|
Chetnaa
| |
| Saturday, September 01, 2007 - 3:33 am: |
| 
|
निरंजन लॅच उघडुन आत आला. लाईट लावत त्याने संपूर्ण फ़्लॅट मधे एक धावती नजर फ़िरवली. सगळीकडे एक पोरके पणा भरुन राहिला होता. स्नेहा निघुन गेल्यापासुन सर्व घर जणु काही पोरंकं झालं होतं. स्नेहाची मर्जी सांभाळत आपला संसार टिकवण्यासाठी त्याने सर्व प्रयत्न केले होते. सुरुवातीस तिच्याकडुनही बरा प्रतिसाद मिळाला होता. पण जुळवुन घेणे तिच्या हेकेखोर स्वभावात नव्हते. हळुहळु त्यांच्यात एक समांतर दुरावा निर्माण झाला.या दुराव्याचा समांतर प्रवाह समांतरच वहावत गेला. त्याने आपली बाजु जितकी तिच्याकडे वळवत नेली तेव्हढीच तिने विरुध्द दिशेलाच वळवत नेली. नदिच्य दोन किनार्यांप्रमाणे वहात गेले ते. एकरुप होणारा बिंदु गाठणे अशक्यच झाले होते. हे असे वहाणे जास्तच त्रासदायक होऊ लागले. आणि मग दोघांनीही आपापला वेगवेगळा प्रवास सुरू केला..... वेगवेगळ्या दिशांनी.... ही समांतर कोंडी फ़ोडुन, अगदी कायदेशिरपणे, स्नेहाच्या हट्टाने...... आता फ़क्त तिच्या आठवणींची सोबत होती त्याच्या सुन्या जिवनाला...... मध्यरात्र झाली तरीही त्याला झोप येत नव्हती आज. त्याची नजर उशिकडे, तिच्या बेडवरील रिकाम्या जागेकडे गेली. आज त्याला फ़ारच अस्वस्थ वाटत होते. उगिचच जुन्या आठवणी यायला लागल्या. तशी त्याने मुद्दामच तिकडे पाठ फ़िरवली. दुसर्या कुशिवर वळत, आठवणींना मनाबाहेर ढकलत झोपायचा प्रयत्न करू लागला. पण छे! आज आठवणींनी छळायचेच ठरवले होते जणू. मग मात्र तो सरळ उठला आणि बाल्कनित येऊन उभा राहिला. बाहेर बराच काळोख होता. परंतु मंद मंद वार्याने त्याला बरे वाटले. काही फ़्लॅट्स मधुन अजुनही टी व्ही चे आवाज येत होते. त्याच्या शेजारील फ़्लॅटमधेही लाईट जळत होती. काही दिवसांपूर्वीच तिथे एक जोडपे रहायला आले होते. पण तो फ़ारसा कुणात मिसळत नसे,त्यामुळे कोण आलं? कोण गेलं? याकडे तो फ़ारसा लक्ष देत नसे. काही वेळाने शेजारच्या फ़्लॅटमधुन " यु बा...... " ओरडल्याचे आणि धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज त्याच्या कानावर आला. क्रमश:
|
Chetnaa
| |
| Saturday, September 01, 2007 - 3:53 am: |
| 
|
कदाचित काही प्रोब्लेम असावा, या विचाराने तो सावध झाला. सर्वांपासुन अलिप्त असला तरी संकट समयी मदत करायला तो सर्वात पुढे असे. त्याने शेजारी जाऊन बेल वाजवली. दार उघडले. दारात एक देखणी तरुणी उभी होती. त्रासिक नजरेने त्याच्याकडे पहात ती म्हणाली, " येस? " " मी तुमच्या घरातुन ओरडण्याचे व काहीतरी पडण्याचे आवाज ऐकले.... मला वाटलं.... तुम्हाला काही मदतीची गरज.... " " नो थॅंक्स. " म्हणत ती दार लाऊ लागली. " काही गरज भासलिच तर मी शेजारीच रहातो..... " तिने फ़क्त एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि धाडकन दार लाऊन घेतले. तो विस्मय करत मुकाट्याने घरात आला. हे म्हणजे जर चक्रमपणाच वाटला त्याला. ती बरीच डिस्टर्बही वाटत होती. तिच्या वागण्याचं कोडं काही उलगडत नव्हतं त्याला. पण तिलाच मदतीची गरज नाही तर आपल्याला काय? असा विचार करत, खांदे उडवतच तो परत बाल्कनित येऊन उभा राहिला. शेजारच्या फ़्लॅटमधुन अस्पष्ट बडबडण्याचा आवाज येतच होता. त्याने दुर्लक्ष केलं तरी त्याची उत्सुकता मात्र चाळवली होती. तेवढ्यात फ़ोनची रिंग वाजल्याचा व तिच्या बोलण्याचा अस्पष्ट आवाज त्याला ऐकु आला. परंतु नंतर मात्र तिचा तारस्वरातला आवाज त्याला ऐकु येऊ लागला. " तू असं करू शकत नाहीस... " " ..................................... " " तू का असा मला छळतोस? " "...................................... " " तू माझं आयुष्य बरबाद केलंस. यु बास.... " "......................................." " तू आत्त्ताच्या आत्ता घरी आला नाहीस तर मी जीव देईन, सांगुन ठेवते... " खाडकन फ़ोन ठेवल्याचा आणि तिच्या शिव्यांच्या भडीमाराचा आवाज त्याच्या कानावर आला. आता मात्र त्याची उस्तुकता चांगलीच ताणली गेली होती. तिची बाल्कनी त्याच्या बाल्कनीला अगदी लागुनच होती. तो सहज डोकवला. त्याची दृष्टी तिच्यावर पडली आणि तो हादरला...... क्रमश:
|
Itgirl
| |
| Saturday, September 01, 2007 - 3:56 am: |
| 
|
चेतना छान झाली आहे सुरुवात लवकर पूर्ण कर आता कथा
|
Chetnaa
| |
| Saturday, September 01, 2007 - 8:07 am: |
| 
|
तिच्या हातात चाकु होता आणि त्याकडे पहात हातवारे करत तिचं रागारागात बडबडणं सुरु होतं. तिची जिव देण्याची धमकी त्याने ऐकली होतीच. तिला आवडले नसते तरी काही हालचाल करणं त्याचं कर्तव्यच होतं. तो सरळ तिच्या बाल्कनित उतरला. व तिच्या समोर जाउन उभा राहिला. ती हाताची नस कापण्याच्या तयारीतच होती. त्याला असं समोर पहाताच ती चमकली. त्याचा फ़ायदा घेत त्याने पटकन चाकु काढुन घेतला. ती अगदी हिंस्त्रपणे त्याच्यवर चालुन आली... " धिस इस नन ऑफ़ युर बिजिनेस... मरायचंय मला... " म्हणत तिने त्याच्यावरच हल्ला चढवला. चाकु बाजुला फ़ेकत त्याने तिचे दोन्ही हात पकडले तशी ती त्याला चावु लागली. त्याने एकदम एका हाताने तिला भिंतीशी दाबले व दुसरा हात तिच्या गळ्यावर थोडासा दाबत म्हणाला, " तुला मरायचंय ना? चल मी मारतो तुला.... रक्ताचा एक थेंबही न सांडता अगदी आरामात मरशील...." त्याने मुद्दामच गळ्यावरचा दाब वाढवला. तसे तिचे डोळे भीतीने विस्फ़ारले... तिच्या आत्महत्येचा क्षण मावळल्याची खात्री होताच त्याने तिला सोडले. गळ्यावर हात ठेऊन घुसमटत्या आवाजात ती ओरडली... " गेट आऊट ऑफ़ हियर... " " ओके, रिलॅक्स! मी जाणारच आहे. पण त्याआधी मला शब्द दे की परत असा खेळ करणार नाहीस म्हणुन? " " तुला असा शब्द मी का द्यावा? कोण लागतोस तू माझा? " " जे तुझे 'कोणी' लागतात त्यांच्याच मुळे आत्ता हा निर्णय घेतला होतास ना? मग आता तुझा कुणिही लागत नाही त्या माझ्यासाठी शब्द देऊन बघायला काय हरकत आहे? किंवा फ़ारतर मला मित्र समज. " " मित्र! माय फ़ूट. " " मग शत्रू समज. माझी काहीच हरकत नाही. पण मला तुझ्याकडुन शब्द हवाय. " " आणि नाही दिला तर? " " मग तुझं ' कुणितरी' येईपर्यंत मला इथेच बसावं लागेल तुझ्यावर लक्ष द्यायला. " आरामात कोचावर बसत तो म्हणाला. " अच्छा? मी मेले काय नि जगले काय? तुला काय फ़रक पडतोय? " " फ़रक काहीच नाही पडत. पण तुझ्यासारख्या सुंदर, हुशार तरुणीनं असं आयुष्य संपवणं पटत नाही मला. शिवाय, इतकी छान शेजारीं गमवणं यात तोटाच नाही का माझा? " क्रमश्:
|
Chetnaa
| |
| Saturday, September 01, 2007 - 8:28 am: |
| 
|
" पण आपली तर साधी ओळखही नाहिये. मग तू माझ्यासाठी हे सर्व का करतोहेस? " "हरकत नाही! " नाटकीपणे तिच्यासमोर हात पुढे करत तो म्हणाला, " हाय! मी निरंजन. तुम्हाला भेटुन आनंद झाला, पण जर वेगळ्या सिच्युएशन मधे भेटलो असतो तर जास्त आनंद झाला असता. " आता मात्र तिला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं. तिच्या नजरेतले वेगळे भाव त्याने मात्र ताबडतोब टिपले व तो मनातल्या मनात रिलॅक्स झाला. ती म्हणाली, " तू फ़ारच विचित्र व आगाऊ आहेस! " " थॅंक्स, मला एक सोडुन दोन दिन पदव्या बहाल केल्या बद्दल. पण आपलं ओळखसत्र अर्धवटच राहिलय. माझा हात बिचारा ताटकळुन दुखायला लागलाय... " हसतच त्याचा हात हाती घेत ती पण नाटकीपणे म्हणाली, " हाय! मी मीता. तुला भेटुन आधी नव्हता झाला, पण आता मात्र आनंद होतोय. " " वॉव! आपली ओळख तर झाली. आता शत्रुचे मित्र झालो तर कसे? ' " ओके! नो प्रॉब्लेम. " "मग मला आता शब्द दे की परत असं नाही करणार. " " हुं, पण एका अटीवर... मला परत असं डिस्टर्ब वाटेल तेव्हा माझा मित्र यायला हवा आजच्या सारखा. " " अर्थात! अच्छा, गूड नाईट. मी चलतो. " " हे काय? मैत्री झाल्या झाल्या पळ काढतोहेस? सेलिब्रेशन नाही करणार? फ़ॉर युर काईंड इन्फ़ॉर्मेशन.... मी कॉफ़ी छान बनवते. " " अच्छा! तो हो जाये. " " एक काम कर ना! तुही किचन मधेच ये. आपण गप्पा मारु एकिकडे.. मला खुप बोलावंसं वाटतय तुझ्याशी.... " मात्र आता पर्यंत ते दोघेच असल्याचे भान आले होते निरंजनला. तो जरा घुटमळतच म्हणाला, " मिता, कुणी या वेळी आपल्या दोघांनाच पाहिलं तर.... तुझ्या घरचे.... मी जातोच कसा... " त्याला थांबवत ती म्हणाली, " मला पर्वा नाही. तू माझा मित्र आहेस. आणि तुझ्या बरोबरच माझा माझ्यावरही विश्वास आहे. प्लिज रिलॅक्स. " क्रमश्:
|
Itgirl
| |
| Saturday, September 01, 2007 - 10:07 am: |
| 
|
...तुझ्या बरोबरच माझा माझ्यावरही विश्वास आहे...... चेतना, खूप आवडले हे वाक्य
|
Aktta
| |
| Saturday, September 01, 2007 - 10:36 am: |
| 
|
आय्ला तु पन कथा लिहितेस... आनि मुख्य मंजे चांगली लीहीतेस..... सही जा रैली है चेत्स एकटा...
|
Ajjuka
| |
| Saturday, September 01, 2007 - 3:03 pm: |
| 
|
काय छान फ्लो आहे!! लवकर पूर्ण कर.
|
Daad
| |
| Sunday, September 02, 2007 - 1:43 am: |
| 
|
अज्जुकाला मोदक! कसला मस्तं फ़्लो आहे, चेतना.
|
Chetnaa
| |
| Sunday, September 02, 2007 - 5:06 am: |
| 
|
ते कॉफ़ीचे घुटके घेत बसले होते. तिने थोडे घुटमळतच विचारले. " मी अशी का वागले, ते नाही विचारणार? " " काय संबंध? तू जे करत होतीस त्यापासुन तुला परावृत्त करणं हे माझं कर्तव्य होतं. ते मी केलं आणि तसही कुणाच्या खाजगी बाबींमधे लक्ष घालणं नाही आवडत मला." "परंतु मलाच तुला माझ्या वैयक्तीक बाबी सांगाव्याश्या वाटत असतील तर?" "तेवढा विश्वास तू माझ्यावर दाखवलास तर मी सदैव तुझा विश्वास सांभाळण्याचा प्रयत्न करीन. शिवाय ते सांगुन तुला काही फ़ायदा होणार असेल,तुझी घुसमट थांबणार असेल तरच सांग. नाहीतर फ़र्गेट इट." " जगात तुझ्यासारखी चांगली माणसंही असतात तर? माझा तर सर्वांवरचा विश्वासच उडालाय. पण आज तुला भेटल्यावर परत ठेवावासा वाटतोय. निदान तुझ्यावर तर नक्किच. तू खुप वेगळा आहेस. " "आणि तुही. खरं सांगु? तू इतकी चटकन रुळावर येशिल असं वाटलं नव्हतं तुझा तेव्हाचा अवतार पाहुन. " " तुझ्याइतकं अधिकाराने रुळावर आणणारं भेटलंही नव्हतं आतापर्यंत. कुणी,तेही इतक्या नि:स्वार्थीपणे. " थोडावेळ ती गप्प बसली.मग शब्दांची जुळवाजुळव करीत म्हणाली, "मी फ़ार दु:खी आहे. " " सर्वांनाच काही ना काही दु:ख असतात मिता. "
|
Chetnaa
| |
| Sunday, September 02, 2007 - 5:36 am: |
| 
|
" पण माझं दु:ख इतरांपेक्षा निराळं आहे निरंजन. ते सहन करण्यापलिकडे आहे. " " मिता, प्रत्येकालाच आपलं दु:ख तसंच वाटत असतं. प्रत्येकाच्या दु:खाची जातकुळी वेगवेगळी असली तरी त्यातली तिव्रता आणि असह्यता मात्र सारखीच असते. तू तुझ्या दु;खानं घाबरुन गेलीस म्हणुन तुला त्याची तिव्रता जास्त जाणवली. दु:ख कमी जास्त नसतात, तुमच्या मनाची सहन करण्याची क्षमता कमी जास्त असते. सहन करण्याचे तुझे प्रयत्न कमी पडले म्हणुन तू पळवाट स्विकारलीस मरणाची. तू पूर्णपणे निगेटिव्ह विचार केलास. " ' आणि माझ्या जागी तू असतास तर? तू काय केलं असतंस? " " मी? मी दुसरेकडॅ मन गुंतवण्याचा प्रयत्न केला असता आणि या दु:खालाच नशिबाचं एक देणं समजुन त्याचाच आत्मबळ वाढवण्यासाठी, एखाद्या रामबाण औषधासारखा उपयोग करुन घेतला असता. " " बोलणं खुपच सोपं आहे निरंजन. "
|
Chetnaa
| |
| Sunday, September 02, 2007 - 5:45 am: |
| 
|
"खरंय, आणि वागायला खुपच कठीण. पण सोप्या गोष्टी तर सर्वच करतात. आपण थोड्या वेगळ्या, कठीण गोष्टी करुन बघायला काय हरकत आहे? " ' मला का नाही याप्रमाणे विचार करता येत? मी का अशी खचुन जाते? " " जमेल, एकदा का तू त्या दृष्टीने पॉझिटीव्हली विचार करु लागलीस की सर्व काही सोपं वाटायला लागेल. " " ए! तू कसा असा विचार करु शकतोस? तू कुठुन शिकलास? " " परिस्थीती सर्वात चांगली गुरु असते बघ. ती सर्व काही शिकवते आपल्याला. " " मलाही तुझ्यासारखं व्हायला आवडेल." "अच्चा! तशीही आपली मैत्री झालीच आहे. वाण नाहीतर गुण नक्किच लागणार." ती तिची हकिकत त्याला सांगु लागली.
