Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 14, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » काव्यधारा » काहीच्या काही कविता » Archive through June 14, 2007 « Previous Next »

Bee
Wednesday, May 30, 2007 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दारा खिडक्यातून
वार्‍याची झुळुक हळूच
चोरपावलांनी येते
नि सोबत आणते
हिरव्या चाफ़्याचा
बेधुंद करणारा परिमळ..

बिच्चार्‍या उपम्याची
कढईतील फ़ोडणी
मधेच विचार करते
हिंगकढीपत्ता घातला ना?
मोहरीजिरे पडले ना?
कांदा गुलाबी झाला ना?
आलेलसूण टाकले ना?
तोंडाला सुटलेले पाणी
सरकन आत वळते,
नाकातली शिंक दबून जाते

वार्‍याची झुळुत पुन्हा येते
फ़ुकटात उपमा खावून
उगाच चाफ़्याचा परिमळ
मला देऊन जाते..


Yogi1987
Saturday, June 02, 2007 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी महाकवी नाही
पण आजपासून थोड्या कविता इथे मिळतील
त्या गोड मानून घ्या
राग नसावा
लोभ असावा


Devdattag
Thursday, June 07, 2007 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अरे काय येताय रस्त्यात माझ्या?
निघालो खरा मीच शोधात माझ्या

म्हणे आठवांचा इथे गाव होता
कसा तोच नाहीच स्मरणात माझ्या

मला प्रीय ते खेळणे बाहुलीचे
किती रोज रडलेत डावात माझ्या

मिळाला कधी देव सांगेन त्याला
खरी चूक त्याचीच जगण्यात माझ्या

कुणी साप जे दंश देऊन गेला
कसे राहिले तेच अंशात माझ्या

मला मान्य नव्हताच मृत्यु कुणाचा
कुठे जन्म माझाच हातात माझ्या


Devdattag
Friday, June 08, 2007 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निघावे असे रोज नादात माझ्या
सदा फक्त संगीत डोक्यात माझ्या

तुझ्या मी घरा रोज देईन पोळी
तुझा सूर लागेल गाण्यात माझ्या

तसे मीच गातो गाणे स्वत:चे
परी त्रास झालाय नाकात माझ्या

बघा श्वान आलाय घालून टोपी
करा रिक्त जागा घराण्यात माझ्या

जुने कालचे गीत बंबात घाला
करा नाच ह्या खास ठेक्यात माझ्या


Shyamli
Friday, June 08, 2007 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे देवा त्या हिमेश ला दे पाठवऊन ही कविता :-)

Mankya
Friday, June 08, 2007 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली .. ग्रेट कॉमेंट ! ह. ह. पु. वा. !
हे वाचल्यावर त्याच्या तोंडातूनच काय पण नाकातूनही आवाज निघणार नाही !
देवा .. मस्तच !

माणिक !


Gajanan1
Saturday, June 09, 2007 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्ता सुन्दर कविता.. आशिक बनाया आपने..

Gajanan1
Saturday, June 09, 2007 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला गळा अन घसा तो कुणाला.
मला मात्र नाकी नवा सूर आला..

नको बासरी शेहनाई कशाला..
पहा आज नाकात हीमेश आला..

अरे सर्दिला आज औषध कशाला..
हिमेशी कृपे मार्ग तो स्वच्छ झाला..











R_joshi
Tuesday, June 12, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत हिमेश लाजेण चुर झाला. :-)


Aparnas
Tuesday, June 12, 2007 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाऊस

सुटे वारा असा बेभान आणि पिसाटते मन
धुंद बरसत येतो असा पाऊस पाऊस

त्याच्या तालात रंगून विश्व गेले मोहरून
कधी भुरूभुरू झरतो असा पाऊस पाऊस

मनी आठवांची दाटी डोळे गेले पाणावून
आणि झिम्मड झडतो असा पाऊस पाऊस

सप्तरंगांनी खुलते इंद्रधनूची कमान
नभ धरेस जोडतो असा पाऊस पाऊस

कधी पावसाची धून कधी श्रावणाचे ऊन
आणि सोनेरी सजतो असा पाऊस पाऊस



Gajanan1
Wednesday, June 13, 2007 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

APARNA VERY GOOD POEM.

Prasad_shir
Wednesday, June 13, 2007 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दारू आणि भारनियमन

अल्कोहोल हे इंधन आहे
हे तुम्ही ऐकलं असेल
आणि विजेचं भारनियमन आहे
हे तुम्ही अनुभवलं असेल

या दोन गोष्टींची सांगड घालून
एकच तुम्ही करत रहा
जेंव्हा, जसा वेळ मिळेल
शरिरार दारू भरत रहा....

(यानी काय होईल)

तुम्हाला जर मरण आलंच
तर इतकं नक्कीच साध्य होईल
विद्युत दाहिनीची वीज गेलीच
तरी दारूमुळे शरीर जळत राहील!!

अन पाण्यानी कुठलीही आग विझते
हे कधीही विसरू नका
म्हणून दारू नेहमी 'कोरी'च प्या
त्यात पाणी कधीही मिसळू नका!!

आणि कधी कोणी पिण्यावरून बोललंच
तर त्यांना सरळ सांगून द्या....
आधी भारनियमन कमी करा
मगच दारूबद्दल बोलायला या....!!
आधी भारनियमन कमी करा
मगच दारूबद्दल बोलायला या....!!!


Kmayuresh2002
Thursday, June 14, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे हे.. प्रसाद सही रे:-)

Rahulphatak
Thursday, June 14, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आंधळा मागतो एक डोळा, देव देतो गॉगल !

क्षणभराचे काम, युगायुगांचा विसावा
'देव' हा इसम बहुतेक भारतीय असावा !

गार्‍हाणी नेऊन त्याच्या दारी
मारे आपण हाकाट्या पिटतोय
तक्रारीची खिडकी बंद करून
हा आत चकाट्या पिटतोय !

'प्रोजेक्ट विश्व' पेलायची लायकी
ह्याचाच शेवटी प्रश्न उरतो
देवाच्या 'वर' कुणीच नाही, तर
त्याचे 'अप्रेजल' कोण करतो ?

हे विश्व म्हणजे काय 'पीमटी' आहे ?
की कुणीही भाड्याने चालवावी !
देवाच्या हातात किल्ल्या देऊन,
आपण आपली लाज का घालवावी ?

अश्या गोष्टी 'आऊटसोर्स' करून
कधीच फळ मिळत नाही..
आता बसा बोंबलत, देवाला
आपला ऍक्सेंट कळत नाही !

काही देवमाणसांकडून तो
थोडी माणूसकी घेईल काय ?
विश्वविधाता वगैरे राहू देत
साधा माणूस तरी होईल काय ?

त्याच्यावर ठेवू विश्वास, पण
त्याचा आपल्यावर बसेल काय ?
'गॉड ऍट वर्क' ही पाटी
स्वर्गात तरी दिसेल काय ?

देवांचे देवांसाठीचे ते राज्य
तीच तर त्याची लोकशाही !
वरवर लोकांसाठी सर्व अवतार
पण तो मूळचा पडला शेषशाही !

- राहुल फाटक



Rajya
Thursday, June 14, 2007 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रे राफा, 126748.gif
अजुन येऊ देत!! 126748.gif

Psg
Thursday, June 14, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है राफ़ा! मस्तच.

Himscool
Thursday, June 14, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राफा.. सही आहे एकदम...

Meenu
Thursday, June 14, 2007 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह ..! चांगला फटकारलास ..

Zakasrao
Thursday, June 14, 2007 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद आणि राफ़ा मस्त जमल आहे.
राफ़ा तुमची कविता देवाना पाठवुन द्या. मिनुच्या आजुबाजुला बरेच देव आहेत असतीच एकदा गडावर बोलली होती. :-)


Vinaydesai
Thursday, June 14, 2007 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त.. आज सकाळी सकाळी दोघेही.. दिवस मस्त सुरू झाला....





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators