Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मराठी गझल

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » काव्यधारा » मराठी गझल « Previous Next »

नमस्कार. मायबोलीचा आठवा दिवाळी अंक यावर्षी नोव्हेंबर मधे प्रकाशित होत आहे. या अंकासाठी आपले साहित्य पाठवण्यासाठी आपल्याला आमंत्रित करत आहोत. गुलमोहोरावर साहित्य प्रकाशित करणे थांबवत नसलो तरी कृपया ते इथे प्रकाशित करण्या ऐवजी दिवाळी अंकासाठी पाठवण्याचा जरुर विचार करावा ही विनंती. गुलमोहोरावर प्रकाशित न होणारे साहित्यच दिवाळी अंकासाठी ग्राह्य धरले जाईल याची कृपया नोंद घ्या. अंकासाठी साहित्य पाठवण्याविषयी अधिक माहिती येथे मिळेल.

Milya
Wednesday, October 03, 2007 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परत एकदा भीत भीतच एक गझल टाकायचे धाडस करत आहे. सांभाळून घ्यावे आणि मार्गदर्शन करावे...

वारूस यौवनाच्या नाही लगाम आता
चाऱ्यास चरस, गांजा, पाण्यास जाम आता

पाडाव पांडवांचा युद्धात का न व्हावा?
कॄष्णात जर तयांच्या, उरला न राम आता

पैसाच देव झाला, पैसाच धर्म झाला
पैश्यास पूजते ही जनता तमाम आता

हे सत्य स्वस्त झाले, लाचार अन अहिंसा
बापू तुम्ही नि तुमची, तत्वे निलाम आता

भगवान आजचा हा, भगवान तो उद्याचा
सूर्यास उगवतीच्या सारे सलाम आता

दु:खातही हसावे, जे सांगती दुज्यांना
सारी सुखे तयांच्या, चरणी गुलाम आता

लखलाभ हो तुम्हाला, दुनिया खुशाल तुमची
म्हणतो 'मिलिंद' माझा, घ्या रामराम आता

Shyamli
Wednesday, October 03, 2007 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या सर्वप्रथम तुझं अभिनंदन आणि धन्यवाद पण.
इकडे काही तरी का होइना हालचाल होईल या गझलमुळे :-)

वृत्त सांभाळल गेल आहे का नाही याबाबत मी न बोललेलच बरं :-)

मतला आवडला,
पाडाव पांडवांचा युद्धात का न व्हावा?
कॄष्णात जर तयांच्या, उरला न राम आता>> इथे काय म्हणायचय ते कळलं नाहीये.

भगवान आजचा हा, भगवान तो उद्याचा>> ?(म्हणजे कधी कोणी तर कधी कोणी असं म्हणायच का?)
सूर्यास उगवतीच्या सारे सलाम आता>>> हे कळलं:-)

बर मक्त्यामधे रामराम का बरं??? :-)



Milya
Wednesday, October 03, 2007 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामले गहन वगैरे अर्थ नाहिये काही...
पांडवांचा सखा कृष्ण... त्याच्यात काहीच 'राम' (दम) उरला नाहीये मग पांडवांचा पाडाव का नाही होणार? किम्वा होणारच.. असे म्हणायचेय मला....

भगवान शेराबाबत हो हो तुला जे वाटते तेच म्हणायचे आहे...


Sarang23
Wednesday, October 03, 2007 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! मिल्या, काही काही शेर वाचून मजा आली... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वेगळा काफिया बर्‍याच दिवसांनी वाचायला मिळाला! छान...!

पुढील गझल लेखनासाठी अनेक शुभेच्छा!


Chinnu
Wednesday, October 03, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या वाह वाह!... ...

Sampadak
Thursday, October 04, 2007 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



"नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या, ही तर दीपावली"


प्रकाश आणि चैतन्याचा उत्सव म्हणजे दिवाळी! आनंद आणि उत्साहाचे उधाण म्हणजे दिवाळी! प्रेमाचा आणि सौहार्दतेचा पुरस्कार म्हणजे दिवाळी! तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीची आणि संपन्नता, सौख्य व संस्कृतीच्या पावलांवर चालत येणारी दिवाळी आता जवळ येऊन ठेपली आहे. दिवाळीचे मुख्य आकर्षण म्हणजे आपल्या मायबोलीचा दिवाळी अंक. गेली सात वर्षं आपला अंक अधिकाधिक बहारदार होत चालला आहे. याचे पूर्ण श्रेय अर्थात मायबोलीकरांच्या प्रतिभाशाली योगदानाला आहे.

यावर्षीचा दिवाळी अंकही या परंपरेत एक पुढचे पाऊल ठरेल यात आम्हाला शंका नाही. अंकाची तयारी जोरदार सुरु आहेच. मायबोलीवरचे सर्व साहित्यिक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार, कलाकार, व्यासंगी आणि ज्ञानी सभासद दिवाळी अंकात उत्स्फूर्तपणे भाग घेतील व अंकासाठी आपल्या प्रवेशिका पाठवतील अशी आशा आहे. अशा या सर्वांना म्हणजेच तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून निमंत्रित करण्यासाठी ही एक आठवण. तुमच्या प्रवेशिका २४ ऑक्टोबर पूर्वी आमच्यापर्यत पोचल्या पाहिजेत. म्हणजेच येत्या वीस दिवसात!

तेव्हा, 'सावकाश लिहू', किंवा 'मनात आहे पण शब्दात नाही' यासारख्या विचारांना (वाचा सबबींना) थारा न देता लवकरात लवकर आपले साहित्य नवीन मायबोलीवर उपलब्ध असलेला "दिवाळी अंक लेखन" हा दुवा वापरुन पाठवा. आपले प्रश्न किंवा शंका संपादक मंडळाकडे जरुर पाठवा. धन्यवाद!


Bairagee
Thursday, October 04, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदराव, 'तमाम' आणि 'गुलाम' मस्त आहे. एकंदर गझल आवडली. येऊ द्या अजून.


Milya
Thursday, October 04, 2007 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सारंग, चिनु, बैरागी...
(आता जरा हायसे वाटले...)

जे आवडले नसेल ते ही सांगावे.. कुठे सुधारणा करता येतील ते ही... म्हणजे भविष्यात उपयोग होईल..

Bairagee
Friday, October 05, 2007 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदराव, कृष्णात राम खटकते. रामात राम उरला नाही असे हवे होते असे वाटते. मला असे काहीसे सुचवावेसे वाटते---
का हार रावणाची रामायणात व्हावी ?
रामातही जरासा उरला न राम आता



Milya
Monday, October 08, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बैरागी धन्यवाद.. मी ही आधी असा विचार केलेला

पण मला कॄष्णात राम न उरणे जास्त भावले... रामायण हे आदर्शवादी तर महाभारत हे बरेचसे वास्तववादाकडे झुकणारे आहे आणि आजच्या काळाला जस्त जवळचे आहे ...
महाभारतातील युद्धात कृष्णाने अनेक क्लुप्त्या (प्रसंगी ज्यांना नैतिक म्हणता येणार नाहित अश्या पण) लढवल्या... पांडवाम्ना विजय मिळवून देण्याकरता... पण त्याने सत्याची बाजू घेतली. त्या अर्थाने त्याच्यात एक रामाचा (आदर्शवादाचा) अंश होता आणि तोच उरला नाही तर कृष्ण हा कॄश्ण रहात नाही... ह्या अर्थाने मला तो जास्ती भावला...

चू. भू. दे. घे.

Vaibhav_joshi
Tuesday, October 09, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फार चांगला मुद्दा आहे मिल्या . बैरागींनी सुचवलेला शेरही आवडला मला पण कृष्णात राम नाही ही कल्पना मलाही खूपच appeal झाली होती .

गज़लचा प्रयत्न एकदम स्तुत्य आहे . आपण बोलल्याप्रमाणे तू गंभीर लेखनाकडेही वळतो आहेस ही आनंदाची बाब आहे . एक गोष्ट मात्र सुचवाविशी वाटते .

गज़ल मध्ये काफ़िया ला जे महत्त्व आहे त्याला तोड नाही . त्यामुळेच उत्तमोत्तम गज़लकार काफ़ियापर्यंत येईस्तोवर वाचकाला शेराचा शक्यतो अंदाज येऊ देत नसावेत ( असं माझं एक निरीक्षण ... ) आणि हे आपल्याला गज़लचं सादरीकरण किंवा गायन ऐकताना कळतं . सुरेश भटांचा एक शेर उदाहरण म्हणून पाहू ..

राहिले रे अजून श्वास किती
जीवना ही तुझी ............... " मिजास " किती

ह्या शेर मधलं " मिजास " ह्या शब्दाचं वजन आणि प्लेसमेंट बघून सुरेश भट का सुरेश भट होते ते कळतं .

तर हे एक पथ्य सहजासह्जी पाळता आलं तर सर्वांनीच पाळावं असं वाटतं .

उदाहरणार्थ

पैसाच देव झाला, पैसाच धर्म झाला
पैश्यास पूजते ही जनता तमाम आता

इथे

पैसाच देव झाला, पैसाच धर्म झाला
पैश्यास पूजते ..................

इथे पैसाच देव व धर्म झाला असं उला मिसर्‍यात म्हटल्याने तुम्हाला जे काय म्हणायचंय ते म्हणून संपतंच त्यामुळे जनता तमाम ला अपेक्षित वजन रहात नाही व केवळ काफ़िया च्या जागी काफ़िया असं आल्यासारखं वाटतं .

पु . ले . शु .


Giriraj
Tuesday, October 09, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा,उत्तम विवेचन...

.. .. ..

Milya
Tuesday, October 09, 2007 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव धन्स रे आणि मांडलेस खूप छान रे. पटले तुझे विचार...

तुम्हा सर्व लोकांमुळे दर वेळी नविन काहीतरी शिकायला मिळते..

सर्वांचेच परत आभार..

परत कार्यशाळा घ्यायचा काही विचार आहे का?

Devdattag
Tuesday, October 09, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्याला दुजोरा..:-)
या कार्यशाळेच्या निमित्ताने का होईना, काही लिहिले जाईल..:-)


Sanghamitra
Tuesday, October 09, 2007 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या गज़ल सुंदर आहे. मतला, मक्ता आणि कृष्णाचा शेर विशेष आवडला. सगळ्याच शेरांम्धल्या कल्पना छान आणि सहज आहेत.

Kedarjoshi
Tuesday, October 09, 2007 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गझल आवडलीच. पण वैभव जोशी चे उदा जास्त आवडले. काही तरी शिकल्याचा आनंद झाला.

Chinnu
Tuesday, October 09, 2007 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरुजी, खुप सारे धन्यवाद. शब्दांचे वजन व्यवस्थित लक्षात आलेय.
कार्यशाळेच्या बाबतीत मिल्या आणि देवाला तिजोरा..


Daad
Wednesday, October 10, 2007 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या सही आहे, गज़ल.
अगदी खर्रंखर्रं सांगायचं तर मतला, मक्त्या पेक्षा मधले शेर जास्तं आवडले.
कृष्ण, रामाचा शेर खरच सुंदर. 'आता काही राम राहिला नाही.....! ह्याचा इतका सुंदर वापर वाचण्यात नाही, जियो.
तसाच भगवानाचा शेरही.


Milya
Friday, October 12, 2007 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मे, केदार, दाद खूप खूप धन्यवाद...

अरे अजून कोणीतरी गझल लिहा बघु इथे...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators