|
Spoiler Alert: If you haven't read 7th book of Harry Potter, this article discloses the plot- Admin माझी आणि हॅरीची ओळख खूप जुनी. तो स्टार बनण्या आधीपासूनची. दादाने मला युरोपमधून परत येताना फ़क्त हे पुस्तक आणलं होतं. साल १९९७. त्यावेळेला पॉटर मॅनिया अजुन आला नव्हता. पहिल्याच भेटीत मला हा पोरगा जाम आवडून गेला. का? कारण तो माझ्यासारखा होता म्हणून? की मला त्याच्यासारखं व्हायचं होतं म्हणून? हॅरी नंतर खूप मोठा झाला. अगदी स्टारपदावर पोचलाय. तिथेच तो राहिलाय. व्होल्डमॉर्टला संपवल्यावर आता तो सुखाने जगणार आहे. I had enough trouble for lifetime असं तो शेवटी म्हणाला. स्वत्:च्या जन्मापासून हॅरी नुसतं गमवत आला होता. सीरीयस मेल्याचं वाचुन मी रडले होते. पण हॅरीजवळ रडण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता. "लढणे" हा त्याचा स्थायीभव झालाय. पण आता तो स्थिरावणार आहे. माझ्या दृष्टीने याहून आनंदाची गोष्ट कोणती? हॅरी हर्मायनी मधे लफ़डे होईल असं एका मित्राने सांगताच मी भांडले होते. शक्यच नाही. रॉन आणि हर्मायनीच. हर्मॉनी खूप हुशार आहे. अभ्यासू आहे. पण रॉनकडे लॉजिक आहे. आपण कायम सेकंड बेस्ट आह्त हे माहीत असूनही तो हॅरीला सोडत नाही. जेव्हा सोडून जातो तेव्हा त्याना शोधत जंगलातून फ़िरतो. असा एक तरी मित्र हवा यार! हॉगवर्ट्समधल्या पहिल्या वर्षापासून हे तिघं धुमाकूळ घालतच आहेत. शिवाय सोबत स्वत्: बनवलेली DA ची टीम. बारा तेरा वर्षाच्या मुलाना इतकी नाती समजतात आणि ती निभावतात आणि त्याच्या दुप्पट वयाची लोकं मात्र एकमेकाना फ़सवण्यात समाधान मानतात. काय अजीब गणित आहे? रॉन हर्मॉनीला कधीच त्याच्या फ़ीलंग सांगत नाही. पण ती त्याच्यावर वैतागलेली असताना हॅरी रॉनला विचारतो "का सतावतो तिला?" रॉन हसत म्हणतो, " Everyrthing is fair on love and war. And in our case, it a bit of both . सात पुस्तकामधे पहिल्यासा रॉन त्याच्या भावना हॅरीला सांगतो. स्वत्:च्या जीवाला असणारे धोके लक्षात घेऊन हॅरीने गिनीला सोडलं आहे. म्हणून रॉन त्याच्यावर रागवत नाही. बहीणी इतकंच तो हॅरीला समजून घेतो. नकळत कित्येकदा रॉन हीरो बनतो. पण त्याचं क्रेडीट त्याला कधीच मिळत नाही. फ़्रेड आणि जॉर्ज ही माझी अजुन एक आवडती जोडी. असेच दोन जुळे माझ्या वर्गात होते. आणि तेही इतकाच गोंधळ घालायचे. दोघाच्या कृपेने केमिस्ट्री लॅब जलमय झाली होती. फ़्रेड आणि जॉर्जसुधा मुर्ख नाहीत. हुशार आहेत आणि अभ्यासापेक्षा प्रॅक्टिकल गोष्टीमधी त्याना विषेश प्राविण्य आहे. आठवा, डोलेरसला सतावण्यासाठी त्यानी उडवलेले फ़ायरवर्क्स. सगळ्या प्रोफ़ेसरच्या मते ती एक चांगली जादू होती. (डोलोरस्च्या मते नव्हे. ) मुळात हॅरी मला जादुसाठी कधीच आवडला नाही. तो मला आवडला त्याच्या नात्यामुळे. आईवडील नसल्याचं दु:ख. त्यानंतर अचानक आलेली वाईट प्रसिद्धी. त्याच्यावर होणाए आरोप प्रत्यरोप आणि त्यातुन सावरणारा तो. ट्रायविझार्डमधे तो सेड्रीकचे प्रेत घेऊन आला तेव्हा काय भावनाकल्लोळ चालला असेल? स्नेपने डंबलडोरला मारलं हे त्याने पाहिलय तरीही डंबलडोरच्या खुनाचा आरोप त्याच्यावर आहे. हॅरी तरीही घाबरलेला नाही. उलट मिनिस्ट्रीमधे शिरून तो आणि त्याचे साथीदार गोंधळ घालतायत. कारण हॅरीला माहीत आहे. "कर नाही त्याला डर कशची?" स्वत्:वर त्याचा विश्वास आहे. पण म्हणून आपल्यामुळे दुसर्याना तो धोक्यात घालत नाही. डंबलडोर त्याला सांगतो " you are the only selfness person i have ever known आणि अशीच माणसं मृत्यूशी झुंज देऊ शकतात. त्याचं आणि स्नेपचं नातं खूप क्लिष्ट आहे. तो स्नेपचा तिरस्कार करतो. स्नेप हॅरीच्या वडलाचा तिरस्कार करतो आणि जमेल तिथे हॅरीला छळतो. स्नेप डंबलडोरला मारतो. आणि तरी हॅरी स्वत्:च्या तिसर्या मुलाचं नाव आल्बस सेवेरस ठेवतो. का? तो स्नेपच्या धाडसाचं कौतुक करतो. का? मी नाही सांगणार. हॅरीलाच विचारा, सध्या तो निवांत आहे. हॅरी माझ्यासाठी कधीच एक पात्र नव्हता. त्याहून जास्त कायम तो माझा गाईड बनला. त्याच्यावर किती वाईट प्रसंग आले तरी तो डगमगला नाही. आणि मी मैत्रीण भांडून गेली म्हणून रडत बसतेय. डंबलडोर कायम मला माझ्या बॉससारखा वाटला. प्रेमळ पण तरीही शिस्तप्रिय. अनाथ हॅरी त्याचा जास्त लाडका कारण त्याला माहीत आहे त्याच्या आईवडीलाच्या मृत्यूला आपण कारणीभूत आहोत. माझ्या बॉसच्या मते मी ऑफ़िसमधल्या प्रत्येक गडबडीला कारणीभूत आहे. आणि हो माझा बॉस मला ओरडताना म्हणतो "तुला शिकायचं आहे की नाही?" फ़ुल्ल टाईम लेक्चर्स असतात. हॉगवर्टच्या शेवटच्या वर्षी हॅरी "कदाचित" मरेल असं जे के रोलिंग बोलली आणि माझ्या हृदयाचा ठोकाच गायब झाला. भविष्यवाणी होती की हॅरी आणि डार्क लॉर्ड यापैकी एकजण जिवंत असताना दुसरा मरू शकत नाही. म्हणजे हॅरी मरणार?? २१ जुलैची मी लग्नाच्या मुहुर्तापेक्षा जास्त वाट पाहिली. आणि मध्यरात्री सहा वाजता जाऊन पुस्तक घेऊन आली. घरी आलयावर मोबाईल बंद केला आणि धडधडत्या अंत्:करणाने वाचायला सुरुवात केली. जर हॅरी मेलाच तर डार्क लॉर्ड आणि जेके दोघाची सुपारी द्यायचीच हे ठरवून. हॅरी मेला. स्वत्:हुन त्याने मरण ओढवून घेतलं. त्याला डंबलडोर भेटला. खूप सार्या प्रशनाची उत्तरं मिळाली. सारी रहस्ये खुली झाली. आणि हॅरी परत आला. मरणाच्या दारातून... कारण ते मरण त्याने मागितलं होतं. त्याला मिळालं नव्हतं. म्हणून त्याच्यासमोर मरणाने हा ऑप्शन ठेवला. व्होल्डमॉर्ट गेला. "मेला" असं म्हणता येणार नाही. पण वीस वर्षाच्या लीपमधे हॅरीची जखम एकदाही दुखलेली नाही. All is well तसंच राहु दे, आमेन. }
|
Chinnu
| |
| Sunday, July 22, 2007 - 4:56 pm: |
| 
|
नंदु, भारी लिहिलसं. हॅरी आणि कंपनीबद्दल तुला वाटणार्या अनेक गोष्टींना अनुमोदन! yes, all is well till now.. असच राहु देत. आमेन!
|
नंदिनी,मस्तच लिहिलयस गं.. हॅरी आणि आणि इतर पात्रांना अगदी सजीव केलयस. ...
|
Ajay
| |
| Monday, July 23, 2007 - 3:54 am: |
| 
|
नंदिनी, सुंदर लिहिलं आहेस. नुकताच Time मासिकात एक खूप सुंदर लेख वाचला. If you want to know who dies in Harry Potter, the answer is easy: God. Harry Potter lives in a world free of any religion or spirituality of any kind. He lives surrounded by ghosts but has no one to pray to, even if he were so inclined, which he isn't. What does Harry have instead of God? Rowling's answer, at once glib and profound, is that Harry's power comes from love. This charming notion represents a cultural sea change. In the new millennium, magic comes not from God or nature or anything grander or more mystical than a mere human emotion. In choosing Rowling as the reigning dreamer of our era, we have chosen a writer who dreams of a secular, bureaucratized, all-too-human sorcery, in which psychology and technology have superseded the sacred. By LEV GROSSMAN Read full Article here http://www.time.com/time/magazine/article/0,9171,1642885,00.html
|
Bee
| |
| Monday, July 23, 2007 - 4:32 am: |
| 
|
मी हॅरी पॉटर एकदाही वाचलेलं नाही पण वरचे जे लिहिले आहे ते वाचून हॅरी पॉटरची पुस्तके वाचाविशी वाटतात. नंदीनी वेगळं काहीतरी लिहिलं आहेस.. आवडलं..
|
अजय, एकदम बरोबर. आणि म्हणूनच मला हॅरीचं जग आवडतं. अगदी मगल्स ना सुद्ध आपले मानत जातात आणि रक्तावरून क्लास ठरवणार्याचा अंत होतो. धर्म आणि देव यापेक्षा हॅरी स्वत्:वर जास्त विश्वास ठेवतो. एवढे कठीण प्रसंग येऊन सुद्धा तो कुणासमोर हार मानत नाही किंवा नशीब दैव या गोष्टी बोलत नाही. त्याच्याजवळ मिशन आहे आणि त्याला ते पूर्ण करायचे आहे. त्यासाठी तो वाटेल ते करतो. पण कुणासमोर गुडघे टेकत नाही. हॉगवर्ट्स मधे क्रिसमस साजरा होतो. ईस्टर साजरा होतो पण त्यात "उत्सवाचा" भाग जास्त आहे. बी, ही पुस्तकं एकदातरी वाच. जेकेची कथा सांगण्याची शैली जबरदस्त आहे. साध्या सोप्या लहान मुलाना समजेल अशा भाषेतून विलXअण रीत्या सांगत जाते. कधी न ऐकलेल्या गोष्टी पण सध्या आमच्या आयुष्याचा भाग बनल्या आहेत. एकदा बॉसचा ड्रॉवर उघडत नव्हता, मी म्हटलं "अलोहोमोरा..." त्यानंतर तो उघडला. माझा भाऊ घरात ताक खराब झालं की त्याला "बटरबीअर" म्हणतो. आणि हो आमची पण DA आहे. मी आमच्या टीमचं नाव ठेवलय. माझ्य बॉसचं नाव दिलीप त्यावरून. बुरख्यातली बाई पाहून माझा एक मित्र त्याना डीमेंटर्स म्हणतो.
|
Asami
| |
| Monday, July 23, 2007 - 1:50 pm: |
| 
|
माझे वाचून झाले आहे म्हणून मला फ़रक नाही पडला पण , To be in all fairness, I think this article needs to have spoiler alert. तो भाग अलहिदा, छन लिहिले आहेस
|
Apurv
| |
| Monday, July 23, 2007 - 3:18 pm: |
| 
|
मी अजून हा BB वाचला नाही... please give spoiler warning if you writing about 7th Book... thanks...
|
Spoiler warning बद्दल धन्यावाद. माझ्या लक्षातच आले नाही.
|
Daad
| |
| Monday, July 23, 2007 - 10:47 pm: |
| 
|
नंदिनी माझ्या लेकाने आग्रह करूनही हरीपुत्राशी ओळख करून घेतलेली नाही आजवर. पण तुझा लेख आणि काही प्रतिक्रिया वाचून लवकरच (आजच) वाचायला सुरूवात करतेय.
|
Arati7
| |
| Tuesday, July 24, 2007 - 8:33 am: |
| 
|
खरच मला हि अगदी हाच्च पण थोड्या वेगळ्या प्रकारे अनुभव आला....पण अश्या पध्द्ती ने शब्दात माण्डणे खुप अवघड वाट्त really gr8 writting......
|
नंदिनी.. चांगल लिहिलं आहेस.. पण अजून जास्त चांगल्या प्रकारे लिहिता आलं असततं तुला.. हे थोडं घाई घाईत पोस्टल्या सारखं वाटलं.. कदाचित एक्साईटमेंट मध्ये..
|
Rajankul
| |
| Tuesday, July 24, 2007 - 12:53 pm: |
| 
|
तहान नाही भुक नाही कित्ती कित्ती वणवण वारकऱ्याना राहवेना सारखी त्याची आठवण मोठ मोठ्या रांगा केवळ त्याच्या साठी हुरहुर मनास वाटे हो मनी शंकांची दाटी राहवत नाही म्हणून म्हणे घेतली पोथी प्रत्येकास दिवस रात्र साऱ्यांना फक्त होता त्याचाच ध्यास वाचला वाचला मरणातून जणू जीव भांड्यात पडला हॅरी पुढे हरीचा भक्त वारकरी वेडा ठरला ही कविता वाचली मायबोलिवर.
|
|
|