Akhi
| |
| Sunday, October 14, 2007 - 7:23 am: |
|
|
मला आलेल्या Forwarded email चा भावानुवाद्: Ready Steady Bang च्या आवाजा बरोबर सगळ्या मुली धावायला लागल्या. फक्त १५ पाउले धावल्या असतील तेवढ्यात्त त्यांच्यापैकी एक लहान मुलगी पडली. तीला बरेच खरचटलं आणि ती रडायला लागली. बाकीच्या सात जणींनी तिचा रडका आवाज ऐकला. सगळ्या धावायच्या थांबल्या फक्त क्षणभरच. परत सगळ्या धावल्या पण त्या शर्यत जींकायला नव्हे तर त्यांच्या छोट्या मैत्रीनी कडे. त्यातील एकीने तिला जवळ घेतल थोड थोपटल आणि म्हणाली, आता तुझा बाउ पळुन जाईल. सातही मुलींनी त्यांच्या छोट्या मैत्रीणीला उभं केल. दोघींनी तिला नीट धरुन ठेवल. सगळ्या जणी हातात हात घालुन चालायला लागल्या. आणि सगळ्यांनी ती शर्यत जिंकली. सगळा अधिकारी वर्ग स्तंभित झाला. आणि बघता बघता टळ्यांच्या कडकडात आसमंतात भरला. कैक लोकांचे डोळे पाणावले. National institute of mental health हैद्राबाद येथील ही सत्यघटना. ह्या सगळ्या खास मुली होत्या. कोण म्हणेल त्यांना मतीमंद??? काय काय शिकवलं ह्या ख़ास मुलिंनी आपल्या? मानवता? समानता?? की संघभावना?? "Sucessful people help others who are slow in learning so that they are not felt behaind."
|
Sneha1
| |
| Sunday, October 14, 2007 - 7:40 pm: |
|
|
सुंदर,अतिशय सुंदर. यापलीकडे शब्द सुचत नाहीत.
|
Badbadi
| |
| Monday, October 15, 2007 - 10:48 am: |
|
|
सुंदर!!! मंद तर ते लोक असतात जे यांना समजून घेऊ शकत नाहीत!
|
Badamraja
| |
| Monday, October 15, 2007 - 11:20 am: |
|
|
>>>"Sucessful people help others who are slow in learning so that they are not felt behaind." but in todays competitive world not all people follow above lines we should all try to implement this in our day to day life...
|
Ashwini_k
| |
| Monday, October 15, 2007 - 11:26 am: |
|
|
बरेचदा आपण observe केले असेल, हि खास मुलेच नाही तर खास मोठ्या माणसांच्या चेहर्यावर निष्पाप भाव असतात. तसेच त्यांच्या मनात naturally च माणसाकडे असलेली स्वसंरक्षणापुरती बुध्दी असते पण दुष्टावा नसतो त्यामुळे धट्ट्याकट्ट्या माणसांपेक्षा ते नक्कीच देवाच्या जवळ असतील.
|
Badamraja
| |
| Tuesday, October 16, 2007 - 8:59 am: |
|
|
मला वाटत या खास मुलांना किंवा व्यक्तींना व्यवहारीक जग प्राॅक्टीकल लाईफ माहीती नसते. स्पर्धा काय असते? सतत पूढे जाण्याची हाव काय असते? स्पर्धेत टीकुन रहाण्यासाठी काय काय कराव लागत? हे सर्व यांना माहीत नसत. हे सर्व आपल्या सारख्या नाॅर्मल लोकांना माहीती असत, मग आपल्या मधे दुष्टावा येतो का? मला वाटत थोड्या फार फरकाने तो प्रत्येकात येत असावा...
|
Mansmi18
| |
| Tuesday, October 16, 2007 - 1:58 pm: |
|
|
अखि, सुंदर! बदाम, सतत पुढे जाण्याची इच्छा असण्यात काहीच वाईट नाही. पण जेव्हा त्याचा अतिरेक होतो आणि पुढे जाण्यासाठी दुसर्याना पायदळी तुडवण्याची किंवा पुढे जाणार्याना मागे खेचण्याची जी प्रव्रुत्ती असते ती दुष्टावा या प्रकारात मोडते. आणि त्यालाच practicality असे नाव दिले जाते.
|
Disha013
| |
| Wednesday, October 17, 2007 - 5:06 pm: |
|
|
अखि, खुप खुप सुंदर!
|