Tukaram
| |
| Friday, August 03, 2007 - 12:03 am: |
|
|
" अहो चहा तसाच राहिला?" " अरे हो कि… आज जरा गडबडित आहे हा सुनील ना.. स्वतः नीट जगणार नाहि आणि दुस-याला पण नीट जगु देणार नाही. " " काय केल आता त्यांनी? " " रात्रभर झोप नाही मला.. काही गोष्टी मनात नुसता गोंधळ घालत होत्या" " ते तुमचं रोजचंच आहे.. काहितरी आठवंत बसता आणि माग झोप लागत नाही.. एकदा झोपेचि वेळ गेली कि मग आहे पहाटेपर्यंत चुळबुळ " " सोड ते.. जरा चहा दे बरं इकडे, दारातच पितो " अरुण सरपोतदार. घरी बाबा तर बाहेर सर्वांचे मास्तर. मास्तर हे नाव पोस्ट मास्टरची नोकरी ४० वर्ष केल्यामुळे मागे लगलेलं. रिटायर होउन १ वर्ष झालयं आणि नवीन विना-धावपळीच्या जीवनची आजुनहि पूर्ण सवय होतीय. सकाळची पूजा, चालणे, मित्रांच्या भेटी आणि संध्यकाळचा कट्टा ह्यात रिटायर्ड आयुष्य संथ गतिने उमलत आहे. सुनील काणे, हा ४० वर्षांपासूनचा मित्र. मित्र, फमिली डॉक्टर, सल्लागार आणि वादाचा प्रतिस्पर्धी. आठवड्यातुन ३-४ वेळा भेट झाल्याशिवाय दोघांनाही करमत नाहि. पण भेटले की वाद सुरु. बाकी मास्टरांची सगळी कडे एक अनुभवी, शांत आणि विचारी माणुस म्हणुन ख्याति आहे. कधी कुणावर रागवणार नाहि कि आवाज चढवुन बोलणार नाहीत. कुणाला दुखावणे त्यांना काधि जमलेच नाही. लोकांनी त्यांचा फायदा घेताला तरी त्यांना त्याचे कधिच काहि वाटले नाही. डॉ. सुनीलशी बोलताना मात्र त्यांचा रंग थोडा वेगळा असयचा. मैत्रिच तशी होति त्यांची. " एवढं काय घाइचं काम आहे आज सुनीलकाकांकडे? " रुपाली ने विचारले. मास्तरांना २ अपत्य. सुमीत आणि शेंडेफळ रुपाली. सुमीत सॉफ्टवेअर कंपनीमधे मनेजर आहे तर बाईसाहेब आजुन कॉलेज मधे रमल्यात. " काहि नाहि ग. सुमीत गेला का ऑफिसला? काधि येतो आणि कधि जातो तेच काळत नाही " पिशवी हातात घेत मास्तर म्हणाले. " बाबा….. आजोबांच्या फोटोला नमस्कार न करताच निघालात? " " ३८ वर्षात असं कधी झालंय का? .. येतो मी ".. मास्तर फोटोला नमस्कार करुन घराबाहेर पडले. " नमस्कार " बाजुचा चहावाला हात हालवत होता. " बारा वाजता २ पाठवुन द्या डॉक्टरांकडे " मास्तरांनी त्याच्या नमस्काराचे उत्तर दिले. रोजचा १० मिनिटांचा रस्ता पण आज एवढा लांब का वाटत होता कुणास ठावुक?. झर झर चालंत मास्तर क्लिनिक कम ऑफिस कम घराची मागची रुम माधे पोचले. " या ".. सुनीलचा ओळखिचा आवाज. " झोपला नसशीलच? " " तुझ्या नादि लागलेला कोणता माणुस झोपु शकला का कधी? " मास्तरांनी पाहिली सलामि दिली. " तयारीनिशी आला आहेस ना? " " हो. काय काय गोष्टी तुला कायमच्या द्यायच्या ते ठरवले आहे. …... हेच का ते का नाही??.. वगैरे विचारुन डोक्याला त्रास देवु नकोस. मिळतंय त्यात आनंद मान. " " बरं बरं….. चल आत, बघु काय काय देतो आहेस मला ते? " "आणि मला नंतर परत हवे असेल तर? " " माहिन्याभरापर्यंत परत करीन्…पुढचा भरवसा नाही " " ठिक आहे " " ये आत मधे " डॉ सुनीलनी मिलिटरी स्टाइलमधे रुम कडे बोट दाखवुन सांगितले. क्रमश्:
|
Tukaram
| |
| Friday, August 03, 2007 - 12:06 am: |
|
|
पहिल्यांदा थ्रेड चालु केला. त्यामुळे पोस्ट करायला वेळ लागला.
|
Itgirl
| |
| Friday, August 03, 2007 - 1:50 am: |
|
|
अमोल, मजा केली छान केलीय सुरुवात, पुढचे भाग कधी?
|
Tukaram
| |
| Friday, August 03, 2007 - 3:45 am: |
|
|
लवकरच पोस्टीन .... ....
|
R_joshi
| |
| Friday, August 03, 2007 - 4:22 am: |
|
|
अमोल छान लिहित आहेस... पुढचे भाग विनाविलंब टाक शक्य असल्यास पोस्ट सलग टाक म्हणजे वाचनातहि सलगता येईल हि एक विनंती आहे.
|
Tukaram
| |
| Sunday, August 05, 2007 - 1:14 am: |
|
|
.................. २५ दिवसांनंतर " काय वहिनी आज अर्जंट भेटायला बोलावलत ? " डॉ. सुनीलनी चहाचा घोट घेत विचारलं. " हो. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी " "बोला" "ह्यांच्याविषयी काही बोलायचं होतं तुमच्याशी. " " अरुण?? काय झालं त्याला? मला तर आजकाल झोप छान लागते म्हणुन खुश होउन सांगत असतो. " " हो... हो.. बरं झालं बाई त्यांचा झोपेचा प्रश्न मिटला एकदाचा " "बर मग? " तुम्ही त्यांचे जवळचे मित्र आणि घरचेच एक असल्यामुळे फक्त तुमच्याशी बोलतेय " वहिनी डोळ्याला पदर लावंत म्हणाल्या. " काळजी करु नका. निश्चिंत मनाने सांगा" " हल्ली ह्यांच्या स्वभावात खुप फरक पडलाय हो. सारखे चिडचिड करतात. केंव्हा काय म्हणतील ह्याचा भरवसा नाही. कुठल्या कुठल्या जुन्या गोष्टी आठवतात आणि त्यावरुन सगळं घर डोक्यावर घेतात. माझं काय? मी सगळं सहन करीन पण मुलांचं तसं नाही. सुमीततर कुठेतरी दुस-या शहरात जॉब करीन म्हणतोय. ईथे आता राहु शकणार नाही म्हणाला. " " अरेच्च्या एकदम काय झालं सुमीतला? बाप लेक चांगले मित्रासारखे वागंत होते एकमेकाशी. ? " " नजर लागली कुणाचीतरी दुसरं काय... इतक्या चांगल्या स्वभावाचा माणूस असा अचानक कसा काय बदलु शकतो?" " मला नीट सांगा काय काय झालं ते..." " पंधरा दिवसा पूर्वीची गोष्ट..." वहीनींच्या डोळ्यासमोर प्रसंग तसाच्या तसा उभा राहिला... ...................... सकाळची वेळ. मास्तर काही कामानिमित्त बाहेर निघाले होते. "अहो... स्वेटर घालुन जा. आज अचानक थंडी पडलीय. " " आयुष्यभर तु सांगतेस तेच करायचं का मी? माझ्या मनाचा कधी विचार होतो का ह्या घरात? " " अहो साधं स्वेटरचं सांगितलं मी एवढं चिडायला काय झालं? " " काही नाही झालं का ही नाही. माझा जन्म तुझ्याकारणी लागला ह्यात समाधान मानायला हवे ना मी? लग्नापासून सर्व काही माझ्या इच्छेविरुध्द झालं तरी मी चिडायला नकोच नाही का? तेंव्हाच बाबांना सांगयला हवं होतं कि तुझ्याशी लग्न नाही करायचं मला म्हणून. चूक झाली. आयुष्य व्यर्थ गेल्यासारखं वाटतंय. निघुन जातो आता मी ह्या घरातुन " वहीनींचा हुंदका त्यांच्या कानापर्यंत पोचला नाही. " बग दे ग माझी रुपाली." मास्तर गरंजले. आणि निघाले. " बाबा फोटोला नमस्कार राहिला...." रुपाली घाबरंत हळु अवाजात म्हणाली. " देव नाहीत ते रोज पाया पडायला. आज्ञा आणि अन्न्याय ह्या शीवाय काय दिलं त्यांनी मला? हा फोटो इकडुन काढुन टाकला पाहिजे. " तरातरा जात त्यांनी दरवाजा जोरात आपटला. .................... " तुम्हीच सांगा भाउजी ह्यांचा असा अवतार तुम्ही कधी पाहीला आहे का? " " नाही... " डॉक्टर विचारत पडंले... " आणि सुमीतचं काय? " तुम्हाला तर माहित आहेच की खुप वर्षांपुर्वी सुमीत काही महीने नको त्या गोष्टिंच्या व्यसनात होता. पण किती सुधारला तो नंतर मेहनत करुन इंजिनीअर झाला, आता तर छान नोकरी करतो आणि एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे आम्ही सर्वजण त्या दिवसांना विसरलो होतो " " कठिण काळ होता तो. आणि सुमीतची रिकव्हरी कौतुकास्पदंच आहे. मी त्याचं उदाहरण सगळ्यांना देतो. " "हो. पण हे परवा त्याला ऍडिक्ट म्हणाले. आणि माझ्या तोंडाला काळं फासलंस म्हणाले. तो विषय ह्या घरात काढण्याची काही गरंज आहे का? सांगा तुम्हीच. " " नाही...पण.... आश्चर्य आहे कि गोष्टि आठवायला कशा काय लागल्या ? " डॉक्टर स्वतशीच बोलंत होते. " म्हणजे? " " काही नाही. तुम्ही काळजी करु नका. मी लगेच बोलतो त्याच्याशी. सगळं नीट होईल " "तुमचं ऐकतील ते असं वाटलं म्हणून तुमच्याशी बोलले. त्यांना सांगु नका नाहितर रागवतील ते " "मी काळजी घेइन. ... येतो मी." डॉक्टर घाइघाइत निघुन गेले. क्रमश
|
Chetnaa
| |
| Sunday, August 05, 2007 - 2:15 am: |
|
|
अमोल छान उत्सुकता ठेवली आहेस.. आता येऊ दे पुढचे भाग पटापट... आजचा रविवार लाव सत्कारणी
|
Rameshdd
| |
| Sunday, August 05, 2007 - 7:51 am: |
|
|
अमोल छान लिहीतोस असाच लिहीत रहा... कल्पना
|
उत्कंठावर्धक गोष्ट! तुकाराम ( ID ) चांगला आहे पुढचा भाग केव्हा?
|
उत्सुकता छान वाढतेय..... लवकर पुढील भाग कळू देत..... कल्पना
|
Manogat
| |
| Friday, August 10, 2007 - 4:32 am: |
|
|
अरे पुढे काय झाल, लवकर post करा..
|
Aashu29
| |
| Friday, August 10, 2007 - 8:10 am: |
|
|
kaay he? 4 tarkhepasun post nahi keliye katha!! pudhe kadhi janar
|
Tukaram
| |
| Friday, August 10, 2007 - 6:28 pm: |
|
|
"ये.. काय म्हणतोस. ४-५ दिवस कुठे गायब झालस..?" डॉक्टर मास्तरांना हसत हसत म्हणाले. "अरे बरीच कामे होती.. वेळच मिळाला नाही बघ.. आज हिने १० वेळा सांगितलं.. मग आलो.. म्हणलं तुझं काहितरी महत्वाचं काम असणार. " "काही नाही रे.. तुझ्याशी सहज बोलायचं होतं" "बोल.." "कसं वाटतंय तुला आज काल मागे झोप न येण्याची कंप्लेंट होती कय झालं त्याचं?" "झोप छान येतेय.. गेले १५-२० दिवस तर खूपंच छान पण २-३ दिवस झाले परत तोच त्रास चालु झालाय… " "बरं बरं… काय होतय नक्कि…?" "काहितरी जुन्या गोष्टि आठवुन मन उदास होतंय " "म्हणजे?" "तुला तर माहितंच आहे मझ्या लग्नाच्या वेळची गडबड आणि सुमीत चा प्रॉब्लेम.. तेच विषय डोक्यात घोळतात.." "बंर मला वाटतं कि तु मला महिन्याभरापुर्वि दिलेल्या गोष्टि घेवुन जा.." "मी तुला काय दिलंय? मला तर काही आठवंत नाही.." "का....ऽ य? तुला आठवंत नाही? … " "असं एकदम ओरडतोस कशाला?" "काहि नही.. मला वाटतं मी तुला चेक करायला पाहिजे आणि मल तुझा काही वेळ दे… २-३ तास…" "उद्या?" "चालेल. मी तयारीला लागतो…" "कसल्या?" "अं...काही नाही तु ये उद्या.." मास्तर निघुन गेले आणि डॉक्टर कितीतरी वेळ विचार करत खुर्चित बसुन रहिले.. असं कसं शक्य आहे? त्यांचं मन विचारंत होतं.. जुन्या गोष्टि रिप्लेस होऊ शकतात? माणसाचं मन म्हणजे अद्भुत प्रकार आहे.. सर्वात पहिल्यांदा मला 'जैसे थे' परिस्थिति आणली पाहिजे मग पुढे विचार करु.. डॉक्टरांनी मनाशी काहितरी ठरवंले आणि ते उद्याच्या तयारीला लागले.. क्रमश
|
Tukaram
| |
| Friday, August 10, 2007 - 7:17 pm: |
|
|
"थोडे थकल्यासारखे वाटताय. झोपा थोडावेळ हवं तर" "नको. जरा देवळात जाउन येतो. ४ दिवसांपुर्वी सुनील नी काही औषधं दिली त्याचा हा परिणाम. पण ब-यापैकी बरं वाटतंय मला." "ठिक आहे" वहिनींनी जास्तं आग्रह केला नाही. " मी सोडु का बाबा तुम्हाला?" सुमीतनी ऑफिसला निघता निघता विचारले. " नको रे. तु जा पुढे. तुला बरिच कामं असणार. एवढा मोठा मनेजर तु. माझ्यामुळे तुझ्या कामात व्यत्यय नको आणि वेळेवर कामाला जाणे हे सर्वात महत्वाचं. आपण कालसारख्या रात्रि गप्पा मारु. जा तु." गेल्या २-३ दिवसात मास्तरांनी सुमीतबरोबर खुप गप्पा मारल्या होत्या आणि त्याला लाजवेल इतके त्याचे कौतुक केले होते. वहिनी तर सारख्या देवाचे आभार मानत होत्या. "मी पण येते." त्या मास्तरांबरोबर निघाल्या. "अहो. एक विचारु का?" " काय हुकुम आहे?" मास्तर हसत म्हणाले. " हुकुम कसला. ड़ऑ. सुनीलनी मला भेटायला बोलावलय. तुम्हाला चालायला लागुनये म्हणुन एकटीला येवुन औषधं घेउन जायला सांगितलंय. जाउ का मी देवळानंतर तिकडे.?" "काही हरकत नाही. त्याला म्हणाव एखादी चक्कर टाक जमेल तेंव्हा" "बंर, सांगेन मी." दोघांनी देवाचे दर्शन घेतले आणि ठरल्याप्रमाणे वहिनी डॉ. कडे निघाल्या. औषधाचे निमित्त सांगुन एकट्याच या असा डॉ. चा फोन आला होता. मास्तरांविषयी काहीतरी महत्वाचं बोलायचं असणार नाहीतर डॉ. असा निरोप देणार नाहीत. त्या शक्य तेवढ्या वेगात चालंत डॉ. च्या घरापाशी पोचल्या. " या....... डॉ. नी त्यांना आत बोलावले". हॉलमधे शिरताना तिकडे कुणीतरी तिथे बसलेलं आहे हे त्यांच्या लक्शात आलं. "ये आई बस..." सुमीत जागा करंत म्हणाला. क्रमश
|
अमोल, कथा खूप छान वळण घेत आहे व उत्सुकता वाढवतेय...... कल्पना
|
Rameshdd
| |
| Saturday, August 11, 2007 - 6:56 am: |
|
|
पहिल्या पासून वाचतोय... प्रसंग डोळ्यासमोर उभारताहेत...उत्सुकता तर आहेच.... आता फार ताणू नकोस....वाट पाहतो आहोत.
|
Chetnaa
| |
| Saturday, August 11, 2007 - 10:17 am: |
|
|
अमोल चान चाललीय... लवकर येऊ दे पुधची वाट पहातेय...
|
Rameshdd
| |
| Sunday, August 12, 2007 - 7:33 am: |
|
|
छान... तुकारम भाऊ... छान लिहले आहे... परत साइट ला भेट देइन
|