|
Chetnaa
| |
| Monday, September 17, 2007 - 9:34 am: |
| 
|
माणिक,स्वप्निल, श्रीराम, मनोगत... सर्वांच्याच कविता छान... स्वप्निल पहिला प्रयत्न जमला बरे.. लिहित रहा...
|
Tiu
| |
| Monday, September 17, 2007 - 5:33 pm: |
| 
|
Thank you चेतना !!
|
Mankya
| |
| Tuesday, September 18, 2007 - 3:45 am: |
| 
|
मित्रांनो .. सर्वांचे मनःपुर्वक आभार ! tiu.. रूटीन मस्त उतरलय ! माणिक !
|
Zulelal
| |
| Tuesday, September 18, 2007 - 6:46 pm: |
| 
|
शहार!! मनाच्या मैदानावरल्या मोहोरलेल्या नंदनवनात शब्दांचे ताटवे डोकावतायत फुलून डोलायच्या तयारीत... वा-याच्या ओंजळीतून ओसंडत्या सुगंधासोबत सांडलेले शब्द झेलायला कभिन्न कुत्री टपली मोकाट... केसाळलेल्या शेपट्या सावरत डोळे लावून हिरवे हावरट कवितांच्या रोपट्यांकडे वखवखून लाळ घोटतायत... लचके तोडायला कधीतरी सापडतील दातात कोमेजलेल्या शब्दांची लोंबकळती लक्तरं समीक्षकाच्या हेकट थाटात... कवींचा थवा आता शहारलाय ताटव्यांचं चित्तपण था-यावर नाही... शब्दांचे ताटवेच कोमेजतायत!!
|
Tiu
| |
| Tuesday, September 18, 2007 - 7:50 pm: |
| 
|
धन्यवाद माणिक... तुमच्या आणि इथल्या बाकी कवींच्या कवीता वाचुनच inspire झालो मी. अजुन तुमच्यासारख्या नाही जमत पण जमतील हळु हळु! बाकी तुझं नाव खुप आवडलं मला. माणिक! छान आहे.
|
Ajjuka
| |
| Wednesday, September 19, 2007 - 5:51 am: |
| 
|
कविMनो, आपल्या प्रतिभेचा सुगंध गणेशोत्सवातहि दरवळूदेत. पद्य STY मधे खास कविMसाठी मैदान ठेवलंय. वाट कसली बघताय.. होऊन जाऊद्या..
|
Meghdhara
| |
| Friday, September 21, 2007 - 11:10 am: |
| 
|
माणिक आणि स्वप्नील मस्त लिहिलयत.
|
अट्टाहास... असा अट्टाहास नकोच की अक्षरांचे अक्षरश: ठसे उमटायलाच हवेत कातर कागदाच्या कातळावर... झाडं,पानं,फुलं,चांदणं, ऊन,वारा,माती,पाऊस... दु:ख शेवटी दु:खच असतं जसं निरागसतेच्या चेहर्यावरील अबोध हसू. व्यक्त होता यायला हवं नुसत्या मौनाच्या शुभ्र शाईतून. असा अट्टाहास नकोच की प्रत्येक संवेदनेची लिपी वाचता यायलाच हवी किंवा प्रत्येक अजिंठ्याच्या लेण्यांची लांबी-रुंदी-उंची-खोली जोखायलाच हवी... दु:ख शेवटी दु:खच असतं जसं- आज्जीच्या गोधडीतलं सावळं उबदार अमर्याद आभाळ. -मयूर
|
Mankya
| |
| Wednesday, September 26, 2007 - 4:13 am: |
| 
|
मयुरा .. ' अट्टाहास ' आवडेश ! मस्त ! त्यातल्या त्यात ' अक्षरांचे अक्षरश: ठसे उमटायलाच हवेत ..' व्वाह ! धन्यवाद मित्रांनो ! माणिक !
|
Mankya
| |
| Wednesday, September 26, 2007 - 4:17 am: |
| 
|
मयुरा .. तुझ्या ' अट्टाहासा ' मुळे लिहावं लागलं हे ! शब्दार्थ कसा पोहोचवावा हवा तसा अर्थ, कसा जुळावा शब्द आपलेच शब्द दूरून ऐकताना उरतो शब्दार्थ निःशब्द तेंव्हा .. असे असावे आखीव शब्द तसेच रेखीव असावी वाणी परक्या काळजावर पाषाणाच्याही कोरायला हवी लेणी तोलूनमापून मोजमाप शब्दांचे सोड तू जाणूनी फोल ते गाठ खोली अर्थाची ऐक गूज भावनांचे, जप समतोल ते तसा करूनी अट्टाहास कुणाला काय मिळाले मित्रा सांग त्या प्रश्नांच्या अनपेक्षित उत्तरांचा कधी लागला का थांग ? सरते शेवटी आपण जे बोलू शकतो तेच आपूल्या रे हाती शब्द आपुले ते बीज परके अन परकीच आहे की रे माती ! माणिक !
|
Mankya
| |
| Thursday, September 27, 2007 - 2:56 am: |
| 
|
व्यवस्थित नाहीच कुणावर राग, कोणावर रोष नाही जे झाले गेले त्यात कोणाचाच दोष नाही जे व्ह्यायचे ते होवून गेले, सर्व वाहून गेले देणेच असावे माझेच वादळ जे घेऊन गेले त्याच्या कुवतीप्रमाणेच ते घेऊन गेल वेडं मला उगीच वाटलं राहून गेल काय थोडं काय मागे ठेवावे ते त्यालाही ठाऊक होते पण काय जपावे ते मला कुठे माहित होते चाळतो नियमाने, जखमांना ठेवतो वाहते वादळापुर्वीची झुळुकच राहून राहून भावते अता वाटतं सगळं सगळं जमीनदोस्त व्हावं उध्वस्तच व्हावं पण ते तरी व्यवस्थित व्हावं ! माणिक !
|
Chetnaa
| |
| Thursday, September 27, 2007 - 5:03 am: |
| 
|
मयुर.. अट्टाहास आवडेश... माणक्या, दोन्ही कविता सुरेख... खालील ओळी फ़ारच भावल्या... काय मागे ठेवावे ते त्यालाही ठाऊक होते पण काय जपावे ते मला कुठे माहित होते अता वाटतं सगळं सगळं जमीनदोस्त व्हावं उध्वस्तच व्हावं पण ते तरी व्यवस्थित व्हावं !
|
Menikhil
| |
| Thursday, September 27, 2007 - 9:41 pm: |
| 
|
सध्या सगळ्याच कवितान्ना दु:खाची कड का आहे? सगळ्या कवितान्मधे वीरह आणि दु:ख आहे. जरा स्फूर्ति देणर्या कविता आल्या तर मजा येइल.
|
Yog
| |
| Sunday, September 30, 2007 - 8:03 pm: |
| 
|
शवासन रोज घट्ट जोडल्या कौलांखाली सहज घडतात शवासने.. जाणीवान्चे श्वास दाबून, असहाय्यतेचे थाट मान्डून, विरक्तीचे कफ़न लपेटून, आज्ञाचक्रातून ब्रम्हरंध्रापर्यन्त सळसळत जाणारी चेतना गोठवून, मुक्तीची स्मितरेषा उमटवणार्या हे सोन्गाड्या लक्षात असू दे, कुठल्याश्या जीर्ण हेलकाव्याशी दुवा जोडणारी एखादी फ़ट तरिही शिल्लक असतेच.. मग उधळले सोन्ग तर अवशेषान्चे विसर्जन निश्चीत आहे.
|
आसपास माझ्या तुझ्या विखुरलेल्या आठवणी अन काही मिटुन घेतलेले क्षण आणि........ काहीशी विखुरलेली मी एका विखुरलेल्या क्षणात... स्वत्:ला समजावतांना मी.. ..... प्रत्येक विखुरलेल्या क्षणात तुला शोधणारी मी...!!!
|
Sampadak
| |
| Monday, October 01, 2007 - 11:03 am: |
| 
|
नमस्कार मित्रहो, आपल्या मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवायचे लक्षात आहे ना? कथा, कविता, ललित, विनोदी, रांगोळ्या, चित्र, छायाचित्र- सर्व प्रकारच्या साहित्याचे स्वागत आहे. तुम्ही लिहा, तुमच्या अन्य मायबोलीकर मित्रमैत्रिणींनाही सांगा. नवीन मायबोलीत साहित्य पाठवायच्या लिंक्स तयार आहेत. तुमच्या साहित्याची वाट पहात आहोत. साहित्य पाठवायचे नियम व सूचना तुम्हाला इथे सापडतील /hitguj/messages/34/131137.html?1191068395 संपादक मंडळ तुम्हाला सर्व प्रकारची मदत करायला तत्पर आहेच. साहित्य पाठवायची तारीख आहे २४ ऑक्टोबर... तेव्हा त्वरा करा..
|
Shyamli
| |
| Monday, October 01, 2007 - 6:52 pm: |
| 
|
वैशाली.......वेलकम बॅक,तुझ्या ओळींनी काही सुचल सहजच तुझ्या भोवतालच्या क्षणाकणातही नसणारी माझ्या विखुलेल्या प्रत्येक क्षणात तुझ्या निमीत्तानी स्वत:ला शोधणारी, अन सापडलास की पून्हा पून्हा विखुरणारी.............. मी........(?) आठवण इथेही पून्हा हक्क नाहीच काही, तीही कायमची तुझीच असलेली
|
Devdattag
| |
| Thursday, October 04, 2007 - 3:26 am: |
| 
|
मंत्रपुष्पांजली.. रस्त्यावर बाजूला बसलेली माळीण तिच्या मांडीवरचं मूल खट्याळ हास्य, कुरमूरे आणि तिच्या केसात अडकलेली एक पाकळी देव्हार्यातला देव सोवळ्यातला पुजारी आरती, प्रसाद आणि मंत्रपुष्पांजली
|
Mankya
| |
| Thursday, October 04, 2007 - 3:46 am: |
| 
|
लोपा, श्यामली .. लिहित रहा गं ! देवा .. लगेच झेपली नाही मला, पण थोडी उलगडली अस वाटतंय. जेवढी कळली तेवढी आवडली ! माणिक !
|
Menikhil
| |
| Saturday, October 06, 2007 - 4:04 am: |
| 
|
मीच तर सूर्याला 'सूर्य' म्हटल, आणि चन्द्राला 'चन्द्र' नाहीतर आगीच्या आणि मातीच्या गोळ्यापलिकडे ते काहीच नव्हते मीच तर वार्यापासून 'वीज' बनवली, आणि लोखन्डापासून 'यन्त्र' नाहीतर पोकळी भरणार्या अणि मातीत लोळणार्या पलीकडे ते काहीच नव्हते मीच तर दगड रचून धरण बनवली, आणि शोधले उडण्याचे 'तन्त्र' नाहीतर मी वर्षानुवर्षे डोन्गरासारखा पडून रहाणार दगडच होतो मीच तर शोधली चन्द्राकडे जाण्याची वाट, आणि शोधले श्वास रोखण्याचे मन्त्र नाहीतर गोष्टिन्मधे आणि जगण्यसाठी लागणर्या वस्तून्पलीकडे ते काहीच नव्हते मग मी स्वत्:ला एकदा 'दुबळ' म्हटल, आणि मनाला 'क्शूद्र' आणि धरण सोडाच, मनगटही आता दगड उचलण्यायोग्य उरले नव्हते पुढे मी शरीरालाही 'दुबळ' म्हटल, आणि विचारान्ना 'उग्र' आणि निर्माल्य होउन पडलेल्या फुलाइतकेही माझे अस्तित्व उरले नव्हते
|
|
|