|
Princess
| |
| Sunday, September 02, 2007 - 7:14 am: |
| 
|
चेतना, too good मजा येतेय वाचायला. भरभर लिही. आम्ही वाचतोय.
|
Itgirl
| |
| Sunday, September 02, 2007 - 10:35 am: |
| 
|
छान ग बयो पुढचे भाग पण असेच पटपट टाक
|
Aashu29
| |
| Sunday, September 02, 2007 - 12:43 pm: |
| 
|
मस्तच जमलिये आता पर्यंत!!
|
Chetnaa
| |
| Sunday, September 02, 2007 - 4:18 pm: |
| 
|
थॅंक्स.... आयटी, दाद, अज्जुका, एकट्या, प्रिन्सेस, आशु... लवकरच पूर्ण करते.... सर्वर ने साथ दिली तर उद्याच....
|
Runi
| |
| Sunday, September 02, 2007 - 4:23 pm: |
| 
|
चेतना प्लिज प्लिज लवकर पुर्ण कर. इतका मस्त फ़्लो आहे कथेचा. अज्जिबात खंड पडु देवु नकोस.
|
Daad
| |
| Sunday, September 02, 2007 - 10:38 pm: |
| 
|
सर्वर की ऐशी तैशी.... चेतना, लवकर, लवकर येऊदे. उत्कंठा वाढतेय.
|
Sneha21
| |
| Monday, September 03, 2007 - 3:46 am: |
| 
|
चेतना प्लिज लवकर लिहा..मजा येतिये
|
Chetnaa
| |
| Monday, September 03, 2007 - 4:02 am: |
| 
|
लग्नाआधी तिचे एका मुलावर प्रेम होते. परंतु घरच्यांच्या मर्जी खातर तिने इथे लग्न केले होते. मागचे सर्व विसरुन ती नविन संसारात रममाण झाली. नवर्याला सर्वतोपरी सहकार्य केले. परंतु तिचा नवरा मात्र फ़्लर्ट होता. लग्नाची नवी नवलाई संपली आणि परत त्याचे बाहेरचे उद्योग सुरु झाले. तिने त्याला आपल्या प्रेमाने जिंकण्याचा खुप प्रयत्न केला. आपल्या स्त्रीत्वाचा होणारा अपमान गिळुन ती त्याला सुधारण्याचा प्रयत्न करत होती. त्याला बायकांच्या कंपनीत ड्रींक घ्यायला आवडतं म्हणुन तिच त्याला कंपनी देऊ लागली. त्याला घरात ठेवण्याचे तिने सर्व प्रयत्न करून पाहीले.तिला कुठल्याही परिस्थीत आपला संसार टिकवायचा होता. आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार होती कारण... कारण.... तिच्या लहानपणीच तिच्या आई बाबांचा घटस्फ़ोट झाल्याने तिचं बालपण पार होरपळुन गेलं होतं. घटस्फ़ोटाबद्दल तिच्या मनात फ़ारच चीड होती. शिवाय तिच्या आईचं एकटेपण पहाणारी ती आता एकटेपणाला फ़ारच घाबरत होती.
|
|
|