|
Shonoo
| |
| Thursday, July 26, 2007 - 2:31 am: |
| 
|
बर्याच मागील पानावरून पुढे /hitguj/messages/119403/115036.html?1173954182.
|
Shonoo
| |
| Thursday, July 26, 2007 - 3:00 am: |
| 
|
"अगं त्याच्याशी कसं बोलावं हेच कळत नव्हतं मला बराच वेळ. मला सगळी माहिती आहे म्हणून त्याला confront करू, की मला नुसता संशय आहे म्हणून विषय सुरू करू आणी तो काय सांगतो ते बघू?" "मग अजून विचारलंस की नाही?" "शेवटी आजोबांचा सल्ला घेतला." हिला नेहमी 'आजोबांनी काय केलं असतं?' हा मोठा आधार असतो. या एका प्रश्नाच्या आधारावर ती कसल्याही समस्येवर तोडगा काढते. "मग काय म्हणाले असते तुझे आजोबा?" "त्यांचा नेहेमीचाच सल्ला गं. आपल्या माणसांशी छक्के पंजे करू नयेत. जे काही असेल ते सरळ सांगावं किंवा विचारावं." आजोबांचा हा सल्ला मात्र मी अनेकदा ऐकला आहे. तिच्या आईशी जुळवून घ्यायला तिला हा सल्ला त्यांनी किती तरी वेळा दिला असेल. "मी त्याला सरळच सांगितलं माझ्या विद्यार्थ्याबद्दल. मी त्याच्या वेब साईटचं नाव सांगता क्षणीच त्याचा चेहरा बदलला. आधी तर त्याने आपल्याच नावाने दुसरा कोणी असं करत असेल वगैरे सांगून पाहिलं. पण माझ्या विद्यार्थ्याने मला कळवायच्या अगोदरच ती सगळी शहानिशा केली होती. अगदी आमच्या घरच्या कम्प्युटर पर्यंत त्याच्या कडे पुरावा होता. मग त्याने त्यात किती नाममात्र पैसे भरलेत, त्या खर्चाने आपल्या बजेट मधे काही फरक कसा पडत नाही, त्याही पेक्षाअ जास्त पैसे कधी कधी एका वाईन वर खर्च होतात वगैरे वाद घातला. " आता मात्र मला काय बोलावं ते सुचेना. इथल्या शब्दात सांगायचं तर एक comiitted relationship मधे असून असल्या साईटवर पैसे भरून जाण्याचं त्याला काय कारण असू शकतं हे माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. मी गप्पच राहिलेली पाहून तिनेच परत सुरुवात केली. " मला माहिती आहे की तुला अगदी cinemax सारख्या चॅनेल चा पण तिटकारा आहे. पण most men like that kind of stuff. प्रत्येकाने कधी ना कधी असले सिनेमे पाहिलेले असतात, मासिकं गोळा केलेली असतात. असल्या चित्रांच्या किंवा व्हिडियो क्लिप च्या इमेल एकमेकांना पाठवलेल्या असतात. तू तुझ्या नवर्याला किंवा इतर तुझ्या ओळखीतल्या लोकांना विचारून बघ."
|
Ladaki
| |
| Thursday, July 26, 2007 - 12:28 pm: |
| 
|
मेधा आज बसुन पुरी कथा वाचली... खुप छान आहे... आता ब्रेक न घेता भरभर पुर्ण कर...
|
शोनू! अनेक धन्यवाद... जुलिआ ला परत आणल्याबद्दल... आता पटकन पुर्ण कर पाहु..
|
Asami
| |
| Thursday, July 26, 2007 - 8:52 pm: |
| 
|
"वर्षाची ??? गोष्ट" title बदल ग. तू तर माझ्यापेक्षा पटाइत आहेस रेंगाळण्यामधे
|
Nilima_v
| |
| Friday, July 27, 2007 - 2:09 am: |
| 
|
Are eka warshachi gosht lihayla ek warsh nako ka? light ghe!
|
Shonoo
| |
| Friday, July 27, 2007 - 2:32 am: |
| 
|
"जुलिआ, अगं इतर सगळे पुरुष जरी असले उद्योग करत असतील तरी ते काही जेफच्या वागण्याचं समर्थन होत नाही." "ते कळतं गं मला. पण मला असं म्हणायचं होतं की कधी कधी असली इमेल एकमेकांना पाठवणे माझ्या मते क्षम्य आहे. जितक्या सहजतेने एखादा चावट जोक मित्र मैत्रिणींमधे सांगितला जातो तसंच आहे. anna cournicova, annaa nicole यांचे फोटो सगळ्यांनी इमेल मधे पाहिलेले असतात. पण बहुतेक पुरुष एका मर्यादेच्या बाहेर जात नाहीत." "हो, कारण त्यांना बायकोची, गर्लफ़्रेंडची भिती असते. मला नाही वाटत कोणी बायका असले चाळे चालवून घेतील. सिंगल पुरुषांची गोष्ट सोड." एक मोठा निश्वास टाकून जुलिआ माझ्या कडे "आता तुला कसं समजावून सांगू?" अशा आविर्भावाने पाह्यला लागली. "मग जेफ ने पैसे देऊन असल्या साईटची मेम्बरशिप घेतलीये ते तुला खटकतंय का? प्रश्न पैशाचाच आहे का? मला नाही वाटत असल्या गोष्टींवर तो भरमसाट पैसे खर्च करेल. तुला राग नक्की कशावरून आलाय?" "तेच तर कळत नाहीये मला! जेफला वाटतंय की पैसे तर फारसे पडले नाहीत. तो माझ्याकडे दुर्लक्ष करतोय, आम्हा दोघांमधे काही दुरावा आला आहे असंही काही नाही. त्याने जे काही केलं त्यात काही immoral आहे असं त्याला वाटतच नाही मुळी. त्याचं काही चुकतंय हेच जर त्याला पटत नसेल तर मग पुढे मी काय बोलू? मला पटत नाही, आवडत नाही हे त्याला कळलेलं आहे. पण त्याचं म्हणणं असं की तू उद्या Golf आवडत नाही म्हणशील,मग मी Golf पण सोडू का?" आता मी पण विचारात पडले. माझ्या मते जेफची वागणूक अगदी निर्विवाद चुकीची होती. " There are no shades of grey here . This is all black, blacker than midnight black. "त्या साइटवर ज्यांचे फोटो असतात त्यांचं exploitation होतं हा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी पती-पत्नीच्या नात्यात असल्या गोष्टींना, नव्हे थेरांना प्रतिष्ठा नाही. ही साधी सोपी गोष्ट जेफ ला कळू नये, पटू नये? इतकी मतभिन्नता कशी असू शकते? आमची चर्चा सगळा दिवस चालली असती, पण पुढच्या वर्गाची वेळ होत आल्याचा अलार्म आला माझ्या कम्प्युटर वर. अगदी घाईघाईत उरलेलं सॅंडविच सम्पवून जुलिआ निघून गेली. यंदाचा Valrentine Day नवर्याला स्वत:च्या भरोशावर साजरा करावा लागणार या विचाराने जराशी हसतच मी वर्गाकडे निघाले.
|
Runi
| |
| Friday, July 27, 2007 - 2:40 am: |
| 
|
शोनु, एक वर्षाच्या आत कथा परत लिहायला घेतल्या बद्दल धन्यवाद. मला तु इतकी चांगली कथा अर्धवट सोडणार की काय याची भिती वाटत होती. आता लवकर पुर्ण कर.
|
Milya
| |
| Friday, July 27, 2007 - 10:52 am: |
| 
|
शोनू आता तरी पूर्ण कर म्हणजे.. सगळी एकसंध अशी एकदमच वाचेन
|
R_joshi
| |
| Friday, July 27, 2007 - 11:37 am: |
| 
|
शोनु एका वर्षाची गोष्ट मागच्या वर्षी पुर्ण झाली नाही निदान या वर्षी तरी पुर्ण कर. दिवे घे
|
Asami
| |
| Friday, July 27, 2007 - 2:47 pm: |
| 
|
शोनू आता तरी पूर्ण कर म्हणजे.. सगळी एकसंध अशी एकदमच वाचेन>>सगळी एकसंध वाचायची म्हणून किती दिवस थांबवशील ग ?
|
Shonoo
| |
| Sunday, July 29, 2007 - 2:20 am: |
| 
|
व्हॅलेंटाईन डे च्या पाठोपाठ मिड टर्म असाइनमेन्ट आणि क्विझेस चालू झाल्या. जुलिआ च्या डिपार्टमेन्ट मधे सुद्धा पुढच्या वर्षाच्या बजेट ची चर्चा, महत्त्वाचे टेक्नॉलॉजी प्रॉजेक्ट्स बद्दलची बोलणी सुरू झाली. मार्च च्या दुसया आठवड्या Spring Break सुरु होणार. तेंव्हा थोडं निवांत पणे बोलता येईल या विचाराने मी जुलिआ ला फारसे प्रश्ण विचारायाला गेले नाही. Spring Break च्या आदल्या शुक्रवारी तिचा फोन आला "Lucky you, you get a week off, I have to work on the Major Projects presentation all week. तरी मला मंगळवार मोकळा मिळतोय. तुला जमणार असेल तर आपण शॉपिंग ला जाऊ या का?" हे शॉपिंग म्हणजे मॉल मधे नाही, पुस्तकांच्या दुकानात, भांड्या कुंड्यांच्या दुकानात पण नाही. ही मला दिवसभर वेगवेगळ्या नर्सरी, गार्डन सेंटर मधनं चिखलातून फिरवणार आणि या वर्षी माझ्या बागेत काय काय आणि केंव्हा लावायचं याचा प्लॅन आखून देणार. मग स्वत:च्या आणि माझ्या कपड्यांची, गाडीची पर्वा न करता ढीगभर झाडं, कंद, माती इत्यादी गोष्टी माझ्या गाडीत घालणार. पैसे सुद्धा मी द्यावेतच अशी काही अपेक्षा नसते. माझ्या घराच्या पुढची मागची जागा तिच्याच मालकीची असल्यागत माझ्या बागेची काळजी असते तिला. Spring break मधे असा वर्षभराचा प्लॅन ठरवायचा अणि मग घरातल्या कॅलेंडरवर खुणा करून ठेवायच्या असा आम्ही या घरात राह्यला आलो तेंव्हापासून चा शिरस्ता आहे. "आता पुरे नं आमच्या बागेचं make over . काय दरवर्षी चिखलातून झाडं बघत फिरायचं ते? केव्हढी थंडी पण आहे अजून? इस्टर च्या सुमारास जाउया की?" मी एक दुबळा प्रयत्न केला. पण तिने माझ्या प्रश्नाकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं. "मी सकाळी लवकरच येईन. तुझी मुलं शाळेत गेली की आपण लगेच निघू. Spring break वर आहे म्हणून नवर्या साठी काही तरी गरम ब्रेक फ़ास्ट करशीलच. जे काही असेल ते मला चालेल. बाकी मग मंगळवारीच बोलू."
|
Nilima_v
| |
| Friday, August 03, 2007 - 3:41 pm: |
| 
|
"बाकी मग मंगळवारीच बोलू" , मंगळवार आला आणि मंगळवार गेा पण.
|
|
|