|
Sayuri
| |
| Wednesday, August 08, 2007 - 11:35 pm: |
| 
|
चिमा्ने जन्म दिलेल्या दोन छाव्यांमुळे अगदी नवजात अर्भक ते पूर्ण वाढलेलं मांजर इथपर्यंतचा प्रवास आम्हाला खूप जवळून पाहता आला, अनुभवता आला. चिमाला मोजून दोनच पिल्ले झाल्याने त्यांना सांभाळणं तसंही अवघड नव्हतंच. (तेव्हा आम्ही पहिल्या मजल्यावर रहायचो. पण मांजरं बाळगण्याच्या दृष्टीने तळमजला असलेला सर्वात योग्य असं मला कायम वाटतं). 'इवली' या शब्दाला सर्वात समर्पक असं उदाहरण म्हणजे मांजरीची नवजात पिल्लं! खरोखर इतके छोटे जीव असतात ते! डोळेही मिटलेली ती नाजूक त्वचेची, चिमणीपेक्षा बारीक आवाजात म्यावम्याव करणारी नाजूक बाळें पाहून यांचेच पुढे इरसाल बोके किंवा लबाड मांजरी होतील असं अजिबात वाटत नाही! आमच्याकडचे हे दोन चिरंजीव रंगारुपात जवळपास सारखे होते, काळे-पांढरे. सिनेमात कसा जुळ्या भावांमध्ये तीळ किंवा जन्मखूण असा एकच फरकाचा मुद्दा असतो तसा यांच्यातही एक फरक होता. त्यापैकी एकाच्या कपाळावर, डोळ्यांच्या मधोमध चांगला मोठ्या टिकलीएव्हढा काळा ठिपका होता. त्यामुळे आम्ही ठेवलेल्या नावाव्यतिरिक्त 'टिकलीवाला' हे विशेष बिरुद त्याला माझ्या आजोबांकडून मिळालं होतं. पुढे मोठं झाल्यावर दोघांचे स्वभाव, आवाज इतके भिन्न झाले की बोलून सोय नाही. या दोन सख्ख्या भावांचं नाव आम्ही 'चंगू मंगू' ठेवलं. कपाळावर टिकली असलेला मंगू आणि दुसरा चंगू. जन्मत:च मांजरांचे डोळे मिटलेले असतात. अर्थात नंतर ते उघडतात पण तेव्हा ते गडद काळेच दिसतात. छोटे काळे मणी जणू. मोठे होऊ लागतात तसतसा त्यातला घारा अंश दिसू लागतो. या नवजात बालकांना हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद मिळालेली असल्याने त्यांचं निरीक्षण करण्याव्यतिरिक्त फारसं काही करता यायचं नाही. तसंही या वयातील पिल्लांशी फारसं खेळताही येत नाही हेही खरंच कारण अजून तितकी मोठी ती झालेली नसतात. पण ही जोडी मोठी होऊ लागली तशी लुटुलुटु चालूही लागली. दिसेल तो पदार्थ हुंगुन खाण्यालायक आहे का ही सवय लागण्याचा हाच तो काळ. दुडदुडत त्यांनी त्यांच्या संचाराचा परीघ आधी टोपलीतच, टोपलीच्या बाहेरील परीसर, मग पूर्ण गॅलरी आणि मग पुढे अगदी घरभर असा क्रमाक्रमाने वाढवत नेला. या वयातली पिल्लं निरागस मुलांसारखी निर्व्याज आणि अबोध वाटतात. मोठेपणातले बिलंदर भाव चेहेर् ०दयावर उगवायला अजून बराच अवकाश असतो ना!
सर्वत्र संचारी चंगूमंगूच्या लटक्या मारामार् ०दया, पळापळी आणि लुटुपुटीची भांडणं वगैरे पाहून एकाऐवजी घरात दोन समवयीन मांजरे असल्याची मजा काही औरच असल्याचा साक्षात्कार झाला. तसंही एकच मांजर असलं तरी ते आपल्याशी किंवा आपण त्याच्याशी कसंही खेळू शकत असल्याने मजा ही येतेच पण दोन मांजरं असली तर आपण स्वत:ही खेळाडू बनण्यापेक्षा निरीक्षकाची भूमिकाच हळूहळू आपल्या अंगवळणी पडत जाते. कारण बहुतेक वेळेस दोन पिल्लं आपापसातच खेळत असतात. आपण एखादा खेळ सुरु करुन द्यायला निमित्त होतो इतकंच. पुढे फक्त ती गंमत अनुभवायची. पण एकमेकांशी खेळून पोट भरलं की कधीकधी दोघं गुपचूप चोरपावलांनी मोर्चा आमच्याकडेही वळवायचे. वर्तमानपत्र पूर्णपणे जमिनीवर अंथरुन वाचायची सवय मला बराच काळ होती. मग आता ही वाचतेय तर आपल्याकडे लक्ष वेधून कसं घ्यायचं याची चांगली क्लृप्ती त्यांनी शोधून काढली होती. चंगूमहाराज सरळ मी वाचत असलेल्या बातमीवरच येऊन बसायचे! तसंच अभ्यास करायला चटई घालून बसलं की अभ्यास कसा न होईल या दृष्टिने अथक परिश्रम ही जोडगोळी करायची. लिहित असले तर हलणार् ०दया पेन्सिलीवर डावल्याच मार, दप्तर जरा उघडं दिसलं की त्यात घूस, कंपासपेटीत तोंड घाल एक ना दोन! दोघे जसजसे मोठे होत गेले तसतसा त्यांच्या आवाजात, अंगलटीत आणि स्वभावातदेखील फरक पडत गेला. चंगूचा आवाज तर काय सांगू! त्याच्या आवाजाने "चि. चंगू हल्ली दुपारी वरचेवर शेजारच्या बोक्याशी उंच स्वरात बोलत असल्याने आमच्या बाळूचा अभ्यासात अडथळा निर्माण होतो. बाळूचे सध्या दहावीचे वर्ष असल्याने या गोष्टीची त्वरीत दखल घ्यावी" अशाप्रकारच्या चिठ्या मिळतायत की काय अशी भिती वाटायला लागली. कारण चि. चंगूचा आवाज कर्कश्य, घोगरा, चिरका, फाटलेला की काय म्हणतात तसल्या प्रकारांत मोडायचा. पण त्याला हे कळलं होतं की काय माहित पण जरुरीशिवाय त्याने कधी आपला आवाज ऐकवला नाही. त्यामुळे सुदैवाने चिठ्याही आल्या नाहीत. पण एक आवाज सोडल्यास चंगू हे एक सडपातळ, हुशार, चपळ आणि स्मार्ट मांजर होते. अगदी त्याच्या भावाविरुद्ध. मंगू म्हणजे 'बोकोबा' कॅटेगरीला साजेशी अशी गुबगुबीत अंगलट असणारे, अत्यंत मऊ केसांचे एक संथ, निवांत आणि आळशी मांजर होते. आणि आवज तर इतका मंजुळ की 'टॉम एन्ड जेरी' मधल्या टॉमची गर्लफ्रेंड असलेल्या त्या शुभ्र मनीच्या डबिंगसाठी त्याचा आवाज वापरला असता तरी चाललं असतं. ('मांजरी' असती तर 'मंजुळा'च नाव ठेवलं असतं मी ) कसलीही घाई नाही, गडबड नाही, एकदम सुस्त कारभार! कदाचित "ही माणसं आपल्याला दोन वेळचं खायला द्यायला काही चुकायची नाहीत, मग कशाला करा खाद्य शोधायची खिटखिट, रहावं की निवांत" असा विचार नक्कीच मंगू करतही असेल. स्वत:हून चंगूच्या खोड्या काढायला जाणार नाही पण दोघांची एकदा सुरुवात झाली की मात्र मागे रहायचा नाही. त्याचे केस कमालीचे मुलायम आणि खूप दाट होते आणि त्या हिशेबाने त्याची शेपटीसुद्धा चांगली जाड दिसायची. त्यामुळे एकमेकांशी मारामारी करताना मंगूने अंग आणि शेपटी फुलवली की त्या दर्शनाने चंगूची पाचावर धारण बसत असे आणि मग चंगू पुढे, मंगू मागे अशी धावाधाव घरभर चालून त्याचा शेवट पलंगावरील गादीवरची चादर विस्कटण्यात होत असे. चादरी, गाद्या, उशा म्हणजे तर मांजरांचे अतिशय आवडते प्रांत! दररोज रात्री झोपण्यापूर्वी गादीवर चादर घालण्यासाठी ती उघडून गादीवर पसरण्याच्या दृष्टीने अंथरायला लागले की टुणकन उडी मारुन कुठुनतरी एकजण चादरीखाली घुसणार आणि दुसरा मुद्दाम बाहेर राहून चादरीत दिसणार् ०दया त्या उंचवट्यावर पंजे मारणार. रोज हाच खेळ न चुकता न कंटाळता होत असे. शेवटी दोघांना खोलीबाहेर काढून गादी घालेपर्यंत मी दरवाजा लाऊन घेत असे. यावर दोघंही दाराबाहेर घुटमळत पंजे मारत, म्याव म्याव करत आपली नाराजी व्यक्त करायचे.
मंग्याची एक अतिशय प्यारी गोष्ट म्हणजे आईची एक जुनी साडी होती गुलाबी रंगाची. का कुणास ठाऊक पण ती त्याला भारी आवडायची. अगदी चेंडूशी खेळण्यापेक्षाही ती जुनी साडी अंथरली तर त्या घोळात जाऊन चंगूशी लढायला त्याला आवडायचं. बर् ०दयाचदा मित्राने घेऊ नये म्हणून त्याच्यापासून एखादं खेळणं कसं मूल सुरक्षितपणे लपवतं तसंच ती साडी तोंडात धरुन चंगूपासून काळजीपूर्वक दूर नेताना मी त्याला पाहिलंय. या साडीमुळे मंग्याची एकदा विचित्र परिस्थितीतून सुटकाही झालेली आहे. खिडक्यांच्या चौकटीबाहेर एक वीतभर रुंदीचा असा दगडी कठडा आमच्याकडे होता. पुढचे-मागचे पाय मुड्पून एखादं मांजर बसू शकेल अश्या प्रकारचा. आजही असे कठडा किंवा कट्टा असलेल्या घरांत मांजर असेल तर बर् ०दयाचदां ते तिथेच बसलेलं आढळून येईल. चिमण्या, कावळे, खारीबिरींवर चोरटी नजर ठेवायला फारच सोयिस्कर अशी ती जागा असल्याने चंगूमंगू बर् ०दयाचदां तिथे जाऊन बसायचे. मंगूला एकदा त्या ठिकाणी झोप लागली. मग झोपेत हातपाय ताणले की काय केलं कुणास ठाऊक, पण साहेब खालच्या मजल्यावरच्या बिर् ०दहाडाच्या खिडकीवरील सिमेंटच्या स्लॅबवर पडले. बरं ही गोष्ट आहे माझ्या आजीच्या घरातली जी दुसर् ०दया मजल्यावर रहायची. म्हणजे मंगू आता पहिल्या मजल्याच्या स्लॅबवर होता. वर येणं अशक्य आणि पहिल्या मजल्यावरुन खाली उडी मारणेही कठीण अशा अवस्थेत मंग्या असताना कुणाला तरी सुचलं की ती साडी वरुन स्लॅबपर्यंत सोडल्यास त्याला धरुन साहेब वर येतील आणि तसंच झालं. मग अगदी थेट हिंदी सिनेमाप्रमाणे साडी गजांना वगैरे बांधून तिचं दुसरं टोक स्लॅबवर सोडलं आणि आमचे हे हिरो तिला धरुन वर आले आणि बराच वेळ नंतर घाबरुन कुठेतरी लपूनही बसले होते. गंमत म्हणजे अगदी हाच प्रकार चंगूच्या बाबतीतही घडला होता! लहान असताना घरी यायचं असलं म्हणजे आम्ही कोणी शाळेतून वगैरे घरी येताना दिसलो की आमच्याबरोबर येणं दोघं पसंत करायचे. नंतर मोठे होऊ लागल्यावर ही सवय मोडून दोघं स्वतंत्रपणे ये-जा करु लागले. तेव्हा दरवाजापाशी येऊन म्याव म्याव करुन दरवाजा उघडण्याबद्दल सुचविलं जायचं. पण अलिकडे एक गोष्ट लक्षात आली होती. ती म्हणजे कडी वाजत असे आणि दार उघडून पाहिलं तर फक्त मंगू दिसे. आधी वाटायचं कोणी त्याला दरवाजाबाहेर उभं पाहून कडी वाजवून देऊन निघून जात असेल. पण असं वारंवार होतंय म्हटल्यावर खात्री करुन घ्यायचं ठरवलं. एकदा मंगू घरी परतत असताना मी गुपचूप त्याच्यामागोमाग जाऊन लपून पाहिलं. साहेब दोन पायांवर उभे राहिले आणि पुढ्च्या पंजाने कडी वाजवली! हे त्याला कोणीच शिकवलं नव्हतं. खरं तर माझा हात तेव्हा बेलपर्यंत पोचत नसल्याने मीच नेहेमी कडी वाजवत असे. आणि मंग्याने हे बहुतेक पाहून ठेवलं होतं. कसं का असेना, हे कडी वाजवणं पाहून मी खूष झाले. मग काय, त्या संध्याकाळी मंगूचा कौतुकसमारंभ! पण या कडी वाजवण्याच्या सवयीने पुढे एकदा आम्ही सर्व घराबाहेर असताना घराला आतून कडी लावण्याचा प्रतापही घडला होता! दोघांच्या बालपणाचा काळ भुरकन उडूनही गेला. मोठे झाल्यावर आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकून दोघांनी आपापलं विश्व शोधलं आणि त्या स्वराज्यात ते रमूनही गेले. आमच्या बिल्डींगच्या मोकळ्या आवारात गवतात लोळणारे चंगू-मंगू हळूहळू दिसेनासे झाले. पुढेमागे ते दोघं कुठे दिसले असते आणि त्या घार् ०दया डोळ्यांत ओळख दिसायचीच असेल तर ती चंगूच्या डोळ्यात दिसेल असं आपलं मला वाटायचं कारण दोघांमध्ये त्याला जरा माझ्याबद्दल 'काहीतरी' भावना होत्या हे मला जाणवायचं. मांजरं स्वार्थी, मतलबी असतात हे खरंच आहे पण त्यांना नावं ठेवायला मनुष्यप्राणी स्वत: नि:स्वार्थी कुठेय? मुक्या प्राण्यांच्या वावराने आपल्याला आनंद मिळतो म्हणूनच बर् ०दयाचदां कुत्रेमांजरी पाळली जातात. कुत्रा घराची राखण करतो म्हणून पाळला जातो...पोपटाचा हिरवागार रंग नजरेस सुखावतो म्हणून तो घरांत पिंजर् ०दयात आढळतो...रंगीबेरंगी मासे दिवाणखान्याची शोभा वाढवतात तर मांजरांच्या चित्तवेधक हालचाली एखादं पिल्लू बाळगायला कारणीभूत ठरतात. म्हणजे शेवटी याच्यामागे आपलाही एक हेतू दडलेला असतोच. मग त्यांच्याकडून अपेक्षा ती काय करायची? की आपल्या या सहेतुक सांभाळण्याचा, खाऊपिऊ घालण्याचा मोबदला म्हणून त्यांनी आयुष्यभर तुम्हाला सोबत करावी? त्यांनाही त्यांचं जग खुणावत असेलच की. त्यामुळेच चिमा, चंगूमंगू यांनी मोठेपणी स्वतंत्र विश्व शोधलं तेव्हा त्यानंतर मला काही दिवस चुकल्याचुकल्यासारखं जरुर वाटलं पण वाईट वाटून त्यांचा राग कधीच आला नाही! यथावकाश आमचंही शालेय जीवन, कॉलेजही संपून आम्ही नोकरीव्यवसायात अडकलो. कालांतराने आमच्या दुमजली सोसायटीचं रुपांतर सातमजली टॉवरमध्ये झालं आणि पहिल्या मजल्यावरुन आम्ही चौथ्या मजल्यावर रहायला आलो. आता मांजर पाळणं शक्यच नव्हतं आणि आता तर याही गोष्टीला बराच काळ लोटलाय. एकेकाळी मांजर सतत आसपास घुटमळण्याची सवय असलेल्या आमच्या घराला मांजरं नसण्याचीही सवय झालीय... आताशा युट्युबसदृश्य संकेतस्थळावर पाळीव कुत्र्यामांजरांच्या करामतींच्या हजारो फिल्म्स उपलब्ध आहेत. ते पाहून चंगूमंगू आणि आधीच्या मांजरांचं चित्रिकरण केलं असतं तर एक मुव्ही सहज झाली असती असं आता वाटतं. पण तेव्हा त्यासाठी लागणारी आयुधंही नव्हती त्यामुळे तसं काहीच केलं गेलं नाही पण तेही एका दृष्टीने बरंच झालं. नाहीतर चंगूमंगूचे एकमेकांच्या खोड्या काढण्याचे प्रसंग कॅमे ०द्र् ०दयाच्या डोळ्यात बंदिस्त करता करता माझ्या डोळ्य़ात साठवायचे राहूनच गेले असते! आजही ते टवटवीत क्षण लख्ख आठवतात आणि मन उल्हसित करुन, खूप हसवून जातात. त्यांची छायाचित्रं, चलचित्रं नसल्याची खंत आता अजिबात नाही कारण त्यांच्या अवखळ मूर्ती मनात कायमच्या ठसल्या आहेत. समाप्त.
|
Monakshi
| |
| Thursday, August 09, 2007 - 6:02 am: |
| 
|
सयुरी खूप छान, मस्त वर्णन केलं आहेस अगदी.
|
Zelam
| |
| Thursday, August 09, 2007 - 12:19 pm: |
| 
|
सयुरी तिन्ही भाग अप्रतीम झाले आहेत.
|
Malavika
| |
| Thursday, August 09, 2007 - 4:46 pm: |
| 
|
सायुरी, तीनही भाग खूप छान आहेत. मला मांजर फार आवडत नाहीत. पण आता तुझे लेख वाचल्यानंतर कदाचित एखादे पाळीनही!
|
Bsk
| |
| Thursday, August 09, 2007 - 5:31 pm: |
| 
|
तुझा लेख वाचून मांजर पाळायची जबरी इच्छा झाली आहे... तिन्ही लेख खुपच मस्त! आणि हो, चित्रं पण! फारच क्युट!!
|
Daad
| |
| Friday, August 10, 2007 - 4:00 am: |
| 
|
फारच छान लिहिलयस, सायुरी
|
सायुरी, छान वर्णन! तिन्ही भाग खुपच वाचनीय. माऊताईबोकोबा पुढे उभे रहातात.
|
Princess
| |
| Friday, August 10, 2007 - 4:04 pm: |
| 
|
सायुरी, मस्त लिहिलय ग. मनीमाऊ मला आवडते पण कधी पाळली नाही. माझ्या बाळाला मात्र माऊचे पिल्लु हवय. आता विचार करतेय एक आणुन द्यावे.
|
Runi
| |
| Friday, August 10, 2007 - 8:06 pm: |
| 
|
सायुरी, माऊचे तिन्ही भाग एकदम वाचले. छान केलयस वर्णन. मला कुत्रा, मांजरीशी खेळायला आवडते पण पाळायला मात्र फारसे नाही. आता वाटायला लागलय की पाळुनही बघायला पाहिजे.
|
Disha013
| |
| Friday, August 10, 2007 - 8:38 pm: |
| 
|
मस्तच जमलयं.फ़ोटोही अगदी क्युट आहे!
|
Upas
| |
| Friday, August 10, 2007 - 9:49 pm: |
| 
|
तिनही लेख आवडले.. आमच्या मांजरीचं नाव ताईने ठेवलं होतं मुंटा.. बराच काळ होती.. चाळ असल्याने मुक्त संचार अगदी.. जशी आली तशी एक दिवस अचानक नाहीशी झाली.. अगदी शी काढण्यापासून, बाळंतपणापासून पुष्कळ किएलं तिचं.. कित्येकांच्या शिव्या खाल्ल्या पण जीव लावला तिच्यावर.. आणि उंदरांचा चोख बंदोबस्त झाला बराच काळ तिच्या मुळे... ती गेली आणि अचानक एक दिवस बोका आला घरात.. त्याचं नाव ठेवलं लठ्ठ्या.. अतिशय आळशी.. म्हणजे उंदीर पकडण्यात सुद्धा.. मूड असेल तर दिलेलं खाईल नाहीतर बघणार सुद्धा नाही तुमच्याकडे.. मला मात्र खूप आवडायचा.. अगदी राजेशाही झोपायचा.. त्याला बघूनच समोरच्याला भीती.. सगळं आठवलं एकदम.. मांजराना बरोबर कळतं.. पोटात दुखत असेल ना किंवा बरं नसेल तर दुर्वा घेउन यायचं कुठुनतरी.. आणि खात बसायचं.. खूप छान लिहिलयस.. :-)
|
Ksmita
| |
| Friday, August 10, 2007 - 9:55 pm: |
| 
|
sayuri, तीनही लेख सहज , सुंदर लिहिलेत पाळीव प्राण्यांची मला विशेष आवड नाही पण लेख वाचून छान वाटले . माऊ बद्दल प्रेम असणारी अगदी घरचाच सदस्य असल्यासारखे वागणारे बरेच लोक मी जवळून पाहीले आहेत .
|
छान लिहिल हे तपशीलवार! (जुन्या आठवणी जाग्या झाल्या)
|
Sayuri
| |
| Saturday, August 11, 2007 - 4:44 pm: |
| 
|
सगळ्यांना धन्यवाद. उपास, हो हो दूर्वा ना मलापण आठवलं. झोपलेल्या मांजराजवळ दूर्वांची जुडी नुसती नेली तरी खडबडून जागं होईल
|
सायुरी मस्त जमलेत तिन्ही लेख. अगदी refreshing! मांजरं छान आहेतच पण तुझी लिहायची शैली अगदी रसाळ आहे. >> प्रसंग कॅमे ०द्र् ०दयाच्या डोळ्यात बंदिस्त करता करता माझ्या डोळ्य़ात साठवायचे राहूनच गेले असते! क्या बात है!
|
|
|