|
Shonoo
| |
| Thursday, October 04, 2007 - 2:20 am: |
|
|
लै भारी. अजून येवू द्या...
|
Mankya
| |
| Thursday, October 04, 2007 - 3:20 am: |
|
|
दाद .. खरंतर निःशब्द केलयस पण लिहिल्याशिवाय रहावेना. खूप अफाट शक्ती आहे तुझ्या शब्दात, किती छोटे छोटे प्रसंग पण त्यामागील तुझं निरीक्षण आणि विचार खरंच वाखाणण्याजोगे ! मीही शहारायचो आमची स्काऊट गाईडची प्रार्थना म्हणताना, अगदी त्याची आठवण झाली ," ईतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना .. नेक रस्ते पे चले है हमसे, भूलकर भी कोई भूल हो ना .. .. .. हमारा धर्म हो सेवा हमारा कर्म हो सेवा, सदा ईमान हो सेवा की सेवक चर बना देना, वतन के वास्ते जीना वतन के वास्ते मरना; वतन पर जां फिदा करना प्रभू हमको सिखा देना !" ' सध्यातरी समाप्त ' यातल्या सध्यातरी या शब्दाला जागशील अन पुढे असेच काहीतरी अप्रतिम वाचायला मिळेल अशी आशा करतो ! माणिक !
|
Daad
| |
| Thursday, October 04, 2007 - 4:04 am: |
|
|
thansk गं आणि रे, सगळ्यांना! हा विषय इतका घोळत होता डोक्यात की विचारू नका. दिवाळी अंकासाठी काही लिहायचं तर आधी डोकं रिकामी करायला हवं. आता नेहमीसारखं कसं हलकं (रिकामं) वाटतय सव्यसाची, गोनिदा... अतिशय अतिशय आवडते लेखक. सुश, माझ्या मैत्रिणीचे आई देव पाण्यात ठेवायची क्रिकेट मॅचला! माणूस शोनू, माणिक, thanks heaps
|
Sampadak
| |
| Thursday, October 04, 2007 - 4:37 am: |
|
|
"नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली दीप उजळले नयनी माझ्या, ही तर दीपावली" प्रकाश आणि चैतन्याचा उत्सव म्हणजे दिवाळी! आनंद आणि उत्साहाचे उधाण म्हणजे दिवाळी! प्रेमाचा आणि सौहार्दतेचा पुरस्कार म्हणजे दिवाळी! तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीची आणि संपन्नता, सौख्य व संस्कृतीच्या पावलांवर चालत येणारी दिवाळी आता जवळ येऊन ठेपली आहे. दिवाळीचे मुख्य आकर्षण म्हणजे आपल्या मायबोलीचा दिवाळी अंक. गेली सात वर्षं आपला अंक अधिकाधिक बहारदार होत चालला आहे. याचे पूर्ण श्रेय अर्थात मायबोलीकरांच्या प्रतिभाशाली योगदानाला आहे. यावर्षीचा दिवाळी अंकही या परंपरेत एक पुढचे पाऊल ठरेल यात आम्हाला शंका नाही. अंकाची तयारी जोरदार सुरु आहेच. मायबोलीवरचे सर्व साहित्यिक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार, कलाकार, व्यासंगी आणि ज्ञानी सभासद दिवाळी अंकात उत्स्फूर्तपणे भाग घेतील व अंकासाठी आपल्या प्रवेशिका पाठवतील अशी आशा आहे. अशा या सर्वांना म्हणजेच तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून निमंत्रित करण्यासाठी ही एक आठवण. तुमच्या प्रवेशिका २४ ऑक्टोबर पूर्वी आमच्यापर्यत पोचल्या पाहिजेत. म्हणजेच येत्या वीस दिवसात! तेव्हा, 'सावकाश लिहू', किंवा 'मनात आहे पण शब्दात नाही' यासारख्या विचारांना (वाचा सबबींना) थारा न देता लवकरात लवकर आपले साहित्य नवीन मायबोलीवर उपलब्ध असलेला "दिवाळी अंक लेखन" हा दुवा वापरुन पाठवा. आपले प्रश्न किंवा शंका संपादक मंडळाकडे जरुर पाठवा. धन्यवाद!
|
Sush
| |
| Thursday, October 04, 2007 - 4:56 am: |
|
|
अप्रतिम, सगळं कसं मनाला भिडणारं, त्या व्रुद्ध बाइला सगळेच पहात असतिल पण उत्सुकतेपोटी विचारणारे तुज़्यासारखे विरळच. किति छान झालं असतं जर भारतातिल सगळिच धर्मक्शेत्रं अशी पवित्र झालि असति
|
Prajaktad
| |
| Thursday, October 04, 2007 - 9:21 am: |
|
|
मनाला भिडणारे लेखन... दिवाळी अंकात दाद स्पेशल वाचायला असणार अशी आशा करते .. (पाठवल ना!नसेल तर लिही बघु पटकन)
|
Ana_meera
| |
| Thursday, October 04, 2007 - 1:10 pm: |
|
|
केवळ अप्रतिम दाद, तुझी शब्दचित्रे.. डोळ्यासमोर प्रसंग, माणसे उभी रहातात...
|
मस्तच. .. .. ..
|
Farend
| |
| Friday, October 05, 2007 - 12:20 am: |
|
|
अतिशय आवडले. शेवटची सर्वात जास्त. आणि मुळात तू आता लिहित आहेस हे बघून आनंद झाला, मधे काही दिवस तुझा लेख दिसला नाही तेव्हा वाटले की आम्ही त्या 'तो हा विठ्ठल..' वर जरा टीका केली होती त्यामुळे तू लिहिणे बंद केलेसकी काय. आता जर दिवाळी अंकात लिहिणार असशील तर ते लिहून होईपर्यंत येथे लिहू नको.
|
लहान असताना माझी आज्जी आम्हा सर्व मुलाना एक साधी छोटीशी प्रार्थना शिकवायची आणि आम्ही ती रोज संध्याकाळी 'शुभं करोती' म्हणुन झाल्यावर म्हणायचो. त्या वयात समजतील असे शब्द वापरुन तयार केलेली असावी. खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करू नये शिव्या कोणा देऊ नये, कोणासंगे भांडू नये पाहिले ते मागू नये, गोड फ़ार खाऊ नये सांगितलेले ऐकत जावे, देवापाशी चित्त जडावे. अजुनही त्यावेळी आज्जी कशी दिसायची हे तसच्या तसं आठवतं
|
Jhuluuk
| |
| Friday, October 05, 2007 - 1:47 pm: |
|
|
दाद, खरोखर मनाला भिडणारे लिहिले आलेस.... असेच लिहित चल,आम्हा वाचकांना अशीच मेजवानी मिळत राहु दे
|
Mansmi18
| |
| Friday, October 05, 2007 - 5:15 pm: |
|
|
दाद, तुमचे विनोदी लिखाण मला तितकेसे गमले नाही आणि तसे मी लिहिलेही आहे. पण हा लेख अतिशय सुंदर, fantastic! वाचताना मला त्या सुवर्णमंदिरात प्रत्यक्ष उभे राहिल्यासारखे वाटले. अभिनंदन.
|
दाद, मस्तच गं. या वर्षी मी ज्या बिल्डिंगमधे राहते तिथे गणपती बसवला होता. तिथे एक छोटीशी तीन वर्षाची टिल्ली होती. डोळे अगदी मोठे मोठे. आणि आरतीचा प्रचंड उत्साह. पण तो कसा तर सर्व म्हणत असताना फ़क्त घंटा वाजवत इकडे तिकडे बघायचं आणी पंढरपुरी आहे..ऽऽऽ स्पष्टपण तिचा किनरा आवाज ऐकू यायचा. मोरया रे बाप्पा मोरया ला सर्वाचा आवाज दमलेला असतो. तेचा हिचं जोरात सुरू.. अगदी बाप्पा खुश झाल्यासारखा वाटायचा तिचं मोरया ऐकून विसर्जनाच्या वेळेला तर ती चक्क रडायला लागली. मग तिला वाटेतलं एक गणपतीचं देऊळ दाखवलं आणी म्हटलं "हे बघ बाप्पा इथे येऊन बसलाय. पुढच्या वर्षी इथून न्यायचा त्याला परत. त्याला सांगितलय ना.."पुढच्या वर्षी लव्कर ये म्हणून." "हो पण पुढच्या वर्षी तो अंघोळ करून अनवीन कपडे घालून दुकानात बसेल. तिथून आणूया त्याला...." लहान्पण किती निरागस असतं ना..
|
दाद, निशब्द केलस... म्हणा तुझे सगळे लेख वाचल्यावर असचं होतं... पण तुझ्या मुलाचा आणि शेवटाच्या "प्रार्थनेने" तर अगदी डोळ्यात पाणी आलं.... अप्रतिम...
|
Daad
| |
| Saturday, October 06, 2007 - 11:23 pm: |
|
|
थॅन्क्स हीप्स! अमोल, अरे, टीका-टिप्पणी महत्वाची. अरे, तुम्ही सगळे वाचता आणि आवर्जून आवडल्याचं, न आवडल्याचं कळवता. हे लिहिणार्यांसाठी खूप आवश्यक आहे. श्रुती, सगळ्याच आज्जी-आजोबांचं नातवंडांबरोबर 'ह्या हृदयीचे त्या हृदयी' घातल्यासारखं असतं. आजच्या न्युक्लिअर कुटुंबातून हद्दपार झालेले आज्जी-आजोबा बघितले की, त्यांच्यापेक्षा घरातल्या आई-वडिलांची कीव येते. किती मोठ्ठ्या आनंदाला मुकवतायत ते आपल्या पिल्लांना. मनस्मी१८, तुमचा प्रामाणिक अभिप्राय मला खरोखर आवडतो. तुम्ही गेलाय सुवर्ण मंदिराला? जरूर जा आणि ते सुद्धा रात्री. एक विलक्षण अनुभव आहे. नंदिनी, अगं मी लहानपणी रडून रडून शेवटी आजारी पडायचे गणपती विसर्जनानंतर. शेवटी बाबांनी एका वर्षी दोन मुर्त्या आणल्या. एकीचं विसर्जन आणि एक पुढलं वर्षभर घरात पुजली. मी चांगली दहा-बारा वर्षांची होईपर्यंत हे चाललं. तुझ्या चिमखडीने माझीच आठवण करून दिली. फक्त तुझी समजुतदार दिसत्ये माझ्यापेक्षा
|
Rajya
| |
| Tuesday, October 09, 2007 - 12:02 pm: |
|
|
व्वा दाद व्वा, काय सुरेख लिहीतेस गं, कदाचित या प्रार्थना आम्हालाही भेटल्या असतील पण हे असं शब्दरुप करायची ताकत फक्त दाद कडेच असु शकते तुला लाख सलाम
|
Aditih
| |
| Thursday, October 11, 2007 - 11:11 pm: |
|
|
खरंच गं ...आम्हालाही भेटल्या प्रार्थना,अजूनही भेटतील, भावतील, भिडतील पण इतकं सुरेख शब्दबध्द नाही करता ययचं..
|
|
|