Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
शापीत

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आश्विन » कथा कादंबरी » शापीत « Previous Next »

Manogat
Wednesday, October 24, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रात्रिचे सुमारे ७:०० वाजले असतिल समोरच्या पडवीत अप्पा बसले होते.. नेहमी प्रमाणे हातात अडकित्ता घेउन सुपारि कापित होते. अप्पा म्हण्जे एक करारि व्यक्तिमत्व, घरात सगळेच घाबरायचे त्यांना. पण अप्पा फार दयाळु होते सगळ्यांना मदत करायचे.माई तर नेहमिच सांगायचि ते दिसतात तसे नहित नारळा सारखेच आहेत.

नारायण काका पुढच्या दारातुन धावत आले "अप्पा.. अप्पा घात झाला". नारायण काका हेच एक व्यक्तिमत्व होत जे अप्पांना काहि पण बोलु शकत होते, अप्पांचा पण खुप जिव होता त्यांच्यावर.
नारायण काकां चा आवाज ऐकुन अप्पा घाबरले हातातला अडकित्ता ठेवुन ते लगेच उठुन दाराकडे गेले. वाड्यातल पुढच दार अणि पडवित बरच अंतर होत. अप्पा पुढे धावले तोच नारायण काका त्यांच्या जवळ आलेत आणि बेशुद्ध होउन खालि कोसळले. अप्पा घाबरले त्यांने म्हादुला आवज दिला.. अप्पांचा तो घाबरलेला आवाज ऐकुन सगळे पडवि कडे धावले. म्हादु, माई,नेत्रा,रघु अप्पा पुन्हा ओरडु लागले. म्हादु बाहेरन आला आणि ते द्रुष्य पाहुन थकित झाला.


Manogat
Wednesday, October 24, 2007 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांनि मिळुन नारायण काकांना तक्तपोसावर झोपवल. अप्पांच्या सांगण्या वरुन म्हादु गावातल्या एकमेव डोक्टरांना बोलवायला गेला. अप्पांच काम म्हण्टल की सगळ गाव तय्यार असायच. म्हादुला बघुन डोक्टरांनी त्याला विचारल अरे म्हादु काय झाल आता येवढ्या रात्रि कसा काय,म्हादु धापा टाकतच आला होता. थोडा अवकाश घेउन डोक्टरांना म्हणाला "अप्पांनि वाड्यावर बोलिवल तुम्हाला" डोक्टर म्हणाले काय रे अप्पांचि तब्यत वगैरे ठिक आहे न. म्हादु म्हणाला ते सगळ रस्त्यात सांगतो चला आत. अप्पांचा निरोप आहे म्हणुन डोक्टर भरल्य ताटावरुन उठले आणि सरळ वाड्या कडे चालते झाले. म्हादुने सारि हक़िकत त्यांना रसत्यात सांगितली.

डोक्टरांनी येउन नारायण काकांना चेक केल. नारायण काकांचा रक्तदाब वाढला अणि त्यांआ heart attack आला हे डोक्टरांच्या लक्षात आले. त्यानी अप्पांना तालुक्याच्या दवाखाण्यात नारायण काकांना घेउन जायला सांगितल.

डोक्टरांनी अप्पांन्ना विचारल काय झाल तेव्ह अप्पांनि नारायण काकांच्या हातातल पत्र दाखवल. अप्पांनि सांगितल तो धावत आला तेव्ह त्याच्य हातत हेच होत अणि मग कोसळलाच. आज पहिल्यांदा अप्पांचा आवाज भारि झाला होता, पण सर्वात मोठे याचि जाणिव होति म्हणुन त्यांनि आपल्या भावनांना रोखल अणि डोळयातल्या अश्रुंना तेथेच थांबवल.


Peacelily2025
Wednesday, October 24, 2007 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढचा भाग लवकर येउ देत. भयकथेची सुरुवात वाटते आहे. माझा आवडता कथा प्रकार! सुरुवात छानच आहे!

Manogat
Thursday, October 25, 2007 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रघु आणि डोक्टरांनी ते पत्र बघितल दिनुच्या मित्राच पत्र होत, दिनु नारायण काकांचा मुलगा, नेत्रा चा होणारा नवरा. तो ज्या गाडिने येत होता ति नदित पडली अणि दिनुचा काहिच पत्ता न्हवता. हे वाचताच सगळ्यांना धक्काच बसला. पण अप्पांनि कोणाला पण सांगण्यास मनाई केली. रघु ने एक कटाक्ष नेत्रा कडे ताकला "उंच पुरि, गोंडस त्याचि बहिण बोहल्यावर कधिच उभि होउ शाकणार नाहि का" या विचाराने त्याला एकदम दाटुन आले. पुन्हा त्याच्या मनात "श्राप श्राप आहे या वाड्याला" हे वाक्य ऐकु येउ लगले.

अप्पांच्य लक्षात येताच त्यांनि रघु ला नारायण काकांच्या घरी पाठवुन राधा वहिनि आणि मुग्धा ला घरि घेउन ये असे सांगितले, आणि बजावल मी येइस्तोवर कोणालाहि याचि वाच्यता नाहि करायचि. अप्पा, डोक्टर, म्हादु, शिवराम (म्हादुचा मुलगा) आणि गावातले दोन लोक तलुक्यला निघाले.


Manogat
Thursday, October 25, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रस्त्यतुन जतांना अप्पा विचर करित होते.
नारायण काकांनी पद्वित विचर करत बसलेल्या अप्पांच्या पठिवर हात ठेवला अणि तु काळजि कशाला करतोस मि आहे न अशि सांतवना दिली. पण अप्पा खुप चिंतेत होते ते म्हणाले "अर्रे नारायणा कसा रे नको करु चिन्त लोक थु थु कर्तिल. पोरीच वय झालय आत अजुन किती दिवस वाट पाहायचि. या श्रापचा परिणाम त्या पोरिवर का, सोन्य सारखि पोर मझि इतकी सुग्रण आहे पण बघ ना कुठे जुळुन येत नाहि.एक तर पोर भेटत नाहि अणि असेले भेटतात कि ज्यांना माझि नेत्रा नको हा हा पैसा हवाय " अप्पांना अस व्याकुळ झालेला पाहुन नारायण काका म्हणाले माझि तुझि बरोबरि नहि पण जर तुला पटत असेल तर माझ्या दिनु साठि मी तुझ्या नेत्रा चा हात मागतो. नरायण काकांच हे बोलण ऐकुन अप्पांना आपल रडु आवरल नाहि ते नारायन काकांच्या जवळ गेले अणि त्याना बिल्गुन रडु लागले. डोळ्यातुन येणारे अश्रु आंदाचे होते, नारायण काकांना ही हे कळुन चुकले होते पण इतक्या दिवसांच हे कोड अस सहजा सहजि सुटल्या मुळे अप्पांच रडन स्वाभाविक होत.

नारायण काकांनि अप्पांच्य पठिवरुन हात फ़िरवला आनि म्हणाले अरे बरेच दिवसांन पासन इच्छा होति माझी पण तुझ्या पुढे बोलण्याचे धर्यच झाले नाहि बघ. त्यावर अप्पा म्हणाले अरे तुझ्या घरी मझी पोर गेली तर एक आंगण सोडुन दुसर्यत गेली यचा सुख आहे माल. मला माहित आहे तुझ्या घरी तिला काहिच त्रस होनार नाहि. अणि वहिणि सुद्दा तिल आपल्या पोरि सारखि माया करतिल.



Itgirl
Thursday, October 25, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा, कथा छान पुढे सरकत आहे, पण जरा लिखाणही शुद्ध असेल तर अजूनही मजा येईल ना? :-) टाका पटपट पुढचे भाग, मी वाचतेय :-)

Vrushs
Friday, October 26, 2007 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा मोठे भाग आले तर वाचायला पण छान वाटेल आणि कथेचा परिणाम पण चांगला होईल. आणि शुद्ध आले तर अजुनच छान. मी पण वाचतेय.

Jaijuee
Friday, October 26, 2007 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा छान पकड घेते आहे पण अशुद्धलेखन मजा घालवत आहे. कृपया हा मुद्दा विचारात घ्या!
"तक्तपोसावर" नव्हे तर "तख्तपोशीवर" असे मल वाटते. बरहासारखी प्रणाली यात उपयुक्त ठरेल (कदाचित)!
पुढचे भाग येउ द्यात.


Peacelily2025
Friday, October 26, 2007 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान पकड येत आहे. फ़्लो मस्त आहे आणि थोडा छोटा भाग असला तरी कथा पुढे वेगात जातीये. चालु ठेवा. आम्ही वाचतोय अन दाद ही देतोय! पुढचे भाग पटकन टाका.

Peacelily2025
Sunday, November 04, 2007 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोगत, कुठे गायब झालीस? प्रत्येक वेळी उत्सुक्तेने मायबोलिवर जावे आणि कथा जराही पुढे न गेलेली दिसणे! लवकर टाक की पुढचे भाग!

Manogat
Monday, November 05, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद :-)..
शुद्ध लेखनाचा प्रयत्न नक्कि करेल.
सध्या काम भरपुर असल्या कारणाने posting दिवाळी नंतर करेल.
Sorry





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators