|
Dineshvs
| |
| Thursday, June 21, 2007 - 4:29 pm: |
|
|
नंदिनी, कुणी केलय का त्या मागच्या मानसिकतेचं विश्लेषण ? असे परत होवु नये, म्हणुन ते होणे आवश्यक आहे.
|
Pancha
| |
| Friday, June 22, 2007 - 1:42 am: |
|
|
"आर्कुट'वरील किलर कम्युनिटीमधूनच तो "किलर' बनला!
|
Shamli
| |
| Friday, June 22, 2007 - 6:50 am: |
|
|
hi news kuthe wchayala milel ........... kuni sangu shakal ka please
|
दिनेशदा, तेच तर मला अभिप्रेत आहे. इथे बरेच जण पालक आहेत. आपल्या मुलाविषयी ते कशाप्रकारची जागरूकता बाळगतात. खोटं नाही सांगत पण पाचवी सहावीची मुलं अश्लील फ़िल्म्स बघतात. सिगरेट दारु, ड्रग्ज. सगळं बोकाळत चालले आहे. यावर उपाय काय??
|
Pancha
| |
| Friday, June 22, 2007 - 3:46 pm: |
|
|
shamli, click on my link above
|
Dineshvs
| |
| Friday, June 22, 2007 - 3:46 pm: |
|
|
नंदिनी, मला तर ते व्हीडिओ गेम्स सुद्धा भयानक वाटतात. गोळ्या घाला, मारा, समोर दिसेल तो शत्रु त्याला खतम करा. चित्रविचित्र चेहरे, हिडिस मुखवटे. शांत सुंदर प्रसन्न, असे काहि दाखवताच येत नाही का ? कसला द्वेष आहे या पिढीत. कुणावर रोष आहे यांचा ? आत्ताच प्रा. राम शेवाळकरांचे पसायदानावरचे निरुपण ऐकत होतो. खळांची व्यंकटी सांडो वर त्यानी केलेले भाष्य, हेलावुन टाकणारे आहे. गीतेत कृष्णही दुर्जनांचा संहार करण्याचे वचन देतो. तिथे माऊली केवळ खलनायकांचे खलत्व गळुन पडो, असे मागणे मागतात.
|
Madhura
| |
| Friday, June 22, 2007 - 5:01 pm: |
|
|
त्या मुलाला आपण दत्तक आहोत आणि आपले खरे आई वडील वेगळे आहेत हे सत्य पचवता आले नाही म्हणे. अशा दत्तक मुलांच्या बाबतीत खरे तर काय करावे? त्यान्ना पहिल्यापासुन खरी परिस्थिति सांगावी का? कशा तर्हेने सांगावी? teen age मधे बाहेरुन कुठुन कळले तर problem होउ शकतात. मी असे एक उदाहरण ऐकले होते कि मुलगा अतिशय लहान असताना आई गेली.आपली आई सावत्र आइ आहे हे मुलाला १५ व्य वर्षी कळले आणि तो एकदम बिथरल्यासारखा वागु लागला होता.
|
Ashwini
| |
| Friday, June 22, 2007 - 5:15 pm: |
|
|
नंदिनी, काय लिहिणार? एक प्रकारची बधिर, सुन्न अवस्था जाणवते आहे. मी ह्या विषयावर काहीही वाचले नाही, वरची pancha ने दिलेली लिंक सोडून. त्यामुळे मला खरोखरच माहित नाही म्हणून विचारते आहे. जे झाले ते अतिशय निंद्य आणि क्लेशदायी कृत्य होते यात शंकाच नाही पण दिनेशनी म्हंटल्याप्रमाणे यामागची मानसिकता जाणून घेण्याचा प्रयत्न कुणी खरच केला आहे का? कुठे उजेडात आलय का, की त्या मुलाने खरच असे का केले असावे? फक्त आपण दत्तक आहोत हे आता कळले इतके साधे कारण याच्यामागे खरच असेल का? त्याच्या लहानपणी किंवा वाढत असतानासुद्धा child abuse कळत नकळत झाला असण्याची शक्यता आहे का? भारतात अश्या गोष्टी चटकन बाहेर येत नाहीत. तसे कायदेही नाहीत. दत्तक मुलांना protect करण्यासाठी social workers च्या visits इ. गोष्टी असतात की नाही माहित नाही. पण जर त्याचे लालन पालन मायेने आणि काळजी घेऊन झाले असेल तर तो केवळ सत्य कळल्याने इतका बिथरेल हे तर्कसंगत वाटत नाहीये. काहीही माहिती नसताना मला त्या आईवडिलांवर आरोप करायचा नाहीये. पण त्या मुलाने पण किती सहन केले असेल गोष्टी या थराला येईपर्यंत. कुणालाच त्याला समजून घेता येऊ नये ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ते जर योग्य वेळी घडले असते तर ही दुर्दैवी घटना कदाचित टळली असती.
|
अश्वीनी तुझा मुद्दा नक्कीच चांगला आहे पण हे फ्क्त भारता पुरते मर्यादीत नाही. child abuse, ADD अशा टाईपचे कारण खरच खरे असतात का? कायदा करने योग्य आहे पण कायदा केले म्हणजे सर्व संपते का? तसे असते तर मग अमेरिकेत जे हिडीस गुन्हे होतात (रोज पेपर, CNN ) वैगरे पाहीले की कळते मग ते थांबत का नाहीत. मला असे वाटते कायदा केला म्हनजे गुन्हे थांबतात असे नाही (आळा बसु शकतो पण त्याचे परंसेटेंज काढता येत नाही). बलात्काराचे, सुनेला न त्रास देन्याचे कायदे आहेत पण ते गुन्हे अजुनही होतातच. गरज आहे ती मानसीकता जानन्याची. केवळ चार शब्द जर एकाद्याला निट बोलले तर बर्याच गोष्टी टाळता येतील. जसे अति क्रुर व्हिडीयो गेम्स खेळायला देने. मी देखील max payne आणि Call of Duty वैगरे खेळले आहेत. ते जे रक्त 3d तुन उडते व ते जे रिफ्लेक्स दाखविले आहेत त्यामुळे मला देखील मळमळ होत होती. अर्धातुन सोडुन दिले. पण आजच्या मुलांना जर हे गेम खेळु दिले नाही तर you are not cool parents / or brothers etc ह्या अशा खेळातुन नक्कीच माणसिकता बदलते व प्रत्येक गोष्टीचे उत्तर हिंसेत सापडते. मग तो boy or girl next door पण असु शकतो. दुसरे कारण न्युक्लीअर फमीलीज. भरपुर पैसे असल्यामुळे व वेळ नसल्यामुळे मुलांना मनमानी करता येते, जर एकत्र कुंटुब पध्दत असेल तर मनमानीला खूप आळा बसु शकतो. आपल्या व मागच्या जनरेशस्न्स ला प्रश्न पडत न्हवते असे नाही पण आजु बाजुला पाहील्या वर उत्तर सापडत होते. पण ही जी नविन मुल आहेत (म्हणजे आज जी ० ते १५ वैगरे वयोगट) ही बरीशची एक एक्टी वाढली आहेत त्यामुळे त्यांना त्यांचा अफेअर्स मध्ये लक्ष दिलेले चालत नसावे. कदाचीत ह्यालाच आजकालची जनरेश्न matchure झाली असे म्हनत असतील. भारतात हे आत्ता होत आहे कारन एकत्र कुंटुब पध्दत काही वर्षांपुर्वी मोडीत निघालीये. अशी अन्के कारण असु शकतील पन हे जे विकृत स्वातंत्र्य मिळाले आहे ते जर कमी झाले तर कदाचित हे गुन्हे कमी होतील. त्या मुलाचा आई वडीलांनी त्याला दत्तक घेतले म्हणजे त्यांची त्याला मुला प्रमाने वागवायची मानसिक तयारी होती असे वाटते पण खरे काय ते माहीत नाही. पण मला तरी त्यांचा दोष जास्त नसावा वाटतय. त्या मुलाला कसे सम्जले व त्याने ते कसे घेतले ह्यावर बरेच काही असेल. एक पालक(असलेले वा होनारे) म्हणुन मात्र आपल्याला या घटनेतुन शिकन्या सारखे आहे.
|
Dineshvs
| |
| Saturday, June 23, 2007 - 4:10 pm: |
|
|
अश्विनी आणि केदार, तुमच्या दोघांच्या लेखनातुन जाणवले कि, सतत संवाद होणे जरुरीचे आहे. मनातले प्रश्ण विचारायला, शंकांचे निरसन करायला हक्काची माणसे आणि हक्काची वेळ पाहिजे.
|
|
|