|
Tukaram
| |
| Saturday, August 04, 2007 - 5:44 am: |
|
|
एक संभाषण... " गुड मॉर्निंग " " गुड मॉर्निंग " " तुला भेटल्याशिवाय माझा दिवस चालुच होत नाही. " " हाच डायलॉग बायकोला मारलास तर ती किती खुश होइल ? " " माहित नाही. पण बहुदा तिला खरं वाटणार नाही. " " माझाही दिवस तु भेटल्यावरंच चालु होतो म्हणलं " " माझी बायको मला असं म्हणाली तर.... " " तुझा विश्वास नाही बसणार..... पण तीची आणि माझी तुलना करु नकोस.. " " का? राग आला? " " हो. कारण तीची आणि माझी तुलनाच होऊ शकत नाही. मी कितीतरी सरस आहे " " चल... काहीतरीच बोलु नकोस.." " खरंच.. तु मला भेटण्यासाठी किती उत्सुक असतोस? आणि माझ्याबरोबर असतोस तेंव्हा किती खुश असतोस..." " हो.. पण त्याचा अर्थ असा नाही की...." " पाहीलंय मी तुम्हा दोघांना एकत्र. किती वेळा भांडत असता." " पण नवरा बायको मधे भांडणं होतातच कधीकधी " " आपण एवढा वेळ एकत्र काढतो, आपली नाही होत भांडणं?..... तीची आणि माझी तुलनाच होऊ शकत नाही " " आम्ही एंजॉय पण करतो म्हणलं " " हो पण तेंव्हा सुध्दा तुला माझी आठवण येते ना? खरं सांग " " हो येते..." " ऑफिसमधे एवढा वेळ एकत्र काढुनपण, संध्याकाळी काम आहे सांगुन आपण भेटतो ?" "हो..." " तुझी बायको बाहेर गेली की माझ्याबरोबर असण्याची संधी तु कधिच सोडत नाहीस.......बरोबर??" " बरोबर..." " एकदा ती माहेरी गेली होती तेंव्हा आपण काय मजा केली एकत्र?? " " आठवतंय सगळं मला.." " काही वेळा तर रात्री ती झोपल्यावर तीच्या नकळत भेटलो आपण..." "हो.." "माझ्याबरोबर जेवढा मोकळा आणि रिलॅक्स असतोस तेवढा तीच्याबरोबर नक्कीच नसतोस. " " अं.... अं...." " म्हणुनच,.... तीची आणि माझी तुलनाच होऊ शकत नाही. " " पटलं मला... सॉरी...मी असा विचार काधिच केला नव्हता." " Thank God तुला पटलं ते " " का ? " " कारण आता तुला माझा निर्णय पण पटेल.... " "कसला निर्णय ? " " आपल्या दोघात लक्श्मणरेखा आखण्याचा " " म्हणजे ? " " मी तुला ऑफिस नंतर कधिच भेटणार नाही... फार कमी.. " " का ?? " " कारण माझ्याबरोबर आनंदी राहण्यासाठी तु तीच्याबरोबर खुश असणे जरुरी आहे . " " आहे?? " " हो... तुलाही पटेल हळुहळु.... " " जमेल तुला?... मला भेटण्यापासुन थांबवायला ? " " हो.... आणि तु जर माझं ऐकलं नाहीस तर मी स्वतला hang करुन घेइन. " "अरे पण... " " जा.... बोल तिच्याशी " " आत्ता ? " " हो... आत्ताच... " " बंर थॅंक्स.... बाय..." ......... "अगं ऐकलंस का? चल, आज मस्त ब्रेकफास्ट करतो मी तुझ्यासाठी आणि संध्याकाळी बागेत फिरायला जात जाउ आजपासुन आपण " मी माझा "...LAPTOP..." बंद करत म्हणालो.... माझ्याकडुन फमिलीकडे जा सांगणा-या लॅपटॉपचे कवतुक जेवढे करावे तेवढे थोडेच..... समाप्त
|
अमोल, छान आहे संवाद
|
T_pritam
| |
| Sunday, August 05, 2007 - 5:54 am: |
|
|
एकदम सही आहे... मस्तच
|
Chetnaa
| |
| Sunday, August 05, 2007 - 7:29 am: |
|
|
अमोल.. एकदम जम्या.. आणि पट्या पण... या हितगुज वर हितगुज करताना पण सर्व जग विसरायला होत बघ..
|
Meggi
| |
| Sunday, August 05, 2007 - 9:11 am: |
|
|
मस्त.. हा हा हा
|
छान जमलीय. लिहीत रहा.
|
Atul
| |
| Monday, August 06, 2007 - 6:14 am: |
|
|
अमोल, मस्तच... लगे रहो!
|
Swa_26
| |
| Monday, August 06, 2007 - 9:29 am: |
|
|
अमोल, खुपच छान लिहिलय. वाचता वाचता शेवट कधी आला कळलेच नाहि!! मस्तच
|
Tukaram
| |
| Monday, August 06, 2007 - 6:54 pm: |
|
|
सर्वांना, धन्यवाद.... ..... .... अमोल.
|
Disha013
| |
| Monday, August 06, 2007 - 7:30 pm: |
|
|
हीहीही,अमोल,सही लिहीलय......ष ह्भ ह्ह ह
|
Aktta
| |
| Monday, August 06, 2007 - 9:03 pm: |
|
|
झकास यार.... मज्जा.... एकटा....
|
अमोल, सही रे सही......... एकदम आवडेश!!!!!!!!!!!!!
|
Pancha
| |
| Tuesday, August 07, 2007 - 8:50 pm: |
|
|
Nice ... ... ...
|
Tukaram
| |
| Wednesday, August 08, 2007 - 6:02 am: |
|
|
धन्यवाद.. दिशा, धुमशान, पंचा, एकटा...
|
Sneha21
| |
| Friday, August 10, 2007 - 9:49 am: |
|
|
तुकाराम....आपन खरच असा मस्त सन्वाद लिहिलाअय ना...मला तर आमचि LAPTOP वरुन होनारी भन्द्न आठ्वलि UR GREAT
|
Sneha21
| |
| Friday, August 10, 2007 - 9:50 am: |
|
|
i mean bhandana athwali sorry...
|
|
|