Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 03, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » कथा कादंबरी » मैत्री » Archive through September 03, 2007 « Previous Next »

Chetnaa
Monday, September 03, 2007 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलिकडे ती फ़ारच नर्व्हस होऊ लागली होती. आज त्याच्या निर्लज्ज बोलण्याने तिचा पूर्ण तोल गेला. आणि त्या भरातच सर्व काही संपवावेसे वाटले तिला.
त्याने परत एकदा तिला धीर दिला.
" तुझी संसार टिकवण्याची धडपड पाहुन मला तुझ्या बद्दल खुपच आदर वाटतोय मिता. तुला यापुढे हवी ती मदत माझ्याकडुन मिळेल याची खात्री बाळग. काही काळजी करू नकोस. "
पहाट व्हायला आली होती. तो सहज बाल्कनित आला आणि पहातच राहिला. त्याने तिला हाक मारली.
" मिताऽऽ पटकन ये इकडे... "
तिही धावतच आली. आता तिच्या धावण्यातही जणु बालिकेचा अल्लडपणा लपला होता. त्याच निरागस उत्सुकतेने तिने विचारले,
"काय रे, निरंजन? "
बाहेर हळुहळु दिशा उजळु लागल्या होत्या. सुर्याची बाल अवस्थेतील किरणे जणु हळुवारपणे एक एक पाऊल टाकत आपल्या कवेत घेत होती सृष्टीला. इतका वेळ अंधार्‍या धुक्यात गुरफ़टलेल्या सृष्टीचे पदर अलगद दूर करित होती ती किरणे...... आणि रोजच्याच स्रुष्टीचे धुक्यात नजरेआड झालेले रूप जणु पुन्हा नव्याने उलगडुन दाखवत होती.... तो अनिमिष नेत्रांनी पहात होता.


Chetnaa
Monday, September 03, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" ए, असा काय पहातोहेस बाहेर? '
" मिता, बघितलंस ही सुर्याची कोवळी किरणे किती सशक्तपणे दूर पळवताहेत या धुक्याच्या सृश्टीवरील आवरणाला? "
तिने त्या दिशेने पहात म्हटले,
"वाटतंय खरं! पण त्यात काय? हे तर रोजच घडत असणार... "
" होय! हे रोजच घडतंय. पण आज जणु काही पहिल्यांदाच जाणिवेने टिपलंय. ही सर्व सृष्टी धुक्यात गडप झाली होती तेव्हा किती विचित्र, भेसुर आणि भितीदायकही वाटत होती. "
" हुं! मला अशा गुढ वातावरणाकडे बघताना शहारेच येतात अंगावर... "
" अस्सं! आणि आता तेच वातावरण निवळुन असं सामोरं येताना कसं वाटतंय? '
ती सर्वत्र नजर फ़िरवत म्हणाली,
" खरंच! अलगदपणे धुक्याचं भेसुरपण बाजुला सारताना ही सर्व सृष्टी नवचैतन्याने नहाताना भासतेय. रोजचेच दृष्य पण जणु काही नव्याने जन्मल्यासारखे वटतेय. पण याआधी कधीच असे वाटले नव्हते. सर्व इतके नवे नवे आणि हवे हवे देखिल... "
" तिच तर किमया आहे निसर्गाची. अनादी काला पासुनचं त्याचं हे रूप... पण प्रत्येक दिवशी ते मरगळण्या ऐवजी नवचैतन्याने बहरतं आणि आपण मात्र आपल्या इतक्या छोट्याश्या, अवघ्या काही वर्षांच्या आयुष्यात नको ती दु:ख कवटाळुन दिवसागणिक मरगळत जातो. ह्या धुक्याप्रमाणे या दु:खाचं जाळंही आपल्या मनातील आशा किरणांनी आपल्या जिवनावरुन आपल्यालाही हटवता आलं तर आपलं जिवनही खळखळणार्‍या नवचैतन्याच्या झर्‍यासारखं होऊन जाईल"


Chetnaa
Monday, September 03, 2007 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" खरंय तुझं! दु:खाच्या डोहात डुंबण्या पेक्षा मिळणारे सुखाचे कण वेचीत, त्याच्या आधारावर झोकुन द्यायला हवे स्वत:ला, या चैतन्याच्या प्रवाहात. थांबला तो संपला. "
" आं? हे तू बोलतेहेस मिता? अगदी ताबडतोब गुण लागलेला दिसतोय गुरुचा. मला वाटतं बाईसाहेब! तुम्हाला आता योग्य दिशा सापडली आहे. जिवन तर जगायचंच आहे. मग रडत कुंथत का? चांगलं हसत व दु:खही साजरं करत जगण्यात जास्त आव्हान नाही का? मग हे आव्हान प्रत्येकाने पेलुन आपलं सामर्थ्य सिध्द करण्यासाठी "दु:ख" ही संधीच मानली पाहीजे. "
" येस सर! मला वाटतं या सुंदर पहाटे बरोबर सुरु झालेल्या सुंदर जिवनाची व अपल्या मैत्रीची सुरुवात परत एकदा कॉफ़ी पार्टी करुन सेलिब्रेशन करायला मुळीच हरकत नसावी. "
" अर्थातच नाही. "तोही नाटकीपणे म्हणाला.
वाफ़ाळलेले कॉफ़ीचे मग घेऊन ती दोघे परत बाल्कनीत आली.
" हे सुंदर जिवन आणि आपल्या मैत्री प्रित्यर्थ.... चीयर्स... "
दोघांनीही एकाच वेळी म्हणत एकमेकांना चियर्स केले आणि दोघेही खळखळुन हसले......

समाप्त


Ana_meera
Monday, September 03, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासच ग चेतना!! शिवाय एकसंध पूर्ण केलीस हे विशेष... पुढच्या लेखनप्रवासाला हार्दिक शुभेच्छा!!

Itgirl
Monday, September 03, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप छान चेतना... आवडली ग :-)

Manjud
Monday, September 03, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना, सर्वरला घाबरून तू कथा घाईघाईत गुंडाळलीस असं वाटलं. मिता स्वत:बद्दल सांगत असताना मधेच लेखिका कशी तिचं पूर्वयुष्य सांगायला लागली? आणि मधूनच पुन्हा दोघांचे संवाद चालू झाले. कथेची सुरुवात फारच अप्रतिम झाली होती. शेवटही आवडला पण ती मधली पोस्ट तुला अजून एडीट करून फुलवता आली तर बघ. कथा अजून फुलवली असतीस तर वाचायला अजून मजा आली असती बघ

हे माझं वैयक्तिक मत आहे. कृपया राग नसावा.


Himscool
Monday, September 03, 2007 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना, मला वाचताना एखाद्या एकांकीकेचा ड्राफ़्ट वाचतो आहे असे वाटले....

Chetnaa
Monday, September 03, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा, आयटी. मंजुद थॅंक्स...
मंजुद अग बरं झालं लक्षात आणुन दिलस... घाईघाईत टायपताना वाक्य थोडं बदललं... ती हकिकत सांगु लागली... ऐवजी.... तिने तिची हकिकत त्याला सांगितली... असे आहे मूळ लिहिलेलं... आणि मग लेखिकेच्या व्ह्यु ने लिहिलिय...
तसेच त्या हकिकतेला जास्त महत्व नव्हते द्यायचे मला... अनेक दु:खांपैकी तिचे हे दु:ख... पण त्यांच्यात निर्माण झालेली मैत्री... आणि तिला सकारात्मक विचारांकडे घेऊन जाणे.... इतकेच मला दाखवायचे होते...
सल्ल्या बद्दल धन्यवाद...


Chetnaa
Monday, September 03, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिमस्कुल... बरोबर आहे.. असे वाटु शकते... कारण पात्रं दोनच आहेत... संवादावर जास्त भर असल्यानेही तसे वाटत असेल... ठांकु..

Daad
Monday, September 03, 2007 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना सुंदर कथा, पटकन पूर्ण केलीस.... तुला स्वतंत्र मेल केलय, गं.
कथा आवडली!


Princess
Monday, September 03, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना, मस्तच आहे कथा. मला शेवटाचे संवाद आवडलेत. पण शेवट तू आवरता घेतलास असे मलाही वाटते.

Nandini2911
Monday, September 03, 2007 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना.. मस्त आहे. मला शेवटच जास्त आवडला. :-) सुरुवात पण छान झाली होती..

Gobu
Monday, September 03, 2007 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा सुरुवातीला थोडी long आणि शेवटी थोडी short झालीय, बाकी छान आहे.
चु.भु.द्या.घ्या.


Yashwant
Monday, September 03, 2007 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पन असे काही मित्र मैत्रीणी आहेत जे मला पॉजीटीव्ह विचार करायला लावतात आणि निराश क्षणात धिर देतात. काही जण मायबोली वर भेटले. यान्च्या मुळे आयुष्य किती सुखकर होते म्हणुन सान्गू. एका चान्गल्या कथेबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा.

Mi_aboli
Monday, September 03, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना............. मस्तच आहे कथा आपल्याला आवडली :-)

Neelu_n
Monday, September 03, 2007 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना छान लिहलियस कथा. आवडली.:-)

Dineshvs
Monday, September 03, 2007 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना, असे सकारात्मक विचार करणारे आणि करायला लावणारे मित्र भेटणे हे भाग्याचे असते.
मी आहे त्यातला एक. कथा अर्थातच आवडली.


Ajjuka
Monday, September 03, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कथा आवडली. सकारात्मक शेवट म्हणून अजूनच.

Runi
Monday, September 03, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना, कथा लवकर पुर्ण केल्याबद्दल धन्यवाद. सुखांत आवडला.

Zakki
Monday, September 03, 2007 - 10:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथेचा मुख्य मुद्दा चांगला आहे.

माझ्यासारख्याला असे ' positive विचार ठेवा,' हे परत परत सांगावे लागते, त्या मुळे मला ही कथा आवडली.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators