मस्त, लेख आवडला. पावसाळ्याच्या अनेक आठवणीना उजाळा मिळाला.
|
Supriyaj
| |
| Tuesday, July 17, 2007 - 11:50 pm: |
| 
|
Farend अगदी सहज आणि ओघवतं लिहिलय.. समोर बसून एखाद्या माणसाशी गप्प माराव्यात इतकं.. आणि शेवटचं वाक्य फार भावलं. सगळे म्हणतयत तसं.. मुंबैच्या पावसाची मज्जा अजुनच वेगळी.
|
Pancha
| |
| Wednesday, July 18, 2007 - 1:05 am: |
| 
|
superb farend! असे लिखाण असावे
|
दर पावसाळ्यात हमखास लक्ष जाणारी शाळेच्या दुसर्या मजल्याच्या जवळ असलेली पानशेत च्या पुराच्या वेळची पाण्याची लेव्हल दाखवणारी रेघ आणि नेहमी शाळेभोवती जमणारे पाणी ग़रवारे school का?
|
Farend
| |
| Wednesday, July 18, 2007 - 3:47 am: |
| 
|
हो मुंबईकरांना नक्कीच वेगळे अनुभव येत असणार. यात वर्णन केलेला काळ माझा पुण्यात गेल्यामुळे तिथल्याच आठवणी आहेत. बाकी ९९ मधे मी सहा महिने मुंबईत होतो आणि एरव्ही बर्याच वेळा पावसाळ्यातही गेलो आहे, पण तेवढाच अनुभव आहे. MaraThi_masoos हो विमलाबाई गरवारे. केदार Thanks! , बर्याच दिवसांनी फोटो बघितला. आणि सर्वांना धन्यवाद प्रतिक्रियांबद्दल!
|
Chinnu
| |
| Wednesday, July 18, 2007 - 3:04 pm: |
| 
|
अमोल, मज्जा आली वाचतांना. सगळ्या ओल्या आठवणी आल्या! गज आणि पाऊस अमुक इंच पडला बद्दल अगदी डिट्टो रे!
|
Asami
| |
| Wednesday, July 18, 2007 - 3:40 pm: |
| 
|
मुंबईच्या पावसाची सर्वात भन्नाट गोष्ट म्हणजे marine drive वर उभे राहून उधळत्या लाटा अंगावर घ्यायच्या. दिवेलागणीच्या वेळी अखंड समुद्र फ़ुललेल्या पळसासारखा पेटलेला असतो नि त्या उजेडामधे Queen's necklace काजव्यांसारखा लुकलुकत असतो. अशा वेळी बेफ़ाम वार्यामधे छत्र्या सांभाळत (raincoat, jerkin etc ची थेर मुंबईच्या वार्यापावसाला उपयोगी नसतात महाराजा ) drive च्या कट्ट्यावर आपटुन उफ़ाळून फ़ेसाळणार्या लाटा अंगावर घेण्याची अनुभव शब्दातीत आहे. अर्थात scale company ला कोन आहे ह्यावर अवलंबून आहे. नंतर जाऊन newyorker किंवा pizza gamina मधे उपसणे हा apt epilogue कधी तरी Boston मधे फ़िरून मी असा प्रकार कुठे सापडतो का ते शोधले होते , but one or more ingredients were always missing
|
काय हे असाम्या! इतकं मस्त भिजल्यावर पिझ्झा कसा सुचतो तुला? तेव्हा रस्त्यावरचं कणीसच खायचं. फारतर तसंच खाली चालत येऊन सुखसागरची गरम गरम पावभाजी किंवा इडली. आणि मग जिवात जीव आला की शेजारच्या त्या आद्य कुल्फीवाल्याकडची मलई कुल्फी. पाऊस नसेल त्या दिवशी समुद्रावर ( आणि समुद्राशी) पोटभर गप्पा मारून झाल्या की चर्नी रोड पुलावरून आत येऊन ताराबागेत भेळ आणि पाणीपुरी खायची.
|
Asami
| |
| Wednesday, July 18, 2007 - 4:55 pm: |
| 
|
new yorker नि pizza g. मधे खायला जायचे असते हे कोणी सांगीतले तुला ? Jokes apart मस्त भिजल्यावर कहिही गरमागरम छन लागते. eating is not the epilogue ग. }
|
Chinnu
| |
| Wednesday, July 18, 2007 - 5:20 pm: |
| 
|
स्वाती, असामी शो. न. हो! कशाला अजून जीव जाळता माझा, असल्या आठवणी काढून! मरीन Drive वरच्या लाटा अगदी सुखद आठवण!
|
Farend
| |
| Wednesday, July 18, 2007 - 5:54 pm: |
| 
|
तो ही अनुभव घेतला आहे, आणि का कोणास ठाऊक तारीखही लक्षात राहिली, आणि योगायोग म्हणजे १८ जुलैच (१९९९)! त्या मरीन ड्राईव्ह च्या रस्त्यावरच्या कट्ट्याजवळून जोराच्या पावसात चालत (मी आणि बायको: उगाच शंका नको ) आणि ती VT समोरची 'खडा पाव भाजी' खाऊन वगैरे! मजा आली, त्या दिवशी पेपर मधे आले होते की लाटा रस्त्यापर्यंत येतील, आणि आम्हाला तिकडे जवळ जायचेच होते, म्हणून मग गेलो होतो.
|
Runi
| |
| Wednesday, July 18, 2007 - 6:06 pm: |
| 
|
फारएन्ड, एकदम भुत्काळात नेलेस तु आम्हा सगळ्यांना. तिथे पाऊस पडल्यावर जो काही हिरवा रंग दिसतो तो मात्र इथे काही दिसला नाही. बाकि पावसाळा म्हणले की साचलेल्या पाण्यात नावा सोडणे, तोंडाचा मोठ्ठा आ करुन पावसाचे पाणी प्यायचा प्रयत्न करणे, सायकलणे सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवणे एकदम सेम टु सेम.
|
Ravisha
| |
| Wednesday, July 18, 2007 - 7:25 pm: |
| 
|
हे सगळं खरं; पण २६ जुलै च्या पावसाची मात्र आठवणही नको. पावसाच्या पाण्याचे ते रौद्र रूप आजही अनेकांच्या डोळ्यांतून पाणी काढेल...
|
Sherpa
| |
| Thursday, July 19, 2007 - 5:28 am: |
| 
|
फारएन्ड खुप छान लिहिले आहेस. मी पण पुण्याचाच त्यामुळे वाचायला अजुन मजा आली. श्रावणातली अजुन एक आठवण म्हणजे पतंग उडवणे. पुण्यात अजुनही याच सुमारास पतंग उडवतात. आताची पिढी पाऊस enjoy करत नाही असे मला वाटत नाही. maybe US मधे हे वेगळे असेल. या वर्षी आमच्या complex मधली खुप मुले,मुली पहिल्या पावसात भिजत होती. मी पण माझ्या मुला बरोबर भिजलो खुप मजा आली. अजुनही पावसात बोटी सोडणे हे तितकेच प्रिय आहे जितके आपल्याला होते.
|
Psg
| |
| Thursday, July 19, 2007 - 5:46 am: |
| 
|
मस्त लिहिलिअं आहेस फ़ारेंड! सगळ्यांनाच nostalgic केलंस! माझं माहेर ज्ञानप्रबोधिनीशेजारी.. तो रस्ता तर पूर्ण पावसाच्या पाण्यानी भरतो अजूनही- कारण तिथे उतार आहे नदीकडे पाणी जाण्यासाठि! मग त्यात होड्याबिड्या सगळं आलंच! आणि शेरपा म्हणल्याप्रमाणे, मुलं अजूनही तितकाच enjoy करतात पावसाळा. तुम्ही तिकडे परदेशी असल्याने तुमच्या मुलांना ती मजा कळणार नाही मेबी, पण आमच्या मुलांना तरी बर्फ़ पडण्याचा आनंद कुठे घेता येतो?
|
Pancha
| |
| Thursday, July 19, 2007 - 4:45 pm: |
| 
|
श्रावणातली अजुन एक आठवण म्हणजे पतंग उडवणे. पुण्यात अजुनही याच सुमारास पतंग उडवतात. आं? पतंग चा season dec-jan राव, संक्राती ला संपतो.
|
Ksmita
| |
| Friday, July 20, 2007 - 8:06 pm: |
| 
|
मस्त वाटले वाचून ..thanks !अगदी भूतकाळात गेले थोड्या फ़ार फ़रकाने बर्याचशा आठवणी सारख्या आहेत मला कायम पावसाळी बूट हवे असायचे त्यात पावसाचे पाणी गेल्यावर पच पच आवाज करत चालणे फ़ार गमतीचे वाटायचे तसेच पावसाची सबब सांगून युनिफ़ोर्म ऐवजी दुसरा ड्रेस घालून सोबत पालकांची चिठ्ठी नेणे हा एक मोठा पराक्रम वाटायचा आणि शेवटच्या श्रावणी सोमवारची वर्षा सहल !!!साॅलिड मज्जा !!
|
Ksmita
| |
| Friday, July 20, 2007 - 8:26 pm: |
| 
|
अजून एक गंमत , ५वी ६वी पर्यत रेनकोट चालला ७वीत त्या रंगीत बटणाच्या छत्र्या हट्टाने घेतल्या पण त्या वार्यावर उलट्या होत आणि त्यांना सुलट्या करण्याच्या कसरतीत पावसाची एकच सर चिंब भिजवित असे मग अश्याच पूर्ण भिजलेल्या अवतारात पुन्हा डोक्यावर छत्री घेऊन घरी यायचे ....आई जाम चिडायची रेनकोट कसा चांगला हे पुन्हा सांगायची पण आम्हाला छत्री मिरवायची दांडगी हौस ना !
|
Shyamli
| |
| Thursday, July 26, 2007 - 11:24 am: |
| 
|
मस्त लिहलयत माझा पावसाळ्यातला आवडता प्रसंग (अर्थात collage मधला )म्हणजे पाउस आला म्हणुन सगळे पटापट आडोसा शोधत रस्ते सोडुन बाजुला व्ह्यायचे आणि मी मात्र पार्कींग मधली गाडी काढुन मोकळ्या झालेल्या रस्त्यानी मस्त लांबच्या रस्त्यानी पाउस झेलत घरी जायचे इथे पाउस नाही
|