोंट वरी. आम्ही बहुतेक सगळे एकमेकाना ओळखतो. हि फक्त तत्वाची लढाई आहे. आमच्या मैत्रीत त्याने काहिच फरक पडत नाही. इथे मी सगळ्यांचा नावाचा उल्लेख केला नाही, पण तरिही कुणाचा मुद्दा राहिला असेल तर, अवश्य कळवा.
|
Ashwini_k
| |
| Thursday, November 01, 2007 - 9:03 am: |
| 
|
दिनेशदा, थोडे विषयांतर होते आहे पण तुमच्या मित्राची केस नुसत्या स्वभावविशेषाची नसावी (राशीनुसार स्वभाव विशेष ही ढोबळ मानानेच ठरू शकतात असे माझे मत आहे). त्यांना क्रिटिकल सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असावा (कदाचित टोकाचा न्यूनगंड). तुम्ही ज्या अर्थी मैत्री केली होती त्या अर्थी आधी ते एक चांगली व्यक्ती असावेत. मग त्यांच्या कुटुंबापैकी कुणी किंवा तुमच्या सारख्या मित्राने त्या दृष्टीने (म्हणजे नुसते समजावणे न करता, प्रोफ़ेशनल काऊंसेलिंग आणि सायकियाट्रिस्टकडे जाण्यासाठी motivate करणे केले होते का? चिकाटीने हे केले असते तर कदाचित ते बरे झाले असते किंवा mental health अजून बिघडणे थांबले असते. कथेप्रमाणे खरेच घडल्याचे कळल्याने अगदीच रहावले नाही म्हणून लिहीले.
|
Dineshvs
| |
| Thursday, November 01, 2007 - 9:19 am: |
| 
|
राशीचा मुद्दा नाहीच अश्विनी, या घटनेला बरिच वर्षे झाली. त्यावेळी हा मानसिक विकार आहे, हेच कळले नाही, अगदी खरे सांगायचे तर. तुमच्या व्यसनासाठी तुम्ही लंगड्या सबबी शोधताय, असेच मी त्याना म्हणालो होतो. मानसिक विकार त्या व्यक्तिंच्या लक्षात येत नाहीत आणि माझ्यासारख्या परिचितांच्याही लक्षात येत नाहीत. मग उपचाराचा मार्ग कुठुन सूचणार ? आज अश्या खुप व्यक्ति आठवताहेत, कि त्याना जर आधार मिळाला असता, योग्य तो सल्ला उपचार मिळाले असते, तर त्यांचे जीवन बदलले असते. माझ्या काहि कथातून मी हेच मांडले होते. ईनकमिंग फ़्री, कथा पण अशीच होती. माझ्या एका जिवलग मित्राने अनाकलनीय कारणासाठी आत्महत्या केली होती, त्यावेळीही मी प्रिय विशाल, असे पत्र ईथेच मायबोलिवर लिहिले होते. विशाल तर त्याच्या मृत्युच्या केवळ चार तास आधी माझ्याबरोबर होता. त्याला जिवंतपणी भेटलेली, बोललेली, मी शेवटची व्यक्ति होतो, आणि मला त्याच्या आत्महत्येचे कारणही कळले नव्हते. तो असे काही करेल अशी शंकाही आली नव्हती.
|
Giriraj
| |
| Thursday, November 01, 2007 - 2:28 pm: |
| 
|
गिरीसारखे स्वत्:ची काहीच मते नसलेले बिनडोक हुजरे>>>> अहोऽऽ मास्तुरेऽऽ, मला न भेटताच असे बोलण्यापेक्षा किंवा इथल्या दोन चार पोस्ट वाचून माझ्याबद्दल कहीतरी समज करून घेण्यापेक्षा एखाद्या वेळेस भेटून मग काय मत बनवायचे ते बनवा! काय आहे की तुम्हाला खरओखरच प्रतिक्रिया देणे हा उद्देश्य असएल तर फ़क्त तितकीच द्या.. कंपूबाजांकडे पूर्ण दुर्लक्ष करा... मुळात मी दिनेश्च्या लेखनाला प्रतिक्रिया देण्याच्या फ़ंदात पडत नाही आणि माझ्या कविता कधी त्यांनी आइकल्याचे स्मरत नाही! आणि महत्वाचे म्हणजे ज्याला तुम्ही आमचा कंपू म्हणू शकाल त्यांनी कधी माझ्या मायबोलीच्या पोस्ट्वरून माझ्याशी मैत्री केली नाही! असो. बाकी मायबोलीवर प्रतिक्रिया न देण्याचे बर्याच जणांचे कारण 'आपण ज्याला प्रत्यक्षात ओळखत नाही त्याचा उत्साह तथाकथित नकारात्मक प्रतिक्ल्रिया देऊन खच्ची का करावे?' अश्या प्रकारचा असतो (सगळ्यांचा नसेलही)! असो. तुम्हाला पुढील निखळ समिक्षेसाठी शुभेच्चा!
|
चिन्या, मला वाटते तूमचा आणि अश्विनीचा मुद्दा एकच होता, त्याला मी उत्तर दिलेच आहे. नावाचा उल्लेख करायचा राहिला, त्याबद्दल दिलगीर आहे. अच्छा म्हणजे गैरसमज झाला असेल. नाही तुम्ही त्यात माझा उल्लेख केला नाही याबद्दल काही वाटल नाही पण खाली 'काहिंना अनुल्लेखाने माराव' अस लिहिल होत आणि वर परत 'डुप्लिकेट id ' लिहिल होत त्यामुळे मला वाटल की मलाच उद्देशुन लिहिलय कारण इतर सगळ्यांचा उल्लेख तुम्ही केला होता. मी इथे नविन आहे त्यामुळे कोण डुप्लिकेट आहे, कोण खरा आहे व इतर भांडणे मला नवी आहेत. त्यामानाने V & C वरची भांडणे बरी असतात.
|
Rimzim
| |
| Friday, November 02, 2007 - 3:17 pm: |
| 
|
lukhi... kathaa mala pan awadli लुखी मला पण कथा आवडली हो, म्हणजे कथेचा भाव आवडला. आफताब क्या बात है! सत्या तुम्हाला एका दिवसात देवनागरी पण जमले आणि कोणता ID कोणाचा ते पण. ( दिवा घ्या, आणि सांगा कोणत्या शाळेत शिकलात? नाही ईतके हुशार म्हणुन म्हंटले) अज्जुका हि काय भानगड आहे? मी खुप मोठ्या गप नंतर येत आहे त्यामुळे काहि संदर्भ लागत नाहि आहे. (दिवा देवुन आणि घेवुन असे किती नविन dup ids आले आहेत कळेल का मला पण) 
|
|
|