Sush
| |
| Wednesday, October 24, 2007 - 4:01 am: |
| 
|
मी लहान असताना तो चिन्चेचा लोलिपोप ८ आण्याला मिळायचा
|
Daad
| |
| Wednesday, October 24, 2007 - 7:19 am: |
| 
|
अयाई.... स्स...! (तोंडाला पाणी सुटलेला चेहरा) सायूरी मस्त लेख!
|
Aditih
| |
| Wednesday, October 24, 2007 - 8:42 am: |
| 
|
सायुरी खरंच मस्त लेख. शाळाच आठवली. आम्ही तर भूगोलाच्या तासाला चंद्र,सूर्य , पृथ्वी काढायला एक रुपया, आठाणे अशी नाणी न्यायचो. आणि संध्याकाळी शाळा सुटली की त्या पॆशाचे आवडते कोफी बाईट खायचं. त्यामूळे आठवड्यातून दोनदा खायची मी ते. कधीतरी आईच्या लक्षात आलं.ती म्हणे प्रत्येक भुगोलाच्या तासाला वेगळी नाणी लागतात का?.. मग मी सांगितलं की मी काय करते त्या पॆशाचं ते... तसे आई कधीतरी वडा पाव खायला म्हणुन वेगळे पॆसेही द्यायची. ती म्हणे शाळेत काही खायचं असेल तर तसं सांगून पॆसे ने माझ्याकडून. अशी काहीतरी कारण काढून नाही न्यायचे पॆसे.... ही ही ही ... मजा येतेय आता आठवायला.
|
बर्फ़ाच्या गोळ्याची एक सही आठवण... त्यावेळेला मी कॉलेजमधे होते. जुहूला कॉलेज असल्यामुळे तिथून चौपाटीला जाऊन गोंधळ घालायची आम्हाला सवय झाली होती. रात्री एक एक वाजेपर्यंत आम्ही भटकायचो. नोकरीला लागल्यावर माझा एक मित्र (जो जुहूला रहयचा.) आणि मी चौपाटीवर असेच फ़िरायला गेलो होतो. खरं तर मी त्याला जबरदस्तीने आणलं कारण मला गोळा खायचा होता. अख्खं आयुष्य जुहूमधे घालवून या महा भागाने एकदाही चौपाटीवर काहीसुद्धा खाल्लं नव्हतं. बिचार्याने माझ्यासोबत तो बर्फ़ाचा गोळा ट्राय केला. (आजूबाजूची सर्व लोक त्याला हसत होते.) पांढर्या टी शर्टवर काला खट्टाचे काळे ओघळ बर्फ़ वितळून पाणी झालं तरी याची गंमत सुरूच.. असली मज्जा आली मग त्याला विचारलं "पाणिपुरी खाणार?" मोबाईलमधे त्याचा फोटो काढून ठेवला होता इतकी सही रीऍक्शन होती त्याची.
|
फ़ारच सुंदर लेख सायुरि, किराण्याच्या दुकानातला साबणाचा वास (आमच्या नागपुरात वाणि हि term नाहिच), किंचित खारट चव असलेलि गाडिवर मिळणारि मलई कुल्फ़ि, चविपेक्षा रंगांसाठि आवडणार्या जेम्स च्या गोळ्या आणि क्वचित कधितरि मिळणार आणि रसना! याशिवाय supermom नि लिहिल्याप्रमाणे बोरकुट शिंपडुन serve केलेइ उअकडलेलि बोर. हि बोर चोरुन लपुन मैत्रिणींशि deal करुन खावि लागायचि कारण कुणाच्याच घरुन परवानगि नसायचि याच्यासाठि. याशिवाय आमच्याकडे एक खास toffee मिळायचि 'राजमलाई' म्हणुन ( supermom आठवतेय का?) हि regular toffee size पेक्षा थोडि मोठि असायचि त्यामुळे आठ आण्यात ऐश केल्यासारख वाटायच!
|
Anaghavn
| |
| Thursday, October 25, 2007 - 12:01 pm: |
| 
|
"राजमलाई"आमच्या औरंगाबाद ला सुध्धा मिळायची.मज्जा यायची! आईल चोरून खाल्लेली कुल्फी (मस्ताना वाल्याची),भरपूर खाल्लेली बोरं (मैत्रिण जयू बरोबर), पूर्णानंद चा वडा----आहाहाहा!! क्या बात है!मज्जा आली आठवून सुध्धा!
|
सायुरी काय तोंडाला पाणी सुटवणारे लिहीलेय. फ़ायुस्टारच्या डेझर्ट्सना सुद्धा " त्या " लहानपणच्या सौंगड्यांची चव येत नाही. सोलापूरचे नाही वाटतं कुणी गाड्यावरची कुल्फी खायची सक्त मनाई होती लहानपणी तरीही एकदा चोरून खाल्ली होती आणि नेमकी पकडले जाऊन तेंव्हाची सगळ्यात मोठी शिक्षा मिळाली होती वडिलांशी न बोलण्याची. हेच तत्व पेप्सीकोल्याबाबत आणि बर्फाच्या गोळ्याबाबत होते. आणि मी बहुतेक वेळा पकडली जायचेच. ते बोरकूट खरंच मस्त लागायचे. पण आमच्या सोलापूरला नाही मिळायचे. नागपूरची एक मैत्रीण घेऊन यायची. चिंचेच लॉलीपॉप कुणी आठवले? आता सगळ्यांना एकेक पाठव करून मधे आमच्या टीमची पिकनिक गेली होती लोणावळ्याला तेंव्हा कित्येक वर्षांनी बर्फाचे गोळे खाल्ले सगळ्या मुलीनी बॉसला थांबायला लावून. मला ऑरेंज नाही नाही काला खट्टा. मिक्स करके दोगे क्या भय्या? इ. इ. तो गोळेवाला पण आमचा उत्साह बघून हसत होता. फारेंड बेकरीचा वास अगदी अगदी. आमच्या शाळेजवळच होत्या एकदोन. टुटीफ्रुटी बन, कप केक्स आणि नानकटाई. दे जावू
|
Chinnu
| |
| Thursday, October 25, 2007 - 4:49 pm: |
| 
|
सायुरी, भेट एकदा मार दिला पाहिजे तुला! एक तर घरापासून दूर, अश्या आठवणी परदेशात काढायला लावतेस!
|
Suyog
| |
| Friday, October 26, 2007 - 12:13 am: |
| 
|
aani 10 paishachi bobby 10 botat adkawun chorun ghayachi aani chikki aajoli tar aajobankade hattane kulphi barfacha gola tyawar parat rang takun khayala maja yayachi
|
Dineshvs
| |
| Friday, October 26, 2007 - 12:42 pm: |
| 
|
सुपरमॉम, या बोरकुटाबद्दल आम्हाला काहिच माहिती नाही. कुठल्या बोराचे करतात. कसे कसे खातात ?
|
Sayuri
| |
| Friday, October 26, 2007 - 4:49 pm: |
| 
|
धन्यवाद. हो हे बोरकूट आणि चिंचेचा लॉलीपॉप या दोन गोष्टी मी पण नाही खाल्लेल्या.. ती आंबटगोड छोटी बोरं तेव्ह्ढी खायचो
|
Supermom
| |
| Friday, October 26, 2007 - 5:12 pm: |
| 
|
दिनेश, हे बोरकूट नागपूरला फ़ारच पॉप्युलर आहे. ते कसे करतात याबद्दल मला काहीच माहिती नाही.ते बोरांचेच असते हे माहीत आहे. केळकर कंपनीचे बोरकूट प्रसिद्ध आहे. दिसायला तपकिरी लालसर पावडरीसारखे दिसते. त्यावरून बोरे वाळवून त्याचे पीठ करत असतील अशी शंका येते. वर त्यात थोडे मीठही मिसळलेले असते. चवीला आंबटगोड फ़ार मस्त लागते. नुसते तळहातावर घेऊन चाटत बसायला फ़ार मजा यायची लहानपणी. अर्थात हे माझ्या आजोबांकडे नेहमी असायचे. त्यावरून लहानथोर सर्वांनाच आवडते असे दिसते. या भारतवारीत आईला भेटायला आणीन तेव्हा जरूर घेऊन येईन.
|
Sush
| |
| Tuesday, October 30, 2007 - 10:05 am: |
| 
|
ते बोरकुट पुण्यातही होतं ( आता माहित नाहि.) आणि चिंचेचा लोलिपोप म्हणजे icecream च्या कांडीला मिठ लावलेली चिन्च मिळायची. अजुन ओली बडिशेप मिळायची. ५० पैशाला. ओली बडीशेप म्हणजे देठासकट बडिशेप असायची. त्याची जुडी बांधुन मिळे (जुडि म्हणजे भाजिचि जुडी आठवु नका हि जुडी साधारण २-३ इंचाचिच असेल.)
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 30, 2007 - 11:12 am: |
| 
|
सुमॉ, आता उत्सुकता लागली. मुंबईत साधारण बोराचा सिझन संपला कि विटकरी रंगाची सुकवलेली बोरं मिळतात. ती पण चवीला छान लागतात. पण त्यातली काहि किडकी निघतात. आपल्याकडे आता थायलंडची गोड चिंच मिळते. खुप छान लागते ती.
|