|
Hems
| |
| Friday, July 06, 2007 - 10:37 pm: |
|
|
अधिवेशनानंतर..... तीन दिवस..कार्यक्रम संख्येनं ओलांडलेली साठी.. नव्या ओळखी... आणि मुख्य म्हणजे खास मराठी वातावरण असं तेरावं बृ म मं अधिवेशन नुकतच पडलं... मनावर उमटलेली ही काही क्षणचित्रं: आम्ही Seattle ला पोचलो संमेलनाच्या आदल्या दिवशीच... त्यामुळे रजिस्ट्रेशन पटकन आवरलं. आमची एकांकिका अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्य सभागृहात सादर करायची होती.. म्हणून स्टेजचा अंदाज घ्यावा या विचारानं स्टेज़च्या पाठी धडकलो. तिथे आमचे काही गाववाले भल्या मोठ्या क्रुझचा देखावा बांधण्यात गुंतलेले दिसले.... opening ceremony साठी. मग आमचे नवरोबा तिथे मदत करण्यात अडकले आणि मी बाहेर पडले. convention center एकदम चकाचक दिसत होतं. बाहेर सगळीकडे मराठी बोलणं ऐकू येत होतं. 1999 मधलं आमच्या गावातलं san jose , नंतर गेल्यावेळचं Atlanta मधलं अधिवेशन बघितलं असल्यामुळे तिथलं वातावरण नविन नव्हतं ! पुलंचं वाक्य उधार घेऊन(अस्सल मराठी माणसाचं लक्षण न.१) सांगायचं तर अधिवेशनाला जाताना "आपण का जातोय " आणि परतताना " का आलो होतो " याखेरीज अन्य विचार प्रवासात सुचत नाहीत. आणि तरीही अधिवेशनाच्या ठिकाणी पोचल्यावर "इथे यायचा विचार केला ते बरं झालं " असं वाटतंच. इतके सगळे मराठे लोक एकत्र जमणार ही कल्पनाच thrilling वाटते. मला काही नवे जुने चेहेरे भेटले त्यांच्याशी बोलून झाल्यावर मी कार्यक्रम पत्रिकेवरून नजर फिरवत राहिले... इतके ठासून भरलं होतं ते वेळापत्रक की त्याच्यापुढे मी अधिवेशनासाठी म्हणून नव्या नव्या कपड्यांनी भरलेली बगही फिकी पडली असती ! मग आम्हा दोघांना आणि मुलांना कुठले कार्यक्रम चूकवून चालणार नाही याची मी माझ्या मुलांसह बसून यादी तयार केली. अधिवेशनाचा रंग आता मनात चढू लागला होता.... ------------------------------ अधिवेशनाचा पहिला दिवस भारलेला असतो, सगळ्या कार्यक्रमांबद्दलची उत्सुकता असते, भारतातल्या कलाकारांना बघण्याची ओढ असते.. नव्या कपड्यांचं मिरवणं असतं आणि अशा थाटातच opening ceremony ला सुरुवात होते. हा कार्यक्रम मी बघते तो याच कारणांसाठी. यावेळी तीन मंडळं एकत्र येऊन हा कार्यक्रम करणार होती.. त्यामुळे त्यात सुसूत्रता नसणार.. गडबड गोंधळ होणार अशी शक्यता होती... भिती होती ती खरी ठरली. पण तिन्ही मंडळातून स्थानिक लेखकांनी लिहिलेल्या संहितेवर आधारित हा कार्यक्रम मी चिकित्सकाच्या नजरेतून बघण्याचा अट्टाहास केला नाही. त्यामुळे काही वाक्यं , काही नाच , काही अभिनय ठीकठाक वाटला! उद् घाटनासाठी म्हणून जब्बर पटेल यांना स्टेजवर बोलावलं होतं असं पण ते काही बोलण्याआधीच ( मा.मु. ) विलासराव ( जी ) देशमुख ( जी ) नी उद् घाटन झाल्याचं जाहीर करूनच टाकलं.(सवय हो सवय!). मग त्यांनी भाषणात बृ म मं साठी पन्नास लाख देणार हे जाहीर केलं त्यावेळी मला खूप मानसिक त्रास झाला " महाराष्ट्राकडून आर्थिक मदत घ्यावी लागत असेल तर संमेलन न झालेलच बरं "... वगैरे वगैरे प्रक्षोभक विचार मी मांडत होते तेव्हा माझ्या बरोबर असलेली अनुभवी मंडळी का शांत होती त्याचा उलगडा मला आज झाला. seattle मधल्या आमच्या एका मित्रानं आज फोनवर बोलताना सांगितलं की BMM नं ती देणगी विनम्रपणे नाकरली आहे !! म्हणजे मु.मं ची मांडवशोभा होती तर सारी ! याला म्हणतात politics! मला मात्र खरच हायसं वाटलं हे ऐकून ! यावेळी जब्बारांचं भाषण रंगलं ते त्यांच्या अनाक्रमक शैलीमुळे आणि अर्थातच अस्सल अनुभवांमुळे. मग मात्र आम्हाला तिथून निघावच लागलं... कारणं दोन्: १. भूक लागली होती आणि official lunchtime ही झाला होता २. आम्हाला "साठेचं काय करायचं ?" ही एकांकिका करायची होती आणि त्यासाठी तीन वाजेपर्यंत backstage ला यायचं होतं. तेव्हा झणझणीत रस्सा लोणची चटण्या sides आणि sweets नं परिपूर्ण अशा जेवणावर जास्त लक्ष केंद्रीत करता आलं नाही! तरीही जेवण आणि जेवणाची व्यवस्था खरोखरच झक्कास आहे हे मात्र जाणवलच. जेवताना करमणूकीचे कार्यक्रमही होते म्हणजे एक काका सारखे " मंडळी, हवं तेवढच घ्या हं उगाच जास्त पानात घेऊ नक्का " अशी सूचना वारंवार करत होते! आणि " काय मंडळी , आवडला का बेत " असंही विचारत होते स्पीकर वगैरे वापरून ! आम्ही मग गाशा गुंडाळला आणि नाटकाच्या तयारीला लागलो... लवकरच स्टेज गाठायचं होतं!
|
Manjud
| |
| Saturday, July 07, 2007 - 6:08 am: |
|
|
हेम्स, BMM वृत्तांत लिहायला घेतल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला भारतात राहून BMM काय असतं किंवा किती मोठं असतं ह्याची कल्पनाच येत नाही. फार उत्सुकता असते त्याबद्दल. आणि ह्यावर्षी "मायबोली"ला पुरस्कार मिळाला त्यामुळे ती उत्सुकता अजुनच ताणली गेली आहे. BMM जसं झालं तसंच्या तसं तुझ्या लेखणीतून आम्हाला वाचायला मिळू दे. लेखनासाठी तुला हार्दीक शुभेच्छा.
|
Hems
| |
| Monday, July 09, 2007 - 9:19 am: |
|
|
तर ही एकांकिका " साठेचं काय करायचं " अशा भलत्याच आधुनिक नावाची आणि विषय,संवाद चाकोरीबाहेरचे, नाविन्यपूर्ण.. इ.इ. मनोज, माझा नवरा आणि मी असे आम्ही दोघेच या एकांकिकेतली पात्रं (!) BMM talent tranfer या उपक्रमाद्वारे घेणात आलेल्या स्पर्धेत या आमच्या एकांकिकेची निवड झाली. अमेरिका आणि कनडा येथील नऊ संघांमधून दोन एकांकिका निवडण्यात आल्या होत्या आणि रोख रकमेबरोबरच अधिवेशनात मुख्य सभागृहात एकांकिका सादर करायची संधी असं पारितोषिक होतं ! आधी ही एकांकिका दुसर्या दिवशी करा असं सांगितलं होतं.. नंतर एकदम कळलं की पहिल्या दिवशीच करायची आहे संध्याकाळी ५ वाजता! यात problem हा होता की आमच्याच " कला " ग्रूपचं एक नाटकही त्याच दिवशी बाजूच्या छोट्या hall मध्ये सादर होणार होतं २:२५ ते ४:४५ या वेळात. दोन्ही नाटकासाठी director आणि light व music वरची माणसं common! म्हणजे आली का पंचाईत! seattle च्या programing committee नं वेळ बदलण्याची विनंती डावलताना कार्यक्रम वेळेवर सुरू करण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्या त्या भरघोस वगैरे आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवला आणि ३ वाजता backstage ला पोचलो. नाटकाची property एकत्र करून पडद्याबाहेर मधुर भांडारकरची मुलाखत चालू असताना, पाठी स्टेजवर आमच्या काही volunteers च्या मदतीनं set लावायची जबाबदारी मनोजने घेतली तेव्हा मी त्याला म्हणाले होते की तुला मग focus करणं किती कठीण जाईल वगैरे. प्रत्यक्षात मात्र अजूनच वेगळी अडचण आली! आधीचे कार्यक्रम पुढे पुढे सरकत गेले मधुरची मुलाखत पडद्यापुढे न होता सरळ स्टेज वरच झाली आणि त्यामुळे आमची एकांकिका सुरू व्हायलाच मुळी ५:४० वाजले....! यात अडचण अशी होती की dinnertime ची वेळ ६ ते ८ होती त्यामुळे एकांकिकेच्या प्रेक्षकसंख्येवर परिणाम होणार होता...! पण show must go on या विचारानं आम्ही स्वतला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. पडदा वर जाणार त्याच्या अक्षरश पाव मिनिट आधी पर्यंत सेट लागतच होता! या बद्दल seattle BMM च्या programming committee चे लोक वारंवार दिलगिरी व्यक्त करत होते. आम्ही अगदी मन लाऊन काम केलं आणि त्याची पावती आम्हाला प्रेक्षकांकडूनही मिळाली... भारतातून आलेले ग्रंथाली,मौज चे लोक आवर्जून हजर होते.. जे भारतात "समन्वय" ने सादर केलेल्या या एकांकिकेच्या production मध्ये सामिल होते. त्यामुळे त्यांची दाद महत्वाची वाटली. विजय केंकरे,दीपा लागू, नरेंद्र जाधव यांची पावती मिळाली. शिवाय अमेरिकेतल्या अनेक रसिक प्रेक्षकांचं कौतूक तर भारावून टाकणारं होतं. आपले मायबोलीकर समीर,सुप्रिया आणि अनू यांनी जी भरभरून दाद दिली तेव्हा मी खरी खुलून गेले होते असं मनोजचं मत!!! अशी वेगळी आणि अधिवेशनासाठी तर अगदीच पठडीबाहेरची एकांकिका main stage वर सादर करण्याची संधी मिळाली हाच मुळात आमच्यासाठी सुखद अनुभव होता! मग आम्ही मस्तपैकी जेवायला गेलो आता आम्हाला जेवण होतं त्याहून रुचकर लागत होतं! सुग्रास भोजनाचा मनपूर्वक आस्वाद घेऊन मुखशुद्धीसाठीचा विडा खात आम्ही "मम आत्मा गमला" या कार्यक्रमासाठी सभागृहात दाखल झालो !
|
Zelam
| |
| Monday, July 09, 2007 - 11:53 am: |
|
|
मस्तच गं हेम्स. लिही लिही अजून, वाट बघतेय.
|
अधिवेशनासाठी तर अगदीच पठडीबाहेरची एकांकिका main stage वर सादर करण्याची संधी मिळाली हाच मुळात आमच्यासाठी सुखद अनुभव होता!>>>>> अभिंनदन आणि कौतुक ही वाटतेय तुझे..!!!
|
Ravisha
| |
| Monday, July 09, 2007 - 3:43 pm: |
|
|
खरंच hems ,फारंच वेगळी एकांकिका आहे "साठेचं काय करायचं?" मला वाटतं अमृता सुभाष ने काम केले होते त्यात....तुझा अनुभवही छानच दिसतोय... अभिनंदन तुम्हा सर्वांचे!!!
|
Ajjuka
| |
| Monday, July 09, 2007 - 6:00 pm: |
|
|
राजीव सरांनी ह्या नाटकाचा (मुळात दीर्घांक आहे) पहिला ड्राफ्ट आम्हाला वर्गात वाचून दाखवला होता. ललित कला केंद्रात एम ए पार्ट टू ला असताना. एकदम आठवलं ते.
|
अभिनंदन हेम्स ! छान लिहित आहेस वृत्तांत .
|
Dineshvs
| |
| Monday, July 09, 2007 - 6:26 pm: |
|
|
हेम्स, एकांकिकेची निवड झाल्याबद्दल अभिनंदन. बाकिच्या कार्यक्रमांबद्दल पण लिहिणार ना ?
|
Hems
| |
| Monday, July 09, 2007 - 10:08 pm: |
|
|
धन्यवाद दोस्त्स ! तुम्ही वाचताय हे पाहून बरं वाटलं !
|
Hems
| |
| Monday, July 09, 2007 - 10:16 pm: |
|
|
" मम आत्मा गमला " या कार्यक्रमाचा भाग १ होता : नाट्यसंगीत आणि कलाकार होते imported !! म्हणजे भारतातून आलेले. आशा खाडीलकर, सुरेश बापट,निलाक्षी पेंढारकर. ( कार्यक्रमाची सुरुवात झाली " पंचतुंड"नं... ऐकल्या बरोबर न राहावून मी आपले मायबोलीकर सुप्रिया-समीर ना शोधत गेले कारण त्या क्षणी आम्ही सगळ्यांनी "दाद" च्या " स्पर्धा " ची आठवण काढणं केवळ अपरिहार्य होतं ! ) कार्यक्रमाचा हा भाग अपेक्षेप्रमाणे रंगला... विशेषत सुरेश बापट आणि आशाताई या दोघांमुळे. आशाताईनी " घाई नको बाई अशी आले रे बकुळफुला " हे पद म्हटलं असतं तर दुधात साखर पडली असती असं मला वाटलं. पण एकूण नाट्यसंगीताची ही मैफील दमदार झाली. भाग २ होता स्थानिक कलाकारांचा भावगीतांचा कार्यक्रम. सुप्रसिद्ध सिनेस्टार जोडगोळी " सचिन आणि सुप्रिया पिळगावकर " निवेदन करणार म्हणून अपेक्षेने बसलेल्या प्रेक्षकांची निराशा झाली. कारण यात सचिन सुप्रिया चं " नच बलिये " फेम नृत्य (दोघं नाचले मात्र बेफाम!)आणि सचिनची दोन गाणी इतकाच त्यांचा "special appearance " होता ! केवळ एवढ्यासाठी त्यांना भारतातून निमंत्रित का केलं असा प्रश्न नंतरही बरेच लोक एकमेकांना विचारत होते.. परत ती दोन गाणीही म्हणे सचिननं प्रत्यक्ष गायली नाहीत... आधीच्या त्याच्याच आवाजातील recording वर lip-sync केली... पण संगीत मात्र live! पण ' सचिन सुप्रिया " कार्यक्रमाचं निवेदन करणार या जाहिरातीमुळे hall भरला होता! त्या गर्दीला " अशी ही बनवाबनवी " चा हा प्रयोग पाहायला मिळाला !! ( भारतातून इतके सारे कलाकार आणि वक्ते आणि पाहुणे निमंत्रित करण्याची गरज नाही असा एक मतप्रवाह प्रत्येक अधिवेशना दरम्यान ऐकायला मिळतो. कारण असं केल्यामुळे अधिवेशनाची बरीच पुंजी आणि नियोजनाचा बराच वेळ खर्ची पडतो. हा मुद्दा अगदी अयोग्य नसला तरी "quality control " साठी हे करावंच लागणार असं मला वाटतं प्रसंगी प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तरी! ) अशा रीतीने अधिवेशनाचा पहिला दिवस संपलादेखील. दुसर्या दिवशीही कार्यक्रमांची रेलचेल होती.. BMM awards , ऐलतीर..पैलतीर, स्त्री-रंग तसंच " नको रे बाबा " आणि " हे राम cardiogram " ही नाटकं बघायची होती. शिवाय झाकिरजींचा तबलावादनाचा कार्यक्रम हे प्रमुख आकर्षण होतच. यातलं काहीच चुकवणं तर शक्य नव्हतं आणि त्याशिवाय इतर काही कार्यक्रमही आकर्षक वाटत होते ! हे म्हणजे " देता किती घेशील दो करांनी "..... दुसरं काय!!
|
Pancha
| |
| Tuesday, July 10, 2007 - 12:55 am: |
|
|
माझ्यामते BMM मधे फ़क्त स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम असावे आणि महत्वाचे म्हणजे प्रवेश शुल्क भरमसाठ नसावे सचिन चा घसा खराब झाला असावा फ़ुकट चे खावुन Check: Sachin on cosy vacation to relax in seattle
|
Milya
| |
| Tuesday, July 10, 2007 - 8:54 am: |
|
|
हेम्स हार्दिक अभिनंदन एकांकिकेला बक्षीस मिळाल्याबद्दल छान ओघवते लिहित आहेस...
|
हेम्स छानच लिहीते आहेस गं एकदम. दोघं मिळून एकांकिका सादर करता म्हणजे मस्तच. आणि ती निवडली गेली म्हणून अभिनंदन. लिहीत रहा.
|
Chinnu
| |
| Tuesday, July 10, 2007 - 5:53 pm: |
|
|
हेम्स अभिनंदन! लिहीलेलं वाचून छान वाटलं.
|
Paragkan
| |
| Wednesday, July 11, 2007 - 12:50 am: |
|
|
हा मुद्दा अगदी अयोग्य नसला तरी "quality control " साठी हे करावंच लागणार असं मला वाटतं प्रसंगी प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तरी! >>>>> खरं आहे अगदी. केवळ स्थानिक लोकांचे कार्यक्रम असतील तर US, Canada मधले किती लोक एवढ्या दूरवर येतील? अधिवेशनाला जायचं की नाही हे ठरवताना सर्वात आधी 'कार्यक्रम पत्रिका' बघून कोण कोण नावाजलेले लोक आहेत हे पाहिलं जातं. हा आता अशा किती लोकांना बोलवायचं हा प्रश्न अधिक रास्त वाटतो. मला एक गोष्ट खरच समजत नाही, दरवेळी निवेदक म्हणून सुधीर गाडगीळना का बोलावलं जातं? स्थानिक, निदान US, Canada मध्ये कुणीच समर्थ नाही ते काम करायला? ( आहेत हे मला पक्कं ठाऊक आहे.)
|
Supriyaj
| |
| Wednesday, July 11, 2007 - 6:30 am: |
|
|
पराग, पण ह्यावेळेस काही अपवाद सोडले तर स्थानिक कलाकारांनी केलेले कार्यक्रम हे जास्त सरस होते अस जाणवलं. आणि आमच्या इथे बर्याच senior citizens चा पण हा आग्रह दिसला की पुढच्या वेळेस १-२ प्रोग्रॅमसाठीच भारतातून कलाकार बोलावले जावेत.
|
Zakki
| |
| Wednesday, July 11, 2007 - 12:05 pm: |
|
|
मी सिनियर सिटिझन आहे, गेली ३७ वर्षे न्यू जर्सीत आहे. मराठी विश्व चा पहिल्या दिवसापासूनचा मेंबर आहे. माझे असे ठाम मत आहे की नरेंद्र जाधव यांच्यासारख्या योग्य व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवावे नि बाकी कुणाला यायचे असेल तर इतर कलाकार जसे स्वत:चे पैसे खर्चून येतात नि विनामूल्य कार्यक्रम देतात तसे द्यावेत. पूर्वी ठीक होते हो. भारतात फार कमी वेळा जाणे व्हायचे, व्हिडिओ वगैरे नव्हते. आता तर इन्टरनेटवर पण काय पहायचे ते पहाता येते. शिवाय बरेचदा 'सुयोग' सारख्या संस्थांचे दौरे असतातच. त्याला भारंभार पैसे देऊन बघायला जायचे असेल तर जावे. पण सर्वांवर त्याची सक्ति कशाला? एव्हढेच असेल तर भारतात जाऊन बघा त्यांना! इथे कशाला भाराभर पैसे उगाच पाच मिनिटासाठी वाया घालवायचे? खरे खोटे माहित नाही, पण मागे आशा भोसले आल्या होत्या तेंव्हा त्यांनी 'म्हणे' खूप जास्त पैसे मागितले नि त्यामुळे पैसे कमी पडले. मागे एकदा लता मंगेशकर आल्या होत्या नि त्या पण इथल्या मराठी लोकांची निंदा करत होत्या. करायचे काय असले 'कलाकार'? पु. लं सारखे एखादेच. गेले बिचारे!
|
Zakki
| |
| Wednesday, July 11, 2007 - 12:07 pm: |
|
|
एक दोनदा मी गुजराति संमेलनांना गेलो होतो. पाच डॉ. शुल्क. बाकी ऐच्छिक. खाणे पिणे फुकट. कार्यक्रम कमी, फक्त गप्पा, लोकांना भेटणे. मला त्यात काही गैर वाटले नाही. वर्षातून एकदा अखंड उत्तर अमेरिकेतल्या लोकांनी एकत्र येऊन आपापल्या मित्रांना भेटावे, नव्या ओळखी कराव्यात, गप्पा माराव्यात. पुस्तके, कला यांचे स्टॉल्स लावावेत, झाले अधिवेशन. कार्यक्रम एरवी चालूच असतात.
|
मी पण अस ऐकल, की या संमेलनाला माधुरी दिक्शीत ला बोलावले होते पण म्हणे तिने तिच्या सकट सर्व कुटुंबाचा(ति, २ मुले, तिचे आई वडिल) येण्या जाण्याचा,राहण्या खाण्याचा व इतर खर्च अणी बरेच मानधन मगितले. हे सर्व BMM बजेट च्या बाहेर होते सो मग ते जमले नाही.
|
Hems
| |
| Monday, July 16, 2007 - 11:56 am: |
|
|
BMM awards साठी आपल्या " मायबोली " चं nomination गेलेलं आहे तेव्हा त्यावेळी आपण सगळे हजर राहू या असं सुप्रियानं सुचवलं होतं त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी आळस न करता आम्ही तिथे पोचलो. तरी नरेंद्र जाधव यांचं भाषण चुकलंच. दोन वर्षांपूर्वी जाधव बे एरियात आले होते तेव्हा त्यांनी भाषणात एकांगी आणि प्रखर सूर लावला होता. पण त्यावेळी त्यांच्या भाषणाचा विषय वेगळा होता या वेळी त्यांनी श्रोत्यांना चांगलंच प्रभावित केलं असं कळलं.त्यांच्याच हस्ते BMM awards देत होते आणि आम्ही ज्याची उत्सुकतेने वाट बघत होतो ते नाव पुकारलं गेलं ! मायबोलीच्या वतीनं पुरस्कार घेण्यासाठी समीर सरवटे व्यासपीठावर गेला. सुप्रिया फोटो काढत होती मीही माझा कमेरा सरसावला होता. सुप्रियाच्या चेहेर्यावरून अभिमान आणि आनंद ओसंडून वाहात होता. खरं तर तिचाही एक फोटो काढायला हवा होता पण तेव्हा एकमेकींना टाळ्या देण्यापुढे ते सुचलंच नाही! तिथे हजर होतो हे आमचं चांगलं नशीब. ही बातमी कळल्यावर सगळ्या मायबोलीकरांना किती आनंद होईल हे आमच्या मनात येत होतच. मानचिन्ह घेऊन समीर परतला तेव्हा ते निरखण्यात आम्ही मग्न होतो आणि एकदम मला आमचं नाव ऐकू आलं -- एकांकिकेसाठी पुरस्कार म्हणून आमच्या ' कला " संस्थेलाही मानचिन्ह देण्यात आलं .. आम्हाला याची काही कल्पनाही नव्हती !मायबोलीसाठी म्हणून वेळेवर पोचले तर हा " आकस्मिक लाभ " झाला ! अशा दोन दोन बक्षीसांमुळे डोळ्यावरची झोप उडून गेली आणि एकदम प्रसन्न वाटायला लागलं होतं ! नंतर पडदा उघडला तो " ऐलतीर पैलतीर " या कार्यक्रमासाठी. अटलांटातल्या गेल्या वेळच्या अधिवेशनामध्ये न्यू जर्सीच्या या theatrix या संस्थेचा कार्यक्रम खूप गाजला होता. या वेळी, बरेच दिवस इथे अमेरिकेत स्थायिक झालेले आणि नव्यानं आलेले भारतीय, त्यातही त्यांच्या दोन पिढ्या यांच्यातली दरी हळूहळू कशी मिटत जाते अशी theme होती. नाचांची choreography मस्त होती आणि नाच करणारे कलाकारही तिला न्याय देत होते. गीतं, निवेदन यात मात्र वैविध्य नव्हतं. तुलनेत गेल्यावेळचा कार्यक्रम उजवा होता असं वाटलं. दुपारच्या सत्रात एकाच वेळी, " नको रे बाबा " हे नाटक आणि " स्त्री रंग " असे कार्यक्रम ठेऊन संयोजकांनी पंचाईत करून ठेवली होती ! " नको रे बाबा " हे " ग्रिप्स " तंत्रानं केलेलं नाटक. मोठ्या माणसांनी लहान मुलांच्या भुमिका करून सादर केलेलं. रंगमंचावर न करता एका खोलीत प्रेक्षकांशी जणू संवाद करत करत या नाटकाचा प्रयोग तुफान रंगला. प्रेक्षकातल्या लहान मुलांना त्यांनी मुद्दाम खाली बसवून घेतलं होतं. सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे आणि सुभग ओक यांच्या प्रमुख भूमिका होत्या.. या तिघांनी लहान मुलांच्या भुमिकेत अक्षरश कमाल केली. उड्या मारणं, भांडणं ओरडा आरडा करणं हे सगळं चालू होतं लहान मुलांच्या energy level नी. सोनाली कुलकर्णी प्रत्यक्षात इतकी सडपातळ आणि लहानखुरी आहे की ती तर लहान मुलगीच वाटत होती. पण बाकी दोघंही " ग्रिप्स " मध्ये धोका असतो तसे " मतिमंद " न वाटता खरच लहान वाटत होते हे त्यांच्या अभिनयचं यश. आईचं दुसरं लग्न होतं, नवे बाबा घरी येतात आणि त्यांच्या चिडक्या आणि तुटक स्वभावाला मुलं कशी वठणीवर आणतात ही गोष्ट प्रेक्षकातल्या लहान मुलांना प्रचंड आवडली. माझी दोन्ही मुलं बेहद्द खुश आहेत नाटकावर. असा मस्त रंगत होता प्रयोग तरी त्याच वेळी खाली मेन स्टेजवर विजया राजाध्यक्षांचा कार्यक्रम कसा होत असेल असं मनात येत होतच. तेवढ्यात मध्यांतर झालं आणि त्या कार्यक्रमची स्तुती करत आमचा एक मित्र मुद्दाम सांगायला आला की थोडा वेळ तरी तो कार्यक्रम बघाच. मग आम्ही दोन तीन मैत्रिणी खाली धावलो. park hopper असल्यासारखं वाटत होतं मला! किंवा दोन चांगली पुस्तकं एकाच वेळी हातात आली की दोन्ही थोडी थोडी वाचत राहाण्याचा अधाशीपणा मी करते तसं काहीसं ! " स्त्री रंग " हा विजया राजध्यक्ष, अश्विनी भिडे आणि झेलम परांजपे या तिघींनी निवेदन नृत्य गायन यांच्या कोलाज मधून साकार केलेला अभिनव कार्यक्रम. विजयाबाई मराठी कवितांमधून स्त्री ची विविध रुपं कशी साकार झाली हे सांगत होत्या. त्यांचं निवेदन अभ्यासपूर्ण, संथ, शांत आणि तरी प्रभावी होतं अश्विनी भिडेंचा सूर नितळ लागला होता आणि झेलम परांजपे यांची नृत्यं तर खिळवून ठेवत होती. अतिशय लयबद्ध हालचाली आणि तंत्रावरची त्यांची पकड, शास्त्रीय नृत्याची काही समज नसणार्या मलाही जाणवत होती. विशेष म्हणजे या तीघींनी कुठलाही अभिनिवेश न आणता हा कार्यक्रम सादर केला. आपापल्या क्षेत्रात दिग्गज असणार्या या तिघी जणी -- त्यांना मुद्दाम काही आव आणायची गरजच नव्हती!! " नको रे बाबा " ची energy आणि त्यानंतर " स्त्री रंग " ची परिपक्वता हे दोन्ही अनुभव भिन्न होते आणि दोन्ही तितकेच उच्च होते! समुद्रकिनार्यावर वाळूमध्ये भरपूर पळून खेळून झाल्यावर पाण्यामध्ये पाय बुडवून शांतपणे लाटा घेताना वाटतं तसं वाटत होतं. नंतर चहा घेताना सर्वांचा एकमेकांशी याच विषयी संवाद होत होता. सगळे खुष होते कार्यक्रमांवर.... आणि सगळ्यांना संध्याकाळच्या सत्राचे वेध लागले होते. कारण त्यावेळचं उस्ताद झाकिर हुसेन यांचं तबलावादन
|
Ravisha
| |
| Monday, July 16, 2007 - 2:31 pm: |
|
|
hems,park hopper Can imagine that
|
|
|