Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
विडंबन

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » अधिक - ज्येष्ठ » विनोदी साहित्य » विडंबन « Previous Next »

Cool
Wednesday, May 30, 2007 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या बायडीस माझ्या

खरं तर 'या झोपडीत माझ्या' ही मूळ कविता माझी खूप आवडती आहे, पण विडंबन सुचत गेले आणि धैर्य गोळा करून पोस्ट करतो आहे. या विडंबना बद्दल तुकडोजी महाराजांची मनोमन क्षमा मागतो आहे. मूळ कविता
'या झोपडीत माझ्या' या दुव्यावर वाचता येऊ शकेल.

खादाड एका घरची , वारस शोभे त्यांची

पेहराव बारा इंची, या बायडीस माझ्या ॥१॥

खाटेवरी पडावे, 'बाई'स ओरडावे,

अन वेड नित्य खावे, या बायडीस माझ्या ॥२॥

खानावळीत जाई, चाखून सर्व पाही,

पैशाची पर्वा नाही, या बायडीस माझ्या ॥३॥

खर्चाने आली गरिबी, हे रत्न माझ्या नशिबी,

गांजून गेले धोबी, या बायडीस माझ्या ॥४॥

पोटात आणि ओठात, आजार नाही शरीरात,

सगळेच घास पचतात, या बायडीस माझ्या ॥५॥

खचले पलंग सोफे, खुर्ची दमून झोपे,

पाहता शिंपी कापे, या बायडीस माझ्या ॥६॥

खाण्याचे असू दे काम, मज वाटतसे प्रेम,

जपणार साती जन्म, या बायडीस माझ्या ॥७॥

- सुभाष डिके (कुल)





Zakasrao
Thursday, May 31, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खचले पलंग सोफे, खुर्ची दमून झोपे>>>>
मस्त जमलय रे

Mankya
Thursday, May 31, 2007 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

cool... जोरदार रे मित्रा ! सहीच जमलय विडंबन ! ह. ह. पु. वा. !
तसा बायडी हा शब्दच मस्त वाटतो !

माणिक !


Kandapohe
Thursday, May 31, 2007 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलराजे जबरीच जमले आहे रे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators