Ajai
| |
| Wednesday, September 12, 2007 - 8:51 am: |
| 
|
रामगोपाल वर्माकी आग तिकिटबारिवर फार भडकली नाही आणि त्यामुळे त्याची factory थंड पडली. पण जमेल तिथे आणि जमेल तसे हात मारायचा मुळचा गुलटी स्वभाव त्याला स्वस्थ बसु देईल तर ना.. factory तुन कितिहि कचरा बाहेर पडला तरी factory बंद करायचे काहि कारण नव्हतेच कारण quality आणि pollution control चे norms त्याच्या factory ला लागु नाहित. नवीन प्रयोग म्हणुन मराठी चित्रपट बनवण्याची त्याने घोषणा केली. स्वतच्या 'शिवा'ची आणि सिप्पिंच्या' शोले'ची केलेलि माती लक्षात घेवुन अगदि मराठी मातीतला 'श्वास' त्याने रीमेकसाठी निवडला.. नुकतीच त्यासाठि त्याने मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली त्यातले हे काहि बाईट्स. प्र. तुम्हि रिमेकच्या या प्रयोगासाठि 'मराठी' आणि त्यातुन 'श्वास'चि निवड का केली? उ. जरी मी मुंबईत बरिच वर्ष असलो तरी मराठीपासुन इतके दिवस काहि 'अंतरा'वरच राहिलो. आता या'उर्मि'ला किती दिवस दाबुन ठेवायचे म्हणुन हा चित्रपट बनवायचे ठरवले आहे. राहता राहिला प्रश्न श्वासच का? तर कारणे दोन. पहिले म्हणजे श्वास हा मैलाचा दगड आहे. मराठि चित्रपट त्या दगडापसुन पुढे सरकला पाहिजे असे मला वाटते. दुसरे महत्वाचे कारण्-माझि आग पाहुन प्रेक्षक आणि परिक्षक दोघानीही दगड मारले. हेच दगड पुढिल मैलाचे दगड म्हणुन वापरायचा प्रयत्न असेल. तसे तिसरेहि एक कारण आहे. के सरा सरा मधुन बाहेर पडलो, factory ही बन्द पडायच्या आधी त्यात श्वास फुंकणे जरुरिचे झालेय प्र. पण श्वास रीमेक करण्या येव्हढा जुना नाहिये उ. हो मला कल्पना आहे त्याची.. अजुनही अरुण नलावडे आठवड्याला येक दोन सत्कार आणी शालि स्विकरतात असे ऐकुन आहे मी. पण हा रिमेक नसेलच. श्वास is just inspiration प्र. म्हणजे? उ. तुम्हि माझि आग पाहिलेली दिसत नाहि.कुठेतरि तो शोलेसरखा वाटतो का? कारण शोले is just inspiration मी श्वास ला वेगळी treatment देणार. स्टारकास्ट, स्टोरिलाईन सगळे हटके असेल उदाहरण म्हणजे श्वास घडला कोकणात.मी हा चित्रपट विदर्भात शुट करणार आहे. नावीन लोकेशनमुळे येक फ़्रेशनेस येईल आणि जाताजाता विदर्भाच अनुशेष भरुन काढण्याचे पुण्यही मिळेल प्र. वा तुमच्या प्रत्येक चित्रपटात हे असे काहि नाविन्य असतेच. आणि काहि बदल? उ. हो बघा म्हणजे श्वास मधे नातवाला डोळ्याचा आजार होता इथे आजोबाना नाकाचा आजार असेल. त्यांच्यासाठि नातवाने केलेली धावाधाव हेच कथासुत्र. प्र. वा.. intresting पण मग आजार नाकाचा आणि चित्रपटाचे नाव रामगोपाल वर्माचे डोळे असे का? उ. डोळ्याच्या आजारावरच्या चित्रपटाचे नाव श्वास ते तुम्हाला चालते मग नाकाच्या आजरवरच्या चित्रपटाचे नाव 'डोळे' असायला काय हराकत? प्र. आणि काहि खास? उ. हो श्वास च्या climax ला तो होडिचा shot आहे तिथे आम्हि होडित उर्मिलाचा आयटम टाकु. गाणे सुद्धा आजोबांच्या तोंडि असेल. म्हणजे पायघसरुन ते पाण्यात पडतात आणि मग गातात "मै डुबा... मै डुबा" मराठि चित्रपटात हिंदि गाणे हिही खासियतच. प्र. बर मग स्टारकास्ट उ. या सिनेमात तिन मह्त्वाची पात्र. डॉक्टर,आजोबा आणि नातु. अजुन काहि नक्कि नाहि पण अमिताभ आजोबा आणि अजय देवगण डॉक्टर, नातवाचा रोल मात्र नाक्कि प्रसिद्ध बालकलाकार सचिनलाच देणार. प्र. दिग्दर्शन तुम्हि स्वत करणार का? उ. नाहि.. माझ्याच फ़क्टरिचे येक प्रोडक्ट विश्राम सावंत याचे दिग्दर्शन करेल. उ. पुढचे प्लन्स? प्र. ऑस्कर चे नाहि माहित पण ई ते झी मराठि अवॉर्ड साठि लॉबिंग नक्कि करेन. पुढे 'डोळे' फाऊंडेशन ही काढायच विचार आहे प्र. फाऊंडेशन चा उद्देश? उ. माझ्या चित्रपटांमुळे देशोधडीला लागलेल्या डिस्ट्रीब्युटरना मदतीचा हात द्यायची कल्पना आहे. बघु किति जमतेय.. प्र. आता शेवटचा प्रश्न.. हा चित्रपट तरी चालेल का? उ. के सरा सरा...
|
Mankya
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:09 am: |
| 
|
ajai.. क्या बात ! अगदी तूफान ! ह. ह. पु. वा. ते आग च्या बाबतीत मात्र अगदी खरं आहे म्हणजे अगदी अब्रूच काढलीये ' शोले ' ची ! माणिक !
|
Itgirl
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:15 am: |
| 
|
अजय, मजा आली वाचायला!!
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:50 am: |
| 
|
अजय, पटकथा पण हवीय. शिवाय निशा कोठारी नर्स चे काम करणार ना ? आणि समाजसेविका कोण ? बाकि या मंडळींचे कॉश्च्युम्स कोण करणार ? आमच्या तर्फ़े रामुजीना हे विचारणार का ?
|
अजय मस्त . मजा आली . दिनेश , रामूची " मंडळी " आणि कॉस्चुम्स?
|
Gobu
| |
| Wednesday, September 12, 2007 - 10:23 am: |
| 
|
अजय, बापरे! हसुन हसुन पुरेवाट!
|
Manjud
| |
| Wednesday, September 12, 2007 - 10:35 am: |
| 
|
डोळ्याच्या आजारावरच्या चित्रपटाचे नाव श्वास ते तुम्हाला चालते मग नाकाच्या आजरवरच्या चित्रपटाचे नाव 'डोळे' असायला काय हराकत? अजय अगदि ह. ह. पु. वा. दिनेशदा, मला पण वाचताना हाच प्रश्न पडला की कॉस्चुम दिझाईन कोण करणार?
|
Zakasrao
| |
| Wednesday, September 12, 2007 - 10:55 am: |
| 
|
अजय सहीच लिहिल आहेस.
|
Aashu29
| |
| Wednesday, September 12, 2007 - 12:30 pm: |
| 
|
होडीत उर्मिलाचे गाणे, आजोबा गातात मै डुबा!!!! हिहिहि जबरीच लिहलयस!!
|
Mansmi18
| |
| Wednesday, September 12, 2007 - 1:25 pm: |
| 
|
बर्याच दिवसानी हसायला येण्यासारखे विनोदी वाचले. मजा आली!
|
Ajjuka
| |
| Wednesday, September 12, 2007 - 2:11 pm: |
| 
|
मस्त लिहिलंय... दिनेश आणि मंजु, हाणा च्यामारी.... ही ही ही
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, September 12, 2007 - 5:51 pm: |
| 
|
डोळ्याच्या आजारावरच्या चित्रपटाचे नाव श्वास ते तुम्हाला चालते मग नाकाच्या आजरवरच्या चित्रपटाचे नाव 'डोळे' असायला काय हराकत>>>> 
|
Deepanjali
| |
| Wednesday, September 12, 2007 - 6:05 pm: |
| 
|
डोळ्याच्या आजारावरच्या चित्रपटाचे नाव श्वास ते तुम्हाला चालते मग नाकाच्या आजरवरच्या चित्रपटाचे नाव 'डोळे' असायला काय हराकत <<<< LOL मला तो सुप्रसिध्द पीजे आठवला , ऑस्ट्रेलियाचा एक निर्माता ' गावस्कर ,' नावाचा चित्रपट काढतो . पण त्यात सुनिल गावस्कर चा उल्लेखही नसतो . यावर त्याचं उत्तर असं , तुम्ही नाही का बॉर्डर सिनेमा काढला जिथे आमच्या ऍलन बॉर्डर चा उल्लेखही नव्हता ! 
|
Runi
| |
| Wednesday, September 12, 2007 - 10:22 pm: |
| 
|
अजय एकदम मस्त फटकेबाजी केलीये.
|
Farend
| |
| Thursday, September 13, 2007 - 2:02 am: |
| 
|
माझ्याच फॅक्टरीचे एक प्रॉडक्ट आणि डोळे फाउंडेशन . चांगला लिहिलाय.
|
Daad
| |
| Thursday, September 13, 2007 - 7:22 am: |
| 
|
अजय, धम्माल लिहिलय. अनेक पंचेस.... मस्तच!
|
Chetnaa
| |
| Thursday, September 13, 2007 - 7:36 am: |
| 
|
अरे वा अजय.. धमाल आणलीस येऊ दे अजुन ( बॉलीवूड बरेच विषय पुरवेल तुला ) ... मजा येतेय वाचायला...
|
Monakshi
| |
| Thursday, September 13, 2007 - 7:39 am: |
| 
|
अजय, सहीच रे. अगदी ह. ह. पु.वा. मी अंमळ घाबरलेलीच होते अज्जुकाची काय कमेंट येते यावर. हे भगवान तूने बचा लिया.
|
Zakasrao
| |
| Thursday, September 13, 2007 - 8:19 am: |
| 
|
डोळ्याच्या आजारावरच्या चित्रपटाचे नाव श्वास ते तुम्हाला चालते मग नाकाच्या आजरवरच्या चित्रपटाचे नाव 'डोळे' असायला काय हराकत>>>> आताच सुचल एक. त्या नाकाच्या आजाराच नाव "हिमेश रेशमिया" ठेवल तर जास्त योग्य होइल. अंमळ घाबरलेलीच होते अज्जुकाची काय कमेंट येते यावर. हे भगवान तूने बचा लिया.>>>>>>... याचा अर्थ अज्जुका काय भगवानला घबरणारी भुत आहे असा घेवु काय?? अज्जुके दिवे घे.
|
Ajjuka
| |
| Thursday, September 13, 2007 - 8:41 am: |
| 
|
मोना, तू चूक गयी... मी कुणाही भगवानच्या पिताजींनांही न घाबरणारं भूत आहे!!
|