|
Jagu
| |
| Tuesday, May 29, 2007 - 6:23 am: |
|
|
नवी मुंबई मधिल उरण या शहरात आमची पाच एकरची वाडी होती. घरात माझे आई वडिल, आजी, मझा मोठा भाऊ आणि मी असे राहत होतो. घरात लहान असल्यामुळे मी सगळ्यांचीच लाडकी होते. मी पहिल्यापासुनच खुप धिट होते व आहे. मला कधिच भुतांची (विश्वास नसल्यामुळे), सापांची, माणसांची भिती वाटत नाही. मी राहायची ती वाडीच असल्यामुळे कधिही रात्री ९ ते १० वाजता पडलेले आंबे गोळा करण्यासाठी किंवा पाण्याचा पंप सुरु करण्यासाठी (वाडीत मळा असल्यामुळे पाण्याचा पंप घरपासून थोडा लांब होता) न घाबरता जायचे. मला भिती फक्त एकाच गोष्टीची वाटते, ती म्हणजे पावसाळ्यातील विजेची. ती कधी चमकली की मी रस्त्यात असो वा घरात ती बाकीचा परीसर सोडून फक्त माझ्याच अंगावर पडेल अशी मला भिती वाटते. मी १० वी मध्ये असतानाची ही गोष्ट आहे. रोज संध्याकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत तेव्हा माझी ट्युशन असायची. तेव्हा मी नेहमी सायकल नेच प्रवास करायचे. घरापासुन शाळा व ट्युशन चालत २० मिनिटांवर होती. पण पावसाळ्यात जास्त पाऊस असल्यावर मी चालतच जायचे. कारण जास्त पाऊस पडल्यावर आमच्या घरासमोरील मोठा विरा भरायचा आणि डोफ्या पर्यंत रस्त्यावर पाणी साठायचे. त्यामुळे पावसाळ्यात मला ट्युशन वरुन न्यायला माझे वडिल किंवा भाऊ यायचा.
|
Jagu
| |
| Tuesday, May 29, 2007 - 7:08 am: |
|
|
त्या दिवशी ट्युशनला जाताना पाऊस नव्हता. त्यामुळे मी सायकल घेऊन गेले होते. ट्युशन ची वेळ अर्धी झाली असताना अचानक जोराचा पाऊस चाऊ झाला आणि ढगांची गर्जना आणि विजेचा तांडव सुरु झाला. सगळी लाईट गेली आणि सर्वत्र अंधारच अंधार पसरला. ट्युशनच्या सरांनी मेणबत्या लाऊन सगळ्यांना ७ वाजता जिन्या वरुन खाली सोडले. खाली रस्ता होता, कसलाच आडोसा नव्हता. विज पडत असल्यामुळे माझी आधिच घाबरगुंडी उडाली होती. लवकर सोडलेले घरात माहित नसल्यामुळे (तेव्हा घरी फोन पण नव्हता) कोणी आपल्याला न्यायला येणार नाही हे माहीत असल्याने सर्व मैत्रिणी घरी जायला निघाल्या होत्या. बहुतेक त्यांना विजेची भिती वाटत नसावी. माझ्या गावात जाण्यासाठी माझ्याबरोबर माझी एक मैत्रिण होती. पण तिची साथ पाण अर्ध्या रस्त्या पर्यंतच होती. आता थांबण्यात काहीच अर्थ नव्हता. कारण ट्युशन लवकर सुटलेले आणि त्यातुन त्या दिवशी दादा घरात नव्हता आणि वडिल गावात मिटिंगला जाणार होते. पावणे आठ ला मिटिंग मधुन निघुन ते मला न्यायला येणार होते.
|
Ajjuka
| |
| Tuesday, May 29, 2007 - 7:23 am: |
|
|
hmm interesting.. mothe bhag tak.
|
प्राजक्ता, थांबलीस का? येऊ दे
|
Jagu
| |
| Thursday, May 31, 2007 - 7:36 am: |
|
|
तिथे थांबणे शक्य नसल्याने एका हातात सायकल आणि एका हातात छत्री धरुन मी मैत्रिणी सोबत घरच्या रस्त्याला निघाले. मला नकोशी वाटणारी विजच आम्हाला रस्ता दाखवत होती. मैत्रिण पावसाच्या धारा ज्या दिशेला पडत होत्या त्या दिशेला छत्रीची ढाल करुन लढत पुढे चालत होती, पण मी मात्र ज्या दिशेला विज चमकत होती त्या दिशेला छत्री धरत विजेबरोबर लपाछपी खेळत होते, जेणेकरुन ती विज माझ्या दृष्टीस पडणार नाहि. एकाच हाताने खेळताना माझी तारांबळ उडत होती. मन रमवण्यासाठी गप्पाही मारता येत नव्हत्या. थोड्याच अंतरावर मैत्रिणीचे घर आले. माझी धडपड पाहून तिने सायकल तिच्या घरी ठेवण्याची परवानगी दिली. त्यानुसार मी सायकल तिच्या घरी ठेवली आणि देवाचे नाव घेउन पुढच्या रस्त्याला निघाले. आता मी रस्त्याला एकटीच आहे हे जाणवू लागले. रस्त्यावरुन माणुस नावाचा प्राणीच नाहीसा झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वडाची मोठी जुनाट झाडे होती. जोरदार वार्यामुळे त्यांच्या फांद्यांचा किर किर आवाज होत होता. कोणतेही झाड किंवा फांदी तुटण्याची शक्यता होती. रस्त्यावर पाणीही जमा होउ लागले होते. विरा आणि रस्त्याची आता एकी झाली होती. विर्यात वाहत आलेले पायात अडकत होते. पण विजे पुढे ह्या सर्व गोष्टी मला क्षुल्लक वाटत होत्या.
|
Jagu
| |
| Thursday, May 31, 2007 - 9:16 am: |
|
|
आता माझा खेळ लपा छपी वरुन विष अमृत वर आला होता. विज चमकली की मी जागीच थांबत होते आणि ती नसताना अंगात जेवढे बळ असेल तेवढे एकवटून धावण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याच्याही आड साचलेले डोफाभर पाणी आणि विर्यातली जिन्नसे येत होती. विज कधिही आपल्यावर आक्रमण करुन आपली राख करेल हिच एक भिती होती. अंतरमनातून मी पुर्ण घाबरी घुबरी झाले होते. आज पर्यंतच्या आयुष्यात मी पहिलांदाच एवढी घाबरले होते. छातीची धडधड अजुन जोरात वाढली होती. थंडीने अंग गारठून गेले होते. आता मला माझे घर दिसायला लागले होते. तरी पण ते अजुन खुप लांब आहे असेच वाटत होते. इथपर्यंत येऊन तरी मी घरी पोहोचते की नाही ह्या शंकेने थैमान घातल होत. अखेर मी अंगणात आले अंगणामध्ये चिंचेच झाड होत. लहानपणापासुनच उंच झाडांवर विज पडते अस ऐकल्यामुळे ती आता झाडावरुन माझ्यावर पडेल असच वाटत होत. आणि शेवटची चढलेली घराची पायरी मला जशिच्या तशी अजुन आठवते (आमच्या घराला चारच पायर्या होत्या). त्या पायरीवर पाय ठेवला आणि लख्ख प्रकाश पडला. खुप जोरात आभाळ गडगडल. आता ह्या पायरीवर ती आली असे वाटुन मी पटकन आत शिरले. अशा प्रकारे अखेर मी हा विजेसोबत चा डाव संपवला (रात्री ७.०० ते ७.३५). वडिल अजुन आलेले नव्हते. मला अचानक बघताच आई आणि काकी धावत आल्या. मला जवळ घेतले. मला डोके पुसण्यासाठी टाॅवेल आणुन दिला. आणि वरच्या माळ्याच्या जिन्यावरुन अचानक माणसाचा आवाज आला जागू..., जागू...., जागू.... मी थोडीशी दचकले. कारण हा आवाज ओळखीचा नसुन आपलासाच वाटच होता. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. घरात काका सोडुन दुसरा कोणताही पुरुष त्यावेळी नव्हता. काकांची आजारपणात स्मृती जाउन ते अबोलच झाले होते. दोन्-तिन दिवसांनी मी आई आणि काकीच्या गप्पांमध्ये ऐकले. त्यांना पण तो आवाज ऐकू आला होता आणि तो आवाज माझ्या आजोबांचा होता. ते माझ्या जन्मापुर्वीच वारले होते. समाप्त.
|
Nilima_v
| |
| Friday, June 01, 2007 - 8:53 pm: |
|
|
He gosht khupach aawadli. Nahitar rastyawar busstopwar wagmayin bhashet gappa marnare lok. ekmekanshi formal bolnare aai/mule asha goshti aikun kantala aalela. Tuzi gosht khari wastaw watli. daad na pun wicharawese watle itki sundar tyanchi bhasha aahe pun nawra aani priykar yancha sanwaad itkya hindi, marathi serials madhun chotha karun zalela wishay ka niwadlaat
|
चांगली आहे हं गोष्ट... त्यातल्या त्यात शेवटचा twist!
|
Jaijuee
| |
| Wednesday, June 13, 2007 - 11:32 am: |
|
|
विशेष नाही आवडली कथा. थोडीशी विसविशीत आहे. कथा त्या मुलीची नि वीजेची अशी वाटत असताना आजोबा कुठून आले मध्येच? त्यामुळे पकड घेणारि कथा अगदीच हरवून जाते! आणि घर लहान असल्याने माणसे लाडकी कशी होतील? कुटुंब लहान असे म्हणयचेय का?
|
Jagu
| |
| Thursday, June 14, 2007 - 5:25 am: |
|
|
ही सत्य घटना मी लिहीली आहे. ही कथा लिहीली आणि त्याच दिवशी खरोखर जोर जोरात विजा चमकयला लागल्या. त्यामुळे मला आश्चर्य वाटले. आणि मला त्या दिवशी विजेची भितीही वाटली नाही. त्याच दिवसा पासून माझे सासरे आजारी पडले. त्यांना माईल्ड ऍटक आला होता. त्यामुळे मी एवढे दिवस रजेवर होते. आता ते बरे आहेत. अजुका, धुमशान, निलिमा धन्यवाद. जाईजुई मी घर लहान होते असे लिहीले नसुन मी घरात सर्वात लहान होते त्यामुळे मी लाडकी होते असे लिहीले आहे. मी पहिलांदाच माझा अनुभव लिहीला आहे. त्यामुळे कदचीत माझे लिखाण विसविशीत असेलही. जो मी शेवट केला आहे तो मी अनुभवला आहे. तुझ्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. मी सुधारण्याचा प्रयत्न करेन.
|
Jaijuee
| |
| Thursday, June 14, 2007 - 2:35 pm: |
|
|
खरच की ग! घरात असे लिहिले पण, मी ते चुकून घर असे वाचले... त्याबद्ल sorry !
|
|
|