Ajai
| |
| Wednesday, August 15, 2007 - 10:55 am: |
|
|
विक्रमाने वेताळाला खांद्यावर मारले आणि तो चालु लागला. "राजा विक्रमा तुझ्या चिकाटीची मी दाद देतो.तु हे काम कुणाच्या सान्गण्यावरुन करतोयस हे मला माहीत नाही पण तु जसा न थकता मला घेवुन निघतोस तसाच मीही तुला न थकता येक कथा सांगतो. ऐक..." वेताळाने कथा सुरु केली आणि विक्रम लक्षपुर्वक ऐकु लागला. मुम्बापुरि नावाची महानगरी. ही नगरी मोठि म्हणुन तीथे संधी ही भरपुर आणि सन्धीसाधुही भरपुर. महानगरी मोठी म्हणुन तिचे प्रश्नही मोठे. या महा प्रश्नांवर उपाय सन्शोधन करण्यासाठि विलासराव,उद्ववसाहेब,आबा आणि राज अशा मंडळीनी महाचर्चा करायची ठरवली. सगळ्याना सोयीस्कर म्हणुन शिवाजी पार्कात शिवाजी पार्क जिमखान्याच्या क्रिकेट पिच वर भेटायचे नक्कि केले. घराजवळ म्हणुन राज साहेब आधिच हजर होते.त्यांच्या हातात कसलासा निळा कागद होता. नंतर कळले कि ति महाराष्ट्र आणि मुंबापुरि विकासाची blueprint होती. त्यांच्या पाठोपाठ उद्ववसाहेबांचे आगमन झाले. राजसाहेबानी त्याना ती blue print दाखवायचा प्रयत्न केला पण उध्ववसाहेबानी आपण गणपती मंडळांची मतं विचारात घेत नाही म्हणुन त्याना झटकुन लावले. दोघेही येकमेकांना पाठ करुन आबा आणि विलासरावांची वाट पाहु लागले. तासगाव आणि लातुर विकासाच्या मिटिंग लांबल्यामुळे आबा आणि विलासरावाना उशीर झाला. आपापल्या मिटींग संपवुन दोघेही आघाडीची स्कुटर घेवुन निघाले. स्कुटर विलासराव चालवत होते तर साइडकारमधे आबा होते. ही आघाडीची स्कुटर कितिही दामटली तरि पोचायला उशीर व्हायचा तो झालाच. "मुम्बापुरिच्या विकासाचा प्रश्न आहे म्हणुन थांबलो नाही तर केव्हाच निघुन गेलो असतो. मुम्बापुरीचा विकास हाच साहेबांचा ध्यास.." उद्वव गरजले. "हो ना साहेबांचे मुम्बापुरिवर खास लक्ष.." आबानी दुजोरा दिला. ते दोघेही वेगवेगळ्या साहेबांबद्दल बोलत होते हा भाग वेगळा. "युतीच्या कारकिर्दीत किती विकासाची काम झाली.. हे सगळे उड्डाणपुल त्याची साक्ष आहेत" - उध्वव "यात किती कोटीची उड्डाणे झाली ती मला माहीत आहेत.त्यापेक्षा ही blueprint पहा" राजसाहेबांनी आपले घोडे दामटले. त्याकडे दुर्लक्ष करीत आबानी आपण डान्सबार बंद करुन मुंबापुरीचे संस्कृती रक्षण केल्याचे गोडवे गायले. आता विलासराव कसे मागे राहतील " पीएम तर मुम्बापुरीचे शांघाय करणारच. आणि तो storm water project madam मुळेच मंजुर झाला ना" इथे madam कोण हे माहीत असल्याने दोन साहेबांसारखे कन्फ्युजन नव्हते. जशी रात्र चढत गेली तशी चारिजणांची चर्चा रंगत गेली. शेवटी मुम्बापुरिच्या विकासासाठि झटण्याची शपथ घेवुन मिटींग संपली. "आता मला सांग मुंबापुरीच्या विकासासठि येव्हडे लोक कटिबद्ध असताना प्रश्नही कायम आहेत. अस का?. या प्रश्नाचे उत्तर दे. आणि लक्षात ठेव जर माहीत असुनही तु याचे उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होवुन तुझ्याच पायवर पडतील" वेताळाने कथा संपवत राजाला विचारले "हे बघ वेताळा या कथेचा पुढचा भाग मी तुला सांगतो म्हणजे तुझ्या प्रश्नांची उत्तरे तुला आपोआप मिळतील" मीटींग संपल्यावर हे सगळे निघुन गेले पण त्या चर्चेच्या गुर्हाळातुन बरीच चिपाडं बाहेर पडली.त्या कचर्याचा हा मोठा ढिग त्या पिचवर जमा झाला. दुसर्यादिवशी क्रिकेटची नेट लावयाला चार माणसं आली. त्यानी ती घाण गोळा केली. ती घाण फ़ेकायला ते कचराकुंडी शोधायला लागले. आख्खा शिवाजी पार्क विभाग पालथा घातला पण त्याना कचराकुंडी काही सापडली नाहि. आजही दादर माहिम भागात ते लोक हिंडताना दिसतील.. "स्वच्छ मुंबापुरीची घोषणा होवुन बराच काळ लोटला तरी अजुन ही अवस्था त्यामुळे बाकिच्या घोषणांचे काय होणार याचे उत्तर तुझे तुलाच मिळेल"- राजाने कथा संपवली. "ह्म्म्म .... माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले पण तु बोललास आणि हा मी चाललो".. वेताळ येव्हढे बोलुन पुन्हा झाडावर लटकु लागला.
|
Rani_2007
| |
| Wednesday, August 15, 2007 - 1:43 pm: |
|
|
अजय, चांगला कल्पनाविलास...गोष्ट आवडली.
|
Asami
| |
| Wednesday, August 15, 2007 - 2:33 pm: |
|
|
आख्खा शिवाजी पार्क विभाग पालथा घातला पण त्याना कचराकुंडी काही सापडली नाहि. >> awesome रे. एकदम दोन फ़ूल एक हाफ़ style वर जमलाय.
|
अजय,चांगली मांडली आहेस रे कथा. आवडली...
|
Aktta
| |
| Wednesday, August 15, 2007 - 6:31 pm: |
|
|
>> आपण गणपती मंडळांची मतं विचारात घेत नाही ही लाईन र्सवात मस्त आहे.... एकटा...
|
Mepunekar
| |
| Wednesday, August 15, 2007 - 10:00 pm: |
|
|
अजय, आवडली ही कथा
|
Daad
| |
| Thursday, August 16, 2007 - 1:12 am: |
|
|
अजय, प्रच्चंड झक्कास! कल्पना आणि तिचा विलास! बहोत खूब!
|
अजय मस्त रे. चांदोबातली गोष्ट आणि दोन फुल एक हाफ चे सही कॉंबीनेशन.
|
Chetnaa
| |
| Thursday, August 16, 2007 - 5:41 am: |
|
|
अजय,मस्तच... गणपती मंडळ आणि कचराकुंडी!!! झक्कास!
|
Ladaki
| |
| Thursday, August 16, 2007 - 6:58 am: |
|
|
अजय चांदोबातल्या कथा जश्या बोधपर असतात... तशी तुझी कथा अर्थपूर्ण आहे... all the best... keep writting...
|
Ajai
| |
| Thursday, August 16, 2007 - 7:27 am: |
|
|
सर्वांना प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. asami,sanghamitra दोन फुल येक हाफ़ चा प्रभाव नक्किच आहे. असाच येक column पुर्वी म.टा. मधे यायचा अशोक जैन लिहायचे.२फुल १हाफ़ कोण लिहते ते मात्र अजुन कळले नाही.
|
अजय, मस्तच लिहिले आहेस. दोन फ़ुल एक हाफ़ तंबी दुराई लिहितात
|
Ajai
| |
| Thursday, August 16, 2007 - 10:28 am: |
|
|
nandini2911 - हो पण तंबी दुराई कोण हा प्रश्न अनुत्तरितच आहे
|
लेखक आहेत म्हणे. मलाही इतकंच ठाऊक आहे.
|
हो ते अशोक जैन लिहायचे त्या सदराचं नाव आठवतंय का कुणाला? मला तर आधी तंबी दुराई हे त्यांचंच टोपण नाव वाटे. पण नंतर कळलं की ते हे नव्हेत. तंबी दुराईंना मधे कसला तरी पुरस्कार मिळाला तेंव्हाचा फोटोही आला होता ना पेपरात. त्यामुळे तेच त्यांचं खरं नाव असावं असं वाटतंय.
|
Asami
| |
| Thursday, August 16, 2007 - 12:06 pm: |
|
|
महेश नायगावकर का ? काहिही असो, जे काय असते ते अप्रतिम असते. ajai चा लेख पण तसाच आहे.
|
Ajai
| |
| Thursday, August 16, 2007 - 12:10 pm: |
|
|
अशोक जैन यांचे सदर "कानोकानी"- "कलन्दर" या नावाने लिहायचे बहुतेक CBDG
|
Chinnu
| |
| Thursday, August 16, 2007 - 2:33 pm: |
|
|
अजै, लिहिण्याची शैली आवडली. पु. ले. शु.
|
Chaffa
| |
| Friday, August 17, 2007 - 3:36 pm: |
|
|
अजय खरच छान सहसा राजकारणी कथा मी वाचत नाही पण वाचावीशी वाटली आणि आवडली सुध्दा. मस्तच रे!!!!!!!!!!!!
|
Slarti
| |
| Friday, August 17, 2007 - 4:27 pm: |
|
|
२ फुल १ हाफ हे सदर कोणत्या वर्तमानपत्रात प्रकाशित होते ?
|