|
Suchiti
| |
| Monday, September 24, 2007 - 5:32 am: |
| 
|
चेतना खुप छान लिहित आहेस. आता पटापट लिहि पुढ्चा भाग.
|
Chetnaa
| |
| Monday, September 24, 2007 - 5:50 am: |
| 
|
वरुन कसंबसं हसत तिने मिठाई व पास दिले. राहवलं नाही म्हणुन खात्री करुन घेण्यासाठी हळुच त्याला विचारले, " तू तिला तसं सांगायला सांगितलंस?" तो खाली मान घालुन पुटपुटला," सॉरी सुरभी..." आता मात्र एक क्षणही न थांबता ती निघाली. जाताना त्याला "गूडबाय" बोलायला विसरली नाही. ती बाहेर आली तरी तिचे मन मात्र आसुसून वाट पहात होतं त्याची हाक ऐकण्यासाठी,उगिचच........ **************** त्या घायाळ मन:स्थितीतच ती थिएटर वर आली. तिच्या मन:स्थितीशी इतरांना काही सोयर्- सुतक असण्याचे काहीच कारण नव्हते. द शो मस्ट गो ऑन..... तिनेही आपल्या भावनांसाठी कर्तव्याला कधी ठोकरले नव्हते. आपलं भंगलेलं स्वप्न आपल्या हृदयात खोलवर जतन केलं तिनं. आणि गेली स्टेजवर आपल्या दुसर्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी. आज नाटकातील रेवतीच्या व तिच्या भावना एकरुप झाल्या होत्या. रेवतीचे शेवटच्या अंकातील दु:ख आणि तिचे दु:ख यांची जातकुळ एकच झाली होती. आज संवाद रेवतीचे नव्हते तर सुरभीचेच होते जणु. हृदयातील वेदनेचा अंतर्नाद आता अभिनय राहिला नव्हता. भळाभळा वाहणारी जखम झाली होती. सुरभी आणि रेवती एकरुप होऊन गेल्या आणि पहाणारे प्रेक्षक थक्क होऊन गेले. ही नवी रेवती त्यांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात स्विकारली. तिच्या अभिनयाला सर्वांनी दाद दिली. पण तिचं मन मात्र ओरडुन ओरडुन सांगत होतं, "मायबाप प्रेक्षकहो, हा माझ्या उरातुन निघणारा वेदनेचा डोंब रेवतीचा अभिनय नाहीय होऽऽ हे तर सुरभीच्या प्रेमाचं क्रंदन आहेऽऽ माझ्या लाडक्या स्वप्नाचा आक्रोश आहे,आक्रोशऽऽ....." पडदा पडला तरीही ती धाय मोकलुन रडतच होती...... समाप्त
|
Ana_meera
| |
| Monday, September 24, 2007 - 6:13 am: |
| 
|
चांगली कथा आहे ग चेतना. स्वाभिमानी व निस्वार्थी मुलगी रंगवली आहेस ते जास्त आवडलं. बर्याच अशा केसेस मधे मुली दुसर्याचा नवरा एकतर पळवतात, किंवा चोरट नात ठेवतात. मुलींनाच ग सगळा त्रास, आणि तो सोट्या आरामात!!! त्याला काय भावनिक आंदोलने!! मी कुटुंबात असे १ उदाहरण पाहिले आहे म्हणून लिहिले हो!
|
Monakshi
| |
| Monday, September 24, 2007 - 6:26 am: |
| 
|
चेत्स, मस्तच गं. शेवट आवडला. उगाच ते नातं ताणण्यात काही अर्थ नसतो. ती लवकर ह्याच्यातून मोकळी झाली हेच चांगलं.
|
Manjud
| |
| Monday, September 24, 2007 - 6:42 am: |
| 
|
चेतना, कथा नेहेमीप्रमाणेच छान!!!! विश्वास का वागला पण असा?
|
Itgirl
| |
| Monday, September 24, 2007 - 6:57 am: |
| 
|
चेतना, छान ग विश्वासने तर दोघींची फ़सवणूकच केली असे वाटले...
|
Arc
| |
| Monday, September 24, 2007 - 7:01 am: |
| 
|
खुप मस्त आहे.वेगळि आणि छान.
|
Mankya
| |
| Monday, September 24, 2007 - 8:28 am: |
| 
|
चेतना .. सुंदर कथा, विशेषतः सुरभीचे भावचित्र खूपच छान रेखाटलयस ! Itgirl.. मला वाटते की विश्वासने स्वतःचीच फसवणूक केली ! त्याला काय पाहिजे हे त्यालाच समजले नाही आणि कोणाला प्राधान्य द्यावे हे ही ! माणिक !
|
Aashu29
| |
| Monday, September 24, 2007 - 10:14 am: |
| 
|
खूप छान रंगवली आहेस कथा!! विश्वास पळपुटा आणि चालु आहे, बाकी त्याच्या प्रेमा मधे काहिही गांभिर्य नाहि!! असे प्रत्यक्षातही बरेच लोक आहेत जगात!!
|
Itgirl
| |
| Monday, September 24, 2007 - 11:32 am: |
| 
|
हो माणिक, स्वत:ची फ़सवणूक तर केलीच, पण, सुरभीच्या भावनांची पण कदर ठेवली नाही, आणि बायकोला पण फ़सवलेच ना, तिच्याशी प्रामाणिक न राहता...
|
Athak
| |
| Tuesday, September 25, 2007 - 7:47 am: |
| 
|
wow चेतना , काय सामर्थ आहे तुझ्या लेखणीत , खुप छान लिहीतेस , सुरभीचे सुर अचुक शब्दात मांडलेस
|
Tiu
| |
| Tuesday, September 25, 2007 - 7:51 pm: |
| 
|
चेतना...कथा आवडली! कथेवर आलेल्या प्रतिक्रियांवर माझी प्रतिक्रिया देतोय. चुक विश्वासची आहे ह्यात वादच नाही...त्याने सुरभीला फसवलंय हे मान्य! पण तितकीच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त चुक सुरभीची नाहिये का? त्याचं लग्न झालंय आणी त्याला मुलं आहेत हे कळाल्यावर त्याच्याशी असलेले संबंध तोडणे हे जास्त शहाणपणाचे होते असं मला वाटतं. मला कथा वाचुन विश्वासचा राग आला पण सुरभीबद्दल सहानुभूती नाही वाटली.
|
Disha013
| |
| Tuesday, September 25, 2007 - 9:16 pm: |
| 
|
अगदी हेच हेच लिहायला मी आल्ते! विश्वास चालु असो नसो,सुरभी म्हणतेच ना लग्न वगैरे अडथळे वाटतात तिला. तसेच राहुन असले नाते ती ठेवु शकते. मग तिला बरा सोडेल विश्वास. maximum पुरुष असेच वागणारे असतात. शेवटी शारिरीक,मानसिक त्रास मुलींनाच होणार. मुले सहजपणे झटकुन टाकतात अशी नाती.
|
Suchiti
| |
| Wednesday, September 26, 2007 - 7:32 am: |
| 
|
मस्त शेवट झाला. मला कथा खुप आवड्ली
|
Sush
| |
| Wednesday, September 26, 2007 - 9:40 am: |
| 
|
पण सुरभिपेक्शाहि विश्वासची चुक नाहि का? सर्वप्रथम आपण विवाहित असुनहि तो सुरभिकडे त्याचे प्रेम व्यक्त करतो, तेव्हा तिला कुठे माहित असते कि तो विवाहित आहे हे? एक चुक तिची झालि तिने सम्जुन घ्यायला हवे होते कि हे कळल्यावर त्याचि बायको या सम्बन्धाला स्विकारणार नाही. म्हणजे त्या दोघानि त्याच्या बायकोला ग्रुहित धरले होते हे चुकिचे आहे. असो, चेतना कथा छान लिहिलिस.
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 26, 2007 - 9:51 am: |
| 
|
चेतना, कथा छान आहे. पण सलग पोस्ट केली असती तर जास्त प्रभाव पडला असता.
|
Tiu
| |
| Wednesday, September 26, 2007 - 2:26 pm: |
| 
|
maximum पुरुष असेच वागणारे असतात. >>> Objection my Lord! ह्या वाक्याला माझा तीव्र आक्षेप आहे. मी माझा जाहीर निषेध व्यक्त करतो. काल्पनिक कथेतला काल्पनिक कथानायक ह्यापलिकडे ह्या वाक्याला दुजोरा देणारा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे माझी कोर्टास नम्र विनंती आहे की maximum पुरुषांना ह्या आरोपातुन मुक्त करण्यात यावे... P.S.: maximum स्त्रिया ह्या कपटी, कारस्थानी व बनेल असतात. (पुरावा: एकता कपुरची कुठलीही K serial ...)
|
Disha013
| |
| Wednesday, September 26, 2007 - 4:58 pm: |
| 
|
अहो tiu , maximum म्हणजेच सगळे न्हवे! थोडेसे प्रामाणिकही असतात हे मान्य. एकता कपुरच्या महामालिकांमधेच एक तरी सर्वगुणसंपन्न सुन असतेच की. तिथे कारस्थानी स्रिया असल्या तरी त्याही एकताच्या अफ़ाट कल्पनाशक्तीतुन आल्यात. मला सुरभीचे वागणे चुकीचे वाटतेय बॉ. तितकाच विश्वासही विश्वासघातकी. ती विश्वासची मैत्रीण म्हणुन अगदी त्याच्या घरीही जावु लागते. ही फ़सवणुकच झाली ना. असो.कथा मस्त आहे पण.
|
Hawa_hawai
| |
| Wednesday, September 26, 2007 - 5:58 pm: |
| 
|
मला तर वाटते चुक सुमाचीच आहे. इतकी वर्षे नवर्याचे बाहेर लफडे आहे हे ओळखता येऊ नये म्हणजे काय!
|
Sashal
| |
| Wednesday, September 26, 2007 - 6:08 pm: |
| 
|
LOL HH! उगीच फ़क्त चूपचाप चूल मुल करत बसली असेल ती सुमा ..
|
|
|