Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आजोळ ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » निज ज्येष्ठ » ललित » आजोळ ... « Previous Next »

Ksha
Wednesday, June 20, 2007 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजोळच्या वास्तूकडे किंवा प्रत्येक गोष्टींकडे बघण्याचे संदर्भ वयानुसार कसे बदलत जातात नाही?
कृष्णेच्या लांबलचक घाटांवर खेळताना लहानपणी वेळ पुरत नसे. आईचे कपडे धुवून झाल्यावर तिने हाका मारायला सुरूवात केली तरी तेव्हढ्यात तीन चार सूर मारूनच बाहेर निघायचो .. तो पाण्यात सूर मारल्यावर होणारा "धप्प्" असा आवाज, नदीवरच्या धुतल्या कपड्यांचा तो एक विशिष्ट वास ... ओलेत्या अंगानेच बाहेर पळत पळत येऊन काठावरल्या मंदिरात कोरड्या टॉवेलने अंग पुसता पुसता म्हटलेली रामरक्षा ...

आता मात्र त्याच काठावर शांतपणे बसून नदीकाठाचा परिसर न्याहाळताना वेळ कसा जातो कळत नाही. संध्याकाळी, "सूर्य डोंगरामागे कुठे जातो", या उत्सुकतेची जागा आता त्याने मावळतीच्या दिशेने फेकलेल्या रंगाची उधळण भान हरपून बघण्याने घेतली आहे ....

आजीच्या देवपूजेसाठी ती सकाळी सकाळी फुलं गोळा करून आणायला सांगायाची. मग पटकन आंघोळ करून, तिच्या फुलांची ती परडी घेऊन, आमची मिरवणूक दारातल्या चाफा जास्वंदीच्या जोडीपासून सुरू व्हायची. शेजारच्या संतूने चाफ्यावर चढायला शिकवलं होतं पण तो मला एकट्याला कधी चढून द्यायचा नाही. त्या पानाच्या आड दडलेली फुलं शोधून हातातल्या आकड्याने तोडायला मजा यायची ....
पारिजातक अगदी माजघराच्या खिडकीपाशीच होता.. त्याला शक्य तितक्या गदगदा हलवून, त्याच्या फुलांचा तो पडणारा पाऊस झेलून घेताना काय अप्रूप वाटायचं! मग पटापटा ती पडलेली फुलं वेचून आजीला नेऊन द्यायचो.
आता मात्र त्यातलं एखादंच फूल घेऊन त्याच्या नाजूक देठाने गालाला गुदगुल्या कराव्याशा वाटतांत .. चाफ्याच्या फुलांचा तो धुंद सुगंध कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात घेऊन जातो.

रात्री आजी सगळ्या मुलांना घेऊन परसात मऊ भात भरवायची. त्या भाताची चव काही वेगळीच असायची ... बहुतेक तिने तिच्या हाताने कालवलेला असायचा ना ... म्हणून. तिथे रातराणीच्या फुलांचा, गायीच्या शेणाने लख्ख सारवलेल्या परसाचा, नुकत्याच विझू विझू झालेल्या चुलीवर ठेवलेल्या वरणाचा आणि त्या भातावर ओतलेल्या तुपाचा अशा वेगवेगळ्या वासांचं एक मजेशीर मिश्रण असायचं .. मग तिथेच टाकलेल्या गोधडीवर अंग झोकून देऊन पोटभर गप्पा मारायच्या. खरंतर बहुतेककरून आजी, मावशी, दोन्ही माम्या आणि आईचं गॉसिप ऐकून तोंड झाकून खुदुखुदू हसत बसण्यातच जास्त मजा असायची. मग आईच्या मांडीवर डोकं ठेवून ती तेल लावत असताना चंद्राकडे बघत, त्याच्यावर तो ससा कुठे असेल हा विचार करत झोप कधी लागायची कळायचं नाही ...

आज त्याच घरात मोडकळीला आलेल्या माजघरातल्या झोक्यावर बसून त्याच्या खिडकीतून दिसणारा चंद्र जेव्हा बघतो, तेव्हा गोलसर चेहर्‍याच्या, गोर्‍यापान आजीचा चेहरा डोळ्यांसमोर येतो.
सकाळच्या पूजेतल्या सुकलेल्या चाफ्याचा वास मध्येच कुठेतरी दरवळतो आणि देवघरापाशी तेवणार्‍या समयांमध्ये तिच्या डोळ्यांतली माया तेवत राहते ...


Bee
Wednesday, June 20, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान उतरत गेली आजीची.. घराची.. नाना फ़ुलझाडांची.. आठवण..

Zpratibha
Wednesday, June 20, 2007 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजोळ. मनाचा एक हळवा कोपरा नाहि? छान व्यक्त केल्यात भावना.

Daad
Wednesday, June 20, 2007 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा! क्ष... आज्जीच्या आठवणी- दुधापेक्षा दुधावरल्या सायीला जपणारी आज्जी...
छानच उतरलीये....


Zelam
Wednesday, June 20, 2007 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे क्ष.
सुंदर गोष्टींच्या फक्त आठवणीच शिल्लक रहातात नाही?


Srk
Wednesday, June 20, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्ष, थंडीत आजीची गोधडी पांघरल्यावर वाटतं नं तस वाचताना वाटत राहीलं.

Sayuri
Wednesday, June 20, 2007 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sundar!!! khoop Chan mandlay.

Disha013
Wednesday, June 20, 2007 - 7:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्ष,सुंदर लिहिलयं. आजोळच्या आठवणींनी मनाचा एक कोपरा सतत व्यापलेला असतो रोजच्या व्यापात सुद्धा.


Ksha
Thursday, June 21, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद लोक्स! हो ... असंच मनाच्या कोपर्‍यात ठेवलेलं काहीतरी :-)

Jaijuee
Thursday, June 21, 2007 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुन्दर! आमचं आजोळ मुंबईत होतं तरी बरेच सारखेपण आहे. अनंताची फुले काढणे, चान्दोबा वाचत अख्खी दुपार झोपाळ्यावर काढणे, दारावर येणार्‍या शेंगदाणेवाल्याकडचे पावलीचे दाणे, आजीच्या हातचे मासे! आता आजोबा वारले, आजी मामाकडे असते. ते घर पण विकलं. फ़क्त उरल्या आठवणी! असे काही वाचल्यावर आवर्जून येणार्‍या!

Swati_rajesh
Monday, June 25, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

karech aajoli jaun aalesarashe vatate. Sundar lihilya aahet athavani.

Chhatrapati
Tuesday, June 26, 2007 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्ष, मस्त !
छान वाटंलं वाचून ...



Anjut
Saturday, July 14, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहेत आठवणी मस्त वाटल वाचून




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators