Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
झुळूक

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » भाद्रपद » काव्यधारा » झुळूक « Previous Next »

नमस्कार. मायबोलीचा आठवा दिवाळी अंक यावर्षी नोव्हेंबर मधे प्रकाशित होत आहे. या अंकासाठी आपले साहित्य पाठवण्यासाठी आपल्याला आमंत्रित करत आहोत. गुलमोहोरावर साहित्य प्रकाशित करणे थांबवत नसलो तरी कृपया ते इथे प्रकाशित करण्या ऐवजी दिवाळी अंकासाठी पाठवण्याचा जरुर विचार करावा ही विनंती. गुलमोहोरावर प्रकाशित न होणारे साहित्यच दिवाळी अंकासाठी ग्राह्य धरले जाईल याची कृपया नोंद घ्या. अंकासाठी साहित्य पाठवण्याविषयी अधिक माहिती येथे मिळेल.

  Thread Posts Last Post
Archive through September 21, 200720 09-21-07  8:28 am
Archive through October 06, 200720 10-06-07  2:51 pm
Archive through October 11, 200720 10-11-07  5:38 am

Monakshi
Thursday, October 11, 2007 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओल्या मातीचा गंध आसमंतात पसरला
तुझ्या आठवणींचा मोरपिसारा मनी बहरला

शब्द आले पाखरांचे थवे बनुन

तुझे गीत गाण्यासाठी ओठी नाचती फेर धरुन


Rajya
Thursday, October 11, 2007 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोब्या, रुप्स चला परत बहरु दे झुळुक :-)

मोना :-)

आठवणींच्या गंधात तुझ्या
मन हे पिसाट झाले
शब्द मुके झाले
फक्त ओठ थरथरले


Rupali_rahul
Thursday, October 11, 2007 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स गोबुदा, राज्या....
मोना सुरेख...

मुक्या शब्दांनी अशीच
मुक्यानेच साद द्यावी
आणि आठवणींच्या गंधाने
त्याला भरभरुन दाद द्यावी...

रुप


Mi_aboli
Thursday, October 11, 2007 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


माझा हा झुळुकवर पहिलाच प्रयत्न..:-)

आठवणिंच्या जगात
शब्दांनि साथ सोडलि
पन सोबतिच्या प्रतिक्षेत
या नयनांनि अश्रु ढाळली...


Monakshi
Thursday, October 11, 2007 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाव तुझे येता ओठी
मनीचा गुलाब उमलला
तुझ्या आठवणींचा भुंगा मग
भोवती गुंजन करु लागला




Bhramar_vihar
Thursday, October 11, 2007 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनात गुलाब उमलला असं केलं तर???

Monakshi
Thursday, October 11, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला ते मनरुपी गुलाब असं म्हणायचंय. म्हणून मनीचा गुलाब अशी उपमा दिलीये.

Ashwini_k
Thursday, October 11, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोना तुझी कॉपी मारते गं!

नाव तुझे येता ओठी
भावनांस भरती आली
तुझ्या आठवणींची लाट मग
मनाचा तळ ढवळून गेली


Rajya
Thursday, October 11, 2007 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोना, अशु छान :-)

आठवणी जाग्या करताना
थोडंसं मनाला समजवावं
इतरांचंही जग असतं
याचं थोडंसं भान ठेवावं


Itgirl
Thursday, October 11, 2007 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सगळे झुळझुळतायत नुसते :-)

आठवणी जाग्या व्हाव्यात,
जसे पाण्यात उठतात तरंग
उठतात, विरतात सतत,
पाण्याच अस्तित्व मात्र अभंग
:-)


Gobu
Thursday, October 11, 2007 - 4:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुप्स, ठान्कु!
मोना, अबोलि, अश्विनी, आय टी
राजा, ....
"वजन थोडं कमी कर"
ही ला मी समजावतो
किती लठ्ठ झालीय ही
याचं ही थोडं भान ठेवतो!

डाऍटींग, योगा करुन्ही
काहीही फरक पडत नाही
एकामागोमाग ऊपाय करुन
वजन कमी होत नाही!


"weight reduction" कसं चाललेय?
विचारल्यावर जाम भडकते
"तुम्ही दुसरी बायको करा"
ही चिडुन सुनावते!

सुखी संसारात भांडण हवेच
यासाठीच ही खोडी आहे
कोण म्हणंत वजन वाईट
अहो त्यात तर खरी गोडी आहे!"








Tiu
Thursday, October 11, 2007 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाव तुझे येता ओठी
कडा ही का पाणावली
काय झाले विचारता वदलो
डोळ्यात बहुदा धुळ गेली...


Tiu
Thursday, October 11, 2007 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवणी जाग्या करतांना
डोळे साथ देत नाही
कितीही समजावलं मनाला तरी
पाणी सरता सरत नाही...


Tiu
Thursday, October 11, 2007 - 11:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोनिका आणी राज्या...उचलेगिरी बद्दल sorry! :-)

Rajya
Friday, October 12, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्निल अरे काय रे, sorry कशाबद्दल, जे आहे ते आपलंच आहे की :-)

गोबु, मस्तच रे भो :-) ते काहीच्या काही कविता मध्ये टाक की :-)




Jagu
Friday, October 12, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नात धुंद असताना
डोळे तुझीच साथ देतात
पण जागेपणी मात्र
अस्तित्वाचा रंग दाखवतात.


Rajya
Friday, October 12, 2007 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय जगु :-) फार दिवसांनी दर्शन दिले :-)

स्वप्नात तुला पाहताना
श्वास माझा कोंडला
पापणीस बिलगुन अश्रु
मुकपणे रडला


Monakshi
Friday, October 12, 2007 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्रूंचे मोती गालावरुनी ओघळले
प्राणांच्या कुडीत मग त्यांना जपून ठेवले
कासावीस झाले जेव्हा मन तुझ्या आठवणींनी
हळूच कुडीत डोकावुनी त्यांस डोळे भरुन पाहिले





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators