|
Marawa
| |
| Saturday, June 23, 2007 - 4:06 pm: |
| 
|
किती कोडकौतुक..किती आनंद,उत्साह... नातलगांच्या जेवणावळी...लग्न कसं मजेत आनंदात झालं.मला तर माझा नवरा कुठे ठेऊ आणी कुठे नको असं करत होता. माझे सासू सासरे,आई बाबांची उणीव भासू देत नव्हते. माला माझा असा स्वतंत्र ब्लॉक सजावू दिलेला.आता मी आणी माझा नवरा अशा जगात मी वावरत होते. सगळ कसं मनासरखं होत होतं.छान नोकरी..छान नवरा..छान घर..मधून मधून माझा भाऊ येऊन मला कय हवं नको ते बघायचा.. या मझ्या सुखच्या संसारात... दुधात सखार म्हणून,एक दिवस अचानक मला बळाची चाहुल लागली.हे कळल्यावर मझा नवरा मला आणखीनच जपायला लागला..माझे सासू सासरे..आई बाबा माझे सगळे सोस..लाड पूर्ण करू लागले.. आता माझ्या बाळावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून मी चंगली पुस्तकं वाचू लागले,छान गाणी ऐकू लागले. जसे जसे महिने जात होते मला हळूहळू बाळाची जाणीव होऊ लागली.मझ्या घरच्यांनी मझी ओटी भरण्याचा कर्यक्रम ठरवला आणी तिच ओटी घेऊन मी माहेरी आले.घरा जवळच्या हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवणी झली.आता माहेरच ओटीभराणं ठरलं.माझ्या सगळ्या आत्या,मावश्या,काक्या सगळे मझी चौकशी करत होते..बहिणी-भाऊ चेष्टा करत होते..फोटो कढत होते. माझा भाऊ तर अगोदरच मामागीरी करात होता.हा सोहळाही व्यवस्थित पार पडला.माझ्या बाबांनी टाऊ.टीऊ अशा वस्तू बनवायला सूरवात केली.आईने नकोसे वटणारे डींकाचे लाडू,मेथीचे लाडू असे सोपस्कार सुरु केले. क्रमशः
|
Marawa
| |
| Monday, June 25, 2007 - 2:28 pm: |
| 
|
मला हे सुख तुच देत होतास ना देवा.एवढं भरभरून सुख देताना तुझ्या कुठच्या हातांत दुःखाची पुरचूंडी.ठेवली होतीस रे? ज्यावेळी मला सोनोग्राफीचा रिपोर्ट कळला..मी तर हादरुनचं गेले.माझ्या आई वडीलांना पाहीले. आणि मी समजुतदारपणाचा बुरखा पांघरला.माझा नवरा खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिला.'जे होईल ते पहायचे..धीर सोडायचा नाही' या त्याच्या वाक्याने मी येण्यार्या संकटाला सामोरं जायच ठरवलं.डॉक्टरांच्या साध्या चुकीने केवढा मोठा ब्रंम्हघोटाळा..नऊ महीने पूर्ण व्हायच्या आत डिलिवरी करणे आवश्यक ठरले.या सर्व गोष्टी मी तुझ्यावर सोपवल्या होत्या...कृत्रिम कळा देऊन निसर्गावर मात करणार्या या डॉक्टरांना नैसर्गिकतेची जाणीव नसेल कारे देवा!मला येणार्या जीवघेण्या कळा मी सोशीत होते.आणी असा मी मझ्या संजनाला जन्म दीला. क्रमशः
|
Marawa
| |
| Friday, June 29, 2007 - 2:48 pm: |
| 
|
मला छोटीला दखवण्यात आलं.. तीला बघताचं क्षणी डोळ्यासमोर काळोख आला..."छोटीला कमरेखाली मणकेच नव्हते जन्मतःच पांगाळी" चेहरा थेट माझ्या नवऱ्या सारखा...मी त्यावेळी रडूच शकले नाही.अश्रू एकदम गोठून गेले.डॉक्टरांच बोलणं ऐकु येत होते पण मनाचा वेध घेऊ शकत न्हवत.सगळे नातलग चिडीचूप.माझे आई-बाबा त्यांच्या जीवची चाललेली घालमेल मी अनूभवत होते. मझ्या ससूससऱ्यांची भयाणता मी बघत होते.पण मझ्या नवऱ्याची दयनीयता मी बघू शकत नव्हते.मझ्या बाळाला मी घेऊ शकत नव्हते,,पाहू शकत नव्हते.फक्त देवाकडे प्रार्थना करताना त्याच्याकडे काय मागू याचा विचार करत होते.अधून मधून आत बाहेर करतान लांबूनच मझ्या छोटीला सोळेभरून पाहत होते आणी दुःखाचे कढ आंतल्या आत जीरवत होते.हॉस्पीटल मधल्या नर्सच्या नजरा असह्य झाल्या होत्या.बळाला घेउन मी आईकडे घेऊन आले.दूधा तूपाच खऊन मला दूध येउ लगलं.बळं समोर असुन सुद्धा मी त्याला पाजू शकत नव्हते.माझी आई मात्र बळात पुर्णपणे गुंतली होती.छोटीला पुसणे,पवडर लावणे..देवापुढे ठेवणे,तीला पणी पाजणे.थेंब थेंब दूध पाजणे.रात्र झाली की आई गाढ झोपयची अशा या जीवघेण्या ओढीत तुला काय साधायचं होतं रे देवा! क्रमशः
|
Princess
| |
| Thursday, July 05, 2007 - 2:23 am: |
| 
|
चांगले लिहिते आहेस. का थांबलीस? लिहि ना... या सत्वपरिक्षेतून तू कशी बाहेर पडलीस?
|
Kanak27
| |
| Thursday, July 05, 2007 - 7:07 am: |
| 
|
आपण देवाच्या हाताच्या कठपुतल्या हेच खर
|
Marawa
| |
| Saturday, July 07, 2007 - 8:38 am: |
| 
|
माझा लग्नाचा वाढदिवस मी त्या परिस्थीतीतही साजरा केला.माझ्या नवऱ्याने तीला उचलून घेतलं.बापाचा स्पर्श जाणवला असावा तिला,माझी उब मात्र मी देवू शाकले नाही.मला तीचा लळा लागेल म्हणून तिला माझ्याकडे देत नसत.पण माझं मन मात्र तिच्याच भोवती घुटमळत असायचे.तिचे ते केविलवाणे डोळे मला निहाळत असतं,तिची ती चुरुचुरु फिरणारी जीभ मला असाह्य करायची.आई बाबांचे होणारे हाल..छोटीचं भवितव्य डोळ्यासमोर आले की मी सैरभैर व्हायचे.नऊ महीने उदरात बाळगलेल्या मझ्या बाळाची जगण्यासाठीची धडपड ..पुढील भवीतव्याच्या दॄष्टीने सर्वांनी केलेली प्रर्थना यांचा मेळ देवा तू ३० एप्रिल रोजी दुपरी ३ वाजून ४ मिनीटांनी साधलास. सुटला बिचारा जीव.आईकडून पुरेपुर सेवा करून घेतली व माझ्याकडे न पाहताच निघुन गेली.देवा असं काय केलं म्हणून मलाही शिक्षा दिलीस? जन्म दिलास काय नेलास काय!अशी कशी रे ही नाटकं खेळलास!माझं हरवलेलं आईपण मी शोधुतरी कुठे!देवा तु कधि आई झाला आहेस का रे? अरे माझे दुःख तेच तुझे दुःख ना..मझ्या सारखा तूहि आता बुरखा पांघर बाहेरुन सुखाचा आणि आतुन दुःखाचा. त्या दिवशी डॉक्टरांचं सर्टीफीकेट घेण्यासाठी हास्पिटलमध्ये नेत होते.हातात चिंगीचा मॄतदेह..अचानक एक गाण्याची लकेर कानावर आली..मेरी जान जा रही है...मेरि जान जा रही है.. समाप्त.
|
बापरे कोणाही आईवर हा प्रसंग येऊ नये.
|
Jaijuee
| |
| Monday, July 09, 2007 - 6:38 am: |
| 
|
एका आईवर हा प्रसंग आला आहे. पण धीराने पचवून आता ती पुन्हा एकदा आई झालीये. नव्या बाळीमुळे दु:ख कमी झालेय. कौतुक ह्याचे की हा व्रण घेऊन गोंजारत न बसता, ती परत एकदा धीराने आयुष्य जगतेय!
|
Daad
| |
| Monday, July 09, 2007 - 7:00 am: |
| 
|
खूप कठीण आहे हे. hats off to her
|
Princess
| |
| Monday, July 09, 2007 - 9:51 am: |
| 
|
मारवा, तू जे सहन केलेस ते खरोखर शब्दातीत होते. पण गेलेत ते दिवस... आता येणारा दिवस तुझ्या आयुष्यात फक्त आनंदच घेउन येओ, ही देवाला प्रार्थना. देव आई असतोच ग, म्हणुन तर त्याने तुला या दु:खाशी लढण्याची शक्ती दिली, हो ना?
|
Kanak27
| |
| Tuesday, July 10, 2007 - 11:31 am: |
| 
|
खुप अवघड आहे अस सल घेउन जगण. बर कलेस लिहलस ते त्याने मन थोड हलक होत.
|
|
|