Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
काहीच्या काही कविता ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » काव्यधारा » काहीच्या काही कविता « Previous Next »

Aaftaab
Monday, August 20, 2007 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


इकडचं विश्व वेगळं, तिकडचं वेगळं..
एक भिंत तर आहे जी लांघायची आहे..
म्हटलं एवढं काय अवघड आहे त्यात,
ध्यास धरला की काहीच अवघड नसतं..

स्वप्नातच एकदा मार्ग सांगितला 'त्या'ने..
मग गेलो घनदाट जंगलाच्या आत,
ब्रह्मकमळ उमलण्याची उगानुयुगे वाट पाहून एकच उमलती पाकळी खुडून आणली,
समुद्राच्या खोल खोल तळात जीवाच्या आकांतानं डुबकी मारून एक नवजात मोती आणला,
घगधगत्या ज्वालामुखीतून एक ओंजळभर लाव्हा आणला,
मरतामरता वाचलो वाघिणीचं दूध आणि जहाल विषारी नागाचं वीष आणताना

हे सगळं मिसळून म्हणे सुर्योदयाच्या वेळी प्राशन करायचं,
...केलं
इतक्या जन्मांची इच्छा अखेर पूरी झाली,
इकडची दुनिया सुद्धा माहीत झाली,

मी इकडे सुखरूप आहे हे
सांगण्यासाठी, ही कविता!

आता पुन्हा तिकडे कसं यायचं हे शोधतोय

इकडचं विश्व वेगळं, तिकडचं वेगळं..
एक भिंत तर आहे जी लांघायची आहे..



Ajai
Friday, August 24, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेव्हापासुन पोलिस झाले 'टाईट'
पिणार्‍यांची अवस्था झाली अती वाईट

ओली पार्टी म्हणजे 'टिटोटलर'ला भाव असतो
सगळे आऊट झले कि तोचतर 'स्टीअरींग व्हील'वर बसतो

हल्लि 'विकएन्ड'ला सुद्धा घरिच बसतो
'ब्रेथ अँनालाईझर'घेवुन मामा स्वप्नात दिसतो

गटारितही दम नव्हता जणु श्रावणि सोमवार
टल्लि व्हायचे दिवस गेले आत्ता द्राक्षासवचा आधार


Desh_ks
Tuesday, August 28, 2007 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफ़ताब,
सुपर्ब! खूप आवडलं हे लिखाण!
"तिकडचं" अनुभवण्याची तगमग, "इकडची" ओढ, आणि त्या "...केलं" मधून प्रकटलेली त्या सार्‍यातली व्यर्थता. - वा! सारं किती सुंदर आलंय्! खूप छान!
खरं तर काही न बोलता या लिहिण्यातला अनुभवाचा प्रत्यय आपल्याशीच घ्यावा हेच उचित होईल असं वाटलं. कवितेच्या 'बीबी' वर का नाही टाकत?
-सतीश


Chinnu
Tuesday, August 28, 2007 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफताब, अफ़लातून जमली आहे कविता! मी इकडे सुखरूप आही.. :-)
अजय, ब्रेथ Analyzer घेवून मामा :-) :-), सही!


Shyamli
Sunday, September 09, 2007 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या सगळीकडे चाललेल्या जीटीजीच्या हवेमुळे सुचलेलं काही ,यात कोणासही दुखावण्याचा मानस नाही,सगळेजण खिलाडूपणाने घेतील ही आशा :-)

औंदा तरी जीटीजी करूया की रं

तीन चार तरी टाळकी जमूया की रं
औंदा तरी जीटीजी करूया की रं॥

एनजेकरांनी बगा लै गाजवला फड
झक्किंनी म्हन सोय केली फक्कड
आर आपन बी गाजावाजा करू या की रं
औंदा तरी जीटीजी करूया की रं॥१॥

बंगळुरातली पोरं बी लै हुशार
केला की वो जीटीजी जरी व्हती चार
आता माज बी जरा तुमी ऐका की रं
औंदा तरी जीटीजी करूया की रं ॥२॥

सिएकरांनी लै येळा घातला घाट
कित्यांदा जीटीजी ची लागली वाट
म्हनं,आता तरी थाटमाट करूया की रं
औंदा तरी जीटीजी करूया की रं ॥३॥

घरात, हाटलात कुटं बी खाऊ
जमवून आनलय कसं तरी भाऊ
लेकराबाळास्नि घेऊन समदे येवा की रं
औंदा तरी जीटीजी करूया की रं ॥४॥

हायेत सा-या गडकरनी चतुरच फार
महिन्यात जीटीजी करतात चार
म्हनं, पोरास्नी धन्याजवळ सोडा की गं
रोजच जीटीजी करूया की गं ॥५॥

श्यामली!

Maanus
Sunday, September 09, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि हि हि... मस्त जमलेय :-)

Farend
Sunday, September 09, 2007 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, सही, बघू आज सीए (बे) वाल्यांचं होतय का :-)

Psg
Monday, September 10, 2007 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचं तरी लई झ्याक झालं बगा..

मस्त श्यामले.. :-)


Milya
Monday, September 10, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही ही श्यामले.. लई झ्याक गं..


कंदीपास्न हे गान शोधुत होतो मी. कुटं गावलं गं

Mahaguru
Monday, September 10, 2007 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचं बी जीटीजी लै झ्याक झालं :-)

Shyamli
Monday, September 10, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मंडळी :-)
मिल्या, अरे आठवणितली गाणि मधे आहे हे गाणं

Kmayuresh2002
Monday, September 10, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामले,
एक gtg बहारिनला करुयात मग:-)


Psg
Monday, September 10, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महागुरु, आमचं 'बी' जीटीजी..
ते 'आमचं "बे" जीटीजी' हवं ना? :-)


Kandapohe
Monday, September 10, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त जमलय. विडंबन वर का टाकत नाहीस.

Farend
Monday, September 10, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम तो नागपूर चा नाही, उदगीर चा आहे, त्यामुळे 'आमचं बे...' म्हणणार नाही

Vaibhav_joshi
Monday, September 10, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफ़ताब , खूपच मस्त लिहीलं आहेस . माफ कर मी इकडे पाहिलंच नव्हतं . आज अचानक पोस्ट्स दिसल्या म्हणून वाचतो तर ... वाह ! आवडले

श्यामली .. विडंबन बीबी वर का नाही टाकलेस ? एकूण काय तर तुझा संचार सर्वत्र असतो हे सिध्द झाले
:-)


Shyamli
Monday, September 10, 2007 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, केपी, वैभव मला आधि वाटल होतं हे विडंबनात जाउ शकेल असं, पण त्या गाण्याचं (मात्रा बघता) बरोब्बर विडंबन आहे अस वाटत नाहिये म्हणून इथे.

एकूण काय तर तुझा संचार सर्वत्र असतो हे सिध्द झाले>>>> आता म्या पामरानं दुसरं काय बर करावं गुर्जी?:-)

एक gtg बहारिनला करुयात मग>> हो हो करु या की :-) कधि येताय सगळे? :-)


Abhija
Monday, September 10, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sahi jamlay shamli! :-)

लेकराबाळास्नि घेऊन समदे येवा की रं ....
he mala jamnaar nahee:-)


Monakshi
Monday, September 10, 2007 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामले, मस्तच गं धमालच लिहिलं आहेस. :-)

>>लेकराबाळास्नि घेऊन समदे येवा की रं ....
he mala jamnaar nahee:-)

अरे दुसर्‍यांची आण, ती कुठे म्हणतेय तुमचीच पाहिजेत म्हणून. :-)

दिवे घ्या हो. :-)


Lalu
Monday, September 10, 2007 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली
लै झ्याक जमलंय.


Swaatee_ambole
Monday, September 10, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आफ़ताब, कविता आवडली. काहीच्या काही मधे का?

श्यामली, विडंबन झकास. :-)


Abhi_
Tuesday, September 11, 2007 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामले लै झकास जमलंया!!

Shyamli
Tuesday, September 11, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा एकदा, धन्यवाद मंडळी :-)


Dineshvs
Tuesday, September 11, 2007 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, कालच वाचली होती. पण ते गाणे आठवायच्या नादात प्रतिक्रिया द्यायची राहुन गेली.
छान जमलीय.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators