|
Princess
| |
| Thursday, August 30, 2007 - 6:47 am: |
| 
|
आज पूनम उर्फ psg ची मोकळीक कथा वाचली आणि डोळ्यासमोर श्रुतीचा चेहरा तरळला. श्रुती आणि मी हनिमूनच्या काळातल्या मैत्रिणी. केसरी बरोबर हनिमूनला आलेल्या चाळीस कपल्स पैकी श्रुती आणि देव एक. देवच्या मानाने रुपात थोडी डावी असली तरी तिच्या चेहऱ्यात एक निराळाच गोडवा होता. केसरीच्या एका खेळात आम्हाला कळले की आमचे लग्न एकाच दिवशी एकाच मुहुर्तावर झालय. त्या खेळानंतर बऱ्याचदा गप्पात आम्हाला जाणवायचे की आमच्या आवडी निवडी पण सारख्याच आहेत. मग काय, हळुहळू आमची छान गट्टी जमली. एकत्र फिरणे, जेवणे गप्पा करणे. दिवस कसे संपलेत ते कळलच नाही. अकरा दिवसांचा हनिमून संपवुन मुंबईला परत आल्यानंतर अधुन मधुन आमचे फोनवर बोलणेही होत असे. जळगावसारख्या अतिशय थंड (सुस्त म्हणायचेय मला) गावातून आलेली असल्यामुळे मुंबईची जीवन शैली मला खुपच त्रासदायक वाटायची. बऱ्याचदा श्रुतीला मी ते बोलूनही दाखवायची आणि मग ती मला समजावायची "अग होईल सवय हळुहळू. नौकरी कर मग तुला खुप मज्जा वाटेल." श्रुती एका डायमंड कंपनीत रिसेप्शनिस्ट होती. तिचा नवरा देव एका छोट्या सॉफ्टवेअर कंपनीत प्रोग्रामर. त्यादिवशी मला मरीन लाईन्सला एका इंटरव्ह्यु साठी जायचे होते. श्रुतीला फोन करून मी भेटीबद्दल विचारले. तीही मला भेटायला खुप उत्सुक होती. मला म्हणाली तू ये मग मी बॉसला विचारुन दोन तास ऑफ घेते. खुप गप्पा करुया. गप्पा करताना नवीन लग्न झालेल्या दोन मुली एकमेकीना जे प्रश्न विचारणार तिकडे आमच्या गप्पांची गाडी वळली आणि श्रुतीचा चेहरा एकदम बदलला. डोळे भरुन आलेत. अश्रु थांबवण्याच्या प्रयत्नात चेहराही एकदम केविलवाणा दिसत होता. मला तर तिला विचारावे की नको असा प्रश्न पडला एकतर आमची मैत्री अगदीच नवी नवी. शिवाय इतका खाजगी विषय... उगाच खोलात शिरायला नको म्हणुन मग मीही गप्प बसुन तिच्याकडे एक गुपचुप एक नजर टाकली. थोडावेळ सांगु की नको अशा संभ्रमात मग तिने स्वत:च बोलायला सुरुवात केली. त्यादिवशी तिने जे सांगितले ते आठवले की आजही अंगावर काटा येतो. देव एकुलता एक मुलगा. ठाण्यात आईवडिलांचा एक बेडरुमचा फ्लॅट. देवचे लग्न होईपर्यंत बेडरूम मध्ये त्याचे आई वडिल झोपत आणि देव हॉलमध्ये. लग्न झाल्यावर (एका बेडरूमच्या घरात) अलिखित नियमाने बेडरूम खरे तर देवलाच मिळायला हवी आणि त्यानेही ते ग्रुहीत धरले होते. पण लग्न झाल्या दिवसापासून एकदाही ते बेडरूम मध्ये झोपु शकले नव्हते. हनिमून वरुन परत आल्यावर रात्री देवने बेडरूम मध्ये जाण्यासाठी पाऊल टाकले तर त्याच्या आईने त्याला सांगितले की "तुम्ही दोघे हॉलमध्येच झोपा. आता या वयात आम्हाला जागा बदल झाली तर झोप येणार नाही." श्रुतीला तर यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हते. पण तरीही श्रुती आणि देव दरवाजा नसलेल्या हॉलमध्ये जाऊन झोपले. देव झोपला दिवाण वर आणि श्रुती जमिनीवर गादी टाकुन. त्या रात्री दोघानाही झोप आलीच नाही. श्रुती रात्रभर रडत होती आणि देव छताकडे पाहुन नक्की काय घडले याचा विचार करत होता. असे दोन तीन दिवस गेल्यावर मग मात्र श्रुतीला देवचा राग आला. जे काही झाले त्यानंतर आई वडिलाना समजावणे त्याचेच काम होते. श्रुतीने ठरवुन टाकले की आता देवला स्पर्श करु द्यायचा नाही. हॉलला दरवाजा नसल्यामुळे देवलाही श्रुतीशी जवळीक करता येत नव्हती. लग्नाला २ महिनेही झालेले नसताना अशा भयानक मानसिक स्थितीला त्या दोघाना सामोरे जावे लागत होते. हा असा प्रकार ऐकल्यावर मी एकदम हतबुद्धच झाले. सल्ला तरी काय देणार. पण मग तरीही माझ्या परीने मी तिला थोडे समजावुन घरी परतली. नवऱ्याला सांगु नको असे वचन श्रुतीने माझ्याकडुन घेतल्यामुळे देवशी या विषयावर बोलण्याचा मार्गच खुंटला. असेच सहा महिने गेलेत. आम्ही आपापल्या आयुष्यात मग्न झालोत. फोन वर बोलणे तर व्हायचे पण पुन्हा तो विषय आमच्या बोलण्या कधीही आला नाही. एक दिवस मात्र श्रुतीचा मला "भेटायला लगेच ये" असा फोन आला. तिच्याकडे असलेली "गुड न्युज" तिला माझ्याशी शेअर करायची होती. माझा आश्चर्यचकित चेहरा पाहुन तीच म्हणाली "अग आम्ही दोघानी नवीन मार्ग शोधला. आता आम्ही अर्धी रात्र किचन मध्ये झोपतो." लोकल मधुन घरी परत येताना मला सारखे वाटत होते "एकुलता एक मुलगा... त्याच्या सांसारिक सुखात अडथळा करणारे त्याचेच आई वडिल आणि तरीही हसत मुखाने सहन करणारी बिचारी सून. तक्रार करायचीच नाही का तिने... किंवा मग तिच्या नवऱ्याने. शारिरीक सुख हा इतका खाजगी विषय असतो का की आपण आपल्या आई वडिलाना पण सांगु नये. कुठेतरी किचनमधल्या टीचभर जागेत घाईघाईने उरकलेल्या शारिरीक जवळिकीला शरीर सुख तरी कसे म्हणावे? आणि वरकडी म्हणजे मनाविरुद्ध सहन करुन तरीही आम्हाला हे पटत नाही, हे ही दाखवु नये. आई वडिलाना आपल्या लेकरांच्या सुखासाठी थोडीही तडजोड करणे, एवढे का खुपावे?" खुप प्रश्न पण सगळे अनुत्तरीत. विचार करुन मला वाटायचे डोके फुटुन जाईल. पण मग हळुहळू मी ही ते सगळे विसरली. श्रुतीच्या बाळाला हॉस्पिटल मध्ये बघायला गेली तर जवळपास कुणी नाही असे बघुन ती हळुच म्हणाले "जरा नाकाजवळ घेउन बघ बरे, माझ्या बाळाला फोडणीचा तर वास येत नाहीयेना." आणि आम्ही दोघी दिलखुलास हसलो.
|
Princess
| |
| Thursday, August 30, 2007 - 6:54 am: |
| 
|
ललित असले तरी नाव बदलली आहेत. तुम्ही जर श्रुती आणि देव नावाच्या कोणाला ओळखत असाल तर लगेच त्याना सहानुभुती प्रदर्शित करु नये
|
Manjud
| |
| Thursday, August 30, 2007 - 9:03 am: |
| 
|
पूनम, छानच गं.!!!! ललित आवडलं. विषय नाजूक आहे पण आजकाल खरंच ही एक समस्या बनत चालली आहे.
|
पुनम, अगदी व्यवस्थितपणे विषय मांडलास तु... पआण असां अनुभव माझ्या एका मैत्रिणीने पण घेतला आहे. आईवडीलच समजत नाहीत आपल्या मुलांच्याबद्दल तर मग कसं होणार देवच जाणे???? त्यांचे घर आहे छोटेसे १ रुम किचन त्यात किचनलाही दरवाजा नाही. त्यात त्याची बहिणही with her 1 year old child & her husband तिथे महिन्यातले १५ दिवस येउन रहाते, मग त्यांनी संसार करायच तरी कसा???? वरुन आईवडीलांची एक "अपेक्षा" कि त्यांना आत्ता एक नातु हवा आहे. हा म्हणजे एकदम कळसच आहे. कित्ति म्हणुन त्या बिचार्या मुलीने सहन करायचे... this irritates me a lot & feel very pity 4 her
|
Ajjuka
| |
| Thursday, August 30, 2007 - 11:11 am: |
| 
|
चांगलं मांडलंयस गं. खरंच खूप नाजूक विषय आहे.
|
Zakasrao
| |
| Thursday, August 30, 2007 - 11:22 am: |
| 
|
प्रिन्सेस खुप छान लिहिल आहेस. शेवटचे वाक्य मला तर बिलकुल जोकिंग मधे नाही घेता आले. त्या मैत्रिणिला मानल पाहिजे जिची विनोद बुद्धी शाबुत राहिली. खरच अस का वागतात लोक?? रुप्स ने जे लिहिलय ते तर खरच कळस आहे. एवढ होउनही त्याना नातवाची मात्र घाई. हा तर मला फ़क्त समोरच्याला irritate करण्याचा प्रकार वाटतो फ़क्त.
|
Princess
| |
| Thursday, August 30, 2007 - 11:36 am: |
| 
|
धन्यवाद मंजुडी, रुप्स, अज्जुका आणि झकास. झकास ते वाक्य मीच टाकलय... माझ्या मनाने. विनोद बुद्धी आणि दिलखुलास हसणे दूरच ती तर स्मितहास्य पण विसरली होती बिचारी. रुप्स, खरच काय विचित्र लोक असतात ना
|
Zelam
| |
| Thursday, August 30, 2007 - 6:50 pm: |
| 
|
पूनम चांगलं मांडलयस. खरंच काय लोक असतात गं!
|
Runi
| |
| Thursday, August 30, 2007 - 10:48 pm: |
| 
|
चांगले लिहीलयस पुनम. जागेच्या अडचणीमुळे काय काय प्रश्नांना तोंड देतात लोक. खरच धक्कादायक आहे हे. मला यावरुन माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीची आठवण झाली. ती मैत्रीण तिचे लग्न झालेले अजुन २ दिर आणि सासु-सासर्यांसोबत २ BHK मध्ये रहायची. तिने मला सांगीतले होते त्यातली १ बेडरुम तिच्या सासु सासर्यांसाठी होती म्हणे आणि उरलेल्या एका बेडरुम मध्ये प्रत्येक couple चा झोपायचा वार ठरलेला होता. तेव्हा ते ऐकुन मला इतका धक्का बसला होता. त्या मैत्रीणीला तेव्हा काय सांगावे हे पण मला कळले नाही.
|
Manuswini
| |
| Thursday, August 30, 2007 - 11:54 pm: |
| 
|
ह्याच्यावरून मला आठवले माझी एक collegue भैया होती जी तिच्या सासरी भरपूर शिकलेली अशी मुलगी, ज्यांचे घर मुंबईला पुढे मसाल्याचे दुकान नी मागे फक्त दोन रूम असे चर्नीरोडला होते. मारवाडी family इतकी कर्मठ पण ह्या collegue चा त्यातल्या कष्ट काढून शिकलेला नवरा आणि त्याच्या प्रेमात पडून लग्न केले आणि नंतरचा तीला मुंबईत झालेला त्रास एकून मी गार एकदम. तीन जोडपी. सासु सासरे, ही दोघे, लहाण नंणद, तीचा दीर नी त्याची बायको. कधी ही दोघे मसाल्याच्या दुकानात ज्यात मोठ्याने बोलले तर एकु जाईल अश्या भींती लागून. तर दुसरे जोडपे माळ्यावर नी खाली सासु,सासरे जे अजूनही active होते म्हणजे तीन जोडपे आळीपाळीने kitchen ,दुकानाचा भाग, वरचा माळा मग नंणद शेजारी चक्क झोपायची per their needs . तीला US ला Job मिळाला तेव्हा दोघे भांडून इथे आली. तेव्हा US मध्ये मधील privacy बघून खूप म्हणे छान वाटले होते. मुंबईत आमचा इस्त्रीवाला भैया कडे असाच काहीसा scene होता पण त्यांना मुले मात्र भरपूर असायची, सगळ्या जोडप्यांना. ,आता कळले तेव्हा आश्चर्य वाटते कसे काय करतात ते.
|
Mankya
| |
| Friday, August 31, 2007 - 1:45 am: |
| 
|
प्रिन्सेस .. मस्त लिहिलस ! Hats off to your friend !! शेवटच्या वाक्याबद्दल झकासला मोदक ! जे समोर आल आहे त्याला बदलू शकत नसेल तर त्याला पूर्णपणे स्विकारावं, वैतागून काही उपयोग होत नाही; त्रास मात्र नक्किच होतो वैतागल्याने अन तोही फक्त आपल्यालाच पर्यायाने जोडिदाराला ! त्या मुलीचा समजुतदारपणा खरच कौतुकास्पद ! माणिक !
|
Bee
| |
| Friday, August 31, 2007 - 5:51 am: |
| 
|
मला ही कथा अधिक practical वाटली, शेवट तर एकदमच खो खो करून हसवणारा केला आहे त्यामुळे सगळे गांभिर्य दूर पळाले असेच असावे मनुष्याने, कुणीनाकुणी तरी तडजोड करून पहावी. आणि वरकडी म्हणजे मनाविरुद्ध सहन करुन तरीही आम्हाला हे पटत नाही, हे ही दाखवु नये.>> प्रिन्सेस, इथे वरकडी म्हणजे काय? मला वाटले किचन मधे झोपून वरतून कडी लावून घ्यावी
|
Princess
| |
| Friday, August 31, 2007 - 10:36 am: |
| 
|
धन्यवाद झेलम, रुनि, मनु, माणिक आणि बी. मनु त्यांच्या बाळाना मसाल्याचा वास नक्कीच येत असणार बी
|
Bee
| |
| Friday, August 31, 2007 - 11:10 am: |
| 
|
मी एक लिहायचे विसरूनच गेलो. तो 'अर्धी रात्र' सोबत घालवण्याचा विनोद आणि कथेचा शेवट दोन्ही मला GD च्या कथेचे feelings देऊन गेलेत.
|
so nice story dear!!! Agdi satya mandle ahes tu. Aplya lokana kadhi akkal yeil dont knw.
|
|
|