|
Desh_ks
| |
| Monday, June 25, 2007 - 5:09 am: |
| 
|
अगं अगं गोगलगायी, आधीच चालणं एवढं हळू; त्यात आणखी ओझं घेऊ नये पाठीवर, एवढंही नाही कळू?
|
Pujarins
| |
| Monday, June 25, 2007 - 8:09 am: |
| 
|
आज पुण्यातला पाऊस जरा थंबला आहे पण कृष्णमेघ पून्हा जमतील तू सोडू नको आशा जाॅनबरोबर पून्हा फ़िरु लागेल बिपाशा
|
अंकगणित.. अंकगणिताचा माझ्याशी नक्की काहितरी झोल आहे Life चित्रपटात ह्याला व्हिलनचा रोल आहे कोणी म्हणतं एक अधिक एक होतात दोन बेरजेच्या गणितात माझा मारे lower tone खरं म्हणजे वजाबाकीचाच हा खेळ आहे सारा इथे बात 'एकम'चीच हातच्यालाही नाही थारा भागाकारात बाकी किती हा प्रश्न गौण आहे भाजकाचे भाज्याशी कायमस्वरूपी मौन आहे गुणाकाराचं वागणं मात्र माझ्याशी अगदी नेक आहे गुण्य इथे कितीही असलं तरी गुणक मात्र एक आहे -देवदत्त
|
Shyamli
| |
| Thursday, July 05, 2007 - 6:44 am: |
| 
|
गुणाकाराचं वागणं मात्र माझ्याशी अगदी नेक आहे गुण्य इथे कितीही असलं तरी गुणक मात्र एक आहे >>क्या बात है रे.....
|
Mahe
| |
| Friday, July 06, 2007 - 10:11 am: |
| 
|
देवदत्त, खुपच छान जमलीय कविता! कविता अगदी अर्थपुर्ण वाटली, कवितेचे गणित जमलेय छान! भाग्यश्री
|
Kpramod
| |
| Sunday, July 08, 2007 - 12:00 pm: |
| 
|
वर्गमूळ अन् घनमूळाच्या पारंब्यावर मारा सूर ! ल.सा.वि. अन् म.सा.वि. च्या ओढ्यांनाही येईल पूर! kahichya kahich!
|
|
|