|
Manogat
| |
| Wednesday, October 24, 2007 - 9:09 am: |
| 
|
PMT बस म्हण्जे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, आहो एखाद्या अनोळखी व्यक्ति शी तुम्हि हा संवाद साधलात तर तो देखिल पुर्ण तन मन धन लावुन तुमच्या शि संवाद साधेल. असा हा आता चौका चौका,किव्हा म्हण्तात ना माहाविद्यालयाच्या भाषेत कट्ट्या कट्ट्या वरचा विषय झाला आहे कारण कोणिच याच्या जाचा पासुन वाचलेला नाहि याची तुलना एका राणटी घोड्याशि केली तरी चालेल त्या घोड्याला जसे काबुत करायला त्याच्या मागे फिराव लागत, धावाव लागत तसच या PMT ला पकडायला तिच्या मागे धावाव लागत. अहो धावण बिवण ठिक आहे पण धावुन अंत तर काय म्हणे या युद्धा चा "बस गेली निघुन दारावर माणसांना लटकवुन" आम्हि आपले पुन्हा उभे ते उभेच. घरची काम उरकुन office च्या घाइने निघालेल्या माणसाचा अंत पाहते हि बस. आहो उशिरा गेल कि तिकडे office च्या लोकांच्या नजरा अगदि chief guest आल्या सारख्या असतात त्यात PM चि cabin जवळ असेल तर आम्हि पण अपराध्या सारखे नजर चोरुन आपल्या जागेवर जाउन बसतो, अणि शेजाराल्या विचारतो माझ्या बद्दल काही विचारल का. नाहि म्हण्ट्ल की जीव भांड्यात पडतो आणि पुढचा दिनक्रम सुरु होतो. याची तुलना तुम्हि मुंबई च्या लोकलशि करु नका तिथे 1st class ,वगैरे category असते इथे मतभेद नाहि बई असो वा माणुस म्हातारा असो वा म्हातारि जागा नसलि की उभे राहा. उभे राहुन आपल्या stop पर्यंत सुखरुप पोहचण म्हण्जे पानिपतच युद्ध जिंकण. ओपरोधिक वाटल ना, हो कारण उभ राहण सोइस्कर नसत, ५४ लोकांना घेउन जाणारी गाडि १०० च्या जवळ पास लोकांना साहारा देते मग, कधि इकडन लात तर कधि इकडन हात,पायाचा तर अगदि चेंदा मेंदा होतो. बारीक सारीक लोक उभी असतिल तर ठिक आहे हो पण जाड जुड लोक आली की अगदि photo च्या frame मधे fix केल्यावर कस हालता येत नाहि तस होत. बस स्टोप ची दशा तर विचारु नका माणसांचे अगदि लोंढे च्या लोंढे असतात चातका सारखे त्या बसची वाट बघत. मग बस आली कि, गुळाला कश्या माश्या चिपकतात तसे लोक भिडतात त्या दरवाज्यला, झाल मग काय चढतांना आम्हि पण मनात एकच निर्णय घेउन अस्तो "जिंकू किव्हा मरु". आत कस बस चढल कि मग तुमचि नजर मिळते ति condactor शि condactor कसला राज त्या बस चा, तो आणि driver त्यच्या हाता खालि नाचणारा प्रधानमंत्रि त्यानि दोन घंट्या वाजवल्या कि निघाला एक घंटि वाजवलि कि थांबला. आणि राज्या बद्दल सांगाव म्हणाल तेवढ थोडच. त्यांची ऐट भारी वेगळिच. गर्दित त्यांना शोधुन तिकिट काढावि लागते नाही तर राज्य मंत्रि bus stop वर दुप्पट घेतील याचि भिते असते. मग साहेब म्हण्जे राजे जवळ आले कि खडसावुन विचारतात कुठे कि लगेच स्टोप सांगितला कि रेट तय्यार मग तिकेट हातात थांबविलि कि पुढे. त्यांच्या हावभावान बद्दल सांगते म्हण्ट्ल तर एक वेगळा लेखच लिहावा लागेल,करडि नजर, त्रासिक हावभाव,चिडकि मुद्र इति इति. . असा हा बसचा प्रवास किति हि त्रासिक असला तरी तुमच्या अम्च्या करमनुकिचा विषय बनतो. पण म्हण्तात ना ज्याच झिजत त्यालाच कळत, कोणाल काय कळनार चंदनाच दु:ख.
|
Pramoddeo
| |
| Sunday, October 28, 2007 - 3:14 am: |
| 
|
छान लिहीलंय!पीएमटी म्हणजे एकूण मजेशीर प्रकरण दिसतंय!ते कंडक्टर बद्दलचे मनोगतही येऊ द्या की!पुढच्या लेखाची वाट पाहतोय. ता.क. कृपया राग मानू नये पण लिहिल्यानंतर पुन्हा एकदा नीट वाचून पाहिलंत तर लेखनातल्या चूका कमी होतील आणि वाचकांना वाचताना अधिक आनंद मिळेल.
|
|
|