|
Slarti
| |
| Thursday, June 28, 2007 - 2:31 pm: |
| 
|
दाद, सुंदर ललित (परत एकदा). केवळ सुंदर. देणगी आहे. >>>एका जुन्या पुस्तकात हे सगळे भाषालंकार सुंदर मराठी, संस्कृत उदाहरणांसकट दिले होते. नाव आठवत नाही. ते पुस्तक म. रा. वाळिंबे यांचे. मराठी व्याकरणासाठी उत्कृष्ट संदर्भ आहे तो. स्वाती, अलंकारांच्या माहितीबद्दल मनापासून धन्यवाद. btw , खरा शब्द 'अध्याह्रत' किंवा 'अध्याहृत' असा आहे ना ? चू. भू. दे. घे.
|
Bsk
| |
| Thursday, June 28, 2007 - 4:15 pm: |
| 
|
ते पुस्तक मो.रा.वाळंबे यांचे.. फार सुंदर पुस्तक! दाद.. तुझे सगळे लेखन वाचले गुलमोहोरवरचे! पण कधी प्रतिक्रिया दिली नव्हती.. इतक्या सुंदर लिखाणाला प्रतिक्रिया तरी काय देणार! you are just too good !! प्लीज लिहीत राहा!!
|
Dineshvs
| |
| Thursday, June 28, 2007 - 5:11 pm: |
| 
|
दाद, लेख पुर्ण झाल्याशिवाय प्रतिक्रिया द्यायची नाही असे ठरवले होते. वर्गातल्या त्या प्रसंगात जबरदस्त नाट्य आहे. कुठलाही सामान्य कुवतीचा शिक्षक, या प्रसंगात असला पवित्रा घेऊच शकला नसता.
|
स्लार्टी, तुमचं बरोबर आहे. तो शब्द ' अध्याह्रत' असा लिहायला हवा. धन्यवाद.
|
Avikumar
| |
| Thursday, June 28, 2007 - 5:15 pm: |
| 
|
दाद, एवढंच म्हणेन, की तुझं लिखाण वाचल्यानंतर जो हेलावून जाणार नाही तो 'मनुष्य'च नव्हे. किती सहज आणि भावपुर्ण...... उपमा आणि द्रुष्टांत मधला फरक इतक्या सहजतेने समजावून सांगितल्याबद्दल सर्व जाणकारांना, विषेशत्: स्वातीला धन्यवाद. बाबामहाराज सातारकरांचे ज्ञानेश्वरीवरील प्रवचन ऐकताना हा प्रश्न मला नेहमी पडायचा. आता छान वाटतंय.
|
दाद,खरोखर सुरेख लिहितेस.सहज, तरिही मनात खूप खोलवर उतरणारं.लिहिती रहा. आणि अशा बाईंसारख्या सगळ्या " अभोगी " जीवांना नमस्कार माझा.
|
Disha013
| |
| Thursday, June 28, 2007 - 7:41 pm: |
| 
|
दाद,खुपच सुंदर!भ्ज ह्भ्ज ह्ब ह्ब ह्ब ज्क
|
Ksha
| |
| Thursday, June 28, 2007 - 8:34 pm: |
| 
|
दाद, काय बोलू!! खरंतर यांत तुझा अहंकार सुखावेल असे काही बोललो तर तुझ्या लिहिलेल्याचा काहीच परिणाम झाला नाही असे होईल ... पण वाचतां वाचतां डोळे कधी पाणावले ते कळलं नाही .. आणि प्रतिक्रिया आपसूकच लिहिली गेली. इतकं सुंदर व्यक्तिचित्रण, आणि तेसुद्धा आध्यात्मिक गाभारा असलेलं, मी तरी फार कमी वेळा वाचलंय. सातपुते बाई इतक्या सहज डोळ्यांसमोर उभ्या राहतात की आत्ता घरातून शांत पण ओजस चेहर्याच्या, प्रेमळ पण निःसंग बाई ज्ञानेश्वरांचा दृष्टांत समजावून द्यायला बकुळीने भरलेली परडी घेऊन येतील की काय वाटतं! अगदी चित्रपटांसारखं सर्व डोळ्यांसमोरून सरकतं आणि बाई जातात तेव्हा आंत, अगदी खोल हृदयांत, कुठेतरी चरका बसतो. या व्यक्तिरेखेबद्दल बोलायचं झालं तर अशा व्यक्तींबरोबर राहिलेल्यांचा सहवास मिळणेही भाग्याची गोष्ट असते. खुद्द त्या व्यक्तीचा सहवास मिळायला मात्र आपल्याला "बहूत पूर्व सुकृताची जोडी" असायला हवी! असो. तू कृपया हे सकाळ किंवा कुठल्याही वर्तमानपत्रांना पाठव. माझी खात्री आहे की हे नक्की छापून येईल आणि इतकं सुंदर लेखन जास्त लोकांना वाचायला मिळेल. ||सर्वेपि सुखिन सन्तु||
|
Daad
| |
| Thursday, June 28, 2007 - 9:58 pm: |
| 
|
दिनेशदा खरंय. मला स्वत:ला यातला वर्गातला प्रसंग आणि सुनंदाला दिलेला सल्ला हे खूप आवडले. सगळ्याच परिस्थितींत balanced रहाणं कठीण असतं. विषेशत: जेव्हा तुमचा अहंकार सुखावतो किंवा डिवचला जातो अशा दोन्ही वेळी.... परत एकदा सगळ्यांचे आभार. व्याकरणाची चर्चा घडवल्याबद्दल स्वातीचे तर खासच.
|
दाद, खूपच सुंदर लिहिल आहेस गं! आतापर्यंत तू मायबोलि वर लिहिलेले सगळे लेख वाचले अणी सगळेच मनाला भिडले. आता पुढच्या लेखाची वाट बघतिये आतुरतेने
|
Supermom
| |
| Friday, June 29, 2007 - 2:23 am: |
| 
|
दाद, केवळ अप्रतिम ग. फ़ार फ़ार सुरेख लिहितेस तू.
|
Princess
| |
| Friday, June 29, 2007 - 2:29 am: |
| 
|
दाद... दाद... दाद... दाद...शब्द शोधतेय तुझे कौतुक करायला... स्वाती, उजळणी करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
|
Zakasrao
| |
| Friday, June 29, 2007 - 3:54 am: |
| 
|
दाद तुझी एक से बढकर एक सीरिज सुरुच आहे. आता तुझ्या खात्यात साष्टांग नमस्कार आणि अप्रतिम हा शब्द कायम स्वरुपी deposit केले.
|
स्वाती.. thanks .. .. .. ..
|
Manjud
| |
| Friday, June 29, 2007 - 7:52 am: |
| 
|
दाद, अप्रतिम. हे काल्पनिक व्यक्तिचित्र आहे हे खरं वाटत नाही. मस्तच लिहिले आहेस. माझी शाळा अश्या शिक्षकांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे पण माझ्या दुर्दैवाने मला असे शिक्षक कधीच मिळाले नाहीत.
|
Shyamli
| |
| Sunday, July 01, 2007 - 11:04 am: |
| 
|
यातला वर्गातला प्रसंग आणि सुनंदाला दिलेला सल्ला हे खूप आवडले.>>> मलाहि सगळ्याच परिस्थितींत balanced रहाणं कठीण असतं. विषेशत: जेव्हा तुमचा अहंकार सुखावतो किंवा डिवचला जातो अशा दोन्ही वेळी.... >>> अनुमोदन ग ! अगदि खरय व्याकरणाच्या चर्चेसाठि स्वातिला धन्यवाद
|
Paragkan
| |
| Monday, July 02, 2007 - 1:36 am: |
| 
|
वा! लाजवाब लिहिलं आहे. अतिशय सहज आणि सुंदर लिखाण.
|
Jo_s
| |
| Monday, July 02, 2007 - 10:57 am: |
| 
|
शलाका सुंदर लिखाण, आवडलं सुधीर
|
Desh_ks
| |
| Wednesday, July 04, 2007 - 8:05 am: |
| 
|
दाद, सुंदर लिखाण! कळत नकळत आपलं अनुभवविश्व समृद्ध करून टाकणार्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 'भेटलेल्या' कितीतरी व्यक्तींच्या आठवणी जाग्या करणारं लिहिल्याबद्दल अभिनंदन! -सतीश सुधीर,या लिखाणाचा संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद. -सतीश
|
व्वा दाद! सुंदर लिखाण. डोळ्यांसमोर हळूहळू सगळे येउन स्वताच सगळं सांगून गेले. अगदी जीवंत. मेघा
|
मनाला भिडणारे, लेखन खूप आवडले.
|
Chinnu
| |
| Friday, July 06, 2007 - 3:46 pm: |
| 
|
स्वाती, फार फार धन्यवाद. दुव्याबद्दल आणि चर्चेबद्दलही. वैभव, शेर खुपच सुंदर आहे. डोळियांच्या देशा, वाह! माझे लाडके अलंकार, त्यावेळेसचे म्हणजे अनुप्रास अणि उपमा. कारण ते Explain करायला सोपे पडायचे ना! उत्प्रेक्षेचे उदाहरण का कुणास ठावूक नेहमीच कठीण वाटले आहे. शलाका, ते 'घुसडणे' इतके सहजपणे आणि प्रामाणिकपणे कबूल केल्याचे स-आश्चर्य छान वाटले! त्यामुळे इथे इतकी छान चर्चा घडली तरी. छान वाटले पुन्हा 'शाळेत' जावून! अशीच चर्चा घडून काही शिकायला मिळाले तर फार छान होईल.
|
किती वेळ विचार करत होते, काय लिहावे? शब्द अपुरे पडतायेत ... मनाला भिडल्यात बाई
|
|
|