Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 02, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » इतर कला » मी काढलेले फोटो » Archive through July 02, 2007 « Previous Next »

Chetnaa
Sunday, July 01, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी..
नाशिक जवळचे ते शिखर...
माझ्या माहिती प्रमाणे कळसू बाईचे शिखर( सुळका) आहे...


Shyamli
Sunday, July 01, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाशिक जवळचे ते शिखर.>>>>
अंकाईचा सुळका म्हणतात त्या शिखराला. अंकाई हे गावाच नाव आहे.

Bee
Monday, July 02, 2007 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेतना, मी जेंव्हा गीतांजलीनी विदर्भात जातो ना त्यावेळी मला हा सुळका नेहमी दिसतो. अगदी ट्रेनच्या खिडकीतून दिसतो आणि जवळपास १५ मिनिट तो प्रवास असतो. हा १५ मिनिटांचा प्रवास माझ्या सर्वात आवडीचा झाला आहे. म्हणून मी नेहमी दिवसाची ट्रेन घेतो. ह्या शिखराखाली एक सुंदरसे छोटेसे हिरवेगार गाव आहे. एकदोन चंद्रमौळी झोपड्या आहेत. हिवाळ्यात पहाटे, पेटलेल्या चुलीचा धूर, उगवणारा सुर्य, हिरवेगार कुरण आणि उंचच उंच सुळका ह्या सर्वांमुळे हे ठिकाण लक्षवेधी होते. खूप प्रवासी टक लावून बघतात खिडकून बाहेर. तसाही नाशिक भाग मला जास्त आवडतो प्रवास करताना. बर्‍यापैकी बागायती आहे ह्या भागात.

Bee
Monday, July 02, 2007 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, फोटोची साईझ खूपच कमी झाली खरच. पण पहिला प्रयत्न असाच असतो. त्यातूनच शिकावे लागते. मला वाटलं हे छायाचित्र leaning tower of PISA आहे की काय.. आणि ऐवढे चित्रपट काढणारे लोकं तुम्ही गरिबाचा ख़ॅमेरा काय म्हणतेस :-)

Zakasrao
Monday, July 02, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका फ़ोटो रिसाइज करण्यासाठी
http://www.shrinkpictures.com/
ही साइट बघ.
मृणल,मिनु आणि फ़दी मस्त फ़ोटो.


Ajjuka
Monday, July 02, 2007 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास,
अरे मित्रा, माझ्याकडे फोटोशॉप आहे. जे मी फोटोशॉप मधे करू शकते तेच तिथे केलं जातंय. परत फोटो एवढुस्साच.
बी,
चित्रपट काढण्याचा कॅमेर्‍आ असण्याशी काय संबंध बुवा? मी ज्यावर काढलाय तो खरंच गरीब कॅमेरा आहे. मोबाइल मधला. high end कॅमेरा नाहीये माझ्याकडे.


Bee
Monday, July 02, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, तुला फोटोंची साईझ कमी जास्त करण्यासाठी एक साईट देतो. तेथून तू ते s/w download कर. मी तेच वापरतो. मला ही माहिती बहुतेक चंद्या किंवा दिक्षितनी दिली होती. चांगले आहे हे s/w, called as Pic Sizer .
http://www.freedownloadscenter.com/Best/pic-sizer-free.html




Monakshi
Monday, July 02, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा आम्ही माथेरानला गेलो होतो तेव्हाचा फोटो, background ला दरी आहे पण ढग खाली आल्यामुळे ती दिसत नाहिये. त्या दिवशी संपूर्ण माथेरानवर ढगांचे साम्राज्य होते.



Phdixit
Monday, July 02, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शनिवारी विचित्रगड / किल्ले रोहिड्याला जाउन आलो त्या वेळेस काढलेले परिसरातील काही फोटो




Phdixit
Monday, July 02, 2007 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Phdixit
Monday, July 02, 2007 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



बाकिचे फोटो आणी व्रुत्तंत लिहिण्याचा प्रयत्न खालील लिंकवर आहेत

PHOTO


Cool
Monday, July 02, 2007 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ.दी. फोटो मस्त आहेत, आणि वृत्तांत सुद्धा

Lopamudraa
Monday, July 02, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़.दी. फोटो छान आहेत, म्रुणाल फोटो खुप सुंदर आहेत दुसरा फोटो तर खुपच छान. या वर्षी माझा मुलगा आल्प्स पर्वतात स्किईन्ग ला गेला होता त्याने देखिल असे हिम शिखरांचे सुंदर सुंदर फोटो काढलेत. पण मीच इथे टाकायचा कंटाळा केला. अजुन असतील तर टाक. अज्जुका फोटोशोॅप मध्ये तर तु फोटोचे वाट्टेल ते करु शकते

Karadkar
Monday, July 02, 2007 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sail Boat

शिपच्या केबिन मधुन घेतलेला सेलबोटीचा फोटो.
वेळ संध्याकाळी ५-५.३० ची. स्थळ LA प्रशांत महासागर.


Lopamudraa
Monday, July 02, 2007 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फोटो पण छाने!!!.. .. ..

Karadkar
Monday, July 02, 2007 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Ajjuka
Monday, July 02, 2007 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना. पण इथे ५०केबी च्या आतलीच फाईल टाकायचीये. आणि फोटोशॉपमधे तेवढी लहान केली की हे असं एवढुस्स चित्र येतंय. ह्या सगळ्या picsizer इत्यादींचा काही उपयोग नाहीये. इथे मुळातच resolution कमी आहे आणि ५० च्या आत बसवायला image size ही लहान केलाय.

Milindaa
Monday, July 02, 2007 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, गुगल चं पिकासा वापरुन बघ.

Ajjuka
Monday, July 02, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मित्रांनो... फोटोशॉप हे या सगळ्यांचा बाप आहे. तिथे मी पाहिजे तसे खेळू शकते. गेले ६-७ वर्ष मी लिलया वापरतेय फोटोशॉप. तेव्हा तो मुद्दा नाहीये. ५० केबी च्या आतली असून एवढ्या मोठ्या आकारात चित्र इथे कस काय दिसतं हा मुद्दा आहे.

Farend
Monday, July 02, 2007 - 9:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही हे विचारायचं होतं. मला एक दोन फोटो टाकायचे होते, पण ५० KB मधे बसवता thumbnail सारखे दिसू लागले म्हणून नाद सोडून दिला.

मूळ फोटोची साइज खूप मोठी असेल तर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा? मला जो टाकायचा होता त्याचा मूळ साइज साधारण 1.5MB आहे





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators