|
Dineshvs
| |
| Saturday, July 28, 2007 - 7:56 am: |
| 
|
स्वप्नसंवाद मोड ऑन : " भावजी, अहो भावजी, मी आल्ये " " बाई कोण तु ? कुणाची ? " " मी लक्षुमी नव्हे का, माडखोलास आपट्यांकडे दिल्ये मला. पमीची सख्खी मावसबहीण, नव्हे का मी. " " अस्सं होय. ओळख लागली नाही मला. प्रमिला गेल्यापासुन, चित्तच थार्यावर नसते हो. " " भावजी पमीचे कळल्ये म्हणुन तर बोलवायला आले. अक्षत टाकायला यायला जमले नाही. म्हंटले डोहाळेजेवणासच जाऊ, तेवढ्यात पमी गेल्याचेच कानावर पडल्ये हो. जीव राहवला नाही. " " दैववशांत असेल तेच होणार ना. होत्याचे नव्हते झाले हो एकदम ताई. " " अंगाची हळदही नव्हती उतरली हो. देव तरी कसा निष्टुर हो, म्हणत्ये मी भावजी. भरल्या ताटावरुन कोवळ्या मुलीस उचलुन नेतो तो. पिकली पानं नव्हती का त्याच्या नजरेस पडली. " " ताई असे बोलु नये. धीर धरायला हवा. अश्यानं गेलेलं माणुस का परत येणाराय ? " " अहो पण हि का वेळ होती. अहेवपणी गेली ते बरिक खरे, पण कूस उजवती तर जल्माचे सार्थक झाल्ये असते हो. " " बाळास टाकुन जाती, तर अजुनी ताप. " " ताप कश्याने हो भावजी. आम्ही होतोच की. म्हणतात ना माय मरो. जळली माझी जीभ ती, हाड म्हणुन नाही हो, माझ्या जीभेला. पमी जाताना काहि बोलली का हो. " " तेवढी उसंत मिळती तर ना. काय मनात आले नि धोशाच घेतलान, हरिहरेश्वरास जाऊ, म्हणुन. मी सांगुन पाहिले, कचेरितुन रजा मिळायची नाही, तर म्हणे देवाचे आवतण आल्ये. साहेबांस सांगा. म्हणावं जाणे गरजेचे आहे. " " वेळ आली कि असे विपरित सुचायचेच हो भावजी. " " विपरित कश्याने हो ताई ? देवदर्शनास तर जावयाचे म्हणत होती. म्हंटले जाऊ. सगळी तयारी केलीन. सर्व्हीस मोटारीने पोहोचलो. परिचीतांकडे मुक्कामास राह्यलो. रात्रीचे वेळ, म्हणुन दर्शनाचे जमले नाही. अगदी प्रातकाळी उठुन तयार झाली. म्हणाली, काकड आरतीस जाऊ. निघालो. आरती झाली. मग म्हणाली प्रदक्षिणेस जाऊ. समुद्राचे काहि ठिक लक्षण दिसत नव्हते. पुजारी पण म्हणाले, अंमळ उधाण ओसरु द्या, मग जा प्रदक्षिणेस. तर म्हणाली, आपण जाऊ. तुम्ही व्हा पुढे. तुम्ही पट्टीचे पोहणारे, मज काय भिती. " " मग पुढे ? " " मी म्हणुन पाहिले, घरच्या वेळेवर जाणे वेगळे, इथे वेगळे. पाण्याचा अदमास नाही, अनोळखी जागा. जराश्याने जाऊ. " " मग ऐकलेन का तिने ? " " ऐकती तर हे दिवस दिस्त्ये का ? म्हणाली चला हो. मी पुढे झालो. वाट अगदीच निरुंद. त्यात निसरडे. दहाबाराच पावले पुढे असेन मी. वाटेत दुसरे कुणी नाही. " " सोबतीनं जाता तर. " " सोबतीनं गेलो तर लोक शेण नाही का घालणार तोंडात. तरी अधनंअमधनं माघारी वळुन पहातच होतो हो मी. शेवटचे अवघड वळण घेतलेन. मिनिटभरात तिचा आरडाओरडा कानी आला हो. " " अग्गो बाई, मग " " तसाच माघारी वळलो, तर कुठे दृष्टीसच पडेना हो ती. आवाजही नाही. लाटांच्या अंगात तर जणु वारं भरलेवते. " " कोणास मदतीस तरी हाक द्यायची हो. " " होतेच कोण तिथे. पिश्यासारखा जागीच खिळुन राह्यलो. दुरवर खडपात तिचे पातळ दिसले, तर घेरीच येऊन पडलो. " " अग्गो बाई. " " अंमळश्यानं कुणीतरी आलं, त्यानी मला सावरले हो. नाहीतर प्रमिलेच्या मागे, मीही जायचो. " " अभद्र बोलु नये हो भावजी. " " पुढचे सगळे परिचितानीच पार पाडले. पोलिसपाटलांस सांगितले. पंचनामा केलान. अग्नि पण तिथेच दिलान हो. केवळ अस्थि घेऊन माघारी आलो हो ताई. " " दिवसकार्य व्यवस्थित पार पडलेन कि. " " ताई पिंडास कावळा शिवेना हो. शेवटी दर्भाचा कावळा केलान. " " भावजी आता पुढचा विचार करायला हवा. तरुण वय आहे. पमी गेल्यापासुन मावशीच्या डोळ्याना खळ नाही हो. जावई नव्हे, मुलागा म्हणुन बघितले हो. थोरला गेलाय संन्यास घेऊन, हिमालयात. एवढी कुळागरं, कुणी बघायची आता. आमची पमी जरा पायात अधु, तरीही जावईबापुनी करुन घेतली. आता आम्हास बोल लावतील. " " छे हो, त्यांचा काय दोष. मी बापडा अंतर देणार नाही हो त्याना. मजकडे डोंबिवलीस येऊन रहावे त्या उभयतानी. जमेल तसे बघु कुळागरांचे. मला त्याचा मोह नाही हो. " " जीवास जपुस असा हो भावजी. येत्ये मी. " Control Z Do you want to save the memory of this chat, in the mind of the subject ? NO. Are you sure, you want to delete the memory of this chat ? YES. &*&*&*&*&**&*&& Chat mode on : PR45A74 Says : Hi LX, how was the session ? LX98DF8 Says : It Was okay, but could not get any clue of the murder ? PR45A74 Says : Why are you so sure, that this guy actually pushed his wife into the sea ? LX98DF8 Says : I think so ya. Just 2 months after her death, he married to his girlfriend. PR45A74 Says : Girlfriend ? Do you mean he had a girlfriend, way back in 1954 ? LX98DF8 Says : Yeah, he had. She was working with him. Slightly averaged. And unmarried. PR45A74 Says :And was she virgin too ? LX98DF8 Says : My dear PR, she lived 150 years ago. And did not know you, I guess. PR45A74 Says : Don’t get upset. Tell me how was your experience with this yoga. Was it easy for you to enter the dream of your subject ? LX98DF8 Says : It takes lot of concentration dear. And you have to take a disguise of a person, known to your subject. Then only there is a chance, that he will open up. And yeah, he should be having a sound sleep too. PR45A74 Says : But you said, he did not open up. Or may be what you think, may not be true. LX98DF8 Says : Somehow, I feel that he is the culprit. There is no police record. I think he cooked up his story too well. He narrated to me the same. PR45A74 Says : How did you manage the slang ya ? It must be very different in those days. LX98DF8 Says : Not an issue. I had the dictionary window open on my screen. I did practice it also. With the animated face, projected in his dream. I think it worked too well. PR45A74 Says : Are you still going ahead with the subject, or want to try the next ? LX98DF8 Says : I feel damn bad for the dame, called Pamee, ya ! PR45A74 Says : you will have to enter his dream at some other time, and in some other disguise. BTW, what is the subject of your thesis ? LX98DF8 Says : It reads, A STUDY OF THE PSYCHOLOGICAL DEVELOPMENTS IN THE MINDS OF MURDERERS, WHO WERE NOT TRIED. PR45A74 Says : You need to make heavy research ya. LX98DF8 Says : Thx. now sign off. I want to begin my next session. PR45A74 Says : BYE. Chat mode off स्वप्नसंवाद मोड ऑन : " अय्या एक माणुस किनई, भलतच खुष आहे आज, बुवा. आमच्याकडे बघायलादेखील वेळ नाही म्हणे. " " अहो असं काय करता मिस बेलवलकर, रजेवर जाण्यापुर्वी एवढी सगळी कामं उरकुन द्यायची ऑर्डर आहे साहेबांची. " " ईश्य, हे मिस बेलवलकर काय म्हणता हो ? तुम्हाला कित्ती कित्ती वेळा सांगितलं कि माझं नाव शैला आहे म्हणुन. पण आम्ही कोण ? एका सेक्शनमधे काम करणारे फक्त. त्यातुन तरुण पुरुषानी, अविवाहित मुलींशी बोलायची फ़ॅशनही नाहि ना. " " अहो तसं माही मिस बेल, म्हणजे शैला, तुमच्यासारख्या सुंदर तरुणीशी बोलायला कुणाला आवडणार नाही. पण म्हंटलं तुम्हाला आवडेल कि नाही. " " अय्या, मी काय वाघोबा आहे का, मला घाबरायला. काईतर्रीच तुमचं " " अहो वाघोबा असतात तरी लोक माना टाकतील तुमच्यापुढे, आम्हाला खा म्हणुन. " " आणि हे हो काय मिस्टर वैशंपायन, शुभविवाह ठरला ते आम्हाला सांगायचं नाही का ? " " अहो ठरलाय म्हणजे तीर्थरुपानी ठरवलय. मुलगी वैगरे बघुन ठरवुन आलेत. घरजावईच करुन घेणारैत. " " अय्या घरजावई. मज्जा आहे एका माणसाची. " " छे हो मी कसला जातोय ? कोण त्या कुळागराची कामं करत बसणार ? त्यापेक्षा आहे ती नोकरी बरी. पाच दिवस काम, आणि दोन दिवस आराम. २२५ रुपये वट्ट महिना अखेरीस हातात. शिवाय दिवाळीचा बोनस आणि स्केलप्रमाणे वर्षाला इन्क्रीमेंट. " " अहो पण लक्ष घातले तर शेतीत पैसा आहे म्हणे. यापेक्षा जास्त कमवाल. आणि घरजावई करणारैत म्हणजे, मुलीला कुणी भावंड नाहीत का ? " " एक थोरला भाऊ होता म्हणे. तो संन्यास घेऊन हिमालयात गेलाय. तूम्ही म्हणता तसं लक्ष घातले तर चांगले उत्पन्न आहे, असे तात्या म्हणत होते. त्यानी आयुष्यभर भिक्षुकी केली. पिठ आहे तर मीठ नाही अशी परिस्थिती घरात नेहमी, आमच्या. कसेबसे मॅट्रिक झालो, आणि साहेबांच्या कृपेने इकडे चिकटलो म्हणुन. आम्ही मनी ऑर्डर करणार, तेंव्हा घरात चुल पेटणार. एक धाकटी बहिण आहे लग्नाची. " " अहो पण आता तर भाग्यं उजळंच कि नाही. सुट्टीत गावी जा. भरपुर पैसे कमवा, आणि घरच्या जबाबदार्या पार पाडा. " " अहो त्यासाठी किती मन मारायचं ? तात्यानी पण तोच विचार केलेला दिसतोय. " " अय्या फोटो नाही का दाखवणार आम्हाला फ़ियान्सेचा. " " अहो कसला फोटो नं कसलं काय. अगदी बावळट्ट ध्यान दिसतय. शिवाय पायात अधु आहे म्हणे. आता डोंबिवली म्हणजे अगदीच गाव नाही. चार शिकलीसवरली माणसं आहेत तिथे. आमच्या आळीत तर चार शिक्षिका राहतात. त्यांच्याकडे घेऊन जायचं, म्हणजे शुद्ध मराठी तरी बोलता यायला नको का. पण आमचं नशीबच फ़ुटकं ना. अगदी फ़ॅशनेबल नको, पन निदान तुमच्यासारखी एखादी सुस्वरुप तरी पत्नी मिळावी एवढीच अपेक्षा. " " ईश्य, माझ्यासारखी ? " Control Z Do you want to save the memory of this chat, in the mind of the subject ? NO. Are you sure, you want to delete the memory of this chat ? YES. Chat mode on : PR45A74 Says : Hi LX, how was the session ? LX98DF8 Says : It was okay. Enjoyed the role playing. PR45A74 Says : Do you still suspect him ? LX98DF8 Says : Yup. PR45A74 Says : You need to try him at some other time. say just before the thing happened. LX98DF8 Says : Ya I will, Tell me what are you working on ? PR45A74 Says : It’s interesting ya, it reads A STUDY OF THE PSYCHOLOGICAL DEVELOPMENTS IN THE MINDS OF VICTIMS OF MURDERERS, JUST BEFORE THE MURDER. LX98DF8 Says : Hey, why don’t you try my subject’s wife. Pamee ? PR45A74 Says : Not bad, fwd me the details. Chat mode off The End.
|
Ana_meera
| |
| Saturday, July 28, 2007 - 11:59 am: |
| 
|
wonderful story थोडी थोडी कळली नाही.. घाईत वाचल्यामूळे असेल. पुन्हा वाचेन पुढच्या भागाबरोबर... पुढचा भाग केव्हा?
|
Aashu29
| |
| Saturday, July 28, 2007 - 12:28 pm: |
| 
|
maja ytey aani trill pan watatey!!dineshbahy!!wegli katha distey
|
Ajjuka
| |
| Sunday, July 29, 2007 - 4:37 am: |
| 
|
हा द एन्ड कथेचा आहे की कथेतील आहे? कथेचा असेल तर झेपले नाही. कथेतील असेल तर मस्त चाललीये कथा!!
|
Dineshvs
| |
| Sunday, July 29, 2007 - 12:05 pm: |
| 
|
अरे इतक्यात कथा वाचली पण ? माझी कथा खरे तर इथेच संपली. आपल्याला खुपदा स्वप्नं पडतात. झोपेतुन उठल्यावर कधीकधी ती आठवतात तर कधी अजिबात आठवत नाहीत. आठवली तरी त्याची संगति लावता येत नाही. क्वचित कधीतरी भविष्यात घडणार्या एखाद्या गोष्टीची पूर्वसूचना आपल्याला मिळालेली असते, आणि ज्यावेळी ती घटना प्रत्यक्षात घडते, त्यावेळी हे आपण पुर्वी कधीतरी अनुभवलय, असे वाटत राहते. ( मला खात्री आहे, असा अनुभव आपल्यापैकी अनेकजणानी घेतला आहे. ) तर अशी संगति न लागणारी वा अजिबात न आठवणारी स्वप्नं म्हणजे, आपल्या नकळत आपण दिलेली झाडाझडति तर नसेल, अशी कल्पना मनात आली. आणि या कल्पनेचा विस्तार म्हणजे हि कथा. भविष्यात कधीतरी 19 काळ 19 या संकल्पनेला ओलांडुन, असे काहि साध्य करता यावे, असा माझा कयास. आता समजा असे तंत्र विकसित झालेच तर त्याला काहितरी मर्यादा असतील ( जसे इथे गाढ झोप ) अशीही माझी कल्पना, आणि जर असे काहि तंत्र विकसित झालेच, तर त्याचा आजघडीला आपल्याला अनुभव यायला हवा. तर तो अनुभव म्हणजे आपल्याला संगति न लागणारी वा न आठवणारी स्वप्नं. बरं असे तंत्र विकसित झाले आणि त्याला इतर संशोधन म्हणजे दृश्यचित्र, भाषा अशी जोड मिळाली तरी जर पुर्वग्रह असतील, ( जसा इथे आहे ) तर त्या संशोधनाचा काय फायदा ? हे तंत्र आत्मसात केलेले मानव वा इतर कुणीही, मानवी गूणदोषांपासुन मुक्त असतील का, प्रगति सगळ्याच बाबतीत होईल का, असे मला पडलेले प्रश्न. ( इथे व्हर्जिनिटी वर निर्लज्ज कॉमेंट आणि त्यावर दुसर्या व्यक्तीची हतबलता. ) शिवाय हे तंत्र विकसित झाले तरी त्याला गुंगारा देण्याची क्षमता आजच्या मानवात आहे का, असाही मला पडलेला प्रश्न ( इथे त्या व्यक्तीने ताकास तुर लागु दिलेली नाही. ) हि कथा पुढे वाढवुन, नेमके उत्तर शोधण्यात मला रस नव्हता. सत्य काय असावे, याचा कयास ज्याने त्याने करायचा. पण मी तिथपर्यंत न लिहिण्याचे एक कारण म्हणजे, मला या सत्यशोधनातला फोलपणा जाणवला. समजा जरी हे आपण त्या माणसाकडुन वदवुन घेऊ शकलो, तरी भूतकाळातील, उघडकीस न आलेल्या एका गुन्ह्याचा कबुलीजबाब आता मिळवण्यात हशील ते काय ? आता त्या हयात नसलेल्या माणसाला शिक्षा होवु शकते का ? ज्या व्यक्तीला प्राणाला मुकावे लागले, तिला न्याय मिळवुन देता येईल का ? या तंत्राने भविष्यातील गुन्हे रोखता येतील. पण जे घडुन गेलेय त्यात बदल करणे शक्य नाही. आणि समजा याच तंत्राने आपल्याला इतिहासातील अश्या एखाद्या घटनेच्या वेळचे, संबंधित व्यक्तीच्या मनातील विचार कळले, ( उदा. महात्मा गांधी, वा पंडीत नेहरु, यांच्या पुढे वादग्रस्त ठरलेल्या निर्णयाच्या वेळची त्यांची मनस्थिति ) तरी त्यांच्या निर्णयाचे जे परिणाम आपण भोगतो आहोत, ते टाळाता येणे शक्य आहे का ? यावर सगळ्याना काय वाटतय ? सोपी उत्तरे देऊन मला हि विचारप्रक्रिया थांबवायची नाही.
|
प्रयोग एकदम interesting आहे! भाषेतील बदल मस्त पकडलेत. पण मलाही वाटलं की अजून पुढे लिहायला खूप स्कोप आहे, त्या मानाने दि एन्ड लवकर केला..
|
Chetnaa
| |
| Monday, July 30, 2007 - 3:50 pm: |
| 
|
काही प्रश्न आहेत... उदा: गुन्हा केलेल्या व्यक्तीवर हा प्रयोग काही वर्षांनी केलाय का? हा भाग मला हिप्नोटिझम सारखा पण वाटला... ती सेशन्स पण अशिच असतात... दुसरे मह्णजे असे एखादे तंत्र, तुम्ही म्हणालात तसे, काही काळाने निर्माण झालेच तर त्याचा प्रयोग घटना घदुन गेल्यावर भविष्यात... पण त्याच व्यक्तिवर करावा लागेल ना? मग ती व्यक्ती जिवंत हवी. त्यामुळे गांधी वगैरे ज्या व्यक्ती जिवंत नाहीत त्यांच्या मनातील त्या निर्णयाच्या वेळचे विचार कसे ओळखता येतील? भविष्यातील गुन्हे मात्र रोकता येतील पण गुन्हा करणार्या व्यक्तीस ओळखणार कसे? की ही व्यक्ती गुन्हा करणार आहे? त्या नंतरच प्रयोग करता येइल आणि गुन्हा थांबवता येइल. राहिला प्रश्न मानवी स्वभावातील गुणदोषांचा. ते तसेच रहातील असे मला वाटते कारण ती मानवाची मूळ प्रेरणा आहे. ( परिस्थीतीने थोडाफ़ार बदल होऊ शकतो, पण पूर्ण मानवी स्वभाव नाही बदलु शकत. ) आणि आजकाल आपण पहातोच जसजशी प्रगती इतर क्षेत्रात होतेय त्याच्याहून जास्त वेगात गुन्हे गारी क्षेत्रातही घडतेच. त्यामुले मानव गुणदोशातुन मुक्त होइल की नाही हे ठामपने नाही सांगता येत. तुम्हाला यात आणखि काही वेगळा व्ह्यु अपेक्षीत असेल तर लिहा. म्हणजेत्या व्ह्यु ने चर्चा करता येइल. पण हा वेगळा प्रयोग आवडला.
|
Dineshvs
| |
| Monday, July 30, 2007 - 4:45 pm: |
| 
|
चेतना, हि कथा लिहिताना अनेक सिनेमे डोळ्यासमोर होते. जसा जेनीफर लोपेझचा सेल, टॉम क्रुझचा मायनॉरिटी रिपोर्ट. मला इथे थोडाफ़ार टाईम मशीनचा संदर्भ घ्यायचा आहे. हिप्नोटिझम करताना, त्या व्यक्तीचे सहकार्य आणि तयारी अपेक्षित असते. नाहितर तो प्रयोग यशस्वी होत नाही. ( माझ्यावर हा प्रयोग झाला आहे. ) आजकालच्या सभ्य पद्धतीमधे काहि गुन्हेगार, गुन्हा लपवु शकतात. इथे भविष्यकाळातुन मागे जाऊन हे प्रयोग केलेत. त्यामुळे व्यक्ती जिवंत वा मृत हा मुद्दा निकालात निघाला आहे. पण जरी हे पुढे शक्य झाले तरी घडुन गेलेला गुन्हा रोखता येणार नाही, हेच माझेही मत आहे. मानवी स्वभाव, अगदी पुरुषी वृत्ती आणि स्त्रीवृत्ती, बदलणे अशक्य आहे असे मलाही वाटते.
|
Zelam
| |
| Monday, July 30, 2007 - 5:13 pm: |
| 
|
दिनेशदा कल्पना मस्तच आहे. मलाही वाटलं की शेवट अजून थोडा फुलवायला हवा होता. अज्जुकाप्रमाणे मलाही आधी कथेचा शेवट झाला हे वाटले नाही. पमीवरचा प्रयोग वाचायला आवडला असता :-) बाकी छानच कल्पना.
|
Psg
| |
| Tuesday, July 31, 2007 - 5:02 am: |
| 
|
मस्त आहे.. वेगळी आहे. छान लिहिली आहे कथा.
|
Pardesi
| |
| Tuesday, July 31, 2007 - 2:43 pm: |
| 
|
छान आहे. कथा वाचत असताना मतकरी यांची पुलावरचा माणूस कथा आठवली. त्या कथेत, नायकाला भविष्यात ल्या गोष्टी अगोदर वर्तमानात दिसल्यामुळे त्याच घडून येतात. मला वाटले होते की स्वप्नात पहीलेल्या बेलवलकर ला खर मानून वैश्यपायन पमी चा खून करत असेल म्हणून. कथा थोडी अजून पुढे गेली असती तर अजुन मजा आली असती.
|
Sashal
| |
| Tuesday, July 31, 2007 - 4:21 pm: |
| 
|
दिनेश चं explanation वाचून Déjà Vu या Denzel Washington च्या movie ची आठवण झाली .. त्या movie बद्दल जास्त माहिती इथे बघता येईल .. अशाच प्रकारच्या science fiction चा concept आहे त्यात .. पण त्याला काहि psychological aspect नाहि .. फ़क्त भूतकाळ (चार दिवस आणी सहा तास पुर्वीचा) बघता येणं आणि गुन्हा होताना वाचवणं हा concept आहे .. दिनेश, हा वेगळा प्रकार interesting आहे हे नक्कीच .. पण सगळ्यांप्रमाणे मलाही बरेच loose ends असल्यासारखं वाटलं .. पण तुम्ही केलेल्या attempt बद्दल अभिनंदन ..
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 01, 2007 - 3:06 am: |
| 
|
पमीवरच्या प्रयोगाचा मी विचार केला होता, पण या तंत्रात ते बसत नव्हते. एकतर तिला याची पुर्वकल्पना असेल याची शक्यता कमी होती. दुसरे प्रत्यक्षात जे घडले, त्यानंतर ती जिवंत नव्हती, त्यामूळे तिला गाढ झोप वैगरे कशी लागेल. शिवाय तिच्यावरच्या प्रयोगाने, एक निश्चित दिशा वा उत्तर मिळाले असते, ते मला टाळायचे होते. भविष्यातल्या गोष्टींची चाहुल लागणे, हि कल्पना अनेकदा वापरलीय, तीही मला वापरायची नव्हती.
|
Psg
| |
| Wednesday, August 01, 2007 - 4:38 am: |
| 
|
दिनेश, हे असेच प्रसंग लिहून तुम्ही नायकाच्याच मनातून त्याने खून कसा केला आणि कसा पचवला हे वदवून घेऊ शकता. खूप interesting होईल ते वाचायला. बघा, अजूनही लिहा पुढचे भाग. मग कथा पूर्णही वाटेल
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 01, 2007 - 6:07 am: |
| 
|
Psg या एवढ्या कथाभागावरुन मला त्या व्यक्तीला पुर्णपणे दोषी ठरवता येत नाही. मला अनेक शक्यता वाटताहेत. ( सिंहासन सिनेमातला माधव वाटवे आणि तारा पाटकर यांचा प्रसंग आठवुन बघा. ) पण तरिही एक मजा म्हणुन, यापुढची कथा, इतर कुणी किंवा अनेकानी आपापल्या परिने पुर्ण केली तर मला जास्त आवडेल. ( अगदी खरे सांगायचे तर, या मर्यादित तंत्रामुळे म्हणा किंवा मी घालुन घेतलेल्या मर्यादेमुळे म्हणा, पुढे लिहिणे मला जरा अवघड वाटतेय. ) बोला मायबोलिकरानो, कोण घेतेय हे आव्हान ? आणि मग सर्वानुमते योग्य तो शेवट ठरवु.
|
Disha013
| |
| Wednesday, August 01, 2007 - 6:51 pm: |
| 
|
सही.... इंटरेस्टिग कल्पना.... दिनेशदा तुम्ही ऑल राउंडर आहात...
|
Tukaram
| |
| Wednesday, August 01, 2007 - 8:32 pm: |
| 
|
Chat mode off स्वप्नसंवाद मोड ऑन : एकदम असे तिर्थयात्रेचे कस ठरलन? इतके दिवस तर माग लागले तरी राग यायचा बाई तुम्हाला. " "काय हे पमी? चाललो तरी कुरकुर आणि नाही म्हनलो तरी राग. तुम्हा बायकान्च्या मनात काय चालते ते ब्रम्हदेवास पण नाही उमजणार." "आहो, मी तर खुश आहेच कि कुटेपन तुमच्या बरोबर जायला." "तिकडे दिवस पावसाचे आहेत म्हने. जरा जपुनच हाव लागल. पायाची काळजी घ्या..." "व्हय. तुम्ही आसल्यावर मला कसली बी भ्या नाय." "काय काय उरकायच तिकडे"? "काकड आरति आन प्रदक्सिना घातल्या बिगर मी परत नाही येणार". "नाय नाय, प्रदक्शिणा फार आवघड आहे. तुझ्या वाटची मी घालेन, तु बस आरति झाल्यावर तिकडच." "आहो पन...." "ते काही नाही. तु प्रदक्शिणा घालणार नाही. उगाच काही त्रास झाला तर तिकडेच राहावे लागेल... रजा २ दिवसाचीच मिळालीय." "कस काय हाये ते तिकड पाहुन ठरवु" "ऐकत जा जरा माझ" Control Z Do you want to save the memory of this chat, in the mind of the subject ? NO. Are you sure, you want to delete the memory of this chat ? YES. Chat mode on : PR45A74 Says : Hi LX, how was the session ? LX98DF8 Says : It was great. PR45A74 Says : Do you still suspect him ? LX98DF8 Says : Yup but little less than last time. Something still needs to be investigated. PR45A74 Says : You need to try one more role? at some other time. LX98DF8 Says : Yep. I wanna be Shaila meeting him few days after the incident. Tell me what are you working on ? PR45A74 Says : It’s interesting ya, it reads A STUDY OF THE PSYCHOLOGICAL DEVELOPMENTS IN THE MINDS OF VICTIMS OF MURDERERS, JUST AFTER THE MURDER. LX98DF8 Says : Lets go ahead with Shaila. PR45A74 Says : here you go.. Chat mode off क्रमश पहिला प्रयत्न आहे. चुकभुल देणेघेणे. दिनेश खुप छान कल्पना आहे.. मी काही गडबड केली आसेल तर माफ करा..
|
Chetnaa
| |
| Thursday, August 02, 2007 - 7:28 am: |
| 
|
अमोल, छान जमतोय प्रयत्न.. अगदी मनात असेच आले होते. येऊ द्या लवकर.... दिनेश तुमची ही कल्पना आवडली
|
Madhavm
| |
| Thursday, August 02, 2007 - 8:10 am: |
| 
|
तुकाराम महाराज प्रयत्न छान आहे पण संवादाची भाषा खूपच वेगळी वाटतेय.
|
Rajasee
| |
| Thursday, August 02, 2007 - 9:11 am: |
| 
|
thodishi tom cruise chya "minority report" chya pan javalpas jate hi katha, nahee!!!
|
Tukaram
| |
| Thursday, August 02, 2007 - 6:36 pm: |
| 
|
स्वप्नसंवाद मोड ऑन : " केन्व्हाची हाक मारतीय मी " " हा बोल शैला. पमीचा विचार काहि डोक्यातुन जात नाही.. " " परत परत तेच आठ्वण्यापेक्शा पुढे काय कारायचे ते ठारवायला हवे ना? " " बरोबर आहे तुझ पण मन खात राहात… " " पुढे कय करायच ठरवल आहे.. ? " " मला माहित आहे तु हा प्रश्न का विचरातेस पण माझ मन आणि मेन्दुची लढाई चालु आहे.. " " तु आता स्वत:ला दोष देणे बन्द केल पहिजेस.. आयुष्यभर आपराधि मानणार का स्वतःला? " " हम्म्म...." " चल एक चक्कर मारुयात म्हणजे तुला बर वाटेल… " " नको......मागच्या वेळेस चक्कर मारण्यापेक्शा मी पमी बारोबर बसलो असतो तर…. " "अरे परत तेच्… देवा ह्याला वाचाव्… मी नवस बोलते. " " मागच्या वेळे सारखाच?? " " म्हणजे…?? " " जसा तु हारिहरेश्वरमधे बोलली होतीस तसाच? " Control Z Do you want to save the memory of this chat, in the mind of the subject ? NO. Are you sure, you want to delete the memory of this chat ? YES. Chat mode on : PR45A74 Says : Hi LX, how was the session ? LX98DF8 Says : It was great. PR45A74 Says : Do you still suspect him ? LX98DF8 Says : Yes. But may be he is not alone in this. PR45A74 Says : You need to try one more role? at some other time ? LX98DF8 Says : Yep. I wanna be HIM meeting Shaila few days after the incident. Tell me what are you working on ? PR45A74 Says : It’s interesting ya, it reads A STUDY OF THE PSYCHOLOGICAL DEVELOPMENTS IN THE MINDS OF MURDERERS, JUST AFTER THE MURDER. LX98DF8 Says : Lets go ahead. PR45A74 Says : here you go.. Chat mode off क्रमश्: दिनेश खुप छान कल्पना आहे.. मी काही गडबड केली आसेल तर माफ करा..
|
Manjud
| |
| Friday, August 03, 2007 - 8:02 am: |
| 
|
हे काय, पमीच्य संवादाची भाषा कशि काय बदलली? का ही भाषा " बोलविता धनीची " ?
|
Dineshvs
| |
| Friday, August 03, 2007 - 8:59 am: |
| 
|
तुकाराम भाषेचं भान ठेवायलाच हवय. इव्हन हिप्नोटाईज करताना, जर भाषा योग्य नसेल, तर संवाद होत नाही. आणखीही प्रयत्न होवु देत, मग सगळ्यानी मिळुन योग्य तो शेवट ठरवु.
|
Tukaram
| |
| Friday, August 03, 2007 - 1:58 pm: |
| 
|
पमीला शुद्ध मराठी येत नसल्याचा उल्लेख होता म्हणुन तशी भाषा वापरली. काळजी घेइन.
|
|
|