|
Jo_s
| |
| Monday, July 23, 2007 - 5:22 am: |
|
|
तहान नाही भुक नाही कित्ती कित्ती वणवण वारकऱ्याना राहवेना सारखी त्याची आठवण मोठ मोठ्या रांगा केवळ त्याच्या साठी हुरहुर मनास वाटे हो मनी शंकांची दाटी राहवत नाही म्हणून म्हणे घेतली पोथी प्रत्येकास दिवस रात्र साऱ्यांना फक्त होता त्याचाच ध्यास वाचला वाचला मरणातून जणू जीव भांड्यात पडला हॅरी पुढे हरीचा भक्त वारकरी वेडा ठरला सुधीर
|
वा ... कन्सेप्ट मस्त आहे सुधीर
|
Badbadi
| |
| Tuesday, July 24, 2007 - 10:15 am: |
|
|
सुधीर मला खरंच कळत नाही लोकांच वेड.. हॅरी पायी!!!
|
पटली, अशा अनेक कविता याव्या..
|
Jo_s
| |
| Wednesday, July 25, 2007 - 3:41 am: |
|
|
वैभव, बडबडी, सुवर्णमयी धन्यवाद बातम्या वाचून अगदीच राहवलं नाही म्हणून उगाच आपल काहीच्या....
|
Princess
| |
| Thursday, July 26, 2007 - 12:16 pm: |
|
|
खुप दिवसापासुन एक गझल लिहिण्याचा प्रयत्न करतेय. ते करत असताना सुचलेली ही कविता मतला आहे, मक्ता नाही भाव आहे, शब्द नाही फुका कागदावरी शब्द सांडतो आहे किती तो शब्दच्छल मांडतो आहे मैत्री करणे गझलेशी सोपे नाही भावनेला समजावतो आहे रात्रंदिन मी शब्दराज्यात हिंडतो आहे युगे लोटली,लगागाशी भांडतो आहे खुळ्या, गझलेची जमीन तयार नाही तू साकीलाच "मय" पाजतो आहे लिहुनी पुन्हा पुन्हा खोडतो आहे शब्दास शब्द परी जोडतो आहे एक गझल लिहुन वेड्या "राजकुमारा" "वैभव" स्वत:ला समजतो आहे.
|
Shyamli
| |
| Thursday, July 26, 2007 - 12:19 pm: |
|
|
हे हे पूनम lol अरेच्चा सुधीर ही बघितलीच नाहि! खरय!
|
Mankya
| |
| Thursday, July 26, 2007 - 12:23 pm: |
|
|
Princess.. कविता छानच आहे, खरंय ! शेवटच " वैभव " तेवढं १०० % खरंय ! माणिक !
|
Jo_s
| |
| Friday, July 27, 2007 - 4:03 am: |
|
|
श्यामली धन्यवाद प्रिन्सेस, छान आहे
|
हाय पूनम, मस्त जमलिये. पण मग गजलेचं काय झाल??
|
Princess
| |
| Friday, July 27, 2007 - 5:47 am: |
|
|
श्यामली, माणिक, सुधीर, भ्रमा धन्यवाद. गझलेचे काय झाले... लिहुनी पुन्हा खोडतो आहे
|
Jo_s
| |
| Monday, August 06, 2007 - 6:05 am: |
|
|
डेज् पहाट झाली, गजर वाजला सूर्य अजून नव्हता उगवला थोडा वेळ कंटाळा केला सूर्य आजूनही नव्हता आला परत वेळ गेला थोडा सूर्याचा का अडला गाडा? शेवटी त्याला SMS केला "कारे? जास्त शहाणा झाला?" लगेच मोबाईल माझा वाजला त्याचा होता रिप्लाय आला "शहाण्या, जरा कॅलेन्डर बघ कुठे तू? कुठे चाललय जग? मदर्स, फादर्स, ब्रदर्स, सिस्टर्स स्टुडंट्स, टिचर्स, ..अर्स, ..अर्स फ्रेंडस्, डॉगज्, वुमन्स्, जेन्टस् ट्रॅडिशन, ऍडीशन, एन्व्हॉयर्नमेन्ट् पेट्रोलियम आणि टेक्नॉलॉजी व्हॅलेन्टाईन इत्यादी आजी माजी आहेकारे आज "डे" असा? डेच नाही तर उगवणार कसा?" "डे" शिवायही पूर्वी कसा साऱ्यांना मान होता सूर्यही, सूर्य मालेत स्थानाने महान होता आता म्हणे लागतील त्याला त्यांचे नियम पाळायला डेज प्रमाणेच वागायला पूर्वे कडूनच उगवायला पूर्वेकडूनच यायला लावण्यात एक कुटील डाव आहे उगवताच दिशा दिसावी पश्चिम जिचं नाव आहे सुधीर
|
Princess
| |
| Monday, August 06, 2007 - 8:53 am: |
|
|
ही ही ही... सुधीर मस्तय.
|
Gajanan1
| |
| Tuesday, August 07, 2007 - 4:27 am: |
|
|
उगवताच दिशा दिसावी पश्चिम जिचं नाव आहे.... छान....
|
Jo_s
| |
| Wednesday, August 08, 2007 - 3:39 am: |
|
|
प्रिन्सेस, गजानन धन्यवाद सुधीर
|
|
|