Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आठाणे

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » आश्विन » ललित » आठाणे « Previous Next »

Swasti
Thursday, October 18, 2007 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"Excuse me madam, here is your balance .. 125 "

"............"

"ma'm , you have ordered one medium pizza so thats ....... "

माझ्या चेहर्‍यावरचे प्रश्नांचे जाळे बघुन त्याने समजावायला सुरुवात केली .

".. and total is 374.30 Rs."

"Right !! and that makes it 374.50 Rs. so I should get back 125.50 Rs."

"...."
"madam , I will return the 50 paisa.Till that just have a seat."

"Are you crazy ???? तु त्याच्याकडे आठाणे परत मागितलेस ? काय हे ? म्हणून मी तुला कुठे नेत नाही :-) . बंगला बांधणार आहेस का , आठाठाणे जमा करून ? "
" हे बघ प्राजु , प्रश्न तत्वाचा आहे . का म्हणुन सोडु मी ते आठ आणे ? अगदी बंगला नाही आला तरी एक चॉकलेट तरी येइल"
"you are impossible"

एका मोठ्या pizza joint मध्ये घडलेला प्रसंग आणि आमचे संभाषण मला उगाचच भूतकाळात घेऊन गेलं

मी शाळेत असतानाची गोष्ट . शाळा ते घर हे अंतर चालत अगदी १५ मिनिटांचं . पण तेन्व्हा नुकतीच अमच्या एरियात BEST ची बस चालु झाली होती त्यामुळे २ स्टॉपचं झालं . आणि त्या नविन बसचं आम्हाला फ़ार कौतुक . सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर . सकाळी निघताना आईकडुन पैसे घेतले . दुपारी मी आणि माझी मैत्रिण शाळेकडच्या स्टॉपला चढलो आणि घरासमोरच्या स्टॉपला उतरलो ... तेन्व्हा तिकीट होत -- आठ आणे ! असा door-to-door बसने पहिला प्रवास केला तो आठ आण्यात .


त्याचकाळातली गोष्ट . मी मैत्रिणीसोबत फ़िरायला जायचे - संध्याकाळच्या वेळेला मार्केटला , काही खरेदी करायला . दर वेळी परत येताना आमचं ठरलेल असायचं , पेप्सीकोला खायचा . आम्ही नेहमी दोन पाण्याचे पेप्सीकोले घ्यायचो - orange flavoured -- आठाण्याचे .
डबल्-मोठा किंवा दुधाचा घेतला कि आठाण्याचा एक मिळायचा . ( हल्ली पेप्सीकोला मिळतो का ? दुकानदार वेड्यात काढेल म्हणून मी विचारायचं धाडस करत नाही :-( )

पुढे juniour college ला आल्यावर एक वेगळीच सवय लागली होती . माझ्या सगळ्या मैत्रिणींना माहित असायचं - अधेमधे भूक लागली की औषध माझ्या पर्समध्ये आहे . त्याकाळी माझी पर्स चॉकलेट्सनी भरलेली असायची . त्यावेळी आठाण्याला मिळणारं coffee bite एकदम स्वस्त आणि मस्त - बजेटमध्ये बसणारं होत .

नंतर PGD करायला लागले तेन्व्हाही पॉकेटमनीमध्ये काही फ़ारशी वाढ झाली नव्हती . त्यामुळे काटकसरीने वागायला लागायचं . स्टेशनवरून कॉलेजला जायला बसचं तिकीट होत ३ रुपये . शेअर रिक्षाही मिळायच्या -- साडेतीन रुपये सीट . आता विचार करून गंमत वाटते , पण तेंव्हा ते आठ आणे वाचवण्यासाठी मी १५ - २० मिनिटं बसच्या रांगेत उभे रहायचे .

मी आजही आठ आणे वाचतात म्हणून लिमिटेड बस सोडुन मागची साधी बस पकडते , रिक्षावाल्याशी भांडुन आठ आणे परत घेते आणि दिवसभरात जास्त काम झाल नाही की पटकन बोलुन जाते आज आठाण्याचंही काम झालं नाही .

एका छोट्याशा प्रसंगावरून कुठल्या कुठे पोचले .
By the way .. त्या पिझ्झा बॉय ने १० मिनिटांनी माझे आठ आणे आणुन दिले.मला सारखं वाटत राहीलं , नोटांचे व्यवहार करत असल्यामुळे त्याच्याकडे सुट्टे पैसे नसणार आणि बाहेरुन कुठूनतरी घेउन आल्यामुळे , त्याला वेळ लागला .




Tiu
Thursday, October 18, 2007 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही...मस्त लिहिलय. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.

पेप्सीकोला वगैरे... आमच्या लहानपणी आठाण्याला एक मिळायचा. त्यात एखाद्या दिवशी श्रीमंत असलो कि एक रुपयाचा मिल्क पेप्सीकोला घ्यायचो! ऍश एकदम... :-)

त्यावेळेस बोरकुट पण फार फेमस होतं. चाराण्याला एक पाकिट मिळायचं.

आणि गोट्या! पाच पैश्याला एक. हंटर १० पैश्याला एक. २ गोट्या आणि एक हंटर अश्या २० पैश्यांच्या भांडवलावर मग बाकिच्या गोट्या जिंकायच्या. :-)

रविवारी सकाळी drawing चा क्लास असायचा शाळेत. Drawing room मधे टिव्ही होता. त्यावेळी सकाळी ९ कि १० वाजता परमवीरचक्र असायचं. मी क्लासला बसने जायचो(हाफ तिकिट). कधी बस लवकर आली नाही की मग रिक्शाने जावं लागायचं. म्हणजे क्लासला उशीर होइल म्हणुन नाही तर परमवीरचक्र मिस होइल म्हणुन. पण रिक्शाने ३ रुपये देउन जाणं पण जिवावर यायचं. मग मी रिक्शावाल्याला पटवायचो की मी उभा राहतो, पण १ रुपया देईन वगैरे. तो पण एक सिट अजुन भरता येईल म्हणुन तयार व्हायचा.
मग उरलेल्या पैश्यात क्लास सुटल्यावर पेप्सीकोला नाहीतर बबलगम घ्यायचो. :-)


Arun
Friday, October 19, 2007 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ती : छान लिहिलं आहेस.

पेप्सीकोला आमच्या शाळेत ३० पैश्यांना मिळायचा. शाळेत असताना पेप्सीकोला खाणं ही एक पर्वणी असायची.
गेल्याच महिन्यात मी पेप्सीकोला आणले होते घरी. माझ्या मुलींनी पहिल्यांदाच खाल्ले आणि त्यांना आवडले पण.
त्या पेप्सीकोलाची चव लहानपणी खाल्लेल्या पेप्सीकोलांसारखीच वाटली ............ :-)


Rajya
Friday, October 19, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा स्वास्ती मस्तच लिहीलंय की :-)

पेप्सी कोला अजुन मिळतो, आणि अजुनही आठण्यालाच मिळतो पण साईज कमी झालाय आता :-)


Manjud
Friday, October 19, 2007 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरुण.....

आमची शनिवारी शाळा सकाळची असायची. त्यावेळी आई कधी कधी बटाटे वडा खायला पैसे द्यायची. मी पहिलीत होते तेव्हा आठ आण्याला एक असा वडा मिळायचा. आणि दुधाचा पेप्सीकोला पण आठ आण्यालाच. पण मी दहावी होईपर्यंत ह्याचे भाव अनुक्रमे ४ रु. एक बटाटेवडा आणि २.५० रुपयाला एक दुधाचा पेप्सीकोला असे झाले. जोपर्यंत सायकल चालवत होते तोपर्यंत आठ आण्याचं महत्व होतं. टायरमधे हवा भरणे, चेन निघाली तर लावून देणे, पावसाळ्यात ग्रीस लावणे (हे काम सोसायटितला एक मुलगा करायचा म्हणून ५० पैसे) असली सगळी कामं आठ आण्यात व्हायची. आता पर्समध्ये आठ आणे असले की गरीब वगैरे झाल्यासारखं वाटतं उगाचच.


Sush
Friday, October 19, 2007 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सुंदर लिहिलयस.
खरच लहानपणीची आठवण झाली.
आईने दिलेल्या ८ आण्याचे मि एक मेलडि चोकलेट घ्यायचे. नन्तर ते १ रुपयाला झाल्यावर खुप महाग वाटायला लागले. मग़ कोफी बाईट सुरु केलं. इतके वर्श झाले अजुनहि ते ८ आण्यालाच मिळतं. त्यानन्तर आज्तागायत मेलडी चोकलेट नाहि खाल्लं.
पण coffee bite अजुनही खाते.


Abhi_
Friday, October 19, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ती एकदम मस्त लिहिलं आहेस :-)

आमच्या शाळेजवळसुद्धा पेप्सीकोला तीस पैशाला मिळायचा आणि शाळेमध्ये एक बाई यायच्या त्यांच्याकडे ८० पैशाला बटाटेवडा मिळायचा :-)

शाळेला बसने जायला लागायचे. बसचा पास असायचाच पण तरीही कधी तो विसरलाच तर जवळ असावेत म्हणून आई कंपास बॉक्स मध्ये आठ आणे ठेवायची. :-) (बसचे हाफ तिकिट पाच पैसे होते मग नंतर ते दहा पैसे झाले.) त्याची सुद्धा एक गंमत असायची आपल्या कंपासमधले पैसे दिसू नयेत म्हणून त्यात तळाला एक कागद घालून त्याखाली ते चार आणे आठ आणे सरकवून ठेवायचो :-)


Mi_aboli
Friday, October 19, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ति खरंच एकदम मस्त लिहिले आहेस....
शाळेचे दिवस आठवले..
आठवड्यापुर्विच ऑफ़िसमधे येताना मैत्रिणिला आनि मला अचानक पेप्सि चि आठवण आलि अन खाविशिहि वाटलि म्हणा... पन मिळनार कुठे आता.. अनि जरि कुठे मिळत असलि तरि मागनार कसे.. आता लहान नाहि राहिलो हे तर कळत होते...
पन एका दुकानात विचारले तर त्याने पुन्हा "काय" म्हणुन विचार्ले.. नंतर हसतच त्याने आम्हाला पेप्सि दिलि... प्रतेकिने दोन दोन घेतल्या.. आता ति १ रुपयाला मिळाते..
depa. मधे घेउन आलो तर बाकिच्या पन तुटुन पडल्या सगळ्या...
पन मजा आलि..:-)
चार आण्याचा बोरकुट पन मस्त...
आनि एक white rabbit नावचे चॉकलेट पन मस्त लागायचे.


Zakasrao
Friday, October 19, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिलय :-)
आठवणी जाग्या झाल्या.
अजुनही मिळतो पेप्सिकोला.
तसच शाळेबाहेर मिळणारे म्हातारीचे केस नावाचा गुलाबी रंगाची एक मिथाई,बोर,पेरु,आवळे,चिंचा,लेमनच्या गोळ्या हे सगळच आठ आण्यात व्हायच. प्रत्येक वेळी वेगळा खाउ :-)


Marathi_manoos
Friday, October 19, 2007 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक रुपयाचा मिल्क पेप्सीकोला.. I remember very much...I could have it once in 1 or 2 months. But the Joy was immense in those small things.

Thanks Swasti !! Made my day..All..... have a fabulous weekend


Nandini2911
Friday, October 19, 2007 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुकतेच मी आठ आणे चार आणे एक रूपयाची नाणी जमा करून करून १६०० रूपये जमा केले आहेत. :-) दुकानदाराला तितकी चिल्लर देऊन नोटा घरी आणल्या तर उगाचच रडायला यायला लागलं. डबाभर चिल्लरच्या ऐवजी पाच सहा नोटा फ़क्त. :-(
आता परत चिल्लर जमा करेन... लहानपणी पप्पा बसच्या तिकिटाचे आठ आणे द्यायचे.. ते वाचवून जमा करुन मग मी एखादी कॅसेट. (तेव्हा MP3 सीडीचा जमाना नव्हता.) किंवा पुस्तक (चांदोबा :-)) घ्यायची.


पेप्सीकोला आणि ते पाईप्स म्हणून हळदी रंगाची नळ्या मिळायच्या.. आवळे चिंचा बोरे कधी विकत घेऊन खाल्लेच नाहीत. करवंदे बोरे वगैरे शाळेत जायच्या वाटेत जाळीत मिळायचे. उन्हाळ्यात कैर्‍या पण मिळायच्या.
आठ आण्यामधे एक वॅनिलाचे आईस्क्रीम यायचे.. ते मात्र मला जाम आवडायचं.... अजूनही कुठे मिळालं तर मी खाते. हायजीन वगैरे को मारो गोली.


Monakshi
Friday, October 19, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदू अगदी अगदी. माझा नवरा तर अजूनही चिल्लर जमवतो डबा भरून. आणि मला लागते खूप रिक्षाने ये जा करायला. जर माझे लक्ष नसेल तर हळूच माझ्या पर्स मधले चिल्लर काढून त्याच्या डब्यात टाकतो.

मलाही खूप आवडायचा पेप्सीकोला. specially दुधाचा. आणि शाळेच्या कॅंटिनमध्ये बहुतेक १० पैशाला दुधाच्या गोळ्या मिळायच्या त्या पण मला खूSSSSSSSप आवडायच्या.


Princess
Friday, October 19, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ति, मस्तच लिहिलय... बालपणात नेउन सोडलत. वाचुनच बालपणीचे सगळे दिवस उभे राहिलेत डोळ्यासमोर.

Badamraja
Friday, October 19, 2007 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वस्ति छान लिहीतेस तु.
मलाही लहानपणी खाल्लेल्या पदार्थांची आठवण झाली.
पण तु अजुन एक मुद्दा मांडला आहेस, सुट्ट्या पैशांचा.

मला एकदा आॅफीसला जायला उशिर झाला होता(नेहमी प्रमाणे) मी बस पकडली. माझ्या कडे फक्त शंभर ची नोट होती आणि ती मी तिकीट काढण्यासाठी कंडक्टर कडे दिली, त्यांनी मला सुट्टे पैशे मागितले
आणि ते माझ्याकडे नव्हते मी त्यांना सांगीतल (सौज्जन्याने ) " काका मझ्याकडे सुट्टे पैशे नाहीत"
ते मला सरळ पुढच्या स्टाॅप वर उतरा अस म्हणाले
मीही त्यांना म्हणालो "मी नाही उतरनार" आणि छान विंडो सीट पकडुन बसलो.
पाच मिनीटांनी येउन त्यांनी मला टीकीत आणि उरलेले पैशेही दिले.
पण घाईच्या वेळी बर्‍याच वेळेला सुट्टे पैशे सोडुन द्यावे लागतात.


Swasti
Friday, October 19, 2007 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्याना धन्यवाद . :-)

मंजु , हो अगदी आठवलं . आम्ही ताशी आठाणे भाड्याने सायकल आणायचो .

अभि , मला ती camline ची भगव्या - पिवळ्या रंगाची कंपास आठवली . :-) . मी ही त्यात तळाला कागद घालुन काय काय लपवून ठेवायचे .


Manuswini
Friday, October 19, 2007 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, अग कीती आठवण काढलीस मागच्या दिवसांची.

हो अगदी खरे, पप्पांनी वेळ नाही कारने सोडायला म्हणून सोडले नाही तर शाळेत आम्ही क्वचीत बसने जायचो. ती पण मजा असायची.
सकाळी रिक्षा मिळणे पण कठीण असायचे कधी कधी.
बसस्टॉप समोर होता, मग आई बालकनीत उभी आम्हाला बस नाहीतर रिक्षा मिळेपर्यन्त.
" आठाअणे " टिकीट होते साध्या बसचे, नी limited चे ७५ पैसे.
माझी एक कंजुष मैत्रीण(मद्रासी तामिळ खुप कंजुष असतात, believe me ) ती limited सोडायची कारण २५ पैसे वाचायचे. साध्या बसची frequency ज्यास्त असायची,मग आम्ही(मी नी बहिण) एकटे कशाला मागे उभे राहा मग शीरायचो. पण ती बस इतकी भरलेली असायची नी जवळपास सगळे लोक असायचे. बसभर मी रागात शी पुन्हा ती चुक केली हीचे(मैत्रिणीचे) कशाला एकले करून लोंबकळत जायचो. पण एकमेकाची गम्मत करत जाताना थोड्याच वेळात विसरायचो. पावसात पुन्हा मजा.
शाळेतून येताना आठ आण्याचा साध्या पाण्याचा पेप्सीकोला नी milk ७५ पैसे. जीभ लाल करत एकमेकांना दाखवत घरी.
आल्या आल्या मी आई कडून ५०,५० पैसे गोळा करून आधीच टाकून ठेवत असे.
ते कंपास मध्ये कागद घालून काय काय लपवायचे प्रकार मी सुद्धा करायचे,
सायकलीची हवा आठ आण्याला भरून,
साधा पेप्सीकोला आठ आणे,
आईला न सांगता शाळेत नुसता वडा आठ आणे मिळायचा शाळेत(हा खुप चविष्ट लागायचा बाहेर पावूस पडत असताना, मी नी बहिण deal करायचो घरचा डब्बा खायला वेळ मिळाला नाही करून हा वडा खायचो).
बहिण माझ्यापेक्षा बरीच श्रींमत(तिच्याकडे लहानपणी सुद्धा ५-६ रूपये असायचे, मग माझ्या मते ती श्रींमत. माझ्याकडे नाणी मिळून १-२ रूपये पण मी careless म्हणून तेव्हढे पैसे मला मिळायचे नाहीत कारण मी बरेचदा पैसे हरवायचे):-)
life was too good then........... हाये वोह दिन फिर ना आये................


Sayuri
Friday, October 19, 2007 - 7:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए किति मस्त! पेप्सीकोला म्हणजे किती आवडीची गोष्ट होती ना... अजूनही आहे म्हणा. मस्त लिहिलंय


Sayuri
Friday, October 19, 2007 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tht reminds me मी पण आपल्या लहानपणीच्या खाद्य आकर्षणांवर 'बालपणीचं खाऊजगत' नावाने आठवणी लिहिल्यात.. त्या 'मनोगत' वर प्रकाशित केल्या. पण तब्येतीच्या कारणाने तेव्हा मायबोलीवर प्रकाशित करणं राहून गेलं माझ्याकडून.. असो. आता टाकते इथेही. :-)


Tiu
Friday, October 19, 2007 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लवकर टाका...किंवा मनोगतची लिंक तरी टाका तोपर्यंत! :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators