Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 31, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आश्विन » कथा कादंबरी » माणगाव १७ किमी. » Archive through October 31, 2007 « Previous Next »

Ashwini_k
Tuesday, October 30, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा,

मनावरील तणाव तुम्ही चांगला दाखवला आहे पण नुसता तणाव दाखवणे एवढाच तुमचा हेतू होता हे तुमच्या explanation वरून समजल्याने डोंगर पोखरून उंदीर निघाल्यासारखे वाटले. त्यापेक्षा एखादा टर्न जो त्याचा कुशंकांना फ़ोल सिध्द करेल असा टाकला असता तरी तुम्हाला जे कन्या राशीच्या माणसांच्या स्वभावाबद्दल सांगायचे आहे ते ठळकपणे उठून दिसले असते.


चिन्या,

---तुम्ही त्या रामसेतुच्या वर अंधश्रध्दा आहेत वगैरे सांगत होतात,मग या राशीचा आणि माणसाचा स्वभाव यांचा संबंध तुम्ही कसा explain करता??? ----

मला देखिल असेच वाटले, पण काय बोलणार!


Swa_26
Tuesday, October 30, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा... तुमच्या explaination चीच वाट पहात होते मी पण!! कारण काहीच कळले नव्हते :-(
पण त्यानंतरही काही विशेष फरक पडला नाहीच आकलनात!!... असो..
आता हा लहान तोंडी मोठा घास होतोय पण, नेहमी चांगला जमणारा पदार्थ पण कधी कधी फसतो.. नाही का? :-)


Daad
Tuesday, October 30, 2007 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, तुमच्या लिखाणातले बारकावे बहुत आवडले. विषयही वेगळा आहे.

पण कोणत्याही एका विशिष्ट दिशेला ही कथा गेलेली दिसत नाही.
एका थकलेल्या, पावसाळी, कंटाळवाण्या प्रवासात झालेला एक अपघात.
आणि त्याच्या आयुष्यात आधी कधी घडून गेलेलं प्रेमभंगासारखं काहीतरी अपघातच तो.
ह्या दोन घटनांना जवळ आणण्याचा प्रयत्न आहे का? किंवा ह्या दोन प्रसंगातून त्याच्या स्वभावाचा हा "काळजी" करण्याचा पैलू दाखवायचा असावा.
पण ते कुठेच खुललेले नाहीये.
****************************
अपघातानंतर तो काही अंतर पुढे येतो. मग न राहवून परत जातो. पण तिथे कुणी माणूस उडवला वगैरे गेल्याचं काहीच
लक्षण दिसत नाही..... मग सुरू होतात त्याच्या शंका, कुशंका.... जिवाची घालमेल.

मग तसाच गोंधळल्या, घाबरल्या अवस्थेत घरी येतो.... कुठेतरी डोक्यावर उद्याच्या प्रसंगाचं ओझही आहेच.
बहिणीशी बोलणं होतं..... मग तशीच जीवाची घालमेल..... आता वेगळ्या कारणासाठी.
*********************************
ह्या आणि अशा ठिकाणी जर अजून फुलली असती कथा, तर मला आवडली असती... अजून.


Ketki2211
Tuesday, October 30, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vishay changla hota.pan i think nit mandta ala nahi.tyamule survatila ghetleli manachi pakad nantar ekdam sutun jate.thodishi sudharna keli tar kadha adhik vedhak hoil.arthat he majhe vyaktigat mat ahe.

Dineshvs
Tuesday, October 30, 2007 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, इतक्या प्रतिक्रिया. बरं परत एकदा खुलासा करतो.

मी कथेचा अभ्यासक वैगरे नाही. पण खुप वाचतो कथा. आताश्या सगळ्या कथा साचेबद्ध वाटायला लागल्या. माझ्याहि काहि कथा तश्याच होत्या. म्हणजे एखादी समस्या मांडायची, ताण निर्माण करायचा आणि तो सोडवायचा. किंवा एकदम कलाटणी द्यायची. कधीकधी अनपेक्षित कलाटणीच, अपेक्षित असते. ते सगळे मला टाळायचे होते. कारण आता त्याचा कंटाळा आला.
हि कथा लिहिल्यानंतर मी डॉ. शिरीष देशपांडे यांची, शहाजी कादंबरी वाचायला घेतली. ( इथे कुठेही माझी कुणा मोठ्या लेखकाशी तुलना करायचा बारिकसाही प्रयत्न नाही. ) त्यांच्या प्रस्तावनेतल्या काहि ओळी मला इथे द्याव्याश्या वाटताहेत.
समस्यांचे अंतिम समाधान सांगणे वा प्रश्नांची चपखल उत्तरे देणे हे कलाकृतीचे कार्य असत नाही. कलाकृतीने ते करुही नये ! कलाकृतीने समस्येची हळुवार उकल करत जावे, संभाव्य उत्तरांचे तारकाविश्व पुढ्यात मांडावे, रसिक वाचकाला स्वतःचे भावविश्व जागे करता करता स्वतःच्या उत्तराची मांडणी करता येते. ह्या त्याच्या ( वाचकाच्या ) निर्मितीत त्याला अलौकिक आनंदाचा लाभ होत असतो. .....

खुपदा कथालेखक, त्यात मीही आलो एक शेवट घडवुन आणतो. पण त्यात खुपदा लेखकाचे विशफ़ुल थिंकिंग दिसते. त्यापेक्षा वेगळा शेवट असु शकतो, असे मला वाटत राहते. किंवा शेवट कश्याला हवा, उत्तर नाही हेही उत्तर असुच शकते की, असे वाटते.

आता प्रत्येकाच्या शंकेला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
यशवंतने लिहिल्याप्रमाणे, केले असते तर तो बेगडी योगायोग वाटला असता. असले योगायोग फक्त पुर्वीच्या हिंदी सिनेमात दिसत असत. समजा आपल्याला ओळखीच्या व्यक्ती अनपेक्षितरित्या भेटली, तर तो अगदी मामुली योगायोग ठरेल कि नाही ? माझा मित्रपरिवार आणि संचार लक्षात घेता, हा योगायोगही माझ्या आयुष्यात अगदी मोजक्यावेळीच घडुन आलाय.

अज्जुकाकडुन आणखी मार्गदर्शन हावेय. अर्थात पुढच्या भेटीत तिच्याशी बोलता येईल. ( ४ तारखेला लग्नाला येणार आहेस ना ?)

झक्कीना तो माणुस वास्तव वाटला, हे माझे यश. पण तरिही या कथेत कुठेही माझा दृष्टिकोन नाही.

माणिक च्या म्हणण्याप्रमाणे कथा का नाही, ते कळले नाही. वर लिहिल्याप्रमाणे आता चौकट मोडावीशी वाटतेय.
अश्विनी, ( दुसर्‍या मुद्द्याचे उत्तर वेगळे देतो ) पण इथे मला कुठलाच निष्कर्ष काढायचा नव्हता. या घटनेचा त्याच्या मनावरचा परिणाम पुसला जाणार नाही, हेच सांगायचे होते.
दाद, या माणसाचा स्वभावच कुढा आहे. तो मोकळेपाणी कुणाशीच बोलत नाही. त्याला संवाद साधायचीच भिती वाटतेय. मग खुलणार कसा ? त्याचा स्वभाव कळला कि मग बाकिचे पटत जाते.

आता परत बघु. या कथेत त्याच्या मनावर नव्या नात्याचा ताण आहे. वेळेवर पोहोचु कि नाही, म्हणजे आपण कमी पडु का, असाही ताण आहे.
त्या प्रसंगाच्या आधी तो थकला आहे. जड जेवण झाले आहे, स्पष्ट संकेत नाही तरी दारुचा अंमल असेलही. त्याला रस्ता नवा आहे. रात्रीच्या ड्राईव्हींगची सवय नाही.
तिथे नेमका माणुस असेल, हा केवळ त्याच्या मनाचा खेळ मला वाटतो. मी तसे नसण्याचे संकेत जास्त दिलेत. एकतर त्याने आरश्यातुन मागे बघितल्यावर त्याला काहि दिसले नाही. ( तो परत गेला नाही. ) आणखी कुणीही त्याला तसा संकेत दिला नाही. तो पोलिस किंवा माणुस तिथुन आल्याचीच शक्यता जास्त आहे. तो दुसर्‍या रस्त्याने आला असेल, असा फक्त याचाच कयास आहे.
त्या ठिकाणी नेमकी कुठली वस्तु उडाली ते त्याला आठवत नाही. पावसात, दोन हेडलाईट्सच्या प्रकाशात, फ़ुटलेली टायरट्युबही अशी उडु व चमकु शकते. बाकिच्या शक्यता कथेत आल्याच आहेत. शिवाय त्याला टायरखाली काहि आल्याचे आठवत नाही. कथा लिहिताना, मला हेच अपेक्षित होते. कदाचित त्याच्या विचारामूळे, वाचकाना पण तसेच, म्हणजे तिथे कुणी माणुस असल्यासारखे वाटत राहिले असेल. ( म्हणजे बघा आपणहि अश्या विचारांच्या कसे आहारी जातो ते. )

आता मूळातच काहि झाले नसताना, त्याने इतकी भिती बाळगावी का ?
जर तो फोन मी घेतला नसता, तर दुसरा प्रसंग कथेत आला नसता. त्या फोनवरुनच हे कळते कि त्याचे काहितरी बिनसलेय आणि ते सगळ्यांच्या लक्षात आलेय.
आता ती घटनाही काहिशी अशीच क्षुल्लक असु शकते. ते सगळे ( फक्त दोघेच नाहीत ) कॅंपला गेल्यावर काय झाले असेल ? त्यांची थट्टामस्करी झाली असेल. त्यानी तिला प्रपोज केले असेल वैगरे वैगरे. पुढे ते नाते बनु शकले नाही. अश्या घटना विसरणेच योग्य असते पण तो तसा करत नाही. तो स्पष्ट बोलुन ताण मोकळा करत नाही. ( तो बॉसलाही स्पष्ट नकार देऊ शकत नाही. )
मुळात त्याचे मन ओळखणारी अगदी प्रेमळ जुळी बहिण त्याला आहे, तिच्याशीही तो मोकळा बोलत नाही.
अश्या माणसांची काय कुचंबणा होते, ती मला दाखवायची होती. मोकळेपणी चर्चा करणे हेच यावर उत्तर होते, पण ते नेहमीच शक्य असते वा होते असे नाही, मग मी शेवट तरी काय करणार ?
तसा या माणसाला उपाय शोधता येत नाही असेही नाही.
अगदी तो जीपमधला माणुस चौकशीला येताना, त्याने मनात योजुन ठेवलेली कारणे बघा किंवा स्वतःवर येणारे तथाकथित बालंट टाळण्यासाठी शोधलेले बचाव बघा. ( गाडी माझी नाही, कुणी नंबर टिपला नाही, मी बॉसची गाडी चालवतोय ते कुणाला माहित नाही, असे विचार करत राहणे वा गाडी गरज नसताना वॉश करुन घेणे वैगरे ) आता जर त्याच्याकडे समस्येवर उपाय शोधायची क्षमता आहे. ( लक्षात घ्या तो नेहमीचा फ़ॉल्ट दुर करायलाच गेला आहे. ) तर त्याला समस्या सोडवता येणे अवघड नाही. पण जर त्याला खरी समस्याच समजली नसेल तर काय करायचे ?

माझ्या बहुतेक कथा मी पुर्ण लिहुन झाल्या आणि परत परत वाचुन माझे समाधान झाल्यावरच मी पोस्ट करतो. त्यामूळे सुधारणा काय करणार ? पण मित्रानी नेमक्या सूचना केल्या तर पुढच्यावेळी लक्षात ठेवीन.

अश्विनी, मानवाचे स्वभावनमुने म्हणुन मला ते वर्गीकरण पटतं. त्याचा प्रत्यक्ष राशीशी कितपत संबंध आहे ते मला माहित नाही. ( म्हणुन मी बहुतेक शब्द वापरलाय ) बाकि भविष्यकथनावर माझा विश्वास नाही. तशी परिस्थिती नाही कारण आजवर माझ्या बाबतीत, एकही भाकित खरे ठरलेले नाही.
अंधश्रद्धेवर माझा कधीही विश्वास नव्हता आणि नाही. मला शरद उपाध्येंच्या टिव्हीवरच्या कार्यक्रमातला एक प्रसंग आठवला. एका महिलेने त्याना विचारले होते कि मी ग्रॅज्युएट होवु शकेन का ? तर ते म्हणाले हे शास्त्र इतके प्रगत झाले का ते मला माहित नाही. पण तुम्ही पदवीधर होणार का, ते इतराना कश्याला विचारता, ते तर पुर्णपणे तुमच्या हातात आहे. हा त्यांचा दृष्टिकोन मला खुप आवडला. त्यांचा कार्यक्रमातुनच मी अशी शक्यता व्यक्त केली.
माझ्याशी वाद घालायला अजिबात घाबरायचे कारण नाही. थेट नाव घेऊन केलेल्या प्रश्नाना ( आणि डुप्लिकेट आयडीज नसलेल्याना ) मी नेहमीच उत्तरे देतो. एरवी हवेत वार करणारे तुम्हालाही भेटतातच, त्यांचे बोलणे कशाला अंगाला लावुन घ्यायचे ?
त्या बीबीवर अत्यंत घृणास्पद रिमार्क होता. तो मला प्रत्यक्ष संबोधुन नव्हता, त्यामुळे मी तिथले लिहिणे थांबवले. सशक्त आणि सभ्य वादासाठी मी कधीही तयार आहे.


Dineshvs
Tuesday, October 30, 2007 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकि सर्व मित्रमैत्रीणीना कळकळीची सूचना. डुप्लिकेट आयडीजना, अनुल्लेखानेच मारा.
त्यांचे खरे रुप कोणाला माहित नाही, अश्या गैरसमजात त्याना राहु देऊ नका.


Chinya1985
Tuesday, October 30, 2007 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुलेख्खाने मला मारायचा प्रयत्न दिसतोय असे वाटते. पण मी डुप्लिकेट वगैरे बिल्कुल नाही.याच id वर माझे सर्व e mail आहेत.ऑर्कुटवर पण हाच id आहे. गरज पडल्यास फोटोही बघु शकता.

T_pritam
Wednesday, October 31, 2007 - 2:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, पहिल्यांदा मला पण कथा समजली नव्हती... पण तुमचं explanation पटलं
and as you said, प्रत्येक कथेला शेवट असतोच असा नाही...

infact, कथेपेक्षा तुमचा explanation जास्त आवडलं


Nandini2911
Wednesday, October 31, 2007 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा. मी पण माझे चिमुकले मत मांडत आहे. पहिली गोष्ट म्हणजे वा वा वा वा (आता कंपूबाज म्हणा अथवा म्हणू नका :-))
मुळात ही कथा नसून ललित म्हटल्यास जास्त योग्य ठरेल. एखाद्या व्यक्तिच्या मन्:स्थितीची अचूक मांडणी करणे आणी तीही सर्व धागेदोरे सांभाळून अजिबात सोपे काम नाही. त्याच्या मनातले विचारचे आंदोलन खूपच छान टिपण्यात आलेले आहे.

मला तरी ही कथा झेपली. :-) abstract मांडणी असूनही. दिनेशदाची भाषाशैली चांगली आहे त्यात वादच नाही. पण शीर्षक थोडं वेगळं दिलं असतं तरी चाललं असतं.

कथा जिथे संपते तिथे पूर्णपणे फ़ुलतेय. एकदा का तिथे माणूस (आपला मायबोलिवरचा नव्हे!) होता की नव्हता हा प्रश्न नायकाच्या मनात आला की वरची अख्खी कथा पालटते. गिल्ट फ़ीलपेक्षाही परिस्थितीला सामोरे जायची ते accept करायची धमक त्यामधे नाही, स्वत्:चा साखरपुडा असताना कोणी कॉलवर जाईल का तेही इतक्या लांब?? पण तो जातो कारण नकार द्यायची हि.मत नाही. त्यानंतरदेखील स्वत्:चे नाते तो हव्या त्या ठिकाणी तो नेऊ शकत नाही. थोडीफ़र "देवदास" सारखी कचखाऊ वृत्ती त्यात आहे. होणार्‍या बायकोला पण तो मोकळेपणाने सांगू शकत नाही.
ही मानसिक दोलायमानता हा या कथेचा मूळ गाभा आहे असे मला वाटते. :-)

का कुणास ठाऊक पण एखाद्या दीर्घकथेचा किंवा कादंबरीचा एखादा भाग वाचतोय असं पण मला वाटलं.

आणि मास्तुरे. माझ्या लिखाणाला का बरं तुमचे प्रतिसाद नाही??? हा पण कंपूबाजपणाच झाला ना???



Indradhanushya
Wednesday, October 31, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आताश्या सगळ्या कथा साचेबद्ध वाटायला लागल्या. म्हणजे एखादी समस्या मांडायची, ताण निर्माण करायचा आणि तो सोडवायचा. किंवा एकदम कलाटणी द्यायची. कधीकधी अनपेक्षित कलाटणीच. ते सगळे मला टाळायचे होते.... दिनेशदा एकदम पटेश... चौकट मोडण्याचा प्रयत्न आवडला... :-)

Ajjuka
Wednesday, October 31, 2007 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी? मार्गदर्शन? तुम्हाला? दिनेशदा... काहीही बरंका!!!!
४ ला कुणाचे लग्न आहे? मला काही माहित नाही.


Maasture
Wednesday, October 31, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी - जे लेखन खूप आवडावे एवढे उत्कृष्ट वाटते ( उदा. दादच्या एक दोन कथा, अज्जुकाची एक कथा ) किंवा मग जे लेखन अगदी फालतू असते पण लेखकाने आव मात्र कोणीतरी मोठा लेखक असल्याचा किंवा काहीतरी फारच महान लिहिल्याचा आणला असतो आपल्या कंपूच्या मदतीने ( उदा दिनेश यांची ही कथा अथवा psg च्या बहुतेक कथा ) अशा लेखनालाच मी प्रतिसाद देतो.

तुमचे लेखन यातल्या कुठल्याच कॅटेगरीमध्ये येत नाही, म्हणून तुम्हाला प्रतिसाद दिला नाही, कृपया राग मानू नये.

इथे -ve प्रतिक्रिया दिल्यावर गिरीसारखे स्वत्:ची काहीच मते नसलेले बिनडोक हुजरे माझ्यावर तुटून पडणार हे माहित होतेच मला. पण अज्जुका आणि तुम्हीही उपहास करावा याचे वाईट वाटले. शिवाय तुम्ही कारण नसतांना अज्जुकाला जो टोमणा मारला आहे ते बरे नाही. असो.

इथे प्रतिक्रिया कशा दिल्या जातात ? एक तर कंपूतला माणुस बघून, किंवा मग संबंध छान छान ठेवायचे म्हणून, किंवा मग आपल्यालाही असेच छान छान प्रतिसाद मिळावे म्हणून, किंवा मग इतर देत आहेत म्हणुन अगदी टुकार कथेलाही किती तरी वेळा बरेच जण वा वा करतांना बघतो. हे खरे नाही का याचे प्रत्येकाने आपल्या मनाशी प्रामाणीकपणे उत्तर दिले तरी पुरे.

पण माझ्या मुद्द्यांना उत्तर देता येत नाही, मग उगाच डुप्लिख़ेट आयडी वगैरे हाकाटी सुरू करायची.

आता दिनेश यांच्या प्रतिसादाकडे बघू.

अरे, इतक्या प्रतिक्रिया. बरं परत एकदा खुलासा करतो.

हा हा हा, बहुतेक लोकांचे प्रतिसाद नीट वाचले तर हे कळेल की लोकांना खुलाशाची अपेक्षा नसून, जरा बरे लिहिण्याची अपेक्षा आहे. पण लोकांनाच समजले नसेल असे समजून लेक्चर देन्याचा हेतू पुन्हा मी छान आणि महानच लिहिली आहे, तुम्हाला समजून सांगतो ह्म्म अशी प्रतिसादांचा सूर कळूनही न कळल्यासारखी भूमिका घेतली आहे.

आताश्या सगळ्या कथा साचेबद्ध वाटायला लागल्या. माझ्याहि काहि कथा तश्याच होत्या. म्हणजे एखादी समस्या मांडायची, ताण निर्माण करायचा आणि तो सोडवायचा. किंवा एकदम कलाटणी द्यायची. कधीकधी अनपेक्षित कलाटणीच, अपेक्षित असते. ते सगळे मला टाळायचे होते. कारण आता त्याचा कंटाळा आला.


हा हा हा, काहीतरी जबरदस्त वेगळा प्रयोग केल्याच आव आवडला.

कलाकृतीने समस्येची हळुवार उकल करत

हा हा हा, अहो तुम्ही साचेबद्ध लिहिले नाही त्याब्द्दल हरकत नाहि घेत कोणी. तेवढी समज आणि वाचन आहे बर्‍याच जणांना. साचेबद्ध न लिहिणे हा ही एक साचाच झाला आहे त्यामुळे ते लोकांच्या पचनी पडले नाही असे नाही, साचेबद्ध असो वा नसो, जे लिहिले आहे ते सुमार आहे असे म्हटले आहे. त्याला बगल देउन तुम्ही त्याच्या वेगळेपणामुळे ते लोकांना समजले नाही असला कसला आव आणताय ?

अर्थात पुढच्या भेटीत तिच्याशी बोलता येईल. ( ४ तारखेला लग्नाला येणार आहेस ना ?)

असे अनावश्यक वैयक्तिक खाजगी संदर्भ हीपण तुमची खासियत. पण ते शक्यतो गुलमोहोरावर नसावे अशी विनंती.

आणि चिन्या म्हाणाला तसा रामसेतू ही अंधश्रद्धा, आणि राशीभविष्या पुरस्कार हा दांभिकपणा बरा नव्हे. पण तो साहित्यबाह्य मुद्दा आहे, जाउ द्या तो.


मेघना पेठे सुद्धा यापेक्षा खूपच चांगले लिहितात बुवा. त्यांच्यावर एक अगदी खालच्या पातळीला जाऊन लेख कुणी लिहिला होता बर ? वर काहीतरी पातळीचा उल्लेख आहे म्हणून आठवले. लिंक आहे का कुणाकाडे ?


Nandini2911
Wednesday, October 31, 2007 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मास्तुरे, हे खास तुमच्यासाठी.
मी अज्जुकाला कुठलाही टोमणा मारलेला नाही. जे मला वाटतं ते मी बोलते ते मी लिहिते.
माझ्या लेखनाची केटेगरी तुम्ही ठरवण्या आधी स्वत्: लिहा, भले लेख अथवा कथा लिहू नका, पण तुम्हाला साहित्य शिकवण्याचा इतका अनुभव आहे तर ते ज्ञान तुम्ही शेअर करा,

मुळात इथे तुम्हाला कुणी ओळखत नसताना तुम्ही दुसर्‍या व्यक्तीना "हुजरे" बिनडोक" किंवा जोगवा मागणे यासारखे शब्द वापरता हे बरे वाटते का? साहित्यातल्या चुका दाखवा. त्या कुणीही ऐकून घेईल. मात्र कंपूबाजी "वावा" करणे याचा तुम्हाला नक्की काय त्रास होतो?


तुमचे मुद्दे मांडताना चुकत आहेत. तुम्ही डुप्लिकेट आयडी नसाल हे गृहित धरून मी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी विचारत आहे. मला तुमच्या मेलची प्रतिक्षा आहे.

आणि तुम्ही प्रतिसाद न दिल्याचा अजिबात राग नाही, मला माहित आहे की मी कुणासाठी लिहिते आणि कोण वाचतं. तुम्ही काळजी करू नये :-)
मी तुम्हाला व्cइहारलं कारण तुम्ही काही विशिष्ट व्यक्तीनाच प्रतिसाद देता. म्हणून विचारलं की अशी पार्शिलिटी का बरे.... :-) जाऊ दे तुमच्याशी वाद घालणे व्यर्थ आहे.



Aaftaab
Wednesday, October 31, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, तुमच्या स्पष्टीकरणानंतरही ही कथा फ़ारशी आवडली नाही. तपशीलामध्ये तुमचा हातखंडा आहेच. पण तुम्हाला अपेक्षित असलेली त्याची मन:स्थिती दर्शविणे किंवा रंगविणे तेवढे जमले नाही असेच एक वाचक म्हणून वाटते. कृपया राग मानू नये. तुमच्या आधीच्या काही कथा आणि ललित, रंगीबेरंगी वगैरेंचा मी चाहता आहेच. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा..
- रवि


Satyajit_m
Wednesday, October 31, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश मला कथा आवडली तुमचे स्पष्टीकरण न वाचता.

वाचकहो तुम्ही कथा वचली, नाही आवडली, तस सांगितलत. झालं ना प्रष्न संपला. ही चिखल्फ़ेक कशाला? कथेत पाउस पडला आहे तिथे चिखल झाला तेवढा पुरे.

!! ये यडछाप, हे हितगुज आहे आणि प्रतिक्रिया देणे हे कर्म अणि किसेरीया हा धर्म .. मध्ये शानपना शिकवायच काम नाय ... काय !! - हे स्वगत आहे ह्याला इंग्रजीत सेल्फ़रिअलाइझेशन वगैरे काहीतरी म्हणतात.

आता एक जाहिरात विश्रंती ...

साला इंडिया मे मोफ़त की advise बोहोत मिलती है. साला इधर तो बहर से भी मिलती है ...
-कुठला तो फोन बरे? HG वर त्याची Ad नाही वाटत. (हवी कशाला म्हणतो मी?)


Savyasachi
Wednesday, October 31, 2007 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,
समिक्षा जर सशक्त असेल तर ती डुप्लिकेट आयडीने केली आहे किंवा नाही याला महत्व नसावे. कोणत्या भाषेत, शैलीत केली आहे यालाही नाही. समिक्षक स्वत्: महान लेखक आहे की नाही यालाही नाही. (तसे असते तर सचीनवर कदाचीत फक्त डॉनच समिक्षा करू शकले असते.) त्यातले उत्तम काय ते पाहून त्यावर आत्मपरिक्षण करावे. हा तुला सल्ला नाही पण तुझी कथा आहे म्हणून तुला उद्देशून लिहीले.
(मायबोलीवर ही गोष्ट 'दाद' अतिशय उत्तम प्रकारे करते अस मला वाटत.)
आणि तसेही शेवटी ही कला आहे. प्रत्येक समिक्षकाला आवडेल अस साहीत्य (कला) जगात कुठेही नाही. (लहानपणी माझा एक समज होता. तमाम मराठी लोकांना पुल आवडतच असतील. पण नंतर कितीतरी लोक भेटले जे पुल फालतू लिहितात अस म्हणाले :-) )
इथे मायबोलीवर खरा कोण खोटा कोण हे कळते. पण प्रत्यक्षात जगात थोडेच कळणार आहे?


Kedarjoshi
Wednesday, October 31, 2007 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे प्रतिक्रिया कशा दिल्या जातात ? एक तर कंपूतला माणुस बघून, किंवा मग संबंध छान छान ठेवायचे म्हणून, किंवा मग आपल्यालाही असेच छान छान प्रतिसाद मिळावे म्हणून, किंवा मग इतर देत आहेत म्हणुन अगदी टुकार कथेलाही किती तरी वेळा बरेच जण वा वा करतांना बघतो. हे खरे नाही का याचे प्रत्येकाने आपल्या मनाशी प्रामाणीकपणे उत्तर दिले तरी पुरे. >>


मास्तुरेंचे वरचे तेवढे वाक्य नक्कीच खरे आहे.
पण मास्तुरे एवढा ग्रुपीझम चालनारच कारण मायबोलीवर अनेक लोक एकमेकांचे मित्र होतात अन ते काही लिहीन्याचा प्रयत्न करतात. ते लोक काही प्रतिष्टीत लेखक नसतात. त्यातुनच कदाचीत उद्याचे लेखक घडु शकतात. त्यामुळे जाउदेत. काही कथा अगदीच टूकार असतात अगदी प्रतिष्टीत लेखकांच्या देखील म्हनुन काय त्यांनी आपले विचार मांडु नयेत का? तेवढे लेखन स्वातंत्र असायला हवे. काही प्रयोग फसतात पण मग प्रयोगशील लेखन करु नये का?

नंदीनी तुला त्यांनी प्रतीक्रीया दील्या नाहीत याचा अर्थ तुझे लेखन " त्यांना ' टुकार वाटले नसावे.

पण मास्तुरे आपण भाषेवर जरा नियंत्रन ठेवले तर आपल्यला जे म्हनायचे आहे ते लेखकांना कळेल. सध्या तरी आपला राग लेखनावर नसुन कंपुबाजी वर आहे हे आपल्या पोस्ट मधुन दिसुन येते. आपण प्रोफेसर असल्यामुळे आपणास आम्ही काय सांगनार पण आपण लेखनातल्या चुका दाखवा प्रतिक्रीयेल्या नको. लेखन टूकार कसे आहे हे आप्ण नक्कीच लिहु शकाल.


समिक्षा जर सशक्त असेल तर ती डुप्लिकेट आयडीने केली आहे किंवा नाही याला महत्व नसावे. कोणत्या भाषेत, शैलीत केली आहे यालाही नाही. समिक्षक स्वत्: महान लेखक आहे की नाही यालाही नाही. (तसे असते तर सचीनवर कदाचीत फक्त डॉनच समिक्षा करू शकले असते.) त्यातले उत्तम काय ते पाहून त्यावर आत्मपरिक्षण करावे>>>


मला सव्या ने लिहीलेले जास्त आवडले. समिक्षा कोणीही करु शकतो. कारन वाचक म्हणजे मायबाप नाही का?

Prajaktad
Wednesday, October 31, 2007 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद आणी नंदिनीशी सहमत ! एक वेगळा प्रयोग वाटतो.. ललित लेखनाच्या आसपास जाणारा..कथा मात्र वाटत नाही.
पण, ज्या संदर्भाने लिहलय तशी अनेक व्यक्तिमत्व असतात..तरी एक अपुर्णत्व जाणवतेच..काहितरी मिसींग असल्यासारखे वाटतेय.


Ajjuka
Thursday, November 01, 2007 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ मास्तुरे.. नंदीनी मला टोमणा मारेल नाहीतर मारणार नाही.. आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही मधे आगी लावत फिरू नका.

T_pritam
Thursday, November 01, 2007 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय हे, लहान मुलांसरखं तुम्ही भांडताय काय?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators