|
Bee
| |
| Tuesday, June 19, 2007 - 3:49 am: |
|
|
आम्ही चौघीजणी म्हणजे मी, अंकिता, मोना, रुपाली संस्कृत शिकणार आहोत ह्याचा सर्वांना खूप आनंद झाला. आई, मावशी, आज्जी, आत्या, बाबा घरातील सर्वच जण मराठी माध्यमातून शिकलेले. त्यावेळेसचे शिक्षक देखील उत्तम व्याकरण शिकवणारे होते म्हणून कसे अस्खलित मराठी बोलतात आणि त्यांना संस्कृतही खूप चांगल कळतं. ह्या सर्वांसोबत मराठीत बोलताना मला किती सुचना मिळतात माझे मलाच माहिती. ही चुक ती चुक.. अधेमधे बरेच ईंग्रजी शब्द. घरातील सर्वांच्या कानाला जणू त्रासच. मला त्यांचा हेवा वाटतो. सर्वात जास्त आनंद झाला तो ह्यामुळे की सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांचे एक विद्यार्थी जे आज वयानी ९० आहेत ते मोफ़त आम्हाला शिकविणार होते. मला त्यांच्यापेक्षाही आजी खूप खूप आवडतात. सतत त्यांच्या चेहर्यावर बालकासारखं एक निर्व्याज हसू पसरलेलं असतं. त्यांच्याकडे गेले की हातात काहीतरी खाऊ पडतोच पडतो. मला फ़ुलांची आवड नव्हती पण त्यांच्यामुळेच फ़ुलांची आवड निर्माण झाली. पितळेच्या ताटात एक एक फ़ुल नीट लावून ठेवन. मधेच तुळशीच्या मंजिर्या. काय सात्विक वातावरण निर्माण करतात आज्जी खरच! .. आज एक आठवडा झाला संस्कृतचा वर्ग सुरू व्हायला. अंकिता मधेच गायब झाली. आता रुपालीही वर्ग सोडणार म्हणाली. आळसाशिवाय दुसर्घरी आई, आज्जी रोज आज काय शिकवल? कस शिकवल? विचारतच असतात. म्हणजे मला वर्गातून आल्यानंतर त्यांना सर्व सांगाव लागतं. दोघी जणी एकदम खूश. आठवीपासून पुढे अर्धे संस्कृत आणि अर्धे हिंदी मी घेणारच आहे. बहुतेक पुर्णच संस्कृत घेईल. पण आत्ता आहे ते तरी शिकू होऊन दे. मी मनाशीच बोलत राहिले. आजोबांचे ज्ञान एकदम वाखणण्याजोगे आहे. किती सुंदर असतात ना सुभाषितांचे अर्थ, त्यांनी शिकवलेले एकेक सुविचार. परत त्यांना इतक काही आठवतं तरी कस अगदी ह्या वयात ह्याचाही मला प्रश्न पडतो. दोघेही जण सुशिक्षित तर आहेच आहे सोबत सुसंस्कृत देखील. मला खूप आवडतो त्यांचा सहवास. उत्तम गुणांचा केवढा मोठा साठा आहे त्यांच्याकडे आणि अहंकाराचा लवलेश देखील नाही हे आणखी उत्तम. आज मी हृदय भरून घरी आले. आईने लगेच ओळखले की काहीतरी बिनसले माझे. मी आईशी कशी खोटी बोलणार, शक्यच नाही ते. म्हणाली, 'आई सर्व काही छान आहे ग, मला त्यांची कुस्तुती करवत नाही. सांगायला धीर लागतो गं पण तरी सांगते आजोबांना म्हातारचळ लागल आहे...' दुसर्या दिवसापासून मी परत ईंग्रजीचा मन लावून अभ्यास करू लागले. आजीच्या भेटीसाठी मन हेलकावले. जास्वंदीच्या फ़ांदीतून त्यांची आकृती दिसत होती तेवढीच मला परत आज्जी भेटत गेली. प्रत्यक्षात नंतर कधीच नाही.. समाप्त
|
बी, मझ्या डोक्यावर्रुन गेले सगळं. यामधली "मी" नक्की कोण आहे. म्हातारचळ म्हणजे काय म्हणायचं आहे? शाळेतलि एखादी मुलगी "कुस्तुती" "सात्विक" असे मोठाले शब्द वापरल का? आणि तुला जरा सविस्तरपणे लिहायला काय होतं? जरा फ़ुलवून नीट लिही. इथेच बघ ना.. आजोबाचं ज्ञान, आजीचा मोठेपणा यावर दोन दोन पॅरा लिहीलेस पण त्या मुलीची मानसिक स्थिती किंवा त्यातून तिचं आईशी communicate होणं या गोष्टी येतच नाहीत. एका वाक्यात तू ते सगळी परिस्थिती संपवतोस. मी स्पष्त सांगते म्हणून रागावू नकोस. पण हे "ललित" कसं काय असू शकेल? ही तर कथापण नीट होत नाही. पण तरीही लिहत रहा. वाटल्यास हीच कथा परत एकदा वाच तटस्थ नजरेने आणि मग परत लिहून काढ.
|
Fadke
| |
| Tuesday, June 19, 2007 - 5:22 pm: |
|
|
Mona cha pudhe kay zala?
|
Slarti
| |
| Tuesday, June 19, 2007 - 7:04 pm: |
|
|
हे काहीच कळले नाही. शिवाय हे ललित मध्ये का ? ही तर कथा वाटत आहे.
|
"आळसाशिवाय दुसर्घरी आई, आज्जी रोज आज काय शिकवल? कस शिकवल? विचारतच असतात. " ह्या वाक्याचा अर्थ नाहि कळला.
|
Bee
| |
| Wednesday, June 20, 2007 - 2:44 am: |
|
|
नंदीनी, इथे 'मी' ह्या व्यक्तीचे नाव काय आहे हे गरजेचे नाही वाटले म्हणून मी ह्या 'मीला' नाव दिले नाही. ती आपली एक कथा सांगत आहे अशा पद्धतीने मला ही कथा लिहायची होती. मोनाचे पुढे काय झाले हेही सांगायचे गरजेचे नाही. 'म्हातारचळ' म्हणजे म्हातारपणी बुद्धीला आलेली विकृती. खूप खोलात सांगायला मला जमणार नाही. इथले वाचक परिपक़्व आहेत अशी माझी समज आहे. ललित मधे ही कथा अयोग्य झाली असेल तर क्षमस्व. नेमस्तकांनी जर ही कथा 'कथा' विभागात उचलून ठेवली तर ठिक नाहीतर त्यांना त्रास देण्याची माझी इच्छा नाही. ही कथा मी आधी वेगळी लिहिली होती. ती इथे टाकतो आहे. खाली वाचा. दोन्हीमधील कुठली नीट वाटते.. की दोन्ही बिघडल्यात? अभिप्राय कळविल्याबद्दल वाचकांचे धन्यवाद. ----------------------------------------------------------- आम्ही चौघीजणी म्हणजे मी, अंकिता, मोना, रुपाली संस्कृत शिकणार आहोत ह्याचा सर्वांना खूप आनंद झाला. आई, मावशी, आज्जी, आत्या, बाबा घरातील सर्वच जण मराठी माध्यमातून शिकलेले. त्यावेळेसचे शिक्षक देखील उत्तम व्याकरण शिकवणारे होते म्हणून कसे अस्खलित मराठी बोलतात आणि त्यांना संस्कृतही खूप चांगल कळतं. ह्या सर्वांसोबत मराठीत बोलताना मला किती सुचना मिळतात माझे मलाच माहिती. ही चुक ती चुक.. अधेमधे बरेच ईंग्रजी शब्द. घरातील सर्वांच्या कानाला जणू त्रासच. मला त्यांचा हेवा वाटतो. सर्वात जास्त आनंद झाला तो ह्यामुळे की सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांचे एक विद्यार्थी जे आज वयानी ९० आहेत ते मोफ़त आम्हाला शिकविणार होते. मला त्यांच्यापेक्षाही आजी खूप खूप आवडतात. सतत त्यांच्या चेहर्यावर बालकासारखं एक निर्व्याज हसू पसरलेलं असतं. त्यांच्याकडे गेले की हातात काहीतरी खाऊ पडतोच पडतो. मला फ़ुलांची आवड नव्हती पण त्यांच्यामुळेच फ़ुलांची आवड निर्माण झाली. पितळेच्या ताटात एक एक फ़ुल नीट लावून ठेवन. मधेच तुळशीच्या मंजिर्या. काय सात्विक वातावरण निर्माण करतात आज्जी खरच! .. आज एक आठवडा झाला संस्कृतचा वर्ग सुरू व्हायला. अंकिता मधेच गायब झाली. आता रुपालीही वर्ग सोडणार म्हणाली. आई, आज्जी रोज आज काय शिकवल? कस शिकवल? विचारतच असतात. म्हणजे मला वर्गातून आल्यानंतर त्यांना सर्व सांगाव लागतं. दोघी जणी एकदम खूश. आठवीपासून पुढे अर्धे संस्कृत आणि अर्धे हिंदी मी घेणारच आहे. बहुतेक पुर्णच संस्कृत घेईल. पण आत्ता आहे ते तरी शिकू होऊन दे. मी मनाशीच बोलत राहिले. आजोबांचे ज्ञान एकदम वाखणण्याजोगे आहे. किती सुंदर असतात ना सुभाषितांचे अर्थ, त्यांनी शिकवलेले एकेक सुविचार. परत त्यांना इतक काही आठवतं तरी कस अगदी ह्या वयात ह्याचाही मला प्रश्न पडतो. दोघेही जण सुशिक्षित तर आहेच आहे सोबत सुसंस्कृत देखील. मला खूप आवडतो त्यांचा सहवास. उत्तम गुणांचा केवढा मोठा साठा आहे त्यांच्याकडे आणि अहंकाराचा लवलेश देखील नाही हे आणखी उत्तम. आई सांगत होती काल संध्याकाळी रुपाली, अंकिता ह्यांच्या आया येऊन गेल्यात घरी म्हणून आणि हे सांगता सांगताच तिने लगेच विषय बदलला. मी तिला विचारणार होते ह्या दोघींनी वर्ग का सोडला एकाएकी. मात्र एकदम बिचकूनच गेले आईमुळे. दुसरा दिवस उजाडला. आजीने नेहमीप्रमाणे उठ गं.. दप्तर भर गं असा गजर लावला नाही. आईने मला सोबत मंदीरात चल म्हंटले. त्या दिवसाचा माझा वर्ग बुडला. नंतर हप्ताभर काहीना काही कारणाने तिने मला जाऊच दिले नाही. मग म्हणाली आता वर्ग सोडुन दे. घरीच तुला मी शिकवते. मी बुचकळ्यात पडले हे असे का. माझ्या बालबुद्धीला हा प्रकार अजिबात झेपला नाही. नंतर काहीस अंधुक आठवतं की मोना, रुपाली, अंकिता ह्यांच्या आया आईसोबत काहीतरी कुजबुजत होत्या आजोबांबद्दल. माझी मुलगी अनघा, आज धावतच शब्दकोश घेऊन आली. म्हणाली आई 'म्हातारचळ' म्हणजे काय. तिच्या ह्या प्रश्नानी माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. संस्कृतचा वर्ग आठवला. आता मोठेपणी जुन्या गोष्टींचे खरे संदर्भ लक्षात येतात. आईनी माझे निरागसपण किती जपले होते. अनघाच्या गोबर्या गालावरून मी हात फ़िरवत तिचा मुका घेतला आणि हळुच शब्दकोश तिच्या हातातून सोडवून घेत तिच्याहाती आईचा अल्बम दिला. आईचे फोटो बघण्यात ती गुंग झाली.. समाप्त
|
Zakasrao
| |
| Wednesday, June 20, 2007 - 3:47 am: |
|
|
बी हे दुसर जे नंतर जे लिहिलस ना ते आधीच्या पेक्षा जास्त परिपुर्ण वाटत.
|
Viveki
| |
| Wednesday, June 20, 2007 - 9:43 am: |
|
|
हो रे झकास, मलापन दुसर्या व्हर्जनची डेप्थ दोन तीन इंच तरी जास्त वाटली. हे लेखन कथा मध्ये टाकायचे की ललितमध्ये या वादात न पडता अशा लेखनासाठी 'काहीच्या काही गद्य' असा नवा विभाग उघडावा.
|
Zelam
| |
| Wednesday, June 20, 2007 - 12:49 pm: |
|
|
बी दुसरं version पूर्ण वाटतं आणि मला तरी ही लघुकथाच वाटतेय.
|
बी गोष्टीला गोष्टपणा यायला जी लेंग्थ आणि थोडीफार वातावरणनिर्मिती लागते ती कमी पडतेय. एक चांगले कथाबीज अस्तित्वात आहे (जे तुझ्या मागच्या कथेत नव्हते.) ही एक सुधारणा आहे. पण ते फुलवले नाहीयेस अजिबातच. एकूणच वर्णन कमी पडतेय. दुसरे लेखन जास्त बरेय पण अजून मोठे हवे. आणि उगीच वापरायचे म्हणून भारदस्त दिसणारे चुकीचे शब्द नको वापरत जाऊ. 'कुस्तुती' हा काय शब्द आहे का? स्तुती हाच एक positive शब्द आहे. त्याला सु किंवा कु ची गरज नसते. सरळ सोपा निंदा हा शब्द उपलब्ध असताना ' कुस्तुती ' हा स्वरचित 'कु'चुकीचा शब्द कशाला?
|
Slarti
| |
| Wednesday, June 20, 2007 - 1:05 pm: |
|
|
संघमित्राला पूर्ण अनुमोदन. स्लार्टी
|
बरोबर संघमित्रा.. बी, अरे मोठे शब्द जितके कमी वापरु तितके जास्त चांगले. तुझे दुसरे व्हर्जन पण बरे आहे. मुळात कथाबीज फ़ुलवण्यात तू कमी पडतो आहेस. या कथेत तू एका शाळेत जाणार्या मुलीची कथा सांगत आहेस, पण तुझे अनुभव कुठेतरी कमी पडत आहेत. सातवीला शिकणारी मुलीचे भाव विश्वाचा तुला नक्की कसा अनुभव आहे. असा प्रसंग घडलेली व्यक्ती तुला भेटली आहे का? लिहीतानाशब्द महत्वाचे नसतात. अनुभव महत्वाचे असतात. आपण निर्माण केलेली पात्रं हे एक माणूस आहे. त्याला भूत भविष्य आहे, त्याचं अस्तित्व त्या कथेपुरतं मर्यादित नसतं (जरी वाचकापर्य्नंत या सर्व गोष्टी पोचत नसल्या तरीही.) तू म्हणतोस की इथले वाचक परिपक्व आहेत, पण हे गृहितक चुकीचे आहे. कारण तू शेवटपर्यंत नक्की काय घडले हे सांगत नाहीस. त्यामुळे "म्हातारचळ" एवढाच शब्द तू वापरला आहेस. आताविषय निघालाच आहे म्हणून सांगते... मला माझ्या एका कथेसाठी हाच विषय लिहायचा होता. मी नेटवरून माहिती गोळा केली. पण तरी मनासारखं काम होत नव्हतं. एकदा असंच पार्टीमधे " Truth or Dare " खेळताना सर्वानी आपापले "पहिले" अनुभव सांगायचं ठरलं. कित्येक मुलीनी घरात मामा काका दादा आजोबा इत्यादि व्यल्तीनी केलेले बलात्कार सांगितले. I was shocked आणि हो, कित्येक मुलानी सुद्धा त्याच्यावर झालेले अत्याचार या वेळेस सांगितले आहेत. ही आकडेवारी कुठेही प्रसिद्ध होत नाही. याबाबत कुणीही बोलत नाही. पण म्हणून या घटना चालूच राहतात. खूपच नाजुक असा हा विषय आहे. कित्येक आयुष्य उद्ध्वस्त झालेली मी पाहिली आहेत. तुझ्या कथेमधली मुलगी घरी आल्यावर आईला आधी "आजोबा" किती चांगले आहेत आणि तरेई त्याना "म्हातारचळ" लागला आहे असे सांगते. जर ही कथा प्रत्यक्षात घडली असती तर एक तर ती मुलगी मी ट्युशनला जाणार नाही याची कारणं देऊन गप बसली असती किंवा तिने आईला सांगितलं असतं. तिच्या आईन कपाळावर हात मारून घेतला असता आणि परत याबद्दल कुणाला बोलू नको असं दरडावलं असतं.... मी एवढं लिहीलं म्हणून राग मानो नकोस. मला वाटलं म्हणून मी लिहीलं. कारण मी स्वत्: रद्दड से रद्दड कथा लिहील्या आहेत आणि वर माझंच म्हणणं कसं बरोबर आहे यावर बॉसशी तासभर भांडले आहे (त्या कथा सध्या केराच्या टोपलीत आहेत) अजून म्हणावी तशी सुधारणा माझ्यात झालि नाहीत. पण सध्या दुसर्याच्या डोळ्यातलं "कुसळ" तरी दिसत आहे. तेवढीच प्रगती. राग मानू नकोस हीच विनंती. आवडलं नसल्यास तसेही सांग.
|
Asami
| |
| Wednesday, June 20, 2007 - 3:37 pm: |
|
|
पहिली कथा पूर्णपणे फ़सलेली आहे. दुसरीमधे पहिले दोन paras वाचताना खूप गोंधळल्यासारखे होते पण नंतरचा भाग नीट उतरलाय. एव्हढा strong विषय असल्यामूळे तुला अजून फ़ुलवायला scope होता , त्यामूळे थोडिसा गुंडाळून टाकल्याचा feel येतो. आणी खरेच उगाच नवीन शब्द तयार करून वापरू नकोस. साध्या सोप्या भाषेत लिहिणे तुला जास्ती चांगले जमते , तेंव्हा क्रुपया " गटणे " गिरी करू नकोस.
|
Mansmi18
| |
| Wednesday, June 20, 2007 - 4:26 pm: |
|
|
नमस्कार, मला कोणी "ललित"साहित्य आणि इतर साहित्य यात काय फ़रक आहे ते सान्गेल का?(गुलमोहर मधे ४ विभाग आहेत म्हणुन विचारतोय) पुलना एकदा "व्यक्ती आणि वल्ली" मधल्या व्यक्तीरेखाबद्दल विचारले होते कि या व्यक्ती तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्या आहेत का? त्यावर पुलन्चे उत्तर होते कि "हे प्रश्न ललित लेखनात सम्भवत नाहीत". म्हणजे "व्यक्ती आणि वल्ली ललित लेखनात येतात! एखादी कथा "ललितकथा" असु शकत नाही का? एखादा विनोदी लेख ललितलेख असु शकत नाही का? कुणी ललित लेखनाची व्याख्या सांगेल का? धन्यवाद.
|
Disha013
| |
| Wednesday, June 20, 2007 - 7:28 pm: |
|
|
बी,मला पण पहिल्यापेक्षा दुसरी कथा बरी वाटली. संघमित्रा,नंदिनीच्या म्हणण्याला अनुमोदन.
|
मनोज, मुद्द्याचा प्रश्न विचारलात. साहित्य हा माझा अभ्यासाचा विषय नाही, पण मला जे वाटतं ते मांडते. चुभूद्याघ्या. गद्य लिखाणाचे ढोबळमानाने कथा, माहितीपर लेख आणि ललित असे तीन प्रकार करता येतील. कथा म्हणजे ज्यात एखाद्या विषयाच्या निमित्ताने काही पात्रांच्या संदर्भातील काही विशिष्ट घटनाक्रम मांडलेला असतो. या घटनाक्रमाला एक निश्चित सुरुवात ( यात पात्रपरिचय, स्थळकाळाची माहिती), मध्य ( कथेचा मुख्य विषय स्पष्ट करणार्या प्रसंगांचं चित्रण, आणि शेवट (conclusion - त्या घटनांचे निष्कर्ष, रहस्यांचा उलगडा, इत्यादि) असतात. माहितीपर लेखांमधे एखाद्या विषयाबाबतची specific सांख्यिक माहिती वा संदर्भ दिलेले असतात. (facts and figures) . यात शैलीला महत्व नसतं, माहितीलाच असतं. ललित लेख हे प्रकरण कदाचित method of elimination ने define करावं लागेल. जे गद्य लिखाण वरीलपैकी दोन्ही नाही, ते ललित. यात कदाचित पात्र, घटना असतील, पण त्या घटनांच्या क्रमाला (chronology) महत्त्व नसतं. महत्त्व विषयाला आणि शैलीला असतं. तुम्ही ' व्यक्ती आणि वल्ली'चं उदाहाण दिलं आहे. त्यात त्या पात्रांची स्वभाववैशिष्ट्यं हाच लिखाणाचा विषय आहे. तेव्हा त्यात त्यांच्या आयुष्यात काय घडतं / घडलं यापेक्षा निवेदकाला त्यांच्या स्वभावात काय ' गंमत' दिसली हा भाग येतो. कथा, ललित हे दोन्ही सत्य किंवा कल्पित व्यक्ती आणि घटनांवर आधारित असू शकतं, तसंच दोन्ही विनोदी ढंगाने लिहीलं जाऊ शकतं. तर प्रवासवर्णनांमध्ये माहिती आणि लालित्य दोन्ही असणं परिणामकारक होतं. पुन्हा एकदा, माझा याबाबत अभ्यास असा नाही. कुणाला याहून वेगळी / चांगली माहिती वा मतं असल्यास जरूर सांगा.
|
Bee
| |
| Thursday, June 21, 2007 - 2:19 am: |
|
|
मला अभिप्रेत असलेल्या प्रतिक्रिया मिळाल्यात त्यांचा पुढे उपयोग होईल. तुम्हा सर्वांचे आभार. मला ही कथा एका पानापेक्षा अधिक वाढवायची नव्हती. अनुकरण वगैरे नाही पण मायबोलिवरील एकट्याच्या एकपानी कथा, मिसेस बर्वेच्या एकपानी कथा आणि इतरत्र वाचलेल्या एकपानी कथा मला खूप आवडल्यात आणि त्यांनी माझ्या मनात घर केले. त्या कथा अशा होत्या की वाचून जिथे संपतात तिथे वाचक क्षणभर सुन्न होतो. माझा तसा काहीसा प्रयत्न होता. लिहिताना मिळणार्या प्रतिक्रियांची भिती होतीच पण भितीला जवळ करणेही पटत नव्हते. असो.. परत एकदा सर्वांचे आभार.
|
Jaijuee
| |
| Thursday, June 21, 2007 - 10:37 am: |
|
|
कथाविषय रोजच्या जीवनातला, त्यामुळे नक्किच वास्तव! "मी"ला नाव नसलं तरी चालेल. थोड्याफ़ार फरकाने प्रत्येक मुलगी तिचं नाव तिथे घालू शकेल. मांडणी मात्र सुन्न करणारी नाहिये. पण तरीही दुसरी कथा पहिलीपेक्षा बरी! समाजातल्या अश्या घटनांबद्दलची नंदिनीची प्रतिक्रीया सर्वथा योग्य!
|
|
